The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from NACE Academy
◼️ IIFA AWARDS 2019

'राझी' सर्वोत्कृष्ट सिनेमा, तर आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री.

आयफा पुरस्कार सोहळा मुंबईत जल्लोषात पार पडला. या सोहळ्यासाठी अवघी इंडस्ट्री उपस्थित होती.

आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या 'राझी' सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला.

तर याच सिनेमातील दमदार अभिनयासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पद्मावत सिनेमासाठी रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

आयुष्मान खुरानाच्या अंधाधुन सिनेमाला सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार मिळाला.आयफा पुरस्कार सोहळ्याला यावर्षी 20 वर्ष पूर्ण झाली.

दरवर्षी आयफा पुरस्कार परदेशाता होतात. मात्र यावर्षी या पुरस्कार सोहळ्याचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं.

या सोहळ्यात सलमान खान, कटरिना कैफ, माधुरी दीक्षित, प्रिती झिंटा, शाहिद कपूर, विकी कौशल, अदिती राव हैदरी, डेजी शाह, रितेश देशमुख, जेनिलिया देशमुख या मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली.

🌺IIFA AWARDS 2019 - आयफा पुरस्कार सोहळ्यातील विजेते 2019🌺

● सर्वोत्कृष्ट चित्रपट- राजी
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (राझी)
● सर्वोत्कष्ट अभिनेता- रणवीर सिंग (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- श्रीराम राघवन (अंधाधुन)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अदिती राव हैदरी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विकी कौशल (संजू)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- इशान खट्टर
● सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – सारा अली खाल (केदारनाथ)
● (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- दीपिका पदुकोण
● (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर
● गेल्या २० वर्षांमधील सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम
● गेल्या २० वर्षांतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राजकुमार हिरानी (संजू)
● सर्वोत्कृष्ट संगीत- ‘सोनू के टिटू की स्वीटी’
● सर्वोत्कृष्ट कथा- ‘अंधाधुन’
● जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी
● सर्वोत्कृष्ट गीतकार – अमिताभ भट्टाचार्य (धडक)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजित सिंग (ए वतन- राझी)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- हर्षदीप कौर (दीलबरो- राझी)
Forwarded from NACE Academy
◼️ग्लोबल AMR R&D हब या गटात भारत सामील.

ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हब यामध्ये 12 सप्टेंबर 2019 रोजी भारत सामील झाला. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातल्या जैवतंत्रज्ञान विभागाने यासंबंधी घोषणा केली.

जगापुढे असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि जागतिक पातळीवर सहयोगासाठी कार्यरत असलेल्या या भागीदारीत आता 16 सदस्य देश, युरोपियन कमिशन, दोन स्वयंसेवी फाऊंडेशन आणि चार आंतरराष्ट्रीय संस्था (निरीक्षक म्हणून) आहेत.

मे 2018 मध्ये ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हबची स्थापना करण्यात आली.

वैश्विक जिवाणूरोधी प्रतिकारक क्षमतेसंबंधी संशोधन व विकासामध्ये आंतर-क्षेत्रीय सहयोगामधली तफावत, संभाव्यता ओळखून त्यासाठी संसाधनांच्या वाटपासंबंधी वैश्विक प्राधान्यकृत व्यवस्था आणि पुराव्यावर आधारित निर्णयाला हा आंतरराष्ट्रीय गट समर्थन देतो.
Forwarded from NACE Academy
#MH Elections
बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..💐💐
Forwarded from Vapu Kale (MNRP)
शुभ रात्री..🙏
#Polity काल अमेरिकेत झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमावर नक्कीच आगामी स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो.👇

उदा. कार्यक्रमाचे संपूर्ण नाव - Howdy Modi : "Shared Dreams, Bright Futures"👈