The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
🔷 अभिनेते अशोक सराफ स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड ॲम्बेसिडर ठरले

◼️स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करणार आहेत.

◼️2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

◼️2 ऑक्टोबर 2019 ऐवजी 18 एप्रिल 2018 रोजीच ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला.

◼️34 जिल्हे, 351 तालुके व 27 हजार 667 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित केल्या.

◼️स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी यापूर्वी चार हजार रुपये इतके अनुदान देण्यात येत होते. ते आते आता बारा हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.
महासत्तांचे व्यापारयुद्ध आणि जागतिक मंदीचा धोका

-डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारी अमेरिका आणि दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा चीन यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून व्यापारयुद्ध सुरू आहे. हे युद्ध संपण्याच्या शक्यता दिसत नाही .नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा 200 अब्ज डॉलर्स च्या चीनी वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घोषित केला. परिणामी, हे युद्ध नव्या वळणावर पोहोचले आहे. अर्थात या युद्धाला सामरीक, भूराजकीय कोनही आहेत. ते पाहता हे युद्ध लवकर निवळण्याच्या शक्यता कमी आहेत. यामुळे जगावर आर्थिक मंदीचे सावट येण्याची शक्यता आहे .गेल्या सहा महिन्यात जागतिक आर्थिक विकासाचा दर खालावला आहे .मोठ्या बेरोजगारीचे संकट चीनसह अनेक देशांमध्ये सुरु झाले आहे 2008 च्या आर्थिक मंदीच्या झटक्यातून मोठ्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था सावरत असताना या व्यापार युद्धामुळे नवे संकट आले आहे . जर्मनी सह अनेक मोठ्या युरोपियन राष्ट्रांच्या विकासाचा दर खालावला आहे .या युद्धामुळे चीनकडून अमेरिकेला होणारी निर्यात कमी होणार असल्याने भारताला एक प्रकारे संधीही आहे; पण भारताबाबतही ट्रम्प असा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-------------

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका - चीन यांच्यामध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे ते संपण्याचे चिन्ह दिसत नाही .अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केले आणि चीनकडून आयात करण्यात येणार्‍या वस्तूंपैकी 200 अब्ज डॉलरच्या वस्तूंसाठी 25 टक्के आयात शुल्क आकारणार असल्याची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे चीन थोडा झुकतो आहे आणि या व्यापारयुद्ध मावळण्याचा मार्ग मिळतो आहे असे वाटत असतानाच झालेल्या या घोषणेने आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली. कारण चीन-अमेरिका यांच्यातील या व्यापारयुद्धाचा परिणाम संपूर्ण आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. चीनने देखील अमेरिकेच्या या कृत्याचा सामना करण्यासाठी जाणीवपूर्वक अपले चलन युआन चे अवमूल्यन केले आहे .त्यामुळे अमेरिकेसाठी चीनची निर्यात अधिक आकर्षक होणार आहे .ट्रम्प ने चीनला यासाठी Currency Manipulator असे म्हंटले आहे .या व्यापारयुद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय रोखे बाजारावर होताना दिसून आले आहे. अनेक देश जे अमेरिका आणि चीन बरोबर व्यापार करतात त्यांच्या विकासदरावर नकारात्मक परिणाम होतो आहे .
ट्रम्प यांच्या ताज्या घोषणेमुळे या व्यापारयुद्धाला पुन्हा कलाटणी मिळाली असून ते अधिक तीव्र होण्याच्या शक्यता बळावल्या आहेत. ट्रम्प यांच्या वाटाघाटींचा एक नवाच प्रकार यातून समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापारयुद्ध का सुरू झाले आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्था आणि भारतावर कोणते परिणाम होणार आहेत, याचे विवेचन या लेखात करण्यात आले आहे.

का सुरु झाले व्यापारयुद्ध ?

आज जागतिक पटलावर चीन ही जगातील क्रमांक दोनची अर्थव्यवस्था आहे. चीनचा जागतिक व्यापार हा सध्या 4.5 ट्रिलियन डॉलर्स इतका आहे. चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 35 टक्के भाग हा या व्यापाराचा आहे. या संपूर्ण व्यापारात चीन वरच्या बाजूला म्हणजेच जवळपास 400 अब्ज डॉलर्स ट्रेड सरप्लसेसमध्ये आहे. म्हणजेच इतर देशांशी व्यापारामध्ये चीनकडून या देशांना होणारी निर्यात प्रचंड आहे; पण चीनमध्ये आयात होणार्‍या वस्तूंची संख्या कमी आहे. साहजिकच या व्यापारात चीन फायद्यात आहे. अमेरिकेचे उदाहरण घेतल्यास दोन्ही देशांतील व्यापार हा 600 अब्ज डॉलर्सचा आहे. या व्यापारातील तूट आहे ती तब्बल 375 अब्ज डॉलर्स इतकी असून ती अमेरिकेच्या बाजूने आहे. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले असले तरी ते मूलतः व्यावसायिक आहेत. वाटाघाटी करण्याच्या व्यावसायिक दृष्टीकोनातून ते परराष्ट्र धोरणाकडे पाहतात. त्यामुळे ही तूट कमी करण्यासाठी त्यांनी चीनवर दबाव टाकण्यास सुरूवात केली.

अमेरिका-चीनमधील व्यापार तूट:-

अमेरिका आणि चीनमध्ये एवढी मोठी व्यापारतूट निर्माण झाली याचे कारण चीनी माल अमेरिकेत जेवढ्या प्रमाणात विकला जातो तितका अमेरिकेचा माल चीनमध्ये विकला जात नाही. चीनने आयातीसंदर्भात अनेक निर्बंध घातले आहेत. परिणामी, अमेरिकन मालाला चीनी बाजारपेठेत जेवढा वाव किंवा संधी मिळणे अपेक्षित व आवश्यक आहे तितकी मिळत नाही. चीनकडून या आयातीवर विविध प्रकारचे शुल्क आकारले जातात. याला नॉन टेरिफ बॅरीअर्स असे म्हणतात. त्यामुळे ही व्यापारतूट मोठी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चीनकडून इंटलेक्युचल प्रॉपर्टी राईटसचे उल्लंघन सातत्याने होत असते.

व्यापारी नफ्यातून लष्करी आधुनिकीकरण:-

डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्त्वाचे आक्षेप आहे तो म्हणजे जागतिक व्यापारातून चीनला जो नफा होतो त्यातील बहुतांश पैसा लष्करी आधुनिकीकरणासाठी वापरला जातो. 2018 चा चीनचा सरंक्षण खर्च 15
च भारताने 5 अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांचे करार केले आहेत. यामागे व्यापारतूट कमी करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे चीनवर ज्या तीव्रतेने दबाव टाकला जात आहे तितका भारतावर पडण्याच्या शक्यता कमी आहेत.
असे असले तरी डोनाल्ड ट्रम्प हे अचानक धक्कादायक निर्ण़य घेणारे असे राष्ट्राध्यक्ष म्हणून जगभरात ओळखले जातात. त्यामुळे भारताने याबाबत तयारी ठेवणे गरजेचे आहे. इराणवर निर्बंध आणल्यानंतर भारताने अमेरिकेच्या आग्रहाखातर इराणकडून तेलआयात पूर्ण थांबवली. यानंतर भारताने इतर देशांकडून तेलाची आयात करण्याची सुरूवात केली आहे. त्यामुळे काही गोष्टी अमेरिकेला विचारात घेऊन भारताला पावले उचलावी लागतील.
त्यामुळे भारताने सर्व दृष्टीने भारताने तयारी करणे गरजेचे आहे. अलीकडील काळात भारताने एक महत्त्वाची गोष्ट केली आहे ती म्हणजे डॉलरच्या मक्तेदारीला शह देण्यास सुरुवात. भारताने इऱाणबरोबर रुपयांमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. तशाच प्रकारे जपान आणि अन्य काही देशांबरोबरचे अंशतः व्यवहार रुपयांत करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाच प्रकारे आपल्या चलनाला प्रोत्साहन देत राहिल्यास डॉलरच्या मक्तेदारीला शह दिला जाईल आणि रुपयाचे अवमूल्यन थांबण्यास मदत होईल. परिणामी, अमेरिकेच्या दबावाचा सामना करणे सोपे जाईल.
0 अब्ज डॉलर्स एवढा होता .त्यातूनच चीनने आपली लष्करी सज्जता आणि सामरीक सामर्थ्य वाढवले आहे. आज चीनची ही वाढती संरक्षणसिद्धता अमेरिकेपुढचे मोठे आव्हान बनली आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्धायाकडे आर्थिक दृष्टीकोनातून पाहून चालणार नाही, तर सामरीक दृष्टिकोनातूनही पाहावे लागेल.

संघर्षाचे अन्य पैलू :-

चीन-अमेरिका यांच्यातील या संघर्षाला भौगोलिक आणि सामरिक स्वरूपाचे संदर्भ आहेत. गेल्या दहा वर्षात अमेरिकेला आव्हान देऊ शकणारी एक महासत्ता म्हणून चीन आशिया खंडात उदयाला आला आहे. आज अमेरिकेला आव्हान देणारे एकमेव राष्ट्र आहे ते म्हणजे चीन. अमेरिका जगातील प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, तर त्या खालोखाल चीनचा क्रमांक लागतो. तथापि, येत्या काही काळात अमेरिकेला मागे टाकून चीन जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या शक्यता आहेत. दुसरीकडे आपल्या लष्करी आणि आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर चीन दक्षिण चीन समुद्र, आशिया प्रशांत क्षेत्र आदी अनेक क्षेत्रांवर -भूभागांवर ,बेटांवर आपला दावा सांगत आहे. चीनचा हिंदी महासागरात वाढता हस्तक्षेप अमेरिकेच्या आशियातील हितसंबंधांना मारक ठरणारा आहे. त्यामुळेच चीनला वेसण घालण्याची आवश्यकता आहे. यासाठीच डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारयुद्धाचा तडाखा द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी चीनबाबत घेतलेल्या या कठोर निर्णयाला आर्थिक नुकसानीचीच पार्श्वभूमी नसून राजकीय संघर्षाची पार्श्वभूमीही आहे.

चीन-अमेरिका संघर्षाचा इतिहास:-

अर्थात ही पार्श्वभुमी आजची नसून पूर्वीपासूनची आहे. 1949 मध्ये चीन साम्यवादी झाला. त्यानंतरही अमेरिकेने चीनला अधिकृतपणे मान्यता दिली नव्हती. त्यानंतर 1971 मध्ये अमेरिकचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी चीनला भेट दिली. चीनला भेट देणारे ते पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते. 1971 नंतर दोन्ही देशांदरम्यान काही वर्षे वाटाघाटी सुरू होत्या. 1976 मध्ये चीनला पहिल्यांदा सार्वभौम राष्ट्र म्हणून अमेरिकेने मान्यता दिली. त्यानंतर चीनला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य बनवून घेतले. तोपर्यंत तैवान हा सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य होता. तैवानच्या जागी चीनला सामावून घेण्यात आले. 1995 मध्ये जागतिक व्यापार परिषद अस्तित्वात आली तेव्हाही चीनने लगेचच त्याचे सदस्यत्व घेतले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष असलेले बिल क्लिटंन आणि चीन यांच्यात वाटाघाटी झाल्या आणि 2001 मध्ये चीन जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला. असा हा तीन दशकांहून अधिक काळापासून सुरू असलेला संघर्ष आता नव्या स्वरूपात समोर येतो आहे. डोनाल्ड ट्रम्प याच राजकीय संघर्षाची पार्श्वभुमी पुढे घेऊन जात आहेत. आता त्यांनी आर्थिक हत्यार उपसले आहे.
दोन्ही देशांच्या व्यापारातील व्यापारतूट गेल्या दोन दशकांपासून आहे आणि त्यात जसा व्यापार वाढत जात आहे तशी तूटही वाढते आहे. असे असताना ट्रम्प यांनी आत्ताच हा संघर्ष करण्यामागे भूसामरिक कारणे आहेत. अमेरिकेला ही व्यापार तूट कोणत्याही प्रकारे कमी करायची आहे. त्यासाठी अमेरिका चीनवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात आहे. यातून अमेरिकेला सामरिक हितसंबंधही जपायचे आहेत.

भारतावर काय परिणाम?:-

चीन-अमेरिका यांच्यामध्ये जशी व्यापार तूट आहे तशीच ती अमेरिका आणि भारत यांच्या व्यापारातही आहे. भारत आणि अमेरिकेचा एकूण व्यापार सुमारे 100 अब्ज डॉलर असून त्यामध्ये व्यापार तूट 20 अब्ज डॉलर्स इतकी आहे. ही व्यापारतूट कमी करण्यासंबंधी ट्रम्प यांनी कडक संदेश दिलेले आहेत. भारताने अनेक नॉन टेरिफ बॅरिअर्स म्हणजे अमेरिकेच्या अनेक वस्तूंवर आयात शुल्क लावलेले आहे. याबाबत ट्रम्प नेहमीच हार्ले डेव्हिडसनचे उदाहरण देत असतात. या दुचाकीवर भारताने 100 टक्के कर लावला आहे. त्यामुळे हार्ले डेव्हिडसनची भारतात खूप कमी विक्री होते. यातुलनेत भारताचा माल अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर विकला जातो. त्यामुळे भारताची ही धोरणे अन्यायी आहेत, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे. आता प्रश्न निर्माण होतो की चीनशी असलेले व्यापार युद्ध संपल्यावर ट्रम्प भारताकडेही वक्रदृष्टी टाकतील का? भारतावरही असा दबाव टाकतील का? तशी शक्यता मात्र कमी आहे. कारण चीनशी असलेल्या व्यापारयुद्धाला सामरिक आणि आर्थिक आधार आहे तसा भारताबरोबरच्या व्यापाराला नाही. चीन आणि अमेरिकेच्या व्यापारातील तुटीइतकी भारताबरोबरच्या व्यापारातील तूट मोठी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे चीनचा आर्थिक विकास आणि लष्करी विकास हा अमेरिकेच्या हितसंबंधांच्या विरोधात जाणारा आहे. भारताच्या बाबतीत असा प्रकार नाही. भारत - अमेरिका यांच्यातील मैत्री गेल्या दोन दशकांमध्ये अधिक दृढ होत गेली आहे. या काळात अमेरिकाच भारताला विकासासाठी मदत करत आला आहे. त्यामुळे अमेरिकेकडून असा दबाव भारतावर टाकला जाण्याची शक्यता कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत अमेरिकेकडून शस्त्रास्रांची मोठी आयात करतो. अलीकडे
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
या विजयासह सिंधूने २०१७च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत.