स्पर्धावाहिनी
5.36K subscribers
596 photos
1.19K files
622 links
Spardhavahini, Maharashtra's most liked online platform on GK (Gen. Knowledge), General Awareness, Current Affairs for MPSC & all competitive exams preparation.
---------------------------------------
© An official channel of
www.spardhavahini.com
Download Telegram
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
चीनचा तियानवेन-1 प्रोब मंगळाच्या कक्षेत दाखल..
🗓 13 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• चीनचा तियानवेन-1 अवकाशयानानं 10 फेब्रुवारी 2021 रोजी मंगळाच्या कक्षामध्ये यशस्वीरित्या प्रवेश केला.
• पृथ्वीवरून साडेसहा महिने प्रवास केल्यावर हा प्रोब मंगळाच्या कक्षेत गेला आहे.
• मंगळावर चीनची ही पहिलीच स्वतंत्र मोहीम आहे.
• टियानवेन -1 मिशन एक लँडिंग कॅप्सूल पाठविण्याचा प्रयत्न करेल ज्यामध्ये 240 किलोग्राम रोव्हर असेल. या रोव्हर ला मंगळाच्या उत्तरी गोलार्धात पाठवले जाईल ज्याला यूटोपिया प्लॅनिटिया म्हणतात.
• हा रोव्हर यशस्वीरित्या उतरल्यानंतर, सौरऊर्जेवर चालणारा रोव्हर 90 दिवस मंगळाच्या पृष्ठभागाचा शोध घेईल.
• हा रोव्हर मातीचा अभ्यास करेल आणि प्राचीन काळातील जीवनाची चिन्हे देखील शोधून काढण्याचा प्रयत्न करेल.
तियानवेन-1

• तियानवेन-1 ही चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाची (CNSA) एक आंतर-ग्रह अभियान आहे.
• या मोहिमेअंतर्गत सीएनएसएने मंगळावर रोबोटिक अवकाशयान पाठविले आहे. अंतराळ यानात ऑर्बिटर, तैनात करण्यायोग्य कॅमेरा, लँडर आणि रोव्हर आहे.
• 23 जुलै 2020 रोजी हे अंतरिक्षयान वेनचांग अंतराळयान प्रक्षेपण साइटवरून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले.

स्रोत : नवभारत टाईम्स,द हिंदू.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
कूच बिहार येथे उद्या अकराव्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन.

🗓 13 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• अकराव्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन उद्या म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या कूच बिहार येथे राज्यपाल जगदीप धनख़ड यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन राज्यमंत्री प्रह्लाद सिंह पटेल यांच्या हस्ते होणार आहे.
• हा महोत्सव, 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार असून, पहिल्या टप्प्यात, 16 फेब्रुवारीपर्यंत कूच बिहार येथे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 22 ते 24 दरम्यान दार्जीलिंग येथे आणि तिसऱ्या टप्प्यात 27 आणि 28 फेब्रुवारीला मुर्शिदाबाद दरम्यान होणार आहे.
• या महोत्सवात, भारतीय संस्कृतीच्या मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचे संवर्धन,प्रोत्साहन आणि प्रचार करण्याची जबाबदारी संस्कृती मंत्रालयाकडे देण्यात आली आहे. यात, पारंपरिक लोकनृत्ये आणि कलाप्रकार, नृत्य- नाट्य आणि गायनासारख्या सादरीकरण कला आणि समृद्ध अशा आदिवासी परंपरांचा समावेश आहे. मंत्रालयातर्फे या कलांना व्यासपीठ देणारे सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि नाट्यविष्कार आयोजित केले जातात.
• राष्ट्रीय संस्कृती महोत्सव हा संस्कृती मंत्रालयाच्या प्रमुख उत्सवांपैकी एक असून 2015 पासून त्याचे आयोजन केले जात आहे. देशातील सात क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांचा या महोत्सवाच्या आयोजनात महत्वाचा वाटा असून, भारतातील समृद्ध, विविधरंगी संस्कृती केवळ प्रदर्शने आणि आर्ट गैलरीपुरती मर्यादित न ठेवता, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
• एका राज्यातील लोक आणि आदिवासी कला, नृत्य, संगीत, खाद्यपद्धती आणि संस्कृती इतर राज्यांपर्यंत पोहोचवण्यात हा महोत्सव अत्यंत महत्वाचा ठरला असून, “एक भारत-श्रेष्ठ भारत” चे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करत आहे. त्याचवेळी लोककलावंतांना महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देत, त्यांची उपजीविका चालण्यासही यातून मदत होते.
• सध्या भारत कोविड-19 महामारीच्या संकटातून बाहेर पडत असतांना आयोजित होत असलेल्या यंदाच्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाला विशेष महत्व आहे. कारण कोविडचा मोठा फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे.
• या महोत्सवाच्या माध्यमातून देशातील लोक-आदिवासी कला आणि कलावंतांना अत्यावश्यक असलेला आधार आणि प्रोत्साहन देण्याचा, मंत्रालयाचा प्रयत्न आहे. तसेच आवश्यक ती काळजी आणि उपाययोजना करुन असे महोत्सव आयोजित केले जाऊ शकतात, असा विश्वासही या निमित्ताने निर्माण होऊ शकेल.

स्रोत : बीबीसी मराठी, महाराष्ट्र टाईम्स,लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
‘बँकिंग नियमन’साठी केंद्रीय समिती.

🗓 13 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• बँकिंग नियमन कायदा 2020 आढावा घेण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी? याबाबत केंद्रीय समिती स्थापन करण्याची नागरी सहकारी बँकांची मागणी केंद्रीय अर्थमंत्रालयाने मान्य केली आहे.
• या समितीचे अध्यक्षपद रिझव्‍‌र्ह बँकेकडे (आरबीआय) देऊ नये आणि समितीमध्ये नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, या मागण्याही नागरी सहकारी बँकांनी केल्या आहेत.
• देशात 26 जून 2020 पासून नवीन बँकिंग कायदा लागू झाला आहे. या कायद्याने सहकारी बँकांच्या नियमनाचे अधिकार ‘आरबीआय’ला मिळाले आहेत. त्यातून सहकारी बँकांची मुस्कटदाबी होत असल्याची भीती सहकार क्षेत्रात निर्माण झाली आहे.
• या पार्श्वभूमीवर ‘द महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फे डरेशन’चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
• या समितीचे स्वरूप कसे असेल? याबाबतची अधिसूचना स्वतंत्रपणे काढली जाणार आहे. ‘नव्या कायद्यात नागरी बँकांना देखील व्यापारी बँकांप्रमाणे नियम लागू झाले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत आवश्यक तो बदल करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक जी पद्धत अवलंबणार आहे, त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा पतपुरवठा धोरणात ४ फेब्रुवारी रोजी केली आहे.
• व्यापारी बँका, नागरी बँकांना समान नियम लागू झाल्याने नागरी सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीत जो बदल अपेक्षित आहे. त्यासाठी ही समिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नागरी बँकांना ‘व्यापारी’ स्वरूप
• नव्या कायद्यामुळे ‘आरबीआय’ला एखाद्या संचालक मंडळावर किंवा संचालकावर थेट कारवाई करता येणार आहे. यापूर्वी ‘आरबीआय’ला सहकार आयुक्तांमार्फत अहवाल मागवून कारवाई करता येत होती. मात्र, आता राज्यातील सहकारी बँकांबाबत सहकार आयुक्तांशी केवळ सल्लामसलत होणार आहे.
• संचालक मंडळाच्या पात्रतेचे निकष ‘आरबीआय’ निश्चित करणार आहे. नागरी सहकारी बँकांना भागभांडवल उभारणीसाठी खुल्या बाजारातून समभाग, बॉण्ड आणि कर्जरोखे विक्रीतून भागभांडवल उभारता येणार आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांना आता व्यापारी बँकांचे स्वरूप येणार आहे.
• व्यापारी बँका, नागरी बँकांना समान नियम लागू झाल्याने नागरी सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीत जो बदल अपेक्षित आहे. त्यासाठी ही केंद्रीय समिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

स्रोत : महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
ई-गव्हर्नन्समधील उत्कृष्ट कार्यासाठी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालयाला 18वा सीएसआय एसआयजी ई- गव्हर्नन्स पुरस्कार 2020 मध्ये कृतज्ञता पुरस्कार प्राप्त.

🗓 13 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालयाला, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचा उपक्रम म्हणून सुरू केलेला 'आदिवासी सक्षमीकरण-बदलता भारत' या प्रात्यक्षिक डॅशबोर्डसाठी 18वा सीएसआय एसआयएन ई गवर्नन्स पुरस्कार 2020चा प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
• उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या हस्ते आदिवासी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव डॉ. नवलजीत कपूर यांनी लखनऊ येथे काल हा पुरस्कार स्वीकारला.
• डिजीटल तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी मंत्रालय अनेक पावले उचलत आहे. देशाच्या सर्वात दुर्गम भागापर्यंत डिजिटायजेशनचा लाभ पोहोचेल, यासाठी देखील मंत्रालय पावले उचलत आहे आणि यासारख्या उपक्रमांच्या पुढाकारामुळे तेथील आदिवासी समाजाच्या जीवनात अमूलाग्र बदल घडणार आहे.
• देशात ई – गव्हर्नन्स क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्यांची नोंद व्हावी यासाठी द कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) यांच्या वतीने पुरस्कारांची मालिका सुरू करण्यात आली आहे.
• हे पुरस्कार सीएसआय – एसआयजी ई-गव्ह यांच्या वतीने दिले जातात. राज्य, विभागीय, जिल्हा आणि प्रकल्प स्तरावर ई – गव्हर्नन्स संकल्पनेच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात.
• ई – गव्हर्नन्स वापराबाबत आदिवासी कल्याण मंत्रालय आघाडीवर आहे. त्याचे प्रदर्शन डॅशबोर्ड, आदिवासी सक्षमीकरण – बदलता भारत हे एक इंटरअक्टीव आणि गतिशील ऑनलाईन व्यासपीठ आहे, जे या मंत्रालयाच्या 11 योजना किंवा उपक्रमांचे अद्ययावत आणि रियलटाइम तपशील दर्शवितो.

स्रोत : नवभारत टाईम्स, PIB.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
कृष्णविवरात प्रकाशीय ज्वाळा.

🗓 14 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• भारतीय खगोलवैज्ञानिकांना बीएस लॅसिरटी या खूप जास्त वस्तुमानाच्या कृष्णविवरात प्रकाशीय ज्वाळा दिसल्या आहेत. त्यातून त्या कृष्णविवराचे वस्तुमान ठरवता येईल, तसेच प्रकाशाच्या स्रोताचाही मागोवा घेता येईल, असे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने शनिवारी म्हटले आहे.
• या कृष्णविवरातील ज्वालेच्या विश्लेषणातून विश्वाच्या उत्पत्तीच्या अवस्थाही समजण्यास मदत होणार आहे.
• कृष्णविवरातील ज्वाला या खगोलवैज्ञानिकांच्या दृष्टीने संशोधनाचा महत्त्वाचा विषय राहिला असून त्यात भारित कणांचे प्रवाह असतात. ते प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. त्यामुळे या ज्वाळा विश्वातील प्रकाशमान घटक मानल्या जातात.
• बीएल लॅसिरटी मधील ज्वाळा या 10 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर अंतरावर असून त्यातील पन्नास ज्वाळा लहान दुर्बिणीच्या मदतीनेही दिसू शकतात. होल अर्थ ब्लेझर टेलिस्कोप या आंतरराष्ट्रीय गटाने यातील 3 ते 4 ज्वाळा शोधल्या आहेत.
• यात आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेचे आलोक चंद्रा यांचा समावेश आहे. ऑक्टोबर 2020 पासून या ज्वाळांवर संशोधन सुरू असून त्यात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांचा समावेश आहे. 16 जानेवारीला त्यातील सर्वात प्रखर ज्वाळा दिसली आहे.
• संपूर्णानंद दुर्बीण नैनीताल येथे आहे तेथून ही ज्वाळा स्पष्टपणे दिसली असून यातील माहितीच्या आधारे त्या कृष्णविवराचे वस्तुमान व इतर माहिती मिळू शकते.

स्रोत : लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
आंतरराष्ट्रीय जागतिक डाळ दिवस 2021 - ग्लोबल व्हर्च्युअल सोहळा रोम मध्ये साजरा.

🗓 14 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

स्थळ : रोम, इटली.
विषय : Pulses for sustainable food systems and healthy diets.

• ‘जागतिक डाळी दिवसा’ निमित्त रोम येथे दि.12 फेब्रुवारी ला आयोजित या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे भाषण केले.
• भारत हा जगातील डाळींचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहकही असून आता भारताने डाळींच्या उत्पादनात जवळपास स्वयंपूर्णता साध्य केली आहे, असे प्रतिपादन, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.
• संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार 2016 पासून जागतिक डाळी दिवस साजरा केला जातो.
• या कार्यक्रमाला, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीस डॉ अग्नेस कलिबाता आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


महत्वाचे
• गेल्या पाच-सहा वर्षात, भारतातील डाळींच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून ते 140 लाख टनांपासून ते 240 लाख टनांपर्यंत वाढ झाली आहे.
• 2019-20 या वर्षात भारताने 23.15 दशलक्ष टन डाळींचे उत्पादन केले, जे जागतिक उत्पादनाच्या 23.62% टक्के आहे.
• डाळी अत्यंत पोषक असून त्यांच्यात प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळेच एक अन्नघटक म्हणून तो महत्वाचा आहे. विशेषत: भारतासारख्या देशात, जिथे शाकाहारी लोकांचे प्रमाण अधिक आहे, तिथे आहारात डाळींना विशेष महत्व आहे. डाळींन कमी पाणी लागते आणि ती कोरडवाहू जमिनीवर देखील पिकू शकते.
• भारतात 86 टक्के छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करुन अशा शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य केले जात आहे. केंद्र सरकार देशभरात 10,000 नव्या शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करत असून त्यासाठी येत्या पाच वर्षात 6,850 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या संघटनांमुळे, शेतकऱ्यांना बियाणे उत्पादन, खरेदी यात मदत होईल तसेच उत्तम तंत्रज्ञान उपलब्ध होईल.
• भारतीय कृषी संशोधन परिषदेने केलेल्या संशोधन आणि विकास कार्यांमुळे डाळींचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत मिळाली आहे. डाळींच्या पिकांच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली असून डाळींच्या नव्या संकरित वाणांवर अभूतपूर्व संशोधन करण्यात आले आहे.
• गेल्या पाच वर्षात,डाळींच्या 100 सुधारित आणि उत्तम पिक देणाऱ्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत.
• भारतात, राष्ट्रीय पोषाहार योजनेअंतर्गत 1.25 कोटी आंगणवाड्यांमध्ये डाळींचे वाटप केले जाते. टाळेबंदीच्या काळातही, केंद्र सरकारने 80 कोटी गरिबांना मोफत चणाडाळींचा पुरवठा केला.

स्रोत : PIB.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______
🖌
संयुक्त राष्ट्र सरचिटणीसपदासाठी आकांक्षा अरोरा यांची उमेदवारी.

🗓 14 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• संयुक्त राष्ट्रातील भारतीय वंशाच्या कर्मचारी आकांक्षा अरोरा (वय 34) यांनी सरचिटणीसपदासाठी उमेदवारी जाहीर केली असून सध्याचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस हेही पुन्हा पाच वर्षांसाठी या पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
• जानेवारी 2022 पासून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नवीन प्रमुखांचा कार्यकाल सुरू होणार आहे. अरोरा या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम विभागातील लेखा समन्वयक आहेत.
• त्यांनी ‘अरोरा फॉर एसजी’ या हॅशटॅगने प्रचार मोहीम सुरू केली आहे. माझ्यासारख्या पदावरील कुणी ही निवडणूक लढवण्याचे धाडस करणार नाही, पण मी ते करत आहे. रोज कामावर जायचे. मान खाली घालून काम करायचे व जग जसे आहे तसे स्वीकारायचे, या चाकोरीपलीकडे जाण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले. आकांक्षा यांनी चित्रफितीत म्हटले आहे, की ‘यापूर्वी जे लोक संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख होऊन गेले त्यांनी त्यांचे उत्तरदायित्व निभावले असे वाटत नाही.’
• गेल्या ७५ वर्षांत संयुक्त राष्ट्रांनी कुठलीच आश्वासने पूर्ण केली नाहीत. निर्वासितांचे संरक्षण केले नाही. मानवतावादी मदतीचा हात पुढे केला नाही. तंत्रज्ञान व नवप्रवर्तनाला प्राधान्य दिले नाही. संयुक्त राष्ट्रांनी प्रगती घडवून आणायला हवी होती पण ते झाले नाही. त्यामुळे मी सरचिटणीस पदासाठी निवडणूक लढवित आहे. केवळ बघ्याची भूमिका घेण्यात अर्थ नाही. संयुक्त राष्ट्रे आतापर्यंत जी कामगिरी केली त्यापेक्षा चांगली कामगिरी करून दाखवू शकतात.’

अँतोनियो गट्रेस (जन्म: 30 एप्रिल 1949, लिस्बन) :
• हे एक माजी पोर्तुगीज राजकारणी व पंतप्रधान होते. ऑक्टोबर 1995 ते एप्रिल 2002 दरम्यान पंतप्रधानपदावर राहिलेले अँतोनियो गट्रेस यांनी 2005 सालापासून संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त म्हणून काम पाहिले.
• अँतोनियो गट्रेस संयुक्त राष्ट्रांचे नववे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
• जानेवारी महिन्यात अँतोनियो गट्रेस (वय 71) यांनी उमेदवारी जाहीर केली असून ते पुढील पाच वर्षे या पदासाठी इच्छुक आहेत.
• गट्रेस यांची मुदत या वर्षी 31 डिसेंबरला संपत असून नवीन सरचिटणीस 1 जानेवारी 2022 रोजी पदभार स्वीकारतील. गट्रेस हे 2017 पासून सरचिटणीस पदावर आहेत. नववे सरचिटणीस असलेले गट्रेस यांनी काही पातळीवर संवादाचा प्रयत्न केला. अजून हे पद महिलेला मिळालेले नाही.

आकांक्षा अरोरा:
• त्या टोरांटोतील यॉर्क विद्यापीठातून पदवीधर झालेल्या असून त्यांनी प्रशासकीय अभ्यास विषयात पदवी घेतली आहे.
• त्यांनी सार्वजनिक प्रशासन विषयात कोलंबिया विद्यापीठातून स्नातकोत्तर पदवी घेतली आहे.
• त्यांनी संयुक्त राष्ट्रात काम करताना आर्थिक पातळीवर काही सुधारणा केल्या आहेत.
• त्या भारतात जन्मलेल्या असल्या, तरी त्यांच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे.
• त्यांनी कुणाही देशाकडे उमेदवारीसाठी पाठिंबा मागितलेला नाही. आपल्या उमेदवारीने निवड प्रक्रियेत बदल होईल, असा आशावाद त्यांनी पासब्लू संकेतस्थळावर व्यक्त केला आहे.

अद्याप एकही महिला संयुक्त राष्ट्रांची सरचिटणीस झाली नाही.
 अँतोनियो गट्रेस 1 जानेवारी 2017 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाचे नवीन सरचिटणीस झाले.
 75 वर्षांच्या इतिहासात एकाही महिलेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळली नाही.
 या वर्षी डिसेंबरपर्यंत सरचिटणीस निवडणुका होणार आहेत.
 संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांची नियुक्ती आमसभा करीत असते व त्यासाठी सुरक्षा मंडळाची शिफारस लागते.
 पाच स्थायी सदस्यांपैकी कुणीही त्यात नकाराधिकार वापरू शकतो.
 ही सदस्य देशांनी चालवलेली प्रक्रिया असते. सदस्य देशच उमेदवारी ठरवू शकतात.

आजवरचे सरचिटणीस
1. ग्लॅडविन जेब (२४ ऑक्टोबर 1945 –1 फेब्रुवारी 1946)
2. दाग हामारहोएल्ड (10 एप्रिल 1953 –18 सप्टेंबर 1961)
3. उ थांट (30 नोव्हेंबर 1961 – 31 डिसेंबर 1971)
4. कर्ट वाल्डहाइम (1 जानेवारी 1972 – 31 डिसेंबर 1981)
5. हाव्हियेर पेरेझ दे क्युलार (1 जानेवारी 1982 –31 डिसेंबर 1991)
6. बुट्रोस बुट्रोस-घाली (1 जानेवारी 1992 –31 डिसेंबर 1996)
7. कोफी अन्नान (1 जानेवारी 1997 –31 डिसेंबर, 2006)
8. बान की-मून (1 जानेवारी 2007–31 डिसेंबर, 2016)
9. अँतोनियो गुतेरेस (1 जानेवारी 2017–चालू)


स्रोत : लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
लष्करात स्वदेशी ‘अर्जुन’

🗓 16 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• स्वदेशात निर्मित अर्जुन एमके-1ए हा लढाऊ रणगाडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लष्कराच्या सुपूर्द केला.
• या अत्याधुनिक रणगाड्याची निर्मिती आणि विकास भारतात झाला आहे. या रणगाड्यात स्वदेशी दारूगोळ्याचा वापर केला जातो.
• या रणगाड्याचे उत्पादन संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) लढाऊ वाहने संशोधन व विकास आस्थापनेने केले आहे.
• DRDO नं 8400 कोटी रुपये खर्च करुन हे रणगाडे तयार केले आहेत.

अर्जुन (MK – 1A) :
 हा रणगाडा सतत हलचाल करणाऱ्या टार्गेटलाही अचूक लक्ष्य करतो. भू सुरुंग पेरली असतील तरी हा त्यावरुन पुढे जाऊ शकतो. त्याचबरोबर या रणगाड्यासमोर ग्रेनेड आणि क्षेपणास्त्र हल्ले देखील निष्प्रभ ठरतात.
 या रणगाड्यांमध्ये केमिकल हल्ल्यापासून वाचण्यासाठी विशेष सेन्सर लावण्यात आले आहेत. पश्चिम राजस्थानातील सैन्याच्या रेजिमेंटच्या मदतीला हे रणगाडे असतील. याचा नेमका अर्थ म्हणजे या रणगाड्यांच्या टार्गेटपासून पाकिस्तान फार दूर नसेल.
 अर्जुन MK – 1A रणगाड्यांना ‘किलर रणगाडे’ असंही म्हंटलं जातं. एक रणगाडा तयार करण्यासाठी 54 कोटी रुपये खर्च आला आहे. रविवारी 118 रणगाडे सैन्यात दाखल झाली आहेत. 124 रणगाडे पूर्वीपासून सैन्याकडं आहेत.

वैशिष्ट्यं:
 रणगाड्याची मारक क्षमता पहिल्या पेक्षा अधिक आहे
 रणगाड्यावर हेलिकॉप्टर विरोधी मशीन गन
 जमिनीवरुन आकाशात अचूक लक्ष्य गाठण्याची क्षमता
 आधुनिक ट्रान्समिशन सिस्टिममुळे शत्रुचा शोध घेणे शक्य
 रासायनिक हल्ल्यापासून वाचण्यासाठी विशेष सेन्सर
 रात्रीच्या वेळी शत्रुला शोधण्यासाठी थर्मल इमेजिंग सिस्टम
 वजन 68 टन, वेग 58 किमी प्रति तास

स्रोत : लोकमत,द हिंदू.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
एस थिओडोर बास्करन यांनी सैंक्चुअरी लाइफटाइम सर्व्हिस अवॉर्ड 2020 जिंकला

🗓 16 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• लेखक, इतिहासकार, निसर्गवादी आणि कार्यकर्ते असलेल्या एस थिओडोर बास्करन यांनी सैंक्चुअरी लाइफटाइम सर्व्हिस पुरस्कार, 2020 (Sanctuary Lifetime Service Award 2020) जिंकला आहे.
• सैंक्चुअरी नेचर फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
• एस थिओडोर बास्करन यांची वन्यजीव संवर्धनाबद्दलचे योगदान लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
• इंग्रजी आणि तामिळ भाषेत पर्यावरण संरक्षणाबद्दल त्यांनी केलेल्या लिखाणाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे

एस थिओडोर बास्करन:
• त्यांचा जन्म 1940 मध्ये तामिळनाडूमध्ये झाला होता.
• ते एक भारतीय चित्रपट इतिहासकार आणि वन्यजीव संरक्षक आहे.
• 1960 मध्ये मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून इतिहासाची बी.ए. (ऑनर्स) पदवी घेतली.
• त्यांनी तामिळनाडू राज्य अभिलेखामध्ये संशोधक म्हणून काम केले.
• नंतर 1964 मध्ये ते भारतीय टपाल सेवेत विभागीय अधीक्षक म्हणून रुजू झाले.
• शिलॉंगमध्ये 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी “युद्ध-प्रयत्नासाठी विशेष अधिकारी” म्हणून काम केले.

इंग्रजी भाषेतील त्यांची काही पुस्तके:
• डान्स ऑफ द सार्स: एसेज ऑफ वंडरिंग नेचुरलिस्ट; बुक ऑफ इंडियन डॉग्स, डे विथ शमाः एसेज ऑन नेचर.

स्रोत : द हिंदू.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
महाभियोगातून ट्रम्प यांची मुक्तता
🗓 16 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• सत्तांतराच्या वेळी त्यांच्या समर्थकांना कॅपिटॉल हिल येथे हिंसाचारास उत्तेजन दिल्याबाबत दाखल करण्यात आलेल्या महाभियोगाच्या आरोपातून अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सेनेटमधील मतदानात मुक्तता झाली आहे.
• त्यांना दोषी ठरवण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज होती, पण तेवेढे बहुमत डेमोक्रॅटिक पक्षाला गोळा करता आले नाही.
• माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे सात सदस्य फुटले होते, पण त्यामुळे बहुमताचे उद्दिष्ट साध्य झाले नसल्यामुळे ट्रम्प यांची मुक्तता झाली. सात सदस्यांनी या ऐतिहासिक महाभियोगात ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले.
• ट्रम्प यांच्यावरचा हा दुसरा महाभियोग होता. यापूर्वी यांनी युक्रेनच्या अध्यक्षांवर जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणल्याच्या प्रकरणी ट्रम्प यांच्यावर पहिला महाभियोग दाखल करण्यात आला होता पण तोही यशस्वी झाला नव्हता.
• ट्रम्प यांच्यावर या वेळी 6 जानेवारीला यूएस कॅपिटॉल येथे दंगलीस उत्तेजन दिल्याचा आरोप होता.
• 57 विरुद्ध 43 मतांनी ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग या वेळी फेटाळला गेला. सात रिपब्लिकनांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने मतदान केले होते. दोन तृतीयांश बहुमताला 10 मते कमी पडली. एकूण 67 मतांची गरज बहुमतासाठी होती पण तेवढी मते डेमोक्रॅट पक्षाला गोळा करता आली नाहीत.
• सेनेटने फेब्रुवारी 2020 मध्ये पहिल्या महाभियोगातून ट्रम्प यांना मुक्त केले होते. जो बायडेन यांच्या मुलाची युक्रेनच्या अध्यक्षांनी चौकशी करावी यासाठी त्यांनी दबाव आणला होता.

स्रोत :महाराष्ट्र टाइम्स.लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राला

🗓 16 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════


• या वर्षीच्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले असून, पुरुष आणि महिलांच्या या स्पध्रेचे उस्मानाबाद येथे 24 ते 28 मार्चदरम्यान आयोजन करण्यात येणार आहे.
• डिसेंबर 2019 मध्ये छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला दोन्ही गटांत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
• त्यानंतर मार्च महिन्यापासून देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे महाराष्ट्रातील खो-खोची मैदाने बंद झाली.
• परंतु राज्य शासनाने आता स्पर्धेच्या आयोजनांना परवानगी दिल्याने आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त ठरवण्यात आल्यामुळे राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या तारखा लवकरच निश्चित होऊ शकतील, अशी आशा आहे. याचप्रमाणे अन्य वयोगटांच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळवण्यासाठीसुद्धा महाराष्ट्र खो-खो संघटना प्रयत्नशील आहे.
• ‘‘श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल”, उस्मानाबाद येथे 24 ते 28 मार्चदरम्यान पुरुष आणि महिला गटाच्या 54व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे.
• करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून लवकरच स्पर्धेची रूपरेषा आणि वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

स्रोत :लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
भारताचे तीन खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र

🗓 16 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार आणि प्रियांका गोस्वामी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. त्यामुळे संदीप, प्रियांका आणि राहुल कुमार या भारताच्या तीन खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
• आता टोक्यो ऑलिम्पिकसाठी चालण्याच्या शर्यतीत पात्र ठरलेल्या खेळाडूंची संख्या पाच झाली आहे. याआधी के . टी. इरफान आणि भावना जट यांनी पात्रता निकष पार केले होते.
• संदीपने एक तास 20 मिनिटे 16 सेकंद अशी वेळ नोंदवत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. प्रियांकाने 1 तास 28 मिनिटे 45 सेकंद अशा कामगिरीसह सुवर्णपदक संपादन केले. राहुल याने पुरुष गटात 1 तास 20 मिनिटे 26 सेकंद अशा कामगिरीसह ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले आहे.
• संदीप याने 50 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

स्रोत :लोकसत्ता.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌
ऑलिम्पिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांचा राजीनामा

🗓 16 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• टोक्यो ऑलिम्पिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी (वय 83 वर्ष) यांनी महिलांबद्दल शेरेबाजी केल्याप्रकरणी 12 फेब्रुवारीला पदाचा राजीनामा दिला.
• टोक्यो ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मोरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या वारसदाराची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
• ‘महिला खूप बोलतात आणि विनाकारण वाद ओढवून घेतात,’ या त्यांच्या वक्तव्यानंतर कडाडून टीका होत होती. सुरुवातीला राजीनामा देण्यास नकार देत त्यांनी सर्वाची माफी मागितली होती. पण पुरस्कर्ते, दूरचित्रवाणीवरून सातत्याने दबाव येऊ लागल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.
• 2014 मध्ये योशिरो मोरी ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष झाले. ते जपान चे माजी पंतप्रधान आहेत.
महत्वाचे:
• जपानच्या संसदेमध्ये महिलांचा केवळ 10 टक्के हिस्सा आहे, जो जगातील सर्वात कमी (135 वा क्रमांकावर) आहे. सूचीबद्ध कंपन्यांमध्ये महिलांची उपस्थिती 5.3% आहे,
• वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2020 च्या ग्लोबल जेंडर गॅप अहवालात 153 देशांपैकी जपान 121 व्या स्थानावर आहे.
• या जेंडर गॅपमध्ये भारत 112 व्या स्थानावर होता.


स्रोत :लोकसत्ता, नवभारत टाईम्स, लोकमत.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

फाफ डुप्लेसिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
🗓 18 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
• या महिन्याच्या सुरुवातीस फाफ डुप्लेसिसने पाकिस्तानमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला.
• 36 वर्षीय डुप्लेसीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2012 मध्ये एडलेड ओव्हल येथे कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने दुसर्‍या डावात नाबाद 110 धावा फटकावल्या होत्या.
• फॅफ डुप्लेसिसने आपला शाळेचा मित्र असलेल्या एबी डिव्हिलियर्सकडून कर्णधारपद स्वीकारले होते.
• दक्षिण आफ्रिकेचा तो एकमेव कर्णधार आहे, ज्याने 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. त्याचबरोबर 2018 मधे आफ्रिकेत देखील त्यांना पराभूत केले होते. .
• त्याने एकूण 27 कसोटी सामन्यांचे नेतृत्त्व करताना 17 विजय मिळविले.
• डुप्लेसिस ने 69 टेस्ट मॅचच्या एकूण118 डावांमध्ये 40.02 च्या सरासरीने 4163 रन बनविले आहेत, ज्यामध्ये 10 शतक आणि 21 अर्धशतक सामील आहेत.
• कसोटी क्रिकेट मधे त्याचा सर्वाधिक स्कोर 199 रन आहे.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
____________🖌

यूएनसीडीएफ च्या कार्यकारी सचिव पदी भारतीय वंशाच्या प्रीती सिन्हा यांची नियुक्ती
🗓 18 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंडने (यूएनसीडीएफ) भारतीय वंशाच्या गुंतवणूक आणि विकास क्षेत्रातील बँकर प्रीती सिन्हा यांना कार्यकारी सचिव म्हणून नियुक्त केले आहे.
• त्यांनी ज्युडिथ कार्ल यांची जागा घेतली, ज्यांनी युनायटेड नेशन्समधील 30 वर्षांच्या कारकिर्दीनंतर निवृत्ती घेतली आहे.
• कार्यकारी सचिव हे यूएनसीडीएफमध्ये सर्वोच्च नेतृत्व पद आहे.
• सध्या सिन्हा, फायनान्स फॉर डेव्हलपमेंट एलसीसी या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आहेत, ही संस्था जिन्हेवा मधील एक डेव्हलपमेंट फायनान्स संस्था आहे.
• यापूर्वी, त्यांनी नवी दिल्लीतील सामाजिक-आर्थिक विकासासाठी खासगी क्षेत्रातील थिंक टँक येस ग्लोबल इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक पद सांभाळले आहे.
• आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेतही त्यांनी वरिष्ठ संसाधन उभारणीची भूमिका बजावली आहे.

युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंड (यूएनसीडीएफ)
• जगभरातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 1966 मध्ये युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंड (यूएनसीडीएफ) ची स्थापना केली.
• या संस्थेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे.
• ही संस्था अल्प विकसित देशांना (एलडीसी) छोटी कर्ज उपलब्ध करून देते.

स्रोत : नवभारत टाईम्स
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी देशातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमची केली पायाभरणी
🗓 18 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी नुकतीच ओडिशातील औद्योगिक शहर, रुरकेला येथे जागतिक दर्जाच्या हॉकी स्टेडियमची पायाभरणी केली.
• हे देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम असेल.
• रुरकेला येथील 20,000 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या हॉकी स्टेडियमला स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे.
• या स्टेडियमवर 2023 मधील पुरुष हॉकी विश्वचषक सामने खेळले जातील.
• रुरकेला येथील बिजू पटनायक टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये 15 एकर जागेवर हे स्टेडियम तयार करण्यात येणार आहे.

महत्वाचे -
• अहमदाबादच्या मोटेरामध्ये बांधलेल्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमची क्षमता 1 लाख 10 हजारांपेक्षा जास्त आहे.
• जगातील कोणत्याही क्रिकेट स्टेडियममध्ये एवढी प्रेक्षक क्षमता नाही.
• या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना 24 फेब्रुवारी रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे.

बिरसा मुंडांबद्दल -
• बिरसा मुंडा यांचा जन्म सन 1875 मध्ये झाला. ते मुंडा जमातीचे होते.
• बिरसांचा असा विश्वास होता की त्यांना लोकांच्या हितासाठी आणि त्यांच्या दु: खावर विजय मिळविण्यासाठीच देवाने पाठविला आहे, म्हणून त्यांनी स्वत: ला देव मानले.
• त्यांना 'धरती अब्बा' किंवा 'जगत पिता' म्हणून संबोधले जाते.
•1899-1900 मध्ये बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वात झालेला मुंडा विद्रोह छोटा नागपूर (झारखंड) क्षेत्रातील महत्वाचा विद्रोह होता.
• या विद्रोहाला 'मुंडा उलागुलन' (बंड) असेही म्हणतात ज्याचा अर्थ 'महाविद्रोह' असा आहे.
• आदिवासींच्या चळवळींमधील सर्वात विस्तृत आणि संघटित बिरसा आंदोलन होते. सावकारांना व्याज आणि इंग्रजांना कर देऊ नका असे ते लोकांना सांगत होते.

स्रोत : द हिंदू, नवभारत टाईम्स
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_________🖌

अजय मल्होत्रा यांची ​​मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड
🗓 19 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• माजी भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी अजय मल्होत्रा ​​संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.
• या पदावर निवड झालेले ते पहिले भारतीय आहेत.
• आपल्या सेवा कालावधीत त्यांनी बरीच महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ते रशियामध्ये भारताचे उच्चायुक्त राहिले आहेत. त्यांनी केनियामधील नेरोबी इंडियन हाय कमिशनमध्येही काम केले आहे.
• नोव्हेंबर 2013 मधे ते परराष्ट्र सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
• केनिया आणि सेशल्ससारख्या देशांशी देशाचे संबंध दृढ करण्यासाठी अजय मल्होत्रा ​​यांनी 1979 1982 to या काळात नैरोबीच्या उच्च आयोगातही काम केले आहे.
• 1985 मध्ये त्यांनी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्राच्या स्थायी मिशनमध्ये सचिव म्हणूनही काम पाहिले. येथे त्यांनी 1989 पर्यंत सेवा बजावली.
• ILO मध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
• संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार सल्लागार समिती ही परिषदेची “थिंक टँक” म्हणून काम करते.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC)
• संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद, ही संस्था संयुक्त राष्ट्राचे एक अंग म्हणून एक आंतर-सरकारी संस्था म्हणून कार्यरत आहे.
स्थापना - 2006 साली संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या जागी ही परिषद स्थापन केली गेली.
उद्देश - विविध देशांमध्ये मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, त्यांचे संरक्षण करणे आणि उल्लंघन झाल्यास तोडगा काढणे हे या परिषदेचे उद्दीष्ट आहे.
मुख्यालय - जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
सदस्य - 47, सदस्य भौगोलिक आधारावर तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात केले आणि जास्तीत जास्त दोन टर्म असतात.
• गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान पुन्हा यूएनएचआरसीचा सदस्य झाला असून आता तो 2023 पर्यंत सदस्य राहील तर 2021 पर्यंत भारत परिषदेचा सदस्य आहे.
• अलीकडेच फिजीचे राजदूत नाझत शमीम खान यांची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे (यूएनएचआरसी) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

स्रोत : द हिंदू, अमर उजाला
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
________🖌

शहरी सहकारी बँकांना बळकटी देण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी आरबीआय कडून समिती गठीत
🗓 19 Feb 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

•रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शहरी सहकारी बँकांना बळकटी देण्यासंबंधित अ‍ॅप्रोचशीट तयार करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे.
• या आठ सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर एनएस विश्वनाथन हे असून समितीच्या सदस्यांमध्ये नाबार्डचे माजी अध्यक्ष हर्ष कुमार भानवाला यांचाही समावेश आहे.
• ही समिती विद्यमान नियामक प्रणालीचा आढावा घेईल आणि शहरी सहकारी बँका मजबूत करण्यासंबंधित सूचना देईल. तसेच त्यांच्या मजबूत स्थितीबद्दलच्या संभाव्यतेचे मूल्यांकनही करेल.
• समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर करावा लागणार आहे.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

डॉ हर्ष वर्धन यांनी मिशन इंद्रधनुष 3.0 चा केला प्रारंभ
🗓 19 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज मिशन इंद्रधनुष 3.0 चा प्रारंभ केला. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी आयएमआय 3.0 पोर्टल देखील सुरू केले आणि आयएमआय 3.0 साठी मार्गदर्शक तत्वे जारी केली तसेच अभियानाचा एक भाग म्हणून विकसित केलेल्या जागरूकता साहित्य / आयईसी पॅकेजचे प्रकाशन केले.
• मिशन इंद्रधनुष अभियानाच्या दोन फेऱ्या 22 फेब्रुवारी आणि 22 मार्च 2021 पासून सुरू होतील आणि देशातील 29 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील निवडक 250 जिल्हे / शहरी भागात त्यांचे आयोजन केले जाईल.
• कोविड 19 महामारीच्या काळात ज्या मुले आणि गर्भवती स्त्रियाना लस घेता आली नाही त्यांच्या लसीकरणावर मिशन इंद्रधनुष 3.0 मध्ये भर दिला जाणार आहे.
• आयएमआय 3.0 च्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यांना लस दिली जाईल. प्रत्येक फेरी प्रत्येकी 15 दिवसांसाठी असेल.
• स्थलांतरित क्षेत्रातील लाभार्थी आणि पोहोचण्यास कठीण अशा दुर्गम भागाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
• मिशन इंद्रधनुष अंतर्गत आतापर्यन्त 690 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आले आणि 3 कोटी 76 लाख 40 हजार मुले आणि 94 लाख 60 हजार गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

स्रोत :PIB.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

डीआरडीओ ने विकसित केलेल्या रणगाडा भेदी मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणाली ‘हेलीना’ आणि ‘धृवास्त्र’ ची चाचणी यशस्वी
🗓 19 FEB 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• हेलीना (लष्करासाठीची आवृत्ती) आणि धृवास्त्र (हवाई आवृत्ती) क्षेपणास्त्र प्रणालींच्या यशस्वी चाचण्या आज वाळवंटी प्रदेशातल्या अत्याधुनिक हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टर प्लॅटफॉर्म वरून करण्यात आल्या. संरक्षण, संशोधन आणि विकास संघटना- डीआरडीओ ने या प्रणाली विकसित केल्या आहेत.
• या क्षेपणास्त्रांची किमान आणि कमाल टप्प्यावरची क्षमता तपासण्यासाठी त्यांच्या पाच प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. ही क्षेपणास्त्रे आकाशात घिरट्या घालणाऱ्या लक्ष्यावर, तसेच विमानांमधून हलत्या आणि स्थिर लक्ष्यांवर नेम धरुन सोडण्यात आली. तर काही चाचण्या जुन्या, निरुपयोगी रणगाड्यांना लक्ष्य करुन करण्यात आल्या. तर एक चाचणी पुढे जाणाऱ्या हेलिकॉप्टरमधून हवेतच हलत असलेल्या लक्ष्याचा वेध घेणारी होती.
• हेलीना आणि ध्रुवास्त्र ही तिसऱ्या जनरेशनची, वापरण्यापूर्वीच लक्ष्य निश्चित केल्यानंतर त्याचा अचूक वेध घेणारी, रणगाडाभेदी क्षेपणास्त्र प्रणाली असून थेट मारा तसेच वरुन मारा केल्यावरही अचूक लक्ष्यभेद करण्याची त्यांची क्षमता आहे.
• सर्व ऋतूमध्ये, कोणत्याही हवामानात दिवसरात्र काम करण्यास सक्षम असलेली ही प्रणाली, पारंपारिक शस्त्रासांनी सज्ज असलेल्या तसेच स्फोटके असलेल्याही रणगाड्यांचा पराभव करू शकते.
• हे जगातली सर्वात अत्याधुनिक असे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र आहे. ही क्षेपणास्त्रे आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट होण्यास सज्ज आहेत.

स्रोत :PIB.
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini