Forwarded from NACE Academy
ड्रोनचा वापर करून भारताचा नकाशा तयार करणार: SoI
👇👇👇👇👇👇👇👇👇
✍देशाचा नकाशा तयार करण्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) प्रथमच ड्रोनचा वापर करणार आहे. विभागाने ड्रोनचा वापर करून नकाशा तयार करण्याचे काम हातात घेतले आहे.
✍योजनेनुसार ड्रोन या अद्ययावत तंत्राचा वापर करून हाय-रिझोल्यूशन असलेले नकाशे तयार करण्यात येणार आहेत. पुढील दोन वर्षांत भारतीय भूप्रदेशाचा एकूण 75% भौगोलिक भाग, म्हणजेच एकूण 3.2 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी सुमारे 2.4 दशलक्ष चौ.किमी.चा नकाशा तयार केला जाणार आहे.
✍सध्या सर्वोत्कृष्ट नकाशांचे रिझोल्यूशन (पृथक्करण) 1: 250000 असे आहे, म्हणजेच नकाशावरील 1 सेंटीमीटर हे भुमीवरील 2500 सेंटीमीटर दर्शविते. योजनेनुसार नवा नकाशा 1:500 रिझोल्यूशनचा असणार आहे.
🔴भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI):-
✍भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) या संस्थेचे मूळ सन 1767 मध्ये आहे. हे भारतातला सर्वांत जुना वैज्ञानिक विभाग आणि जगातल्या सर्वात जुन्या सर्वेक्षण आस्थापनांपैकी एक आहे. सर्व्हेयर जनरल ऑफ इंडिया हे या संस्थेचे प्रमुख आहेत. सध्या हे पद लेफ्टनंट जनरल गिरीश कुमार यांच्याकडे आहे. संस्थेचे मुख्यालय देहारादून (उत्तराखंड) येथे आहे.
✍देशाचे शास्त्रीयदृष्ट्या सर्वेक्षण आणि नकाशा तयार करण्यासाठी कर्नल लॅम्ब्टन आणि सर जॉर्ज एव्हरेस्ट या प्रसिद्ध सर्वेक्षकांनी 10 एप्रिल 1802 रोजी ‘ग्रेट ट्रीग्नोमेट्रिक सर्व्हे (GTS)’चा पाया रचला होता.
🌎 भारताचा भूगोल 🌏
✍भारत देशाचे भौगोलिकदृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिकदृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.
✍भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे 5 कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो.
✍ गंगेच्या खोर्याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये गणला जातो. अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते.
✍ यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो. दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ निर्माण आहेत.
✍भारताला एकूण 7,517 किलोमीटर (4,671 मैल) इतका समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यातला 5,423 किलोमीटर (3,370 मैल) इतका द्वीपकल्पीय भाग भारतात आहे तर उर्वरित 2,094 किलोमीटर (1,301 मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे. मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये 43 टक्के वाळूचे किनारे आहे, 11 टक्के खडकाळ तर उर्वरित 46 टक्के दलदलींनी भरलेला आहे.
✍बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. दख्खनच्या पठारावरील महत्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी, कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात. मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते. पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खार्यापाण्याचे दलदल आहे त्याला ‘कच्छचे रण’ असे म्हणतात.
✍गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात - दक्षिण अरबी समुद्रातले लक्षद्विप आणि इंडोनेशियाजवळचे अंदमान आणि निकोबार.

राणी रामपालकडे हॉकीचे नेतृत्व.
👇👇👇👇👇👇👇👇
✍स्टार फॉरवर्ड राणी रामपाल हिच्याकडे इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाºया या दौºयात पाच सामने खेळविले जातील.
✍४ ऑक्टोबरपर्यंत चालणाºया या दौºयात उपकर्णधार गोलकिपर सविता असेल. सविता आणि रजनी इतिमारपू यांनी स्वत:चे स्थान पक्के केले. बचावफळीत दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, निरा खोखर आणि सलिमा टेटे, नमिता टोप्पो, सुशीला चानू, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलिमा मिंझ यांना स्थान देण्यात आले आहे.
✍मुख्य कोच शोर्ड मारिन म्हणाले, ‘आम्ही टोकियो आलिम्पिकसाठी पात्रता गाठण्यात महत्त्वाच्या वळणावर आहोत. या दौºयाचा लाभ ओडिशात होणाºया एफआयएच हॉकी आॅलिम्पिक पात्रता फेरीत अमेरिकेविरुद्ध खेळताना निश्चित होणार आहे.’
🔴महिला हॉकी संघ :
✍सविता (उपकर्णधार), रजनी इतिमारपू बचावफळी : दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, रिना
✍खोखर, सलिमा टेटे.मधली फळी : सुशीला चानू पुखराम्बाम, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल,
✍लिलिमा मिंझ, नमिता टोप्पो आक्रमक फळी : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर व शर्मिला देवी.

◼️‘अस्मिता लाल’ निर्मितीचा राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात
✍ग्रामीण भागात मासिक पाळी विषयी अनेक गैरसमज असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. या गंभीर प्रश्नावर काम करण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जनजागृतीपासून ते वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या कार्याची साखळी करून त्यावर काम केले जात आहे.
✍अकोल्यातील युवक वर्गाच्या सहकार्यातून सर्वप्रथम ‘रक्तस्राव होण्यात आनंद’ या संगीत अल्बमची निर्मिती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेऊन ते गाणे ट्विट केले. आता महिला बचत गटांच्या सहकार्यातून ‘अस्मिता लाल’ सॅनिटरी नॅपकिन तयार केले जाणार आहेत.
✍२८ मे रोजी मासिक धर्म स्वच्छता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या प्रश्नावर कार्य करण्याची संकल्पना अकोल्यात पुढे आली. सामाजिक कार्य करणाऱ्या अकोल्यातील युवांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सुफी कलाकार, शास्त्रीय संगीताचा विद्यार्थी आणि एमबीबीएस पदवीधर २८ वर्षीय तारिक फैज याने गीत लिहिले. रमिझ राजा याने त्या गाण्याला संगीतबद्ध केले. कृतिका आणि रसिक बोरकर या भगिनींनी ते गाणे गायले. विनाशुल्क हे कार्य करण्यात आले. या विषयावर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करणारी २२ वर्षीय सांची गजघाटे हिची संकल्पना प्रत्यक्षात साकारली.

◼️ IIFA AWARDS 2019
'राझी' सर्वोत्कृष्ट सिनेमा, तर आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री.
✍आयफा पुरस्कार सोहळा मुंबईत जल्लोषात पार पडला. या सोहळ्यासाठी अवघी इंडस्ट्री उपस्थित होती.
✍आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या 'राझी' सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला.
✍तर याच सिनेमातील दमदार अभिनयासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पद्मावत सिनेमासाठी रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
✍आयुष्मान खुरानाच्या अंधाधुन सिनेमाला सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार मिळाला.आयफा पुरस्कार सोहळ्याला यावर्षी 20 वर्ष पूर्ण झाली.
✍दरवर्षी आयफा पुरस्कार परदेशाता होतात. मात्र यावर्षी या पुरस्कार सोहळ्याचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं.
✍या सोहळ्यात सलमान खान, कटरिना कैफ, माधुरी दीक्षित, प्रिती झिंटा, शाहिद कपूर, विकी कौशल, अदिती राव हैदरी, डेजी शाह, रितेश देशमुख, जेनिलिया देशमुख या मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली.
🌺IIFA AWARDS 2019 - आयफा पुरस्कार सोहळ्यातील विजेते 2019🌺
● सर्वोत्कृष्ट चित्रपट- राजी
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (राझी)
● सर्वोत्कष्ट अभिनेता- रणवीर सिंग (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- श्रीराम राघवन (अंधाधुन)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अदिती राव हैदरी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विकी कौशल (संजू)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- इशान खट्टर
● सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – सारा अली खाल (केदारनाथ)
● (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- दीपिका पदुकोण
● (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर
● गेल्या २० वर्षांमधील सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम
● गेल्या २० वर्षांतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राजकुमार हिरानी (संजू)
● सर्वोत्कृष्ट संगीत- ‘सोनू के टिटू की स्वीटी’
● सर्वोत्कृष्ट कथा- ‘अंधाधुन’
● जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी
● सर्वोत्कृष्ट गीतकार – अमिताभ भट्टाचार्य (धडक)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजित सिंग (ए वतन- राझी)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- हर्षदीप कौर (दीलबरो- राझी)

◼️ग्लोबल AMR R&D हब या गटात भारत सामील.
✍ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हब यामध्ये 12 सप्टेंबर 2019 रोजी भारत सामील झाला. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातल्या जैवतंत्रज्ञान विभागाने यासंबंधी घोषणा केली.
✍जगापुढे असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि जागतिक पातळीवर सहयोगासाठी कार्यरत असलेल्या या भागीदारीत आता 16 सदस्य देश, युरोपियन कमिशन, दोन स्वयंसेवी फाऊंडेशन आणि चार आंतरराष्ट्रीय संस्था (निरीक्षक म्हणून) आहेत.
✍मे 2018 मध्ये ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हबची स्थापना करण्यात आली.
✍वैश्विक जिवाणूरोधी प्रतिकारक क्षमतेसंबंधी संशोधन व विकासामध्ये आंतर-क्षेत्रीय सहयोगामधली तफावत, संभाव्यता ओळखून त्यासाठी संसाधनांच्या वाटपासंबंधी वैश्विक प्राधान्यकृत व्यवस्था आणि पुराव्यावर आधारित निर्णयाला हा आंतरराष्ट्रीय गट समर्थन देतो.

Read: आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ?
https://www.loksatta.com/maharashtra-news/vidhan-sabha-election-maharashtra-2019-code-of-conduct-for-elections-nck-90-1976355/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android

लोकसत्ता
आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ?
कोणत्या गोष्टींचं पालन होणं आवश्यक आहे?
Read: राज्यात पनवेलमध्ये सर्वाधिक मतदार
https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/highest-voter-in-panvel-and-less-in-vadala-abn-97-1976683/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/highest-voter-in-panvel-and-less-in-vadala-abn-97-1976683/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
लोकसत्ता
राज्यात पनवेलमध्ये सर्वाधिक मतदार
राज्यात ३१ऑगस्टपर्यंत एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झाली आहे.