स्पर्धावाहिनी
5.32K subscribers
596 photos
1.19K files
622 links
Spardhavahini, Maharashtra's most liked online platform on GK (Gen. Knowledge), General Awareness, Current Affairs for MPSC & all competitive exams preparation.
---------------------------------------
© An official channel of
www.spardhavahini.com
Download Telegram
Forwarded from MPSC Current Diary
स्पर्धावाहिनी | #Current
----------------------------------------
🔘 भू विज्ञान मंत्रालयाच्या " ओशन सर्व्हिसेस, टेकनॉलॉजी, ऑबजर्वेशन्स , रिसोर्सेस मॉडेलिंग आणि सायन्स (O-SMART)” या एकछत्री योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
PIB Gov Of India
----------------------------------------
👉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने "ओशन सर्व्हिसेस, टेकनॉलॉजी, ऑबजर्वेशन्स , रिसोर्सेस मॉडेलिंग आणि सायन्स (O-SMART)” या एकछत्री योजनेला मंजुरी दिली आहे.

👉 ही योजना  2017-18 ते  2019-20 या कालावधीत राबवण्यात येणार असून त्यासाठी 1623 कोटी रुपये खर्च येणार आहे.

👉 सेवा, तंत्रज्ञान, संसाधने, निरीक्षण आणि विज्ञान यासारख्या सागरी विकास उपक्रमांच्या १६ उप-प्रकल्पांचा या योजनेत समावेश आहे.
---------------------------------------
Join » @spardhavahini
Join » @MPSCCurrentDiary
---------------------------------------
www.spardhavahini.com
आज होणाऱ्या PSI मुख्य परीक्षा पेपर- II साठी सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
स्पर्धावाहिनी | #Current
---------------------------------------
🔘 जैन मुनी तरुण सागर यांचे निधन
---------------------------------------
👉 जैन मुनी तरुण सागर यांचे दीर्घ आजाराने दिल्लीत निधन झाले. 

👉 तरुण सागर यांचे नाव पवन कुमार जैन असे होते.

👉 त्यांचा जन्म 26 जून 1967 रोजी मध्य प्रदेशातील दमोह इथल्या गुहजी गावात झाला.

👉 तरुण सागर यांनी 1981 मध्ये गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली.

👉 तरुण सागर यांनी मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेतही प्रवचन दिलं होतं. हरियाणा विधानसभेतील प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

👉 मध्य प्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना राजकीय अतिथीचा दर्जाही दिला होता.
---------------------------------------
Join » @spardhavahini
Join » @MPSCCurrentDiary
---------------------------------------
www.spardhavahini.com
स्पर्धावाहिनी | #Current
---------------------------------------
🔘 न्या. रंजन गोगोई होणार भारताचे नवे सरन्यायाधीश
---------------------------------------
👉 भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची शिफारस सध्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

👉 न्या. गोगोई हे २८ फेब्रुवारी २००१ रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले.

👉 त्यानंतर १२ फेब्रुवारी २०११ रोजी ते पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.

👉 एप्रिल २०१२पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.

👉 न्या. गोगोई हे आसाममधील असून सध्या त्यांच्यावर एनसीआर (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन) अपडेट करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे, त्या प्रक्रीयेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

👉 २०१७ साली सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायधीशांनी केलेल्या बंडात न्या. गोगोई यांचा समावेश होता. त्यावेळी पाच न्यायाधीशांनी न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित केले होते.
---------------------------------------
Join » @spardhavahini
Join » @MPSCCurrentDiary
---------------------------------------
www.spardhavahini.com
नमस्कार,

आजपासुन आम्ही चालू घडामोडी प्रश्नमंजुषा सिरीज (Daily Current Quiz) सुरु करत आहोत.

यामध्ये चालू घडामोडी घटकावर आधारित दररोज 10 प्रश्न विश्लेशनासह दिले जातील. नेहमीप्रमाणेच या प्रश्नमंजुषा सिरीज मधील प्रश्नाचे स्वरूप देखील दर्जेदार असेलच.

आपले काही अभिप्राय / सूचना असल्यास आम्हाला @spardhavahini_admin या ठिकाणी कळवा. आपल्या सूचना आमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक असतील .

धन्यवाद
टीम स्पर्धावाहिनी
Daily Current Quiz 01.pdf
989.1 KB
स्पर्धावाहिनी | #DailyQuiz

🔘 Daily Current Quiz 01
-----------------------------------
चालू घडामोडी घटकावर दररोज 10 प्रश्न (विश्लेषणासह)
-----------------------------------
Join » @spardhavahini
🗞🗞🗞🗞🗞🗞
स्पर्धावाहिनी | आजची वर्तमानपत्रे
दिनांक : 03 सप्टेबर 2018
---------------------------------------
www.spardhavahini.com
---------------------------------------
👇👇
स्पर्धावाहिनी | #Current
---------------------------------------
🔘 एशियाड स्पर्धेची गोड सांगता
---------------------------------------
इंडोनेशियामध्ये सोमवारी सांगता झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तब्बल ६९ पदकांच्या ऐतिहासिक कामगिरीसह देशाला आठव्या स्थानावर नेऊन ठेवले.

👉 १५ ते ६० वर्षांचे पदकविजेते
---------------------------------------
यंदाच्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताच्या अवघ्या १५ वर्षांच्या सौरभ चौधरीने तसेच ६० वर्षांच्या प्रणब बर्धन यांनीदेखील पदक जिंकून अनोख्या कामगिरीचा प्रारंभ केला आहे. त्यामुळे भारताच्या विजयात नवयुवकांइतकाच ज्येष्ठ नागरिकाचादेखील मोलाचा सहभाग घडून आला. त्यामुळे या विक्रमी कामगिरीत प्रत्येक वयोगटातील खेळाडूचा हातभार लागला.

👉 १५ सुवर्णाच्या विक्रमाची बरोबरी
---------------------------------------
आशियाई क्रीडा स्पर्धेला १९५१ साली प्रारंभ होतानाच्या स्पर्धेतच भारताने १५ सुवर्णपदके जिंकली होती. त्यानंतर म्हणजे तब्बल ६७ वर्षांनंतर भारताला त्या विक्रमाची बरोबरी साधणे यंदा शक्य झाले आहे. गत आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण ६५ पदके मिळवली होती. त्यापेक्षादेखील चार जास्तीची पदके भारताने यंदा मिळवून दाखवली आहेत.

👉 कबड्डी, हॉकीमध्ये अपेक्षाभंग
---------------------------------------
यंदाच्या आशियाई स्पर्धेत नवनवीन प्रकारांमध्ये भारताने पदकांची लयलूट केली असताना वर्षांनुवर्षे ज्या खेळांमध्ये भारताची मक्तेदारी होती, त्या खेळांमध्ये मात्र भारताला सुवर्ण मिळाले नसल्याची खंत निश्चितच आहे. कबड्डी खेळात सातत्याने सात वेळा सुवर्णपदक जिंकलेल्या भारताला कबड्डीमध्ये तसेच हॉकीसारख्या वर्चस्व असलेल्या खेळात सुवर्णपदक मिळू न शकल्याची खंत नक्कीच भारतीय खेळाडूंच्या मनात राहणार आहे.
---------------------------------------
Join » @spardhavahini
Join » @MPSCCurrentDiary
---------------------------------------
www.spardhavahini.com
स्पर्धावाहिनी | #Current
---------------------------------------
🔘 व्यक्तिवेध : सत्या त्रिपाठी
---------------------------------------
👉 अर्थतज्ज्ञ असलेल्या त्रिपाठी यांच्यावर संयुक्त राष्ट्रांचे सहसरचिटणीस व संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमाचे न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

👉 ते आता इलॉट हॅरिस यांची जागा घेतील. त्रिपाठी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये यापूर्वी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे सध्या संयुक्त राष्ट्रांचे विकासविषयक पायाभूत धोरण ठरविण्याबाबतची जबाबदारी होती.

👉 कटकच्या रेवेन शॉ महाविद्यालयात १९७१-७२ मध्ये त्यांनी गणित व इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. याच विद्यापीठातून वाणिज्य, गणित, अर्थशास्त्र व वित्त या विषयांत पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. १९७९ ते ८२ या कालावधीत ओदिशातील बेहरामपूर विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. पुढे याच विद्यापीठातून ते द्विपदवीधर झाले. कायदेविषयक अभ्यासात त्यांनी प्रावीण्य मिळवले. पीएचडीसाठी ‘आंतरराष्ट्रीय कायदे’ या विषयावर त्यांनी प्रतिष्ठेच्या अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास केला.

👉 यापूर्वी त्रिपाठी यांनी विकसनशील देशांमधील वनांच्या घटत्या प्रमाणाला आळा घालणे तसेच कार्बन उत्सर्जन रोखणे या महत्त्वाच्या विषयांवर संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाचे संचालक आणि कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

👉 १९९८ पासून त्रिपाठी यांनी युरोप, आशिया व आफ्रिका खंडांत वातावरण बदलांमुळे होणाऱ्या परिणामांबाबत जनजागृती केली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखून विविध देशांना प्रगतीसाठी मदत करणे तसेच समन्वय राखण्याचे काम ते करीत आहेत.
---------------------------------------
Join » @spardhavahini
Join » @MPSCCurrentDiary
---------------------------------------
www.spardhavahini.com
स्पर्धावाहिनी | #Current
---------------------------------------
🔘 उपराष्ट्रपतींच्या पुस्तकाचे प्रकाशन
---------------------------------------
👉 उपराष्ट्रपती वेकैंया नायडू यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पुर्ण झाले. या निमित्ताने नायडू यांनी 'मूविंग ऑन मूविंग फॉरवर्ड: ए ईयर इन ऑफिस' हे पुस्तक लिहीले आहे.

👉 विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
---------------------------------------
Join » @spardhavahini
Join » @MPSCCurrentDiary
---------------------------------------
www.spardhavahini.com
स्पर्धावाहिनी | #Current
---------------------------------------
🔘 सुनील मेहता : भारतीय बँक संघ (IBA)चे अध्यक्ष
---------------------------------------
👉 पजाब नॅशनल बँकेचे (PNB) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD&CEO) सुनील मेहता यांची वित्त वर्ष 2018-19 साठी भारतीय बँकांचा संघ (IBA) याचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

👉 भारतीय बँकांचा संघ (Indian Banks' Association -IBA) 26 सप्टेंबर 1946 रोजी स्थापना करण्यात आलेली भारतीय बँकिंग क्षेत्रातल्या बँकांच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधी मंडळ म्हणून करण्यात आली.
---------------------------------------
Join » @spardhavahini
Join » @MPSCCurrentDiary
---------------------------------------
www.spardhavahini.com
स्पर्धावाहिनी | #Current
---------------------------------------
🔘 आशियाई स्पर्धा विशेष
---------------------------------------
👉 चीनने या स्पर्धेमध्ये १३२ सुवर्णपदकांसह गुणतक्त्यात अग्रस्थान पटकावले. १९८२ च्या नवी दिल्ली आशियाई स्पर्धेपासून सलग दहाव्यांदा चीनने गुणतक्त्यात अग्रस्थानी राहण्याचा पराक्रम केला आहे.

👉 रविवारी स्पर्धेतील अखेरचे ४६५ वे सुवर्णपदक जपानने मिश्र सांघिक ट्रायथलॉन शर्यतीमध्ये पटकावले.

👉 जपानचा संघ ७५ सुवर्णपदकांसह गुणतक्त्यात दुसऱ्या, तर दक्षिण कोरियाचा संघ ४९ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानी राहिला.

👉 यजमान इंडोनेशियाने चौथे स्थान पटकावताना ३१ सुवर्णपदकांची कमाई केली.

👉 या स्पर्धेत सहा सुवर्णपदकांची कमाई करणारी जपानची जलतरणपटू रिकाको ईकी ही स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. एकाच स्पर्धेमध्ये सहा सुवर्णपदके पटकावणारी ईकी ही आशियाई स्पर्धेतील पहिलीच महिला खेळाडू ठरली.

👉 या स्पर्धेतील सर्वांत कमी वयाचा पदक विजेता १२ वर्षीय, तर सर्वाधिक वयाचा पदकविजेता ७८ वर्षीय होता. इंडोनेशियाच्या १२ वर्षीय बंगा निमासने स्केटिंगमध्ये ब्राँझपदक पटकावले, तर इंडोनेशियाचेच ७८ वर्षीय मायकेल बांबांग हार्टोनो हे ब्रिज खेळात ब्राँझपदकविजेते ठरले.

👉 मागील दोन आठवडे ४० क्रीडा प्रकारांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेच्या समारोपप्रसंगी जोरदार पाऊस होता.

👉 आशियाई स्पर्धेमध्ये एकूण १७,००० खेळाडू आणि अधिकाऱ्यांचा सहभाग होता. ही संख्या ऑलिम्पिकखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची आहे.
---------------------------------------
Join » @spardhavahini
Join » @MPSCCurrentDiary
---------------------------------------
www.spardhavahini.com
03-09 महत्वाची कात्रणे.pdf
2.8 MB
स्पर्धावाहिनी | महत्वाची कात्रणे
दिनांक : 03 सप्टेबर 2018

▪️लोकसत्ता
▪️सकाळ
▪️महाराष्ट्र टाईम्स

आजच्या वर्तमानपत्रातील सर्व महत्वाच्या घडामोडी ...

Join » @MPSCCurrentDiary
Join » @spardhavahini
Forwarded from स्पर्धावाहिनी (Digambar Adhure)
t.me/spardhavahini
#CDPO
आपण जर महिला व बालविकास अधिकारी [CDPO] चा अभ्यास करत असाल तर आपल्यासाठी महत्वाची बातमी ....
अभ्यासक्रमाला अनुसरून काही study material खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

🎯 अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तक सूची 👇🏻
https://t.me/spardhavahini/634

🎯 मागील परीक्षाचे Question Papers 👇🏻
https://t.me/spardhavahini/437

🎯 सर्व महत्वाचे कायदे, महिला धोरणे, बाल धोरणे 👇🏻
https://t.me/spardhavahini/437

🎯महिला व बालविकासासंबंधी महत्वाच्या शासकीय योजना 👇🏻
https://t.me/spardhavahini/475

🎯मानवी हक्क ... by YCMOU 👇🏻
https://t.me/spardhavahini/620

CDPO चा अभ्यास करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना हा मेसेज Forward करावा ...
अधिक मटेरीअल साठी जॉईन करा - @spardhavahini
🌍 www.spardhavahini.com
Forwarded from स्पर्धावाहिनी (Digambar Adhure)
CDPO Question Papers.pdf
8.8 MB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

आयोगाचे मागील वर्षातील सर्व Question Papers
2010 | 2012 | 2014 | 2015

Join » @spardhavahini
Visit » www.spardhavahini.com