The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Current
#EnB

🌹🌳🌴इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट, 2019🌴🌳🌹

👉30 डिसेंबर, 2019 रोजी केंद्रीय पर्यावरण आणि हवामानमंत्री प्रकाश जावडेकर यांनी "इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, 2019" जाहीर केला. हा अहवाल दर दोन वर्षांनी जाहीर केला जातो. 

👉या अहवालात वनक्षेत्र, जंगलातील वनस्पती घनता, वृक्षारोपण दर इत्यादींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

अहवालाची ठळक वैशिष्ट्ये

👉या अहवालानुसार देशाचे एकूण वनक्षेत्र (वन कवच) हे 7,12,249चौरस किलोमीटर आहे जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.67%आहे. 

👉देशाच्या झाडाचे क्षेत्रफळ सुमारे 95,027 चौरस किलोमीटर आहे जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 2.89% आहे.

👉भारतीय वन राज्य अहवाल, 2017 च्या तुलनेत यावर्षी देशाच्या वनक्षेत्रात 3,976 चौरस किलोमीटर (0.56%) वाढ झाली आहे.

सर्वात जास्त वृद्धी दर्शविणारे राज्य

1.कर्नाटक (1025 चौरस किमी),
2.आंध्र प्रदेश (990 चौरस किमी),
3.केरळ (823 चौरस किमी), 4.जम्मू-काश्मीर (371 चौरस किमी),
5.हिमाचल प्रदेश (334 चौ किमी) .

👉देशातील डोंगराळ जिल्ह्यांमधील वनक्षेत्र 2,84,006 चौरस किलोमीटर आहे, जे या जिल्ह्यांच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 40.
🌸🌸ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’🌸🌸

💧राज्याला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील पहिली संस्था सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या रूपात मुंबईत स्थापन झाली. राज्यातील कलाकारांनी कला क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लौकिक प्राप्त केला आहे. त्यानुसार, दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाºया ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

💧राज्यात दृश्यकला क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निष्ठेने कार्य करणाºया ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ दरवर्षी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असणार आहे.

💧तर हा पुरस्कार दृश्यकलेच्या एका ज्येष्ठ व नामवंत कलाकार यांना दरवर्षी, क्रमनिहाय प्रदान करण्यात येईल. त्यात अनुक्रमे रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला आणि कला व शिल्प (अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम, मातकाम, धातूकाम) या विभागांचा समावेश आहे.

💧तसेच या क्रमनिहाय येणाºया संबंधित कला विभागात पुरस्कारासाठी कलाकार यांची निवड न झाल्यास त्यानंतरच्या क्रमावरील विभागातील कलाकारांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल, असे निर्देश शासन निर्णयात नमूद आहेत.
#Current
#S&T

🔷कर्नाटकच्या NIT येथे ISROचे चौथे शैक्षणिक केंद्र

- अंतराळ क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी एक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कर्नाटक  राज्यातल्या सुरथकल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) याच्या परिसरात एक प्रादेशिक शैक्षणिक केंद्र उघडणार आहे.

- त्यासंदर्भात 3 जानेवारीला दोन्ही संस्थांमध्ये एक सामंजस्य करार झाला.

- NIT-सुरथकल इथले केंद्र हे ISROचे चौथे प्रादेशिक शैक्षणिक केंद्र असणार. इतर केंद्रे मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (जयपूर), गुवाहाटी विद्यापीठ आणि कुरुक्षेत्र विद्यापीठ येथे आहेत.

▪️केंद्राविषयी

- या ठिकाणी अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनुप्रयोगांमधील संशोधन आणि विकास कार्ये NIT सह संयुक्तपणे केले जाणार आहे.

- ISRO या केंद्राच्या कामकाजासाठी व प्रशासकीय खर्चासाठी वर्षाकाठी 2 कोटी रुपयांचे वार्षिक अनुदान देणार आहे.

- कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश असलेल्या दक्षिणेकडील प्रदेशात अंतराळ तंत्रज्ञानाच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र मदतनीस म्हणून काम करणार.

- भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या भविष्यातल्या गरजांसंबंधित क्षेत्रांमध्ये प्रगत संशोधन हे केंद्र करणार आहे.

- क्षमता बांधणी, जनजागृती आणि ISROच्या संशोधन व विकास कामांसाठी हे केंद्र एक दूत म्हणून काम करणार आहे.

- या केंद्रामध्ये NITचे प्राध्यापक आणि संशोधक तसेच भेट देणारे वैज्ञानिक आणि ISROचे तज्ज्ञ असणार. एक संयुक्त धोरण व व्यवस्थापन समिती या केंद्राच्या अंतर्गत चालणार्‍या उपक्रमांचे मार्गदर्शन करणार.

- या केंद्राच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पाच्या कालावधी दरम्यान संशोधन पाठ्यवृत्ती (फेलोशिप) देखील दिली जाणार.
#Current
#Polity

दिल्ली निवडणूक : तारखा जाहीर.
==============================
06 Jan 2020

● देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे.
● दिल्लीत ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.
● मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व सहकारी आयुक्त अशोक लवासा यांनी पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभेच्या ७० जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
● निवडणूक अधिसूचना मंगळवार, १४ जानेवारी रोजी काढली जाणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी आहे.
● २२ जानेवारी उमेदवारी अर्ज छाननीची अंतिम तारीख असेल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी आहे.
● मतदान शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी होणार असून, निकाल मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी घोषित होतील.
● दिल्ली विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारी रोजी संपणार असून, १३ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे अरोरा यांनी सांगितले.
● दिल्लीत २६८९ जागांवरील १३ हजार ७५० मतदान केंद्रांमध्ये मतदान होणार आहे.
● फेब्रुवारी, २०१५मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ७०पैकी ६७ जागा जिंकून इतिहास घडविला होता.
● नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सात जागा भाजप ने जिंकल्या आहेत.

● मतदान : ८ फेब्रुवारी
● निकाल : ११ फेब्रुवारी
● मतदार : १ कोटी ४६ लाख ९२ हजार १३६
● सैन्य दल कर्मचारी : ११ हजार ५५६
● एकूण मतदार : १ कोटी ४७ लाख ३ हजार ६९२
​​🤼‍♂ नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी 2020 🤼‍♂🏆

◾️६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेला 3-2 अशा गुणफरकाने पराभूत केले.

◾️ याचबारोबर महाराष्ट्राला यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळाला आहे.

◾️६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गादी विभागात हर्षवर्धन सदगीर याने तर माती विभागातून शैलेश शेळके याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

◾️महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात हे मल्‍ल एकाच तालमीतील म्हणजे काका पवारांचे पठ्ठे मैदानात होते.

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
महाराष्ट्र केसरी विजेते...👆

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
#Sports महाराष्ट्र केसरी ..👇

ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली.

सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली. २००८ पासून विजेत्यांना चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख रक्कम मिळू लागली. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा शेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.

२०१७ चा महाराष्ट्र केसरी किताब पुण्याचा अभिजित कटके याने मिळवला. मुंबईच्या नरसिंग यादव याने २०११ ते २०१३ असे सलग तीन किताब मिळवले तर २०१४ ते २०१६ चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी हा आहे.

2018 चा महाराष्ट्र केसरी विजेता बुलढाण्याचा बाला रफिक शेख हा आहे व उपविजेता अभिजित कटके आहे..

t.me/thempscupdate
#Current
तामिळनाडूमध्ये संगीत संग्रहालय :

* तामिळनाडू राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून तिरुवईयरू येथे देशातले पहिले संगीत संग्रहालय उभारण्यात आले आहे.

* कर्नाटकी संगीताचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व संत त्यागराज यांचे तिरुवईयरू हे जन्मस्थळ असल्याने या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे
#Current
डॉ. टेसी थॉमस :-

» त्यांना मिसाईल वूमन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते.
» बेंगळूरू येथे पार पडलेल्या महिला विज्ञान कॉंग्रेसमध्ये त्या प्रमुख अतिथी होत्या
» एरोनॉटिकल सिस्टम, डीआरडीओ च्या त्या महासंचालिका आहेत.
» टेसी थॉमस या भारतातील क्षेपणास्त्र प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम करणारी पहिली महिला वैज्ञानिक ठरल्या
» त्या भारताच्या अग्नि -IV क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
#Current
#EnB

🌹🌳🌴इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट, 2019🌴🌳🌹

👉30 डिसेंबर, 2019 रोजी केंद्रीय पर्यावरण आणि हवामानमंत्री प्रकाश जावडेकर यांनी "इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, 2019" जाहीर केला. हा अहवाल दर दोन वर्षांनी जाहीर केला जातो. 

👉या अहवालात वनक्षेत्र, जंगलातील वनस्पती घनता, वृक्षारोपण दर इत्यादींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

अहवालाची ठळक वैशिष्ट्ये

👉या अहवालानुसार देशाचे एकूण वनक्षेत्र (वन कवच) हे 7,12,249चौरस किलोमीटर आहे जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.67%आहे. 

👉देशाच्या झाडाचे क्षेत्रफळ सुमारे 95,027 चौरस किलोमीटर आहे जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 2.89% आहे.

👉भारतीय वन राज्य अहवाल, 2017 च्या तुलनेत यावर्षी देशाच्या वनक्षेत्रात 3,976 चौरस किलोमीटर (0.56%) वाढ झाली आहे.

सर्वात जास्त वृद्धी दर्शविणारे राज्य

1.कर्नाटक (1025 चौरस किमी),
2.आंध्र प्रदेश (990 चौरस किमी),
3.केरळ (823 चौरस किमी), 4.जम्मू-काश्मीर (371 चौरस किमी),
5.हिमाचल प्रदेश (334 चौ किमी) .

👉देशातील डोंगराळ जिल्ह्यांमधील वनक्षेत्र 2,84,006 चौरस किलोमीटर आहे, जे या जिल्ह्यांच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 40.
#Current #SnT

कर्नाटकाच्या छल्लाकेरे येथे अंतराळवीरांसाठी ISROचे प्रशिक्षण केंद्र उभारणार

अंतराळवीरांना मोहिमेसाठी सज्ज करण्याच्या हेतूने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कर्नाटक राज्यातल्या छल्लाकेरे या गावाजवळ जागतिक दर्जाची सुविधा देणार एक प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे.

कर्नाटकातल्या चित्रदुर्गा जिल्ह्यात बेंगळुरू-पुणे NH4 वरील छल्लाकेरे या गावाजवळ हे केंद्र उभारले जाणार आहे. हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.

ISROने या प्रकल्पासाठी 2,700 कोटी रुपयांचा एक आराखडा तयार केला आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच तेथे ‘योंग ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर’ देखील तयार केले जाणार.

सध्या, गगनयान अभियानासाठी भारतीय अंतराळवीरांना रशियामध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.
#Current #Awards #Goldenglobe

🔷1917’ चित्रपट ठरला सर्वोत्तम 

- गोल्डन ग्लोब पुरस्कारः जेकिन फीनिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता, रिनी जेलवेगर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

- अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरात गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी पार पडला आहे.

-या सोहळय़ात ‘1917’ या चित्रपटाचीच सर्वाधिक चर्चा राहिली आहे. चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर स्वतःचे नाव कोरले आहे.

- तर ‘जोकर’ चित्रपटाने दोन पुरस्कार प्राप्त करत गोल्डन ग्लोबमध्ये इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच एखाद्या कॉमिक बुक चित्रपटाने दोन पुरस्कार पटकाविले आहेत.

- जोकिन फीनिक्स यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. जोकरमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली होती. जोकर चित्रपटातील अभिनयासाठी जोकिन यांना  आता अत्यंत प्रतिष्ठेचा ऑस्कर मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

- अमेरिकन गायिका तसेच अभिनेत्री जूडी गारलँडचे पात्र साकारणारी अभिनेत्री रिनी जेलवेगर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

- ‘रॉकेटमॅन’च्या ‘आय ऍम गॉना लव्ह मी अगेन’ला सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार मिळाला आहे. ‘फ्रोजन 2’ आणि ‘द लायन किंग’ यासारख्या मोठय़ा चित्रपटांना मागे टाकून यंदा सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपटाचा पुरस्कार ‘मिसिंग लिंक’ने पटकाविला आहे.

- ‘वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड’करता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ब्रॅड पिटला मिळाला आहे. टॉम हँक्स, अल पचीनो आणि जो पेस्की यासारख्या दिग्गज अभिनेत्यांना ब्रॅड पिट यांनी मागे टाकले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक क्वँटिन टॅरेंटीनो यांना सर्वोत्कृष्ट स्क्रीप्लेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

- म्युझिकल-कॉमेडी श्रेणीत यंदा क्वँटिन टॅरेंटीनो याच्या ‘वन्स अपॉन ए टाईम’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडले गेले आहे. याच शेणीत ‘रॉकेटमॅन’साठी टेरॉन ईगर्टन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर याच श्रेणी अंतर्गत ऑक्वाफीना यांची ‘फेयरवेल’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड झाली आहे.

- टेलिव्हिजन सीरिजच्या म्युझिकल आणि कॉमेडी श्रेणीत फोब वॉलर ब्रिज यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळविला आहे. फोब यांना हा पुरस्कार ‘फ्लीबॅग’साठी मिळाला आहे. प्रियांका चोप्राने या सोहळय़ात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

▪️श्रेणी                       विजेता

▪️बेस्ट मोशन फिचर……… 1917

▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता…….. जोकिन फीनिक्स

▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री…….. रीनी जेलवेगर

▪️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक……… सॅम मेंडिस (1917)

▪️म्युझिकल कॉमेडी श्रेणी

▪️सर्वोत्कृष्ट चित्रपट………. वन्स अपॉन द टाईम…

▪️टीव्ही सीरिज अभिनेता.. रॅमी युसूफ

▪️लीमिटेड सीरिज आणि मोशन पिक्चर

▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता…….. रसेल क्रो

▪️सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज.. सक्सेशन

▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री…….. फोब वॉलर ब्रिज

▪️सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट पॅरासाइट (द. कोरिया)

▪️सर्वोत्कृष्ट गीत………….. आय ऍम गॉना…

▪️सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपट… मिसिंग लिंक

▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता          ब्रॅड पिट

▪️मोशन पिक्चर

▪️ओरिजिनल स्कोर……………..हिल्डर गुडनाडोटिर

▪️सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज………….चेर्नोबिल

▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री…….. पॅट्रिशिया आर्केट

▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री……लॉरा डर्न

▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता          स्टॅलन स्कार्सगार्ड

t.me/thempscupdate
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...

1. पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
2. मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख
3. मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे
4. ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
5. रायगड - श्रीमती आदिती सुनिल तटकरे
6. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
7. सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत
8. पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
9. नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
10. धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
12. जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
13. अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
14. सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
16. सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
19. जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
24. उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
25. लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27. अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34. गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
Forwarded from History by M.M.
हीनयान Vs महायान..👆👇

http://t.me/historymm