Stay Updated
488 subscribers
402 photos
51 files
292 links
📚 UPSC , MPSC , PSI/STI/ ASI , ASSISTANT INSPECTOR , IB , POSTOFFICE ,Etc . यासारख्या विविध परिक्षासाठीचे उपयुक्त साहित्य एकाच ठिकाणी...
📲 तसेच सरावासाठी दररोज प्रश्नसंच
Download Telegram
👉Tata Acquired Air India : एअर इंडियाची मालकी तब्बल 67 वर्षांनी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे . टाटा सन्सकडून एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली मंत्री गटानं मान्य केलीय.

👉जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या होत्या.
👉त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर 29 जुलै 1946 टाटा एअरलाइन्सचं नाव बदलून त्याचं नाव एअर इंडिया लिमिटेड करण्यात आलं होतं.
👉स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये एअर इंडियातील 49 टक्के भागीदारी भारत सरकारनं घेतली होती.
👉1953 मध्ये याचं पूर्ण राष्ट्रीयीकरण करण्यात आलं होतं. 

Join- @stayupdatedofficial
▪️महाराष्ट्र : पुरुष साक्षरता सर्वाधिक असलेले जिल्हे :

१) मुंबई उपनगर (९२.९%)
२) अकोला (९२.३%);
३) नागपूर (९२.१%);
४) गोंदिया (९२.०%)

▪️महाराष्ट्र स्त्री साक्षरता सर्वाधिक असलेले जिल्हे:

१) मुंबई शहर (८६.५%)
२) मुंबई उपनगर (८६.४%)
३) नागपूर (८४.५%)
४) अकोला (८३.५% )

Join- @stayupdatedofficial
🟢 संविधान सभा 🟢

9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक

11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड

13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली

22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला

25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली

22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला

24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले

29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन

26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली

24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या

26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला

Join- @stayupdatedofficial
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)

आंबोली (सिंधुदुर्ग)

खंडाळा (पुणे)

लोणावळा (पुणे)

भिमाशंकर (पुणे)

चिखलदरा-गाविलगड (अमरावती)

जव्हार (पालघर)

तोरणमाळ (नंदुरबार)

पन्हाळा (कोल्हापूर)

महाबळेश्वर (सातारा)

पाचगणी (सातारा)

कोयनानगर (सातारा)

माथेरान (रायगड)

मोखाडा(ठाणे)

सूर्यामाळ (ठाणे)

म्हैसमाळ (औरंगाबाद)

येडशी (उस्मानाबाद)

रामटेक (नागपूर)

Join- @stayupdatedofficial
◆ भूजल पुनर्भरण

शेत पातळीवर पाणी अडवून जिरविण्यासाठी खोल नांगरणी, उताराला आडवी नांगरणी करावी. म्हणजे पावसाचे वाहते पाणी कमी वेगाने थांबून वाहते, जमिनीत जास्त प्रमाणात मुरते.

◆ कच्चा बंधारा

आपल्या शेताच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्यात दगड मातीमध्ये छोटासा बांध घालावा. साठविलेले पाणी दीर्घकाळ जमिनीत मुरत राहते.

हे बंधारे दरवर्षी बांधावे लागतात. कमीत कमी खर्चात, श्रमदानाचे असे बंधारे जागोजागी बांधल्यास जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होईल.

◆ नाला बंडिंग

नाल्यात मातीचे नाला बांध बांधल्यास पावसाचे वाहणारे पाणी दीर्घकाळ साठून राहते. हे साठलेले पाणी जमिनीत कालांतराने मुरत जाते. आजूबाजूच्या परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते.

◆ वळवणीचा बंधारा

नाल्याच्या प्रवाहामधून उजव्या आणि डाव्या बाजूने पाणी वळविण्याची सोय असल्यास वाहणारे पाणी शेतातून फिरत येते. यातूनच हे पाणी जमिनीत झिरपत जाते आणि पाणी अडविणे व झिरविणे हे साध्य होते.

बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मृद्‌ व जलसंधारणाची कामे केल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि मुरलेले पाणी झऱ्याच्या स्वरूपात विहिरीत पुन्हा येते.

◆ दगडी बंधारा

पाणलोट क्षेत्रातून वाहणारे नाले अरुंद असतात. दोन्ही काठांवर खडक आढळतो अशा ठिकाणी दगडी बंधाऱ्याचा उपयोग पावसाचे पाणी अडविणे, साठविणे आणि जमिनीत जिरविणे यासाठी करता येतो.

दगडी बंधाऱ्याची उंची, उतार, तळातील रुंदी यातील गोष्टी बंधाऱ्याच्या जागेवर अवलंबून असतात. बंधाऱ्यात पाणीसाठा जास्त झाल्यास अधिक येणारे पाणी बंधाऱ्यातून वाहून जाते. यामुळे बंधारा बांधताना हे पाणी बाजूच्या शेत जमिनीतून जाऊ नये याप्रमाणे बांधकाम करावे.

Join- @stayupdatedofficial
भारतात तब्बल २३७ अब्जाधीश; गौतम अदानी कुटुंबाने दिवसाला कमावले १ हजार २ कोटी!

गौतम अदानी आणि कुटुंबाने २०२१ मध्ये प्रतिदिन सर्वाधिक १,००२ कोटी रुपये कमावले आहेत. ज्यामुळे ते आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ नुसार ५.०५ लाख कोटी रुपये संपत्ती असणारे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत कुटुंब बनले आहेत. तर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने २०२० मध्ये शेवटची यादी जाहीर झाल्यापासून दररोज १६३ कोटी रुपये कमावले असून त्यांची एकूण संपत्ती ७.१८ लाख कोटी रुपये आहे. तर, एलएन मित्तल आणि कुटुंबाने ३१२ कोटी रुपये कमावले असून शिव नादर आणि कुटुंबाने दररोज २६० कोटी रुपये कमावले आहेत.

विनोद शांतीलाल अदानी आणि कुटुंबाने दररोज २४५ कोटी रुपये कमावले, तर कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंबाने २४२ कोटी रुपये कमावले. ते आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या एसपी हिंदूजा आणि कुटुंबाने दररोज २०९ कोटी रुपये कमावले आहेत. दरम्यान, यावर्षी भारताच्या टॉप १० श्रीमंत लोकांमध्ये चार नवीन चेहरे होते, असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अहवालात म्हटले आहे की, ११९ शहरांमधील १००७ व्यक्तींकडे IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ मध्ये १००० कोटी रुपयांची संपत्ती आहेत. एकूण ८९४ लोकांची संपत्ती वाढली किंवा समान राहिली आहे. यापैकी २२९ नवीन चेहरे आहेत. तर, ११३ जणांची संपत्ती या वर्षात कमी झाली असून ५१ जण या यादीतून बाहेर पडले आहेत.

भारतात २३७ अब्जाधीश आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५८ जणांची वाढ झाली आहे. नवीन अब्जाधिशांची संख्या ही केमिकल आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात जास्त आहे. तर, फार्मा अजूनही पहिल्या क्रमांकावर असून एकूण अब्जाधिशांपैकी १३० जण फार्मा क्षेत्रातील आहेत. या यादीतील सर्वात लहान अब्जाधिशाचे वय २३ वर्ष आहे. हा अब्जाधिश गेल्या वर्षीच्या सर्वात लहान मुलापेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. महिला संपत्ती निर्माण करणाऱ्यांची वाढ, सरासरी वयात घट आणि पुणे, राजकोट, सूरत, फरीदाबाद आणि लुधियाना सारख्या टियर २ शहरांचा समावेश या यादीतील प्रमुख महत्वाच्या २० शहरांमध्ये आहे, असे आयआयएफएल वेल्थचे संस्थापक, एमडी आणि सीईओ करण भगत म्हणाले.

हुरुन इंडियाचे एमडी आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले की, अब्जाधीशांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि यामध्ये वेगाने वाढ होत आहे. आज भारतात २३७ अब्जाधीश आहेत, जे दहा वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा चार पटीने जास्त आहे. हूरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२१ नुसार श्रीमंतांच्या यादीत चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान वाढ आहे," असंही जुनैद म्हणाले.

Join- @stayupdatedofficial
गळीत धान्य
 
■तेलबिया

●महाराष्ट्रातील तेलबियांच्या पिकांमध्ये सूर्यफूल भुईमूग करडई सोयाबीन तीळ जवस यासारख्या पिकांचा समावेश होतो.

●हे सर्व गळीत धान्य पीक महाराष्ट्रात घेतली जातात.

●होळी धान्य पिकांमध्ये सोयाबीन हे महाराष्ट्राचे प्रमुख तेलबिया पिके आहे.

●गळीत धान्य पिके महाराष्ट्रातील हंगामात घेतले जातात.

●खरीप रब्बी जायद हंगाम

●क्षेत्र व उत्पन्न:

●तेलबिया खाली सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांचा उतरता क्रम:

●अमरावती >बुलढाणा >लातूर

●महाराष्ट्रातील या पिकाखालील सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्ह्यांचा उतरता क्रम:

●लातूर >कोल्हापूर >बुलढाणा

■पिक सर्वाधिक उत्पादन:

●सोयाबीन (लातुर)

●भुईमूग (कोल्हापूर)

●सूर्यफूल (सोलापूर)

●करडई (हिंगोली)

Join- @stayupdatedofficial
लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचं अनावरण! वजन, लांबी-रुंदी पाहून चक्रावून जाल!

२ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचं अनावरण करण्यात आलं आहे. महात्मा गांधीजींच्या १५२व्या जयंतीनिमित्ताने हा तिरंगा तिथे लावण्यात आला असून त्याचं उद्घाटन लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे देखील उपस्थित होते. भारतीय लष्कराच्या ५७ इंजिनिअर रेजिमेंटने हा सर्वात मोठा खादीचा ध्वज तयार केला असून तो लेहमध्ये समुद्रसपाटीपासून २००० फूट उंचीवर ठेवण्यात आला आहे.

लेहमध्ये २००० फूट उंचावर ठेवण्यात आलेल्या या ध्वजाची लांबी तब्बल २२५ फूट आहे. तर ध्वजाची रुंदी १५० फूट इतकी आहे. हा ध्वज पूर्णपणे खादीचा असून त्याचं वजन तब्बल १ हजार किलो इतकं आहे! ५७ इंजिनिअर रेजिमेंटच्या १५० जवानांनी मिळून हा ध्वज २००० फूट उंचीच्या टेकडीवर नेला.

दरम्यान, यावेळी प्रतिक्रिया देताना लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर म्हणाले, "गांधीजी म्हणाले होते की आपला राष्ट्रध्वज म्हणजे एकता आणि मानवतेचं प्रतीक आहे. या देशातल्या प्रत्येकानं या प्रतीकाचा स्वीकार केला आहे. हे आपल्या देशाच्या महानतेचं प्रतीक आहे. यापुढील वर्षांमध्ये लेहमधला हा ध्वज आपल्या जवानांसाठी उत्साहाचं देखील एक प्रतीक असेल".

देशाचे आरोग्यमंत्री मनसूख मांडविय यांनी या ध्वजाचा व्हिडीओ ट्वीट करून त्यावर आपला संदेश लिहिला आहे. "भारतासाठी हा प्रचंड अभिमानाचा क्षण आहे, कारण गांधीजींच्या जयंतीच्या दिवशीच जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचं अनावरण लेह-लडाखमध्ये झालं आहे. देशाचा सन्मान करणाऱ्या या कृतीला मी सलाम करतो", असं ट्वीट मनसुख मांडवीय यांनी केलं आहे

Join- @stayupdatedofficial
🟠लष्करी सराव(समविष्ट देश ):-
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

१. नसीम अल बहर:- भारत व ओमान
२. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया
३. वरुणा :-भारत व फ्रान्स
४. SIMBEX:- भारत व सिंगापूर
५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ
६. AL Nagh Li:- भारत व ओमान
७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका
८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश
९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका
१०. कोकण: भारत व ब्रिटन
११. इंद्र:- भारत व रशिया
१२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया
१३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका
१४. अजेय वारियर :- भारत व युके.
१५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका
१६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान
१७. गरुडा: भारत व फ्रान्स
१८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन
१९. IMBEX:- भारत व म्यानमार
२०. एकुवेरीन:- भारत व मालदीव
२१. मिलन :- भारतासह ९ देश
२२. JIMEx:- भारत व जपान
२३. CORPAT:- भारत व बांगलादेश.

Join- @stayupdatedofficial
स्वर्णिम विजय वर्षानिमित्त बांगलादेश नौदलाचे जहाज विशाखापट्टणम येथे दाखल.

🛳 बांगलादेश नौदलाचे जहाज (BNS) ‘सोमुद्र अविजान’ 03 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्व नौदल कमांडच्या पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी विशाखापट्टणम येथे दाखल झाले.

बांगलादेश नौदल जहाजाचा हा दौरा राष्ट्रपिता बंधू शेख मुजीबुर रहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि ज्यामुळे बांगलादेश स्वतंत्र झाला त्या 1971 भारत-पाक युद्धाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वर्णीम विजय वर्ष यांच्या एकत्रित स्मृती प्रित्यर्थ बांगलादेश नौदलाची ही भेट आहे.

🚢 बांगलादेश हा दक्षिण आशियातील गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील एक प्रजासत्ताक देश आहे. 

🧿 ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे.

💎 बांगलादेशचे ‘टका’ हे अधिकृत चलन आहे.

Join- @stayupdatedofficial
🔖🔖नीट’ परीक्षा रद्द करण्यासाठी स्टॅलिन यांचे १२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र 🔖🔖

❗️वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा मिळविण्यासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी बारा राज्यांकडे पत्राद्वारे पाठिंबा मागितला आहे. त्यांनी याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून शिक्षण क्षेत्रात राज्य सरकारचा प्रभाव असला पाहिजे, या घटनात्मक तत्त्वाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

❗️विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आले असून त्यात आंध्र प्रदेश, दिल्ली, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.

❗️स्टॅलिन यांनी पत्रात म्हटले आहे, की संबंधित राज्यातील ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना व वंचित गटांना या परीक्षांमुळे वैद्यकीय क्षेत्रात स्थान मिळत नाही. उच्च शिक्षण संस्थात ते प्रवेश घेऊ शकत नाहीत. त्यासाठी राज्य सरकारचे शिक्षण क्षेत्रात अधिपत्य निर्माण करण्यात मदत करावी.

❗️प्रत्यक्षात शिक्षण हा विषय राज्यांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे त्यात कें द्राने हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. त्यासाठी संयुक्तपणे व एकजुटीने प्रयत्न करून नीट परीक्षा रद्द करण्याचा आग्रह धरला पाहिजे. केंद्र सरकारने वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा सुरू करणे हेच संघराज्यवाद व घटनात्मक समतोलाच्या विरोधात होते. त्यामुळे राज्यांचे वैद्यकीय प्रवेशातील अधिकार कमी झाले आहेत.

Join- @stayupdatedofficial
🎗🎗जपानच्या पंतप्रधानपदी किशिदा.🎗🎗

🦋जपानचे पंतप्रधान म्हणून संसदेने फुमियो किशिदा यांची निवड केली आहे. त्यांना आता करोनाची साथ व सुरक्षा आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे, याशिवाय राष्ट्रीय निवडणूक अटळ बनल्याचे सांगण्यात आले.

🦋किशिदा हे योशिहिडे सुगा यांची जागा घेत असून त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. किशिदा व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोमवारी झाला. सुगा एक वर्ष अधिकारपदावर होते. करोना साथ व ऑलिम्पिक काळात करोनाचा प्रसार या मुद्द्यांमुळे त्यांचा पाठिंबा कमी झाला होता.

🦋माजी परराष्ट्र मंत्री किशिदा हे ६४ वर्षांचे असून ते नेमस्त नेते म्हणून प्रसिद्ध आहेत, पण काही वेळा त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. त्यांनी स्थिरता व सलगतेसाठी निवडणुकांचा पर्याय निवडण्याचे निश्चित केले आहे. सुगा यांच्या मंत्रिमंडळातील वीस जणांना बदलण्यात आलेअसून त्यातील तेरा जण प्रथमच मंत्री झाले आहेत.

Join- @stayupdatedofficial
😋 आंबट-गोड चिंच खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

जॉइन टेलिग्राम - @stayupdatedofficial

👉🏻 नुसतं 'चिंच' असं नाव उच्चारलं तरी तुमच्या तोंडाला पाणी येत तर ही माहिती तुमच्यासाठी ठरू शकेल.

नक्की वाचा 👉🏻

https://stayupdatedindia.com/five-benefits-of-eating-tamarind/

👨🏻‍🏫 ब्लॉगिंगचे धडे आता मराठीमध्ये 🚩 माझी मराठी या वेबसाईटवर....

नवीन
काही करण्याची आवड असेल तर ही पोस्ट नक्की वाचा..

ब्लॉगरवर विनामूल्य ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची

https://www.mazimarathi.com/2022/02/free-website-on-blogger-in-marathi.html

Stay Updated - मराठी मध्ये
न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन अगदी मोफत जॉईन करण्यासाठी क्लिक करा :
👉
http://join.stayupdatedindia.com
👍 विभाज्यतेच्या कसोटय़ा

➡️ जॉईन करा - @stayupdatedofficial


▪️ २ ने नि:शेष भाग जाणारी संख्या - संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकी कोणताही अंक असल्यास.

▪️ ३ ची कसोटी- संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेषभाग जात असल्यास.

▪️ ४ ची कसोटी- संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्यअसल्यास.

▪️ ५ ची कसोटी- संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५असल्यास.

▪️ ६ ची कसोटी- ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भागजातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोचकिंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.

▪️ ७ ची कसोटी- संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयारहोणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनी तयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्यासंख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.

▪️ ८ ची कसोटी- संख्येतील शेवटच्या तीन अंकांनीतयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेषभाग जातअसल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंकअसतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.

▪️ ९ ची कसोटी- संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेषभाग जातो.

▪️ ११ ची कसोटी- ज्या संख्येच्या विषम स्थानच्याया समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्यापटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो.

▪️ १२ ची कसोटी- ज्या संख्येला ३ व ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.

▪️ १५ ची कसोटी- ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.

▪️ ३६ ची कसोटी- ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.

▪️ ७२ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ८ ने निशेषभाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.

➡️ जॉईन करा - @stayupdatedofficial
💁🏻‍♀️ नोकरी शोधताय... पण नोकरी भरतीविषयीच्या जाहिराती तुमच्यापर्यंत मिळत नाही...?

🤷🏻‍♂️ चिंता कशाला करताय..! Stay Updated च्या चॅनेलवर मिळतील तुम्हाला नोकरीभरतीच्या अपडेट्स.

🪀 नोकरी भरतीच्या अपडेट्स तुमच्याही व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी आमच्या Stay Updated व्हाट्सअ‍ॅप चॅनेलला फॉलो करा.
👇🏻👇🏻

https://channel.stayupdatedindia.com/


टीप - जॉईन होण्यासाठी काही अडचण येत असेल तर WhatsApp ॲपला अपडेट करा.