स्पर्धावाहिनी
5.47K subscribers
596 photos
1.19K files
622 links
Spardhavahini, Maharashtra's most liked online platform on GK (Gen. Knowledge), General Awareness, Current Affairs for MPSC & all competitive exams preparation.
---------------------------------------
© An official channel of
www.spardhavahini.com
Download Telegram
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
__________🖌

ग्राम उजाला योजना
🗓 22 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• ग्रामीण भागात स्वस्त एलईडी बल्ब वितरित करण्यासाठी केंद्र सरकारने 19 मार्च 2021 रोजी ग्राम उजाला योजना सुरू केली.
• केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार सिंग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे या योजनेची सुरुवात केली.

काय आहे ही योजना?
• ही एक महत्वाकांक्षी योजना असून ज्याद्वारे ग्रामीण भागात जगातील सर्वात स्वस्त एलईडी बल्बचे वितरण करण्यात येणार आहे.
• अशा प्रकारची ही भारतातील पहिली योजना आहे. याद्वारे ग्रामीण भागात केवळ 10 रुपयांमध्ये एलईडी बल्ब देण्यात येणार आहेत.
• एका कुटुंबाला जास्तीत जास्त पाच ब्लब देण्यात येणार आहेत.
• अशा प्रकारे ग्रामीण भागात जवळपास 600 दशलक्ष ब्लबचे वितरण करण्यात येणार आहे.
सरकारद्वारा संचालित 'एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लिमिटेड' ची सहायक कंपनी 'कन्वर्जेन्स एनर्जी सर्विसेज लिमिटेड' (CBSL) द्वारा हे बल्ब देण्यात येणार आहेत.
• त्याचबरोबर या योजनेत ग्रामीण ग्राहकांकडून तप्तदीप ब्लब आणि कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट दिवे (CFL) बल्ब जमा करून घेण्याचाही प्रस्ताव आहे.
• असे बल्ब जमा केल्यानंतर, ग्राहकांना 7 वर्षाची वॉरंटीसह 7-वॅट आणि 12 वॅटचे एलईडी बल्ब मिळणार आहेत.

नियोजनाचा पहिला टप्पा
• पहिल्या टप्प्यात ही योजना बिहारच्या आरा या जिल्ह्यातून सुरू करण्यात आली आहे.
• या टप्प्यात आरा (बिहार), विजयवाडा (आंध्र प्रदेश), वाराणसी (उत्तर प्रदेश), नागपूर (महाराष्ट्र) आणि पश्चिम गुजरातमधे सुमारे 15 दशलक्ष एलईडी बल्बचे वितरण केले जाईल.

पार्श्वभूमी
• 2014 साली, एलईडी बल्बचे दर Unnat Jyoti by Affordable Lighting for All (Ujala) या योजनेद्वारे सुमारे 310 रुपयांवरून 70 रुपये प्रति ब्लब अशी कपात केली होती.

योजनेचे महत्त्व
• एका अंदाजानुसार, सर्व 300 दशलक्ष बल्ब भारतात बदलल्यास, दर वर्षी 40,743 दशलक्ष किलोवॅट ऊर्जेची बचत होईल.
• यामुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी करण्यास मदत मदत होणार आहे.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌

बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना 'गांधी शांतता पुरस्कार 2020'
🗓 22 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नुकतीच गांधी शांतता पुरस्कारांची घोषणा केली.
• 2020 साठीच्या पुरस्कारासाठी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची तर 2019 च्या पुरस्कारासाठी ओमानचे दिवंगत सुल्तान काबूस बिन अल सैद यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

बंगबंधू शेख मुजीबुर रहमान
• बंगबंधू शेख मुजीबुर रहमान हे पहिले राष्ट्रपती होते आणि नंतर ते बांगलादेशचे पंतप्रधानही बनले.
त्यांना 'राष्ट्रपिता' किंवा 'मुजीब' म्हणतात.
• 15 ऑगस्ट 1975 रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती.

गांधी शांतता पुरस्कार
• भारत सरकारने 1995 मध्ये महात्मा गांधींच्या 125 व्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
• या पुरस्काराच्या निवड समितीचे अध्यक्षपद पंतप्रधानांकडे असते. तर मुख्य न्यायाधीश, लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता हे दोघे पदसिद्ध सदस्य असतात. तर इतर दोन सदस्य असतात.
• महात्मा गांधी यांच्या नावाने दिला जाणारा हा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
• हा एक वार्षिक पुरस्कार असून व्यक्ती किंवा संस्थांना अहिंसा आणि इतर गांधीवादी आदर्शांद्वारे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बदलांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल देण्यात येतो.
• 1 कोटी रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
____________🖌

'कॅच द रेन' मोहीमेस सुरुवात
🗓 22 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• 22 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने "जलशक्ती अभियान: कॅच द रेन मोहीम" सुरू केली.
• ही मोहीम 22 मार्च ते 30 नोव्हेंबर 2021 यादरम्यान देशातील ग्रामीण आणि शहरी भागात राबविली जाणार आहे.

मोहिमेबद्दल
• “Catch the rain, where it falls, when it falls” या घोषवाक्यासह पावसाळा येण्यापूर्वी हवामान परिस्थिती आणि उप-हंगामांसाठी योग्य असे पावसाचे पाणी साठवण करण्यासाठी उपयुक्त अशी रचना (Rain Water Harvesting Structures-RWHS) तयार करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
• लोकसहभागातून जल संवर्धनाचे काम शेवटच्या स्तरापर्यंत पोहचविण्यासाठी जन आंदोलन म्हणून ही मोहिम सुरु करण्यात आली आहे.
• निवडणूक होऊ घातलेली राज्ये वगळता, प्रत्येक जिल्हयाच्या सर्व ग्राम पंचायतींमध्ये या दिवशी (22 मार्च) ग्राम सभा घेण्यात येतील आणि पाणी व पाणी संवर्धनाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात येईल.
• यासाठी ग्राम सभांमध्ये जल शपथ देखील घेण्यात येईल.
• प्रत्येक जिल्हा, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायतींमध्ये रेन सेंटर सुरू करण्याची विनंती सरकारने राज्य सरकारांना केली आहे.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌

झारखंड सरकारने सुरु केले SAAMAR अभियान
🗓 22 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• झारखंड सरकारने कुपोषण रोखण्याच्या उद्देशाने SAAMAR - Strategic Action for Alleviation of Malnutrition and Anaemia Reduction अभियान सुरू केले आहे.

काय आहे समर अभियान ?
• अशक्त आणि कुपोषित मुलांची ओळख पटविणे आणि कुपोषणाच्या समस्येवर प्रभावीपणे मात करण्यासाठी अनेक विभाग एकत्र आणण्यासाठी हे अभियान आहे.
• 1000 दिवसांच्या लक्ष्यासह झारखंडमध्ये हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
• या मोहिमेअंतर्गत, यासंबंधित विषयानुरुप रज्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी वार्षिक सर्वेक्षण केले जाईल.
• या अभियानात ग्राम विकास विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि शालेय व्यवस्थापन समित्या व ग्रामसभा यांना एकत्रितपणे बालकांच्या पोषणासंबंधिची जाणीव करून देण्यासाठी अनेक विभागांचा समावेश करण्याची कल्पना राबविण्यात आली आहे.
• हे अभियान प्रामुख्याने असुरक्षित अशा आदिवासींच्या पोषण आहारावर लक्ष केंद्रित करणार आहे.

झारखंडमध्ये कुपोषण स्थिती
• आर्थिक सर्वेक्षण 2021 नुसार, झारखंडमध्ये मार्च 2017 ते जुलै 2017 या कालावधीत सर्वसमावेशक राष्ट्रीय पोषण सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार 45% मुले कमी वजनाची आहेत.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________🖌

22 मार्च: जागतिक जलदिन
🗓 22 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• 22 मार्च रोजी संयुक्त राष्ट्र तसेच जगातील इतर विविध संघटनांनी जागतिक जलदिन साजरा केला.
• 1993 पासून दरवर्षी गोड्या पाण्याचे महत्त्व अधोरेखीत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
• यंदाच्या या दिवसाची थीम (विषय) Valuing Water अशी आहे.
• शाश्वत विकास ध्येय 6 (2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता) साध्य करणे हे जागतिक जल दिनाचे मुख्य उद्दीष्ट आहे.

महत्व
• सन 2050 पर्यंत, 5.7 अब्जाहून अधिक लोक पाण्याची कमतरता असलेल्या भागात असतील, 2040 पर्यंत जगभरातील पाण्याची मागणी 50% वाढेल. म्हणूनच, जलसंधारणावर जोर देणे आवश्यक आहे.

ऐतिहासीक पार्श्वभूमी :
• 1992 च्या पर्यावरण व विकास विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत (United Nations Conference on Environment and Development) संयुक्त राष्ट्रांनी जागतिक जल दिन साजरा करण्याचा ठराव संमत केला.
• 2013 हे वर्ष ‘जल क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ (International Year of Cooperation in the Water Sphere) म्हणून साजरे केले गेले.
• 2018 ते 2028 दरम्यान ‘शाश्वत विकासासाठी पाण्यावरील कृतीचे आंतरराष्ट्रीय दशक’ (International Decade for Action on Water for Sustainable Development) साजरे केले जात आहे.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
________🖌

23 मार्च: जागतिक हवामान दिन
🗓 23 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• जागतिक हवामान दिन प्रत्येक वर्षी 23 मार्च रोजी साजरा केला जातो.
• 2021 च्या या दिनाची थीम (विषय) 'The Ocean, Our Climate and Weather' आहे.
 जागतिक हवामान दिवस म्हणून निवड करण्यात आली.
• हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी व हवामानाचे महत्त्व समजावे, तसेच हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, याविषयी जाणीव-जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने 23 मार्च जागतिक हवामान दिवस म्हणून महत्त्वपूर्ण आहे.

23 मार्च रोजीच का?
• 23 मार्चची निवड केली गेली आहे कारण याच दिवशी 1950 मध्ये जागतिक हवामान संस्था स्थापन केली गेली होती.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
____🖌

Freedom Pineapple Movement
🗓 23 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी चीनने तैवानकडून अननस आयात करण्यासंबंधित लावलेल्या बंदीचा निषेध करण्यासाठी नुकतीच ट्विटरवर “Freedom Pineapple Movement ” मोहीम सुरू केली.

काय आहे प्रकरण?
• तैवानकडून अननस आयात करण्याच्या चिनी बंदीविरोधात "फ्रीडम अननस" हा एक राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया आहे.
• 2021 मध्ये चीन सरकारने अननसासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी तैवानकडून येणाऱ्या अननसाच्या आयातीवर बंदी घातली.
• अननस आयात कीटकांपासून दूषित असल्याचे दिसून आले, असे सांगून चिनी सरकारने आयात करण्यास मनाई केली आहे. तथापि, तैवानचे तज्ञ, उत्पादक आणि सरकारने यास नकार दिला आहे.
'Play on Freedom Fries' या चळवळीतून प्रेरणेतून या चळवळीचे नाव ठेवण्यात आलेले आहे.
• या बंदीचा सामना करण्यासाठी तैवानच्या सरकारने आपल्या नागरिकांना आणि इतर मित्र राष्ट्रांना Freedom Pineapple खरेदी करण्यास प्रोत्साहित केले आहे.
• त्याचबरोबर तैवान सरकार संबंधित शेतकऱ्यांना अनुदान देखील देणार आहे.
• तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनीही 'Eat Taiwan’s pineapples until you burst' नावाची एक सोशल मीडिया मोहीम सुरू केली आहे ज्याद्वारे स्थानिक अननसाचा वापर वाढविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
__________🖌

67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
🗓 23 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• कोरोना व्हायरसने जगात घातलेल्या थैमानामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात आली.
• या वर्षी कंगना रणौतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मनोज वाजपेयी आणि धनुषने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला.
• छिछोरे हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर बार्डो हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. 
• बार्डो या चित्रपटातील गाण्यासाठी सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.

प्रमुख पुरस्कार्थी
• सर्वोत्कृष्ट चित्रपट : मरक्कर (मल्याळी)
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (मनकर्णिका आणि पंगा)
• सर्वोत्कृष्ट अभिनेता : मनोज वाजपेयी (भोसले), धनुष (असुरन)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : पल्लवी जोशी (ताश्कंद फाइल्स)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: विजय सेतूपती (सुपर डिलक्स)
• सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट : आनंदी गोपाळ (मराठी)
• सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट : जक्कल (मराठी)

इतर प्रमुख पुरस्कार
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय पुरनसिंह चौहान (भट्टर हुरे)
• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : सावनी रवींद्र (बार्डो)
• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: बी. प्राक (केसरी)
• सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : डी. इम्मन (विश्वासम)
• सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन : आनंदी गोपाळ, सुनील नागवेकर आणि नीलेश वाघ
• सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : कस्तूरी
• सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मकता चित्रपट : ताजमहाल (मराठी)
• सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : छिछोरे
• सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : बार्डो
• सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट : काजरो
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (चित्रपटेतर विभाग): राजप्रितम मोरे (खिसा), मराठी

कंगना राणौत
• कंगना राणौतला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळण्याची ही चौथी वेळ आहे.
• सर्वात आधी 2008 साली चित्रपट 'फॅशन'साठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
• त्यानंतर 2014 साली 'क्वीन' चित्रपटासाठी तर 2015 साली 'तनू वेड्स मनु रिटर्न्स'साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
• यंदा तिला 'मणिकर्णिका'चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिने स्वतःच केले आहे.

मनोज बाजपेयी
• मनोज बाजपेयी याला यंदा 'भोसले' या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
• याआधी 'पिंजर' या चित्रपटासाठी बाजपेयीला 'स्पेशल ज्युरी पुरस्कार' आणि 'सत्या' या चित्रपटासाठी 'बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा' पुरस्कार प्राप्त झाला होता.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
__________🖌

'विमा दुरुस्ती विधेयक 2021' लोकसभेत पारित
🗓 25 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• राज्यसभेने 18 मार्च 2021 ला तर लोकसभेने 22 मार्च 2021 रोजी विमा दुरुस्ती विधेयक 2021 ला मंजूर दिली.
• या विधेयकात 1938 च्या विमा कायद्यात सुधारणा करण्याची तरतूद असून, ज्याद्वारे भारतीय विमा कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकीची मर्यादा वाढविण्यात आली आहे.
• विधेयकानुसार, थेट विदेशी गुंतवणूकीची (FDI) मर्यादा सध्याच्या 49% वरून 74% पर्यंत वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
• 2015 मध्ये देशाच्या विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक मर्यादा 26% वरुन 49% करण्यात आली होती ती आता 74% करण्यात आली आहे.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA)
• भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ही एक वैधानिक संस्था असून 'विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा 1999' अन्वये याची स्थापना करण्यात आली आहे.
• ही एक स्वायत्त संस्था असून यात 10 सदस्य असतात. (एक अध्यक्ष, पाच पूर्ण-वेळ आणि चार अंशकालिक सदस्य).
• भारतातील विमा आणि विमा उद्योगांचे नियमन आणि प्रसार करण्यासाठी तिची स्थापना केली गेली आहे.
मुख्यालय - हैदराबाद
विद्यमान अध्यक्ष - सुभाषचंद्र खुंटिया

स्रोत : इंडियन एक्सप्रेस
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
______🖌

न्या. रमणा यांची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस
🗓 25 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी पुढील सरन्यायाधीशपदी वरिष्ठ न्यायाधीश एन. व्ही. रमणा यांची शिफारस केली आहे. ते देशाचे 48 वे सरन्यायाधीश असतील.
• सेवाज्येष्ठतेच्या निकषानुसार व इतर संकेतानुसार बोपण्णा यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
• सरन्यायाधीश बोबडे हे 23 एप्रिलला निवृत्त होत आहेत.
• निकष व संकेतानुसार सरन्यायाधीश निवृत्तीच्या एक महिना आधी नवीन सरन्यायाधीशांची शिफारस सेवाज्येष्ठतेच्या निकषावर करत असतात.
• जर ही शिफारस सरकारने मान्य केली तर रमणा हे देशाचे पुढचे सरन्यायाधीश म्हणून 24 एप्रिल रोजी सूत्रे हाती घेतील आणि 26 ऑगस्ट 2022 पर्यंतचा कार्यकाळ त्यांना मिळेल.

न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा
• त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नवरम गावात झाला आहे.
• 10 फेब्रुवारी 1983 रोजी वकील त्यांनी विकिलीस सुरुवात केली.
• रमणा यांची नियुक्ती आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश म्हणून 27 जून 2000 रोजी झाली होती.
• नंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून 10 मार्च ते 20 मे 2013 दरम्यान काम केले होते.
• त्यानंतर त्यांची 2013 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली.
• फेब्रुवारी 2014 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते.

स्रोत : इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
1276.pdf
354.9 KB
स्पर्धावाहिनी | #AnswerKey

▪️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
» पेपर 1 (GS)
» प्रथम उत्तरतालिका (First Key)
-------------------------------
Join @spardhavahini
1277.pdf
432.1 KB
स्पर्धावाहिनी | #AnswerKey

▪️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
» पेपर 2 (CSAT)
» प्रथम उत्तरतालिका (First Key)
-------------------------------
Join @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____🖌

66 व्या 'फिल्मफेअर पुरस्कार 2021' ची घोषणा
🗓 29 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• नुकतीच 66 व्या 'फिल्मफेअर पुरस्कार 2021' ची घोषणा झाली.
• यामध्ये बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते इरफान खान यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा तर अभिनेत्री तापसी पन्नू हिला सर्वोत्कृष्ट अभीनेतीचा पुरस्कार जाहीर झाला.

पुरस्कार विजेत्यांची यादी
• सर्वोत्कृष्ट चित्रपट- थप्पड
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- ओम राऊत (तान्हाजी द अनसंग वॉरिअर)
• सर्वोत्कृष्ट अभिनेता- इरफान खान (अंग्रेजी मिडीयम)
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- तापसी पन्नू (थप्पड)
• सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर- फराह खान (दिल बेचारा)
• सर्वोत्कृष्ट ड्रेस डिझायनर- विरा कपूर (गुलाबो सिताबो)
• सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला- आलाया फर्निचरवाला (जवानी जानेमन)
• सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक- राजेश कृष्णन (लूटकेस)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सैफ अली खान (तान्हाजी द अनसंग वॉरिअर)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- फारुख जाफर (गुलाबो सीताबो)
• सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायिका- असीस कौर (मलंग)
• सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायक- राघव चैतन्य (थप्पड)
• सर्वोत्कृष्ट संगीत - प्रतिम (लुडो)

समीक्षक पुरस्कार
• सर्वोत्कृष्ट चित्रपट- ऐब आले ऊ
• सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमिताभ बच्चन (गुलाबो सीताबो)
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- तिलोटामा शोम (सर)

विशेष पुरस्कार
• लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड- इरफान खान
• आरडी बर्मन पुरस्कार- गुलजार

फिल्मफेअर पुरस्कार
• फिल्मफेअर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते.
• इ.स. 1954 सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. 
• द क्लेअर्स हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेअर अवॉर्ड्‌स असे करण्यात आले.

स्रोत : लोकसत्ता, विकिपीडिया
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
______🖌

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारताची सर्वोत्तम कामगिरी
🗓 29 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• भारतीय नेमबाजांनी घरच्या मैदानावर रंगलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली.
• अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदकांची भर घालत पदकतालिकेत अग्रस्थान कायम राखले.
• त्याचबरोबर भारताच्या 15 नेमबाजांनी आतापर्यंत टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले.
• विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या यजमान भारताने एकूण 30 पदकांची कमाई के ली. त्यात 15 सुवर्ण, 9 रौप्य आणि 6 कांस्यपदकांचा वाटा आहे.
• अखेरच्या दिवशी पृथ्वीराज टोंडायमन, लक्षय शेरॉन आणि कायनन चेनाय यांनी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताला अखेरचे सुवर्णपदक मिळवून दिले.
• त्याआधी श्रेयसी सिंग, राजेश्वरी कुमारी आणि मनीषा कीर यांनी भारताला महिलांच्या ट्रप प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले होते.
• भारताने महिलांच्या अंतिम फेरीत कझाकस्तानचा 6-0 असा धुव्वा उडवला.
• नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे ही स्पर्धा पार पडली.

महाराष्ट्राच्या तेजस्विनी सांवतचा सुवर्णवेध
• तेजस्विनीने संजीव राजपूतसह 50 मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र गटात ही कामगिरी नोंदवली.
• अंतिम सामन्यात त्यांनी युक्रेनच्या सेर्ही कुलिश आणि अॅना इलिना यांचा 31-22 असा पराभव केला.

एकाच प्रकारातील तिन्ही पदके भारताला
• महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेतील तिन्ही पदके भारताला मिळाली आहेत.
• या प्रकारात चिंकी यादवने सुवर्ण, राही सरनोबतने रौप्य तर मनु भाकेरने कांस्यपदक जिंकले आहे.

देशनिहाय पदके (Top 3)
1) भारत : 30 (15-सुवर्ण, 9-रौप्य, 6-कांस्य)
2) अमेरिका : 8 (4-सुवर्ण, 3-रौप्य, 1-कांस्य)
3) इटली : 4 (2-सुवर्ण, 0-रौप्य, 2-कांस्य)

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
______🖌

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारताची सर्वोत्तम कामगिरी
🗓 29 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

भारतीय नेमबाजांनी घरच्या मैदानावर रंगलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली.
• अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदकांची भर घालत पदकतालिकेत अग्रस्थान कायम राखले.
• त्याचबरोबर भारताच्या 15 नेमबाजांनी आतापर्यंत टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले.
• विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या यजमान भारताने एकूण 30 पदकांची कमाई के ली. त्यात 15 सुवर्ण, 9 रौप्य आणि 6 कांस्यपदकांचा वाटा आहे.
• अखेरच्या दिवशी पृथ्वीराज टोंडायमन, लक्षय शेरॉन आणि कायनन चेनाय यांनी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताला अखेरचे सुवर्णपदक मिळवून दिले.
• त्याआधी श्रेयसी सिंग, राजेश्वरी कुमारी आणि मनीषा कीर यांनी भारताला महिलांच्या ट्रप प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले होते.
• भारताने महिलांच्या अंतिम फेरीत कझाकस्तानचा 6-0 असा धुव्वा उडवला.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

बिहारने मंजूर केले 'इथॅनॉल उत्पादन प्रोत्साहन धोरण, 2021'
🗓 30 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• अलीकडेच बिहार मंत्रिमंडळाने 'इथॅनॉल प्रॉडक्शन प्रमोशन पॉलिसी, 2021' या नावाने स्वतःचे इथेनॉल धोरण मंजूर केले आहे, असे धोरण लागू करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
• बिहार सरकारच्या या नवीन धोरणाअंतर्गत जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण (2018) आणि राष्ट्रीय जैव इंधन समन्वय समितीने मान्यता दिलेल्या सर्व प्रकारच्या फीडस्टॉकमधून इथेनॉल तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
• या धोरणांतर्गत नवीन इथेनॉल उत्पादक युनिटच्या स्थापनेस प्रोत्साहन देण्यासाठी वनस्पती व यंत्रसामग्रीच्या खर्चाच्या 15 टक्के आणि जास्तीत जास्त 5 कोटींपर्यंत भांडवल अनुदान देण्याची व्यवस्था केली गेली आहे.
• हे भांडवल अनुदान 'बिहार औद्योगिक गुंतवणूक प्रोत्साहन धोरण, 2016 अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त असेल.

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌

अर्थ आवर
🗓 30 March 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════

• यंदाचा अर्थ आवर 27 मार्च 2021 रोजी साजरा करण्यात आला.
• वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर (WWF) द्वारा याचे आयोजन दरवर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी केले जाते.
• 2007 मध्ये सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे प्रथम हा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता.
• या कार्यक्रमांतर्गत 180 हून अधिक देशांतील लोकांना तेथील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 8:30 ते 9:30 दरम्यान सर्व दिवे बंद ठेवण्यास प्रोत्साहित केले जाते.
• लोकांना हवामान बदलाच्या परिणामाविषयी जागरूक करणे आणि ऊर्जा संवर्धनासाठी अनावश्यक प्रकाशाचा वापर टाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दीष्ट आहे.

वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर (WWF)
• ही जगातील एक अग्रगण्य संवर्धन संस्था असून ती सध्या 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे.
• स्थापना: 1961
• मुख्यालय: ग्लॅंड (स्वित्झर्लंड)
• उद्देश: निसर्गाचे संरक्षण करणे आणि पृथ्वीवरील जैवविविधतेवर संबंधित धोके कमी करणे.
• WWF चे इतर प्रमुख उपक्रमः TX2 लक्ष्य (TX2 Goal), ट्रैफिक (TRAFFIC), लिविंग प्लेनेट रिपोर्ट (Living Planet Report)

स्रोत : द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join :
@spardhavahini
लैंगीक असमानता निर्देशांकात (Gender Gap Index) भारत १४० व्या क्रमांकावर
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
ऑलिम्पिक २०२८ स्पर्धेसाठी क्रिकेट संघ पाठवण्यास बीसीसीआयची परवानगी
🗓 17 April 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
• भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) २०२८ साली होण्याऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला खेळण्याची परवानगी दिली आहे. २०२८ ची ऑलिम्पिक स्पर्धा ही लॉस अँजेलिस येथे होणार आहे.
• शुक्रवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयनं हा निर्णय घेतला आहे. तर महिला क्रिकेट संघ २०२२ साली होण्याऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही सहभागी होणार आहे.
• क्रिकेट ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी करण्यासाठी आयसीसीचे प्रयत्न सुरु होते. मात्र बीसीसीआय यासाठी तयार होत नव्हतं. अखेर शुक्रवारच्या बैठकीत ऑलिम्पिकसाठी बीसीसीआयनं हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र बीसीसीआनं यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
• बीसीसीआयनं स्वायत्तता कायम राहावी यासाठी लिखित हमी मागितली आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे संघ राष्ट्रीय खेळ संघाच्या अंतर्गत येतात. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अंतर्गत काम चालतं. त्यामुळे स्वायत्त असलेल्या बीसीआयनं भारतीय ऑलिम्पिक संघांच्या अंतर्गत काम करण्यास विरोध दर्शवला आहे.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
भारतीय कुस्तीपटूंची तिहेरी सुवर्णकमाई
🗓 17 April 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धा
• भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगट आणि अंशू मलिक यांनी शुक्रवारी वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
• टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या या दोघींनी कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याची किमया साधली. याव्यतिरिक्त दिव्या काकराननेसुद्धा सुवर्णपदक पटकावले, मात्र अनुभवी साक्षी मलिकला रौप्यावर समाधान मानावे लागले.
विनेश फोगट:
• महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील अंतिम लढतीत विनेशने चायनीज तैपईच्या मेंड सुआन-सेईवर ६-० असा विजय मिळवला. यापूर्वी आशियाई स्पर्धेत तीन वेळा रौप्यपदकावर समाधान मानणाऱ्या विनेशने अंतिम फेरीत एकही गुण न गमावता तांत्रिक गुणांआधारे सुवर्णपदक जिंकले.
• विनेश फोगट ही भारतीय कुस्तीपटू आहे. आशियाई खेळ व कॉमन वेल्थमध्ये सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. याव्यतिरिक्त, ती लॉरेस जागतिक क्रीडा पुरस्कारासाठी नामांकित होणारी पहिली भारतीय खेळाडू होती.
• २०१६ मध्ये त्यांनी अर्जुन पुरस्कार, २०२० मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जिंकला आहे.
अंशू मलिक:
• हरयाणाच्या १९ वर्षीय अंशूने ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात मोंगोलियाच्या बत्सेत अटसेगला ३-० असे नमवले. पंचांनी बत्सेतला विविध चुकांसाठी तीन वेळा ताकीद देऊनही तिचा खेळ न सुधारल्यामुळे अंशूला विजयी घोषित करण्यात आले. उपांत्य फे रीत अंशूने तांत्रिक गुणांच्या आधारे क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या उझबेकिस्तानच्या सेव्हारा एशमुराटोव्हाला पराभूत केले.
दिव्या काकरान:
• महिलांच्या ७२ किलो वजनी गटात दिव्याने कझाकस्तानच्या झामिला बर्गेनोव्हावर ८-५ अशी मात केली. दिव्याने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. गतवर्षी दिव्याने ६८ किलो वजनी गटात अजिंक्यपद मिळवले होते
स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______🖌
लिंगभाव संवाद कार्यक्रमाचा शुभारंभ
🗓 17 April 2021 ©स्पर्धावाहिनी
════════════════════
लिंगभाव संवाद कार्यक्रम हा दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन (डीएवाय-एनआरएलएम) आणि अर्थव्यवस्थेत महिला आणि मुलींच्या प्रगतीसाठी काय काम केले जाऊ शकते (आयडब्ल्यूडब्ल्यूएजीई) या उपक्रमाचा एक संयुक्त प्रयत्न असून, या प्रयत्नांमधून समोर येणारे अनुभव एकाच व्यासपीठावर सामायिक करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
लिंगभाव संवाद कार्यक्रम राज्यांना खालील संधी प्रदान करतो:
• महिला संस्थाच्या सुधारणांसाठी इतर राज्यांनी हाती घेतलेल्या चांगल्या कार्यपद्धती / उपक्रम समजून घेणे (उदा. महिलांना सुलभरीत्या जमिनीचे हक्क मिळणे, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) मध्ये त्यांचा सहभाग, अन्न, पोषण, आरोग्य आणि पाणी आणि स्वच्छता (एफएनएचडब्ल्यू) यासाठी उत्तम कार्यपद्धती, सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी मजबूत संस्था स्थापन करण्यासाठी, आणि महिलांमधील असुरक्षित गटांचे संरक्षण आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी;
• जागतिक स्तरावरील लिंगभाव समस्या/प्रश्न समजून घेणे;
• मुद्दे/अंमलबजावणीतील अडथळे कसे हाताळावेत यासंदर्भातील सूचनांसह तज्ञ आणि इतर सहकाऱ्यांसोबत सल्लामसलत;
• देशातील / इतर देशांमधील लिंगभाव विषयक प्रश्नांवरील सर्वोत्तम पद्धतींचे एकत्रीकरण करण्यासाठी हातभार;
• सध्या सुरू असलेल्या आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ग्रामीण विकास विभागाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरूवात झाली. या ऑनलाइन कार्यक्रमात तज्ञांचे एक पॅनेल देखील होते. याव्यतिरिक्त, स्थानिक स्तरातील महिलांनी आपले अनुभव देखील सांगितले.
• 2016 मध्ये, डीएवाय-एनआरएलएमने मुख्य प्रवाहातील लिंगभाव विषयक समस्यांच्या समाधानाकरिता एक लिंग परिचालन रणनीती देखील तयार केली, ज्यात लिंगभाव विषयक मुद्द्यांवरील कर्मचारी, संस्था यांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला.

स्रोत : PIB
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini