The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#Infographics : MiG-27

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

t.me/thempscupdate
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
प्राचीन भारत : शिक्षणाची केंद्रे..👆

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/historymm
State_Service_Preliminary_Ghoshana_04_01_2020.pdf
1.9 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019
(मागील वर्षाच्या)
» पदसंख्या व आरक्षणातील बदलाबाबत घोषणा
» आता 431 ऐवजी 420 पदांसाठी निकाल लागेल

लवकरच निकाल लागण्याची शक्यता..

t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M.
स्थापत्य आणि कला...👆

http://t.me/historymm
Forwarded from Vapu Kale (MADHUSUDAN N R P (Mahajan))
शुभ रात्री...!


व.पु.काळे यांच्या विचारांचा अमूल्य ठेवा असलेले हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी तुमच्या मित्रांना ही लिंक शेअर करा..👇👇👇
t.me/vapukale
#Infographics : अमेरिका-इराण तणावाची 40 वर्षे

t.me/thempscupdate
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पाहण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/37zjhzw


https://www.mahasamvad.in/2020/01/blog-post_5.html?m=1
The MPSC Update ©
https://m.economictimes.com/industry/energy/oil-gas/iraq-continues-to-be-indias-top-oil-supplier-imports-from-us-rises-4-folds/articleshow/69129071.cms
#Imp #Current
भारताला तेल (Crude Oil ) पुरवठा करणारे देश...( एकूण आयातीनुसार ) 2018-19..👇👇

1. इराक
2. सौदी-अरेबिया
3. इराण
4. UAE ( संयुक्त अरब अमिराती)
5. व्हेनेझुएला
6. नायजेरिया
7. कुवैत
8. मेक्सिको
9. अमेरिका


MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.👇

t.me/thempscupdate
मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवाना शुभेच्छा...
-------------------------------
आज दि. ६ जानेवारी. वृत्तपत्रसृष्टीत ६ जानेवारी या तारखेला विशेष महत्व आहे. कारण आजपासून साधारणपणे १८८वर्षांपूर्वी ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई मध्ये 'दर्पण' या नावाने पाक्षिकास सुरूवात केली आणि तो मराठी वृत्तपत्रसृष्टीचा सुवर्ण दिन ठरला. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करतो.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा फार मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा १८३२ ते १८४६ या काळात उमटवला.

बाळशास्त्री जांभेकरांना आपण ‘दर्पण’कार जांभेकर म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकी सत्तेला उलथून टाकायचे असेल, तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही हे त्यांना फार पूर्वीच समजले होते. बाळशास्त्री कडवे देशाभिमानी होते. त्यांच्या या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला आणि मराठी वृत्तपत्रविश्र्वात नवी पहाट उगवली. दर्पणाचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्या वेळी बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.

दर्पणाचा पहिला अंक ६ जानेवारी, १८३२ रोजी प्रकाशित झाला. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजीत ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते.

t.me/thempscupdate
#Infographics 👉 Australia : Hot & Dry

t.me/thempsupdate