स्पर्धावाहिनी
5.32K subscribers
596 photos
1.19K files
622 links
Spardhavahini, Maharashtra's most liked online platform on GK (Gen. Knowledge), General Awareness, Current Affairs for MPSC & all competitive exams preparation.
---------------------------------------
© An official channel of
www.spardhavahini.com
Download Telegram
1277.pdf
432.1 KB
स्पर्धावाहिनी | #AnswerKey

▪️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
» पेपर 2 (CSAT)
» प्रथम उत्तरतालिका (First Key)
-------------------------------
Join @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____🖌

66 व्या 'फिल्मफेअर पुरस्कार 2021' ची घोषणा
🗓 29 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• नुकतीच 66 व्या 'फिल्मफेअर पुरस्कार 2021' ची घोषणा झाली.
• यामध्ये बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते इरफान खान यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा तर अभिनेत्री तापसी पन्नू हिला सर्वोत्कृष्ट अभीनेतीचा पुरस्कार जाहीर झाला.

पुरस्कार विजेत्यांची यादी
• सर्वोत्कृष्ट चित्रपट- थप्पड
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- ओम राऊत (तान्हाजी द अनसंग वॉरिअर)
• सर्वोत्कृष्ट अभिनेता- इरफान खान (अंग्रेजी मिडीयम)
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- तापसी पन्नू (थप्पड)
• सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर- फराह खान (दिल बेचारा)
• सर्वोत्कृष्ट ड्रेस डिझायनर- विरा कपूर (गुलाबो सिताबो)
• सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला- आलाया फर्निचरवाला (जवानी जानेमन)
• सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक- राजेश कृष्णन (लूटकेस)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सैफ अली खान (तान्हाजी द अनसंग वॉरिअर)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- फारुख जाफर (गुलाबो सीताबो)
• सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायिका- असीस कौर (मलंग)
• सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायक- राघव चैतन्य (थप्पड)
• सर्वोत्कृष्ट संगीत - प्रतिम (लुडो)

समीक्षक पुरस्कार
• सर्वोत्कृष्ट चित्रपट- ऐब आले ऊ
• सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमिताभ बच्चन (गुलाबो सीताबो)
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- तिलोटामा शोम (सर)

विशेष पुरस्कार
• लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड- इरफान खान
• आरडी बर्मन पुरस्कार- गुलजार

फिल्मफेअर पुरस्कार
• फिल्मफेअर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते.
• इ.स. 1954 सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. 
• द क्लेअर्स हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेअर अवॉर्ड्‌स असे करण्यात आले.

स्रोत : लोकसत्ता, विकिपीडिया
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
______🖌

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारताची सर्वोत्तम कामगिरी
🗓 29 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• भारतीय नेमबाजांनी घरच्या मैदानावर रंगलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली.
• अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदकांची भर घालत पदकतालिकेत अग्रस्थान कायम राखले.
• त्याचबरोबर भारताच्या 15 नेमबाजांनी आतापर्यंत टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले.
• विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या यजमान भारताने एकूण 30 पदकांची कमाई के ली. त्यात 15 सुवर्ण, 9 रौप्य आणि 6 कांस्यपदकांचा वाटा आहे.
• अखेरच्या दिवशी पृथ्वीराज टोंडायमन, लक्षय शेरॉन आणि कायनन चेनाय यांनी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताला अखेरचे सुवर्णपदक मिळवून दिले.
• त्याआधी श्रेयसी सिंग, राजेश्वरी कुमारी आणि मनीषा कीर यांनी भारताला महिलांच्या ट्रप प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले होते.
• भारताने महिलांच्या अंतिम फेरीत कझाकस्तानचा 6-0 असा धुव्वा उडवला.
• नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे ही स्पर्धा पार पडली.

महाराष्ट्राच्या तेजस्विनी सांवतचा सुवर्णवेध
• तेजस्विनीने संजीव राजपूतसह 50 मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र गटात ही कामगिरी नोंदवली.
• अंतिम सामन्यात त्यांनी युक्रेनच्या सेर्ही कुलिश आणि अॅना इलिना यांचा 31-22 असा पराभव केला.

एकाच प्रकारातील तिन्ही पदके भारताला
• महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेतील तिन्ही पदके भारताला मिळाली आहेत.
• या प्रकारात चिंकी यादवने सुवर्ण, राही सरनोबतने रौप्य तर मनु भाकेरने कांस्यपदक जिंकले आहे.

देशनिहाय पदके (Top 3)
1) भारत : 30 (15-सुवर्ण, 9-रौप्य, 6-कांस्य)
2) अमेरिका : 8 (4-सुवर्ण, 3-रौप्य, 1-कांस्य)
3) इटली : 4 (2-सुवर्ण, 0-रौप्य, 2-कांस्य)

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
______🖌

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारताची सर्वोत्तम कामगिरी
🗓 29 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

भारतीय नेमबाजांनी घरच्या मैदानावर रंगलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली.
• अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदकांची भर घालत पदकतालिकेत अग्रस्थान कायम राखले.
• त्याचबरोबर भारताच्या 15 नेमबाजांनी आतापर्यंत टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले.
• विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या यजमान भारताने एकूण 30 पदकांची कमाई के ली. त्यात 15 सुवर्ण, 9 रौप्य आणि 6 कांस्यपदकांचा वाटा आहे.
• अखेरच्या दिवशी पृथ्वीराज टोंडायमन, लक्षय शेरॉन आणि कायनन चेनाय यांनी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताला अखेरचे सुवर्णपदक मिळवून दिले.
• त्याआधी श्रेयसी सिंग, राजेश्वरी कुमारी आणि मनीषा कीर यांनी भारताला महिलांच्या ट्रप प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले होते.
• भारताने महिलांच्या अंतिम फेरीत कझाकस्तानचा 6-0 असा धुव्वा उडवला.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

बिहारने मंजूर केले 'इथॅनॉल उत्पादन प्रोत्साहन धोरण, 2021'
🗓 30 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• अलीकडेच बिहार मंत्रिमंडळाने 'इथॅनॉल प्रॉडक्शन प्रमोशन पॉलिसी, 2021' या नावाने स्वतःचे इथेनॉल धोरण मंजूर केले आहे, असे धोरण लागू करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
• बिहार सरकारच्या या नवीन धोरणाअंतर्गत जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण (2018) आणि राष्ट्रीय जैव इंधन समन्वय समितीने मान्यता दिलेल्या सर्व प्रकारच्या फीडस्टॉकमधून इथेनॉल तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
• या धोरणांतर्गत नवीन इथेनॉल उत्पादक युनिटच्या स्थापनेस प्रोत्साहन देण्यासाठी वनस्पती व यंत्रसामग्रीच्या खर्चाच्या 15 टक्के आणि जास्तीत जास्त 5 कोटींपर्यंत भांडवल अनुदान देण्याची व्यवस्था केली गेली आहे.
• हे भांडवल अनुदान 'बिहार औद्योगिक गुंतवणूक प्रोत्साहन धोरण, 2016 अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त असेल.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

अर्थ आवर
🗓 30 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• यंदाचा अर्थ आवर 27 मार्च 2021 रोजी साजरा करण्यात आला.
• वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर (WWF) द्वारा याचे आयोजन दरवर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी केले जाते.
• 2007 मध्ये सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे प्रथम हा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता.
• या कार्यक्रमांतर्गत 180 हून अधिक देशांतील लोकांना तेथील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 8:30 ते 9:30 दरम्यान सर्व दिवे बंद ठेवण्यास प्रोत्साहित केले जाते.
• लोकांना हवामान बदलाच्या परिणामाविषयी जागरूक करणे आणि ऊर्जा संवर्धनासाठी अनावश्यक प्रकाशाचा वापर टाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दीष्ट आहे.

वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर (WWF)
• ही जगातील एक अग्रगण्य संवर्धन संस्था असून ती सध्या 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे.
• स्थापना: 1961
• मुख्यालय: ग्लॅंड (स्वित्झर्लंड)
• उद्देश: निसर्गाचे संरक्षण करणे आणि पृथ्वीवरील जैवविविधतेवर संबंधित धोके कमी करणे.
• WWF चे इतर प्रमुख उपक्रमः TX2 लक्ष्य (TX2 Goal), ट्रैफिक (TRAFFIC), लिविंग प्लेनेट रिपोर्ट (Living Planet Report)

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
लैंगीक असमानता निर्देशांकात (Gender Gap Index) भारत १४० व्या क्रमांकावर
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
ऑलिम्पिक २०२८ स्पर्धेसाठी क्रिकेट संघ पाठवण्यास बीसीसीआयची परवानगी
🗓 17 April 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) २०२८ साली होण्याऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला खेळण्याची परवानगी दिली आहे. २०२८ ची ऑलिम्पिक स्पर्धा ही लॉस अँजेलिस येथे होणार आहे.
• शुक्रवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयनं हा निर्णय घेतला आहे. तर महिला क्रिकेट संघ २०२२ साली होण्याऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही सहभागी होणार आहे.
• क्रिकेट ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी करण्यासाठी आयसीसीचे प्रयत्न सुरु होते. मात्र बीसीसीआय यासाठी तयार होत नव्हतं. अखेर शुक्रवारच्या बैठकीत ऑलिम्पिकसाठी बीसीसीआयनं हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र बीसीसीआनं यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
• बीसीसीआयनं स्वायत्तता कायम राहावी यासाठी लिखित हमी मागितली आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे संघ राष्ट्रीय खेळ संघाच्या अंतर्गत येतात. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अंतर्गत काम चालतं. त्यामुळे स्वायत्त असलेल्या बीसीआयनं भारतीय ऑलिम्पिक संघांच्या अंतर्गत काम करण्यास विरोध दर्शवला आहे.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
भारतीय कुस्तीपटूंची तिहेरी सुवर्णकमाई
🗓 17 April 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धा
• भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगट आणि अंशू मलिक यांनी शुक्रवारी वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
• टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या या दोघींनी कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याची किमया साधली. याव्यतिरिक्त दिव्या काकराननेसुद्धा सुवर्णपदक पटकावले, मात्र अनुभवी साक्षी मलिकला रौप्यावर समाधान मानावे लागले.
विनेश फोगट:
• महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील अंतिम लढतीत विनेशने चायनीज तैपईच्या मेंड सुआन-सेईवर ६-० असा विजय मिळवला. यापूर्वी आशियाई स्पर्धेत तीन वेळा रौप्यपदकावर समाधान मानणाऱ्या विनेशने अंतिम फेरीत एकही गुण न गमावता तांत्रिक गुणांआधारे सुवर्णपदक जिंकले.
• विनेश फोगट ही भारतीय कुस्तीपटू आहे. आशियाई खेळ व कॉमन वेल्थमध्ये सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. याव्यतिरिक्त, ती लॉरेस जागतिक क्रीडा पुरस्कारासाठी नामांकित होणारी पहिली भारतीय खेळाडू होती.
• २०१६ मध्ये त्यांनी अर्जुन पुरस्कार, २०२० मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जिंकला आहे.
अंशू मलिक:
• हरयाणाच्या १९ वर्षीय अंशूने ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात मोंगोलियाच्या बत्सेत अटसेगला ३-० असे नमवले. पंचांनी बत्सेतला विविध चुकांसाठी तीन वेळा ताकीद देऊनही तिचा खेळ न सुधारल्यामुळे अंशूला विजयी घोषित करण्यात आले. उपांत्य फे रीत अंशूने तांत्रिक गुणांच्या आधारे क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या उझबेकिस्तानच्या सेव्हारा एशमुराटोव्हाला पराभूत केले.
दिव्या काकरान:
• महिलांच्या ७२ किलो वजनी गटात दिव्याने कझाकस्तानच्या झामिला बर्गेनोव्हावर ८-५ अशी मात केली. दिव्याने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. गतवर्षी दिव्याने ६८ किलो वजनी गटात अजिंक्यपद मिळवले होते
स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
लिंगभाव संवाद कार्यक्रमाचा शुभारंभ
🗓 17 April 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
लिंगभाव संवाद कार्यक्रम हा दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन (डीएवाय-एनआरएलएम) आणि अर्थव्यवस्थेत महिला आणि मुलींच्या प्रगतीसाठी काय काम केले जाऊ शकते (आयडब्ल्यूडब्ल्यूएजीई) या उपक्रमाचा एक संयुक्त प्रयत्न असून, या प्रयत्नांमधून समोर येणारे अनुभव एकाच व्यासपीठावर सामायिक करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
लिंगभाव संवाद कार्यक्रम राज्यांना खालील संधी प्रदान करतो:
• महिला संस्थाच्या सुधारणांसाठी इतर राज्यांनी हाती घेतलेल्या चांगल्या कार्यपद्धती / उपक्रम समजून घेणे (उदा. महिलांना सुलभरीत्या जमिनीचे हक्क मिळणे, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) मध्ये त्यांचा सहभाग, अन्न, पोषण, आरोग्य आणि पाणी आणि स्वच्छता (एफएनएचडब्ल्यू) यासाठी उत्तम कार्यपद्धती, सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी मजबूत संस्था स्थापन करण्यासाठी, आणि महिलांमधील असुरक्षित गटांचे संरक्षण आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी;
• जागतिक स्तरावरील लिंगभाव समस्या/प्रश्न समजून घेणे;
• मुद्दे/अंमलबजावणीतील अडथळे कसे हाताळावेत यासंदर्भातील सूचनांसह तज्ञ आणि इतर सहकाऱ्यांसोबत सल्लामसलत;
• देशातील / इतर देशांमधील लिंगभाव विषयक प्रश्नांवरील सर्वोत्तम पद्धतींचे एकत्रीकरण करण्यासाठी हातभार;
• सध्या सुरू असलेल्या आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ग्रामीण विकास विभागाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरूवात झाली. या ऑनलाइन कार्यक्रमात तज्ञांचे एक पॅनेल देखील होते. याव्यतिरिक्त, स्थानिक स्तरातील महिलांनी आपले अनुभव देखील सांगितले.
• 2016 मध्ये, डीएवाय-एनआरएलएमने मुख्य प्रवाहातील लिंगभाव विषयक समस्यांच्या समाधानाकरिता एक लिंग परिचालन रणनीती देखील तयार केली, ज्यात लिंगभाव विषयक मुद्द्यांवरील कर्मचारी, संस्था यांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला.

स्रोत : PIB
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_________🖌

पुष्कर सिंह धामी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी
🗓 05 July 2021 ©स्पर्धावाहिनी
══════════════
• उत्तराखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांनी रविवारी शपथ घेतली.
त्यांच्यासोबत पूर्वीच्या तीरथसिंह रावत मंत्रिमंडळातील 11 सदस्यांचाही शपथविधी झाला.
• राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी धामी व त्यांच्या सहकाऱ्यांना पदाची शपथ दिली.
• तिरथसिंह रावत हे नेमणूक झाल्यापासून 6 महिन्यात राज्य विधानसभेचे सदस्य होऊ न शकल्याने त्यांना हे पद सोडावे लागले होते.

कोण आहेत पुष्कर सिंह धामी?
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत ते 1990 पासून काम करत आहेत.
• पूर्व मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडलेली आहे.
• ते कुमाऊ भागातून दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
• वयाच्या 41 व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे ते उत्तराखंडचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले आहेत.


स्रोत : लोकसत्ता, द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌

नव्या विद्युत वाहन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
🗓 05 July 2021 ©स्पर्धावाहिनी
══════════════
• वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि विद्युत वाहनांच्या नव्या उद्योगाला व त्यातून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी राज्यात नवे विद्युत वाहन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रविवारी मंजुरी देण्यात आली.
• पुढील तीन वर्षांसाठी हे धोरण लागू असून विद्युत वाहन- बॅटरीचा प्रकल्प सुरू करणाऱ्या कं पन्यांना डी प्लस गटातील वस्तू व सेवा कराचा १५० टक्के परतावा देण्याची सवलत देण्यात येणार आहे.
• विद्युत वाहन हा उद्योग आगामी काळातील मोठा व्यवसाय ठरणार असल्याने त्याबाबतची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात नवे विद्युत वाहन धोरण जाहीर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

काय आहे नव्या धोरणात?
• राज्यात सध्या सुमारे ४० हजार विद्युत वाहने आहेत. आता विद्युत वाहनांच्या उत्पादनाला, खरेदीला व दैनंदिन वापरासाठीच्या चार्जिंग के द्रांना अशा सर्व पातळीवर सवलती व अनुदान हे या धोरणाचे वैशिष्ट्य आहे.
• विद्युत रिक्षा, विद्युत टॅक्सी यांना परवान्याची गरज असणार नाही.
• ओला, उबरसारख्या टॅक्सीसेवा आणि घरपोच सेवांसाठी विद्युत वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
• केवळ चारचाकी नव्हे तर दुचाकी विद्युत वाहनांनाही गटनिहाय १५ हजारांपेक्षा अधिक अनुदान देण्यात येणार आहे.

स्रोत : लोकसत्ता, द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌

राज्यात वृक्ष प्राधिकरण
🗓 06 July 2021 ©स्पर्धावाहिनी
══════════════
• शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुरातन वृक्ष संवर्धन, महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यासह अन्य महत्त्वपूर्ण तरतुदी असलेले विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आले.
• पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 'महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन ‘ हे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडले.
• या विधेयकात विकासासाठी काही झाडे कापावी लागली तर, त्यासाठी नियमांची तरतूद करण्यात आली आहे. एक झाड तोडायचे असेल, तर किमान झाडाच्या वयाइतकी व पाच-सहा फुटांची झाडे लावून ती जतन करण्याचे बंधन आता घातले जाणार आहे.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌

आठ राज्यांत नवे राज्यपाल
🗓 07 July 2021 ©स्पर्धावाहिनी
══════════════
• केंद्र सरकारने आठ राज्यांच्या राज्यपाल पदांवर नव्या नियुक्त्यांसह फेरबदल केले आहेत.
• केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले असून त्यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी वर्णी लावण्यात आली आहे.
• गेहलोत राज्यसभेचे खासदार असून वरिष्ठ सभागृहातील गटनेतेही आहेत. आता त्यांना मंत्रिपद, संसद सदस्यत्व व गटनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागेल.
• विशाखापटण्मचे माजी खासदार व भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हरीबाबू कंभमपती यांना मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे.
• भाजपचे गुजरातमधील नेते मंगुभाई छगनभाई पटेल यांना मध्य प्रदेशचे, तर गोवा विधानसभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहे.
• अन्य चार राज्यांत राज्यपालांमध्ये फेरबदल झाले आहेत. मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना गोव्याचे राज्यपाल केले असून सत्यदेव नारायण आर्य यांना हरियाणाहून त्रिपुराचे राज्यपाल म्हणून पाठवले आहे.
• त्रिपुराचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस आता झारखंडचे राज्यपाल होतील.
• संघाचे वरिष्ठ नेते व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय हरियाणाचे राज्यपाल होतील.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर
🗓 07 July 2021 ©स्पर्धावाहिनी
══════════════
• महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
• राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. कानिटकर यांची नियुक्ती जाहीर केली.

ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर
• सध्या त्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख ( वैद्यकीय ) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.
• डॉ. कानिटकर यांनी पुणे येथील सैन्य दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
• बालरोगशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.
• २०१७ ते २०१९ या काळात त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले. त्यांना अध्यापन व संशोधनाचा २२ वर्षांचा अनुभव आहे.
• आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ
• महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान व वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे.
• याचे मुख्यालय नाशिक येथे आहे.
• हे विद्यापीठ महाराष्ट्र शासनाच्या "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम, १९९८" नुसार १९९८ साली स्थापन झाले.
• महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात

स्रोत : लोकसत्ता, वकिपीडिया
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌

शिरीषा बांदला बनणार अवकाशवीर
🗓 07 July 2021 ©स्पर्धावाहिनी
══════════════
• आंध्र प्रदेशात गुंटूर येथे जन्मलेली शिरीषा बांदला ही लवकरच 'अवकाशवीरांगना' ठरणार आहे.
• रिचर्ड ब्रॅन्सन या अब्जाधीश अवकाश उद्योजकाच्या 'व्हर्जिन गॅलेक्टिक' या अवकाश यानातून ती 11 जुलैला अवकाशात झेपावणार आहे.
• एकूण सहा जण या मोहिमेत समाविष्ट आहेत. यात काही प्रयोगही केले जाणार आहेत असे सांगण्यात येते.
• भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो ही संस्था 2022-23 पर्यंत भारतीय महिलेला अवकाशात पाठवणार आहे. याआधी राकेश शर्मा ( रशियन भारतीय मोहीम) व सुनीता विल्यम्स (नासा) यांनी आधीच अवकाश गाठले होते, तर ‘नासा' च्या कोलंबिया दुर्घटनेत कल्पना चावला मरण पावली होती.

कोण आहे शिरीषा बांदला?
• 34 वर्षाची शिरीषा ही जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या 2015 च्या तुकडीमधील 'एमबीए' आहे.
• त्याआधी परड्यू विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनीअरिंग प्रशिक्षण घेतले असल्याने, 'व्हर्जिन गॅलॅक्टिक' या ब्रिटिश-अमेरिकन अवकाशयान कंपनीच्या सरकारी कामकाजविषयक विभागाच्या त्या उपाध्यक्ष आहेत.
• शिरीषा वयाच्या चौथ्या वर्षी अमेरिकेला गेली व टेक्सासमध्ये वाढली.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join :
@spardhavahini
MIDC अधिनियम
येणाऱ्या MIDC परीक्षेकरिता उपयुक्त

संपर्क : 9765000700
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌
देशात १ जुलै २०२२ पासून एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी!
🗓 13 AUGUST 2021 ©स्पर्धावाहिनी
══════════════
• पर्यावरण मंत्रालयाने पुन्हा एकदा एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
• १ जुलै २०२२ पासून एकल वापरातील प्लास्टिक वस्तूंची निर्मिती, विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम २०२१ अधिसूचित केला आहे.
• १ जुलै २०२२ पासून पॉलिस्टीरिन आणि विस्तारीत पॉलिस्टीरिनसह एकेरी वापरातील प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असेल.
• ध्वज, फुगा, आइसक्रिम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारा थर्माकॉल याचा समावेश आहे. तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, ट्रे, स्वीट बॉक्स, आमंत्रण कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवर प्लास्टिक रॅप अशा वस्तूंचा समावेश आहे.
• प्लास्टिक कॅरी बॅगची जाडी ३० सप्टेंबर २०२१ पासून ५० मायक्रॉनवरून ७५ मायक्रॉन करण्यात येणार आहे.
• ३१ डिसेंबर २०२२ पासून ही जाडी १२० मायक्रॉन केली जाणार आहे.
• सध्या देशात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडींच्या पिशव्यांवर बंदी आहे.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join : @spardhavahini
मराठी शुद्ध लेखन.pdf
2 MB
मराठी शुद्ध लेखन नियम
- महाराष्ट्र साहित्य परिषद

Join : @spardhavahini
इंदिरा_गांधी_मातृत्व_सहयोग_योजना.pdf
1.5 MB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
किशोरी शक्ति योजना.pdf
3 MB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» किशोरी शक्ति योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
बाल संगोपन योजना.pdf
551 KB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» बाल संगोपन योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
बेटी_बचाओ_बेटी_पढ़ाओ_योजना.pdf
2.2 MB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
मनोधैर्य योजना.pdf
194.7 KB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» मनोधैर्य योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
माझी_कन्या_भाग्यश्री_योजना.pdf
326 KB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» माझी कन्या भाग्यश्री योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
राजीव_गांधी_राष्ट्रीय_पाळणाघर_योजना.pdf
417.8 KB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
राजीव गांधी सबला योजना.pdf
2 MB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» राजीव गांधी सबला योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com