स्पर्धावाहिनी
5.45K subscribers
596 photos
1.19K files
622 links
Spardhavahini, Maharashtra's most liked online platform on GK (Gen. Knowledge), General Awareness, Current Affairs for MPSC & all competitive exams preparation.
---------------------------------------
© An official channel of
www.spardhavahini.com
Download Telegram
Quiz 5_Science.pdf
539.9 KB
स्पर्धावाहिनी | #DailyQuiz

🔘 Daily Quiz : 05
----------------------------------
विषय : विज्ञान
----------------------------------
Join » @spardhavahini
स्पर्धावाहिनी | #DailyQuiz
═════════════════
या उपक्रमात तुम्हाला दररोज एका विषयाचे 15 ते 20 दर्जेदार प्रश्न विश्लेषनासह दिले जात आहेत. प्रश्नांचा दर्जा राज्यसेवा पूर्व परीक्षेला अनुसरून आहे.
मागील Quiz डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

📙 Daily Quiz 01 : Polity
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
📙 Daily Quiz 02 : Economics
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
📙 Daily Quiz 03 : Geography
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
📙 Daily Quiz 04 : History
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
www.spardhavahini.com
═════════════════
इतर अभ्यास साहित्य डाउनलोड करण्यासाठी आजच जॉईन करा
👇👇
Join » @spardhavahini
---------------------------------------
खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्यात अमृत संस्थेची निर्मिती
════════════════
© @spardhavahini | #Current

● खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ‘अमृत’ ही संस्था स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या स्वायत्त संस्थेची निर्मिती होणार असून त्यात या समाज समुहातील तरुणांच्या विकासासाठी विशेष कार्य केले जाणार आहे.
● राज्य सरकारने विविध घटकांच्या विकासासाठी या अगोदर ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ संस्थेची स्थापना केलेली आहे.
● केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक होते.
● या समाजघटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण प्राप्त होत आहे. मात्र, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षणही मिळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांच्या धर्तीवर अमृत संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
● अनुसूचित जातीतील तरुणांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सारथी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.
● त्याप्रमाणेच बहुजन, दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली आहे.
● आता खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी अमृत संस्था काम करणार आहे
● या संस्थेच्या माध्यमातून अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना उद्योग, व्यवसाय, नोकरी, रोजगार, उच्च शिक्षण, परदेशात उच्च शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकासासह सर्वांगीण विकासासाठी अमृत संस्था प्राधान्याने काम करणार आहे.
● तसेच कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा आणि एमफील-पीएचडी अभ्यासक्रमांसाठीही प्रशिक्षण देण्याचा उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिलांचे सक्षमीकरण करण्यासह संबंधितांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

स्रोत: लोकसत्ता, The Hindu

www.spardhavahini.com
════════════════
संकलन :
राजेश देशमुख (STI)
दिगंबर आधुरे (ASO)
{टीम स्पर्धावाहिनी}
════════════════
Join : @spardhavahini
‘महाराष्ट्रकन्या’ मोनिकाने रोवला अटकेपार झेंडा
════════════════
© @spardhavahini | #Current

● महिला कॉन्स्टेबल असलेल्या मोनिकाने २ सुवर्णपदकांसह जिंकली ३ पदकं
● चीनमध्ये झालेल्या World Police and Fire Games स्पर्धेमध्ये भारताच्या पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली. तिने World Police and Fire Games स्पर्धेत दोन सुवर्णपदकांसह एकूण तीन पदके पटकावली.
● मोनिका बुलडाणा पोलीस दलात कार्यरत असून आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. मोनिका जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग,सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन, तसेच पोलीस महासंचालक ● सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले.
● ८ ते १८ ऑगस्ट या कालावधी दरम्यान चीनमध्ये World Police and Fire Games या स्पर्धा रंगल्या होत्या. यामध्ये मोनिकाने अतिशय चांगली कामगिरी केली.
● ‘टार्गेट आर्चरी’ या प्रकारात मोनिकाने ७२० पैकी ७१६ गुण मिळवित विक्रम नोंदविला. फिर्ल्ड आर्चरीमध्ये तिने सुवर्ण, तर ‘थ्रीडी’ आर्चरी प्रकारात कांस्यपदक मिळविले.
● २०१३ मध्ये मोनिका पोलीस दलात भरती झाली होती. त्यानंतर मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना तिने जागतिक स्तरावर नववे स्थान पटकावले होते.

स्रोत: लोकसत्ता, Maha Times, सकाळ
www.spardhavahini.com
════════════════
संकलन :
राजेश देशमुख (STI)
दिगंबर आधुरे (ASO)
{टीम स्पर्धावाहिनी}
════════════════
Join : @spardhavahini
पुणे बेंचची दीड वर्षांत एकही सुनावणी नाही
════════════════
© @spardhavahini | #Current

पुणे 'एनजीटी'
- पुण्यात २०१३ मध्ये पश्चिम भारताचे न्यायाधिकरण सुरू.
- पुणे बेंचकडे महाराष्ट्र, गोवा, गुजरातमधील पर्यावरणाशी संबंधित खटल्यांचे काम.
- पुणे न्यायपीठाकडे आतापर्यंत ३ हजार ५१३ याचिका दाखल.
- दाखल याचिकांपैकी ६००हून अधिक याचिका प्रलंबित.
- सर्व महत्त्वाच्या याचिकांची दिल्लीतील मुख्य बेंचसमोर सुनावणी सुरू.
- आठवड्यातून दोनदा (मंगळवारी, गुरुवारी) दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्स.

'एनजीटी'वर एक दृष्टिक्षेप
- देशभरात 'एनजीटी'चे दिल्लीसह, पुणे कोलकाता आणि चेन्नई येथे न्यायपीठ कार्यरत आहे
- पर्यावरणीय याचिकांसाठी २०१०मध्ये एनजीटी कायदा अस्तित्वात.
- नवी दिल्लीमध्ये २०११मध्ये पहिले बेंच स्थापन.
- दिल्लीमध्ये 'एनजीटी'चे मुख्य न्यायपीठ.
- दिल्ली, पुणे, चेन्नई आणि भोपाळमध्ये न्यायपीठांची स्थापना.
- गेल्या आठ वर्षांत २९ हजारांहून अधिक याचिका दाखल.
- सुमारे तीन हजार याचिका अद्याप प्रलंबित.
- सहा न्यायपीठात दोन सदस्य आणि सहा तज्ज्ञ कार्यरत.
- जल, वायू, ध्वनिप्रदूषण, खाण उद्योग, नैसर्गिक संपत्तीचे नुकसान आदी खटले अधिक

स्रोत: लोकसत्ता, Maha Times, सकाळ
www.spardhavahini.com
════════════════
संकलन :
राजेश देशमुख (STI)
दिगंबर आधुरे (ASO)
{टीम स्पर्धावाहिनी}
════════════════
Join : @spardhavahini
मुंबई सेंट्रलला 'आयएसओ' प्रमाणपत्र
════════════════
© @spardhavahini | #Current

● अस्वच्छ प्लॅटफॉर्म, सदोष तिकीट मशिन अशी मुंबईतील रेल्वे स्थानकांची ओळख आहे. मात्र ही ओळख चुकीची ठरवत मुंबई सेंट्रल स्थानकाने आदर्श स्थानक असल्याचा मान पटकाविला आहे.
● आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण पूरक तब्बल १२ कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल स्थानकाची दखल आतंरराष्ट्रीय संस्थेने घेतली असून; स्थानकाला 'आयएसओ १४००१ : २०१५' या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे.
● मुंबई सेंट्रल स्थानकाला मे-२०१९ ते मे-२०२२पर्यंत पर्यावरण प्रकारातील आयएसओ प्रमाणपत्र धारक स्थानक म्हणून ओळखले जाणार आहे.
● मुंबईतील हा मान पटकविणारे हे एकमेव स्थानक आहे.
● विशेष म्हणजे आयएसओ प्रमाणित मुंबई सेंट्रल स्थानकाचा 'पॅटर्न' अन्य तब्बल ३८ स्थानकांवर राबवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.

आयएसओ म्हणजे काय?
देशातील एखाद्या सेवेची गुणवत्ता तपासण्यासाठी आयएसओ अर्थात 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँर्डडायझेशन' मानांकन घेतले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकनाची गरज लक्षात घेता १२० देशांनी एकत्र येऊन एक प्रमाण निश्चित केलेले आहे. सेवेच्या गुणवत्तेची तपासणी करून आयएसओ हे प्रमाणपत्र देते.

आयएसओचे प्रकार
● आयएसओ ९००१ - गुणवत्ता व्यवस्थापन
● आयएसओ १४००१ - पर्यावरण व्यवस्थापन
● आयएसओ २७००१ - माहिती सुरक्षा व्यवस्थापन
● आयएसओ २२००८ - अन्न सुरक्षा व्यवस्थापन


स्रोत: लोकसत्ता, Maha Times, सकाळ
www.spardhavahini.com
════════════════
संकलन :
राजेश देशमुख (STI)
दिगंबर आधुरे (ASO)
{टीम स्पर्धावाहिनी}
════════════════
Join : @spardhavahini
निधनवार्ता : मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी
════════════════
© @spardhavahini | #Current

● ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी यांचं नुकतच निधन झालं. ते ९२ वर्षाचे होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे खय्याम यांना सुजय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
● खय्याम यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात अविभक्त पंजाबमधील राहोन (जि. जालंधर) येथे १८ फेब्रुवारी १९२७ मध्ये झाला.
● यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते.
● आपल्या संगीत क्षेत्रातील करीयरची सुरुवात त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी लुधियाना येथे १९४३ च्या सुमारास केली.
● दुसऱ्या महायुद्धाच्या काळात खय्याम यांनी अगदी थोडा काळ लष्करातही सेवा बजावली.
● त्यानंतर ते मुंबईला आले व पुढील काळात शर्माजी-वर्माजी या पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त संगीतकारांच्या ते सान्निध्यात आले.१९४८ च्या सुमारास खय्याम यांनी लोकप्रिय चित्रपट 'हीर रांझा'साठी संगीत दिग्दर्शन केले. या जोडीतील रोहनलाल वर्मा पुढील काळात पाकिस्तानात गेले आणि खय्याम यांची स्वतंत्र वाटचाल सुरू झाली.
● १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले.
● ‘बिवीहा’ त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट. त्यातील ‘अकेले मे वो घबराते होंगे’ हे गाणे महंमद रफी यांनी गायले होते.
● ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाने खय्याम यांना संगीतकार म्हणून खरी ओळख मिळवून दिली. ‘वो सुबह कभी तो आयेगी’ हे मुकेश यांच्या आवाजातील गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले.
त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट ‘मनजून’ प्रदर्शित झाला नाही.
● वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी त्यांच्या आयुष्याची सर्व पुंजी म्हणजे १० कोटी रुपयांची संपत्ती दान केली होती.पुलवामा झाल्यावर त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं जाहीर केले होते.

पुरस्कार
● 1977: Filmfare Best Music Director Award (‘कभी कभी’ चित्रपटासाठी)
● 1982: Filmfare Best Music Director Award (‘उमराव जान’ चित्रपटासाठी)
● 1982: National Film Award for Best Music Direction (‘उमराव जान’ चित्रपटासाठी)
● 2007: Sangeet Natak Akademi Award: Creative Music
● 2010: Filmfare Lifetime Achievement Award
● 2011: Padma Bhushan
● 2018: Hridaynath Mangeshkar Award

गाजलेले सिनेमा
● फिर सुबह होगी (१९५८)
● शोला और शबनम (१९६१)
● आखिरी खत (१९६६)
● कभी कभी (१९७६)
● त्रिशूल (१९७८)
● नूरी (१९७९)
● थोडीसी बेवफाई (१९८०)
● दर्दे और आहिस्ता आहिस्ता (१९८२)
● रझिया सुलतान (१९८३)
● उमराव जान
● पर्बत के उसपार
● थोडीसी बेवफाई
● बाजार
● हीर रांझा

'खय्याम' यांची गाजलेली काही खास गाणी
● कभी कभी मेरे दिल में...
● इन आंखों की मस्ती के दीवाने हजारों है
● आजा रे ओ मेरे दिलबर आजा...
● मैं हर एक पल का शायर हूँ...
● वो सुबह कभी तो आएगी...
● जाने क्या ढूंढती रहती हैं ये आंखें मुझमें
● बुझा दिए हैं खुद अपने हाथों
● ठहरिए होश में आ लूं
● तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो
● शामे गम की कसम
● बहारों मेरा जीवन भी संवारो
● जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने
● दिखाई दिए यूँ
● दिल चीज क्या है, आप मेरी जान लिजिए
● परबतों के पेडोंपर श्यामका बसेरा
● मै पल दो पल का शायर हूँ
● ये क्या जगह है दोस्तो, ये कौन सा दयार है
● हैं कली कली के लब पर
● गपुची गपुची गम गम
● परबतों के पेडेपर श्याम का बसेरा

स्रोत: लोकसत्ता, The Hindu, Wiki
www.spardhavahini.com
════════════════
संकलन :
राजेश देशमुख (STI)
दिगंबर आधुरे (ASO)
{टीम स्पर्धावाहिनी}
════════════════
Join : @spardhavahini
सद्भावना दिन
════════════════
© @spardhavahini | #Current

● दरवर्षी २० ऑगस्ट सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो.
● देश यंदा (20 ऑगस्ट) भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न राजीव गांधी यांची 75 वी जयंती साजरी करत आहे .
● २० ऑगस्ट रोजी देशाचे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांचा जन्मदिन सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो.
● या दिवसाच्या निमित्ताने राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार देखील प्रदान केला जातो.
● या पुरस्कार विजेत्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.हा पुरस्कार 1992 पासून सुरू झाला.

राजीव गांधी
● राजीव गांधी हे भारताचे सहावे पंतप्रधान होते,
● ते 1984 ते 1989 या काळात देशाचे पंतप्रधान होते.
● राजीव गांधींचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबई येथे झाला 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींनी सत्ता ताब्यात घेतली.
● वयाच्या 40 व्या वर्षी राजीव गांधी देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान झाले.
● 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989 या काळात ते देशाचे पंतप्रधान होते. ते 18 डिसेंबर 1885 ते 1991 पर्यंत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षही होते.
● २१ मे 199१ रोजी राजीव गांधींची शेवटची जाहीर सभा चेन्नईपासून 40 किमी अंतरावर असलेल्या श्रीपेरंबुदुर नावाच्या ठिकाणी झाली होती, येथेच राजीव गांधी यांची हत्या झाली होती.

थोर पुरुषांच्या स्मरणार्थ देशात साजरे केले जाणारे खास दिवस
● राष्ट्रीय युवा दिन - 12 जानेवारी
- स्वामी विवेकानंद यांची जयंती.

● राष्ट्रीय शहीद दिवस - 30 जानेवारी आणि 23 मार्च
- राष्ट्रपिता महात्मा गांधी (30 जानेवारी) आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची पुण्यतिथी (23 मार्च).

● राष्ट्रीय विज्ञान दिन - 28 फेब्रुवारी
- नोबेल पुरस्कार विजेते भारताचे महान वैज्ञानिक प्राध्यापक चंद्रशेकर वेंकटरमण यांचा वाढदिवस. सन 1928 मध्ये या दिवशी त्याला 'रमन इफेक्ट्' शोधला .

● समानता आणि ज्ञान दिन - 14 एप्रिल
- अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, दलित विचारवंत, समाजसुधारक, माजी कायदामंत्री आणि भारतरत्न भीमराव आंबेडकर यांची जयंती.

● राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन - 21 मे
- माजी पंतप्रधान आणि भारतरत्न राजीव गांधी यांची पुण्यतिथी.

● राष्ट्रीय सांख्यिकी दिन - २ जून
- प्रख्यात शास्त्रज्ञ आणि सांख्यिकी विज्ञानी प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा वाढदिवस. त्यांनीच भारतीय सांख्यिकी संस्था स्थापन केली.

● राष्ट्रीय डॉक्टर दिन (डॉक्टर दिन) - १ जुलै
- देशाचे प्रसिद्ध डॉक्टर आणि पं. बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा वाढदिवसआणि पुण्यतिथी.

● सद्भावना दिन - 20 ऑगस्ट
- माजी पंतप्रधान आणि भारतरत्न राजीव गांधी यांचा वाढदिवस.

● राष्ट्रीय क्रीडा दिन – २9 ऑगस्ट
- मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस.

● शिक्षक दिन - 5 सप्टेंबर
- माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस.

● अभियंता (अभियंता) दिवस - 15 सप्टेंबर
- महान अभियंता व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरयांचा वाढदिवस.

● आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन - 2 ऑक्टोबर
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वाढदिवस.

● राष्ट्रीय एकात्मता दिन - 31 ऑक्टोबर
- माजी उपपंतप्रधान आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा वाढदिवस.

● राष्ट्रीय बाल दिन - 14 नोव्हेंबर
- माजी पंतप्रधान आणि भारतरत्न जवाहरलाल नेहरू यांची जयंती.

● शक्ती दिवस - १9 नोव्हेंबर
- माजी पंतप्रधान आणि भारतरत्न इंदिरा गांधी यांचा वाढदिवस.

● शेतकरी दिन - 23 डिसेंबर
- माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा वाढदिवस.

● सुशासन दिन - 25 डिसेंबर
- माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस.

स्रोत: लोकसत्ता, सकाळ, The Hindu
www.spardhavahini.com
════════════════
संकलन :
राजेश देशमुख (STI)
दिगंबर आधुरे (ASO)
{टीम स्पर्धावाहिनी}
════════════════
Join : @spardhavahini
सशस्त्र पोलिस बलाचे निवृत्तीवय ६० वर्षे
════════════════
© @spardhavahini | #Current

● केंद्रीय सश्स्त्र पोलिस बलामध्ये कार्यरत असलेल्या जवानांसाठी सरकारने निवृत्तीवय ६० वर्षे निश्चित केले आहे.
● या सरकारी आदेशामुळे कॉन्स्टेबल ते कमांडन्ट या उतरंडीच्या प्रत्येक पायरीवरील जवानाचे निवृत्तीवय आता सरसकट ६० वर्षे झाले आहे. आधी कॉन्स्टेबल ते कमांडंट वयाच्या 57 व्या वर्षी निवृत्त होत, तर वरील रँकचे अधिकारी 60 व्या वर्षी निवृत्त होत असत.
● याचा थेट फायदा केंद्रीय सशस्त्र पोलिस बलामध्ये समाविष्ट असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस बल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा बल (बीएसएफ), इंडो-तिबेट सीमा पोलिस बल व सहस्र सीमा बल या चार दलांना होणार आहे.
● याशिवाय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) व आसाम रायफल्स यातील जवान साठाव्या वर्षी निवृत्त होणार आहेत.
● सीआयएसएफ, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी हे केंद्रीय सैन्य व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येतात, त्या आधी या सैन्यांना निमलष्करी दल मानले जाण्यापूर्वी. ● मार्च २०११ नंतर या सैन्यांचे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल म्हणून वर्गीकरण करण्यात आले.
● भारतातील "अर्धसैनिक बल" अधिकृतपणे कोणत्याही कायद्याद्वारे परिभाषित केलेले नाही. याचा उपयोग आसाम रायफल्ससाठी केला जातो (त्याचे प्रशासकीय नियंत्रण केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असते तर त्याचे संचालनात्मक नियंत्रण भारतीय सैन्याकडे असते) आणि स्पेशल फ्रंटियर फ़ोर्स (SFF)साठी केला जातो.

स्रोत: The Hindu
www.spardhavahini.com
════════════════
संकलन :
राजेश देशमुख (STI)
दिगंबर आधुरे (ASO)
{टीम स्पर्धावाहिनी}
════════════════
Join : @spardhavahini
भारत हा सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन करणारा सर्वात मोठा देश
════════════════
© @spardhavahini | #Current

● कोळसा जाळून सल्फर डायऑक्साइडचे (SO2) उत्सर्जन करणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा देश असल्याचा दावा 'ग्रीनपीस' या स्वयंसेवी संस्थेने 'नासा'च्या पाहणीचा हवाला देऊन केला आहे.
● 'नासा'ने ही पाहणी केली असून, त्यासाठी ओझोन मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंट (ओएमआय)चा वापर करण्यात आला.
● त्यात 'SO2'चे सर्वाधिक उत्सर्जन करणारी जगातील प्रमुख ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी भारत हा सर्वाधिक 15 टक्के 'SO2'चे उत्सर्जन करत असल्याचे म्हटले असल्याचे 'ग्रीनपीस'ने म्हटले आहे.

अहवालाची ठळक वैशिष्ट्ये
● भारताच्या संदर्भातः भारत जगातील सल्फर डाय ऑक्साईडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे.
● नासाच्या ओएमआय उपग्रहाच्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साइड हॉटस्पॉट आहेत, ज्याचे मुख्य कारण कोळसा वापर आहे.
● भारतात मध्य प्रदेशातील सिंगरौली, तमिळनाडूतील नेवेली आणि चेन्नई, ओडिशातील तल्चेर आणि झारसुगुडा, छत्तीसगडमधील कोरबा, गुजरातेतील कच्छ, तेलंगणातील रामागुंडम आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि कोराडी येथे सर्वाधिक उत्सर्जन होत असल्याचे या पाहणीत आढळले.
● हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील बहुतेक प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव असल्याचेही या पाहणीच्या विश्लेषणात आढळले.
● जगातील सर्वाधिक 'SO2'चे उत्सर्जन रशियातील नोरिल्सक स्मेल्टर कॉम्प्लेक्स येथे होते. त्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील क्रील आणि इराणमधील झाग्रोझ या ठिकाणांचा समावेश आहे. मात्र 'एसओ२'चे उत्सर्जन करणारी अधिक ठिकाणे भारतात असल्याने भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

● भारतातील बहुतेक कोळशावर चालणार्यात उर्जा प्रकल्पांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी डीसल्फराईजेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही.
● शासनाने उचललेली पावले: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने डिसेंबर 2015 मध्ये कोळशाच्या उर्जा प्रकल्पांमधून सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यासाठी मर्यादा निश्चित केली. परंतु डेसल्फ्युरायझेशन तंत्राची अंतिम मुदत 2017 ते 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
● रशिया, दक्षिण आफ्रिका, इराण, सौदी अरेबिया, भारत, मेक्सिको, संयुक्त अरब अमिराती, तुर्की आणि सर्बिया या जगात सल्फर डायऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमुख आकर्षण केंद्र सापडले आहेत.
● चीन आणि अमेरिकेने स्वच्छ उर्जा स्त्रोतांचा वापर करून सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यात यश मिळविले आहे.
● विश्लेषणानुसार, वायू प्रदूषण ही सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी चिंता आहे, जगातील 91 टक्के लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) बाह्य प्रदूषणाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मर्यादा ओलांडणार्याए भागात राहते आणि परिणामी,प्रत्येक वर्षी 4.2 दशलक्ष लोक अकाली मृत्यूमुखी पडतात..

स्रोत: The Hindu, Indian Express
www.spardhavahini.com
════════════════
संकलन :
राजेश देशमुख (STI)
दिगंबर आधुरे (ASO)
{टीम स्पर्धावाहिनी}
════════════════
Join : @spardhavahini
Quiz 6_Polity.pdf
556.8 KB
स्पर्धावाहिनी | #DailyQuiz

🔘 Daily Quiz : 06
----------------------------------
विषय : राज्यशास्त्र
----------------------------------
Join » @spardhavahini
स्पर्धावाहिनी | #DailyQuiz
═════════════════
या उपक्रमात तुम्हाला दररोज एका विषयाचे 15 ते 20 दर्जेदार प्रश्न विश्लेषनासह दिले जात आहेत. प्रश्नांचा दर्जा राज्यसेवा पूर्व परीक्षेला अनुसरून आहे.
मागील Quiz डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

📙 Daily Quiz 01 : Polity
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
📙 Daily Quiz 02 : Economics
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
📙 Daily Quiz 03 : Geography
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
📙 Daily Quiz 04 : History
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
📙 Daily Quiz 05 : Science
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
www.spardhavahini.com
═════════════════
इतर अभ्यास साहित्य डाउनलोड करण्यासाठी आजच जॉईन करा
👇👇
Join » @spardhavahini
---------------------------------------
Quiz 7_Economics.pdf
554 KB
स्पर्धावाहिनी | #DailyQuiz

🔘 Daily Quiz : 07
----------------------------------
विषय : अर्थशास्त्र
----------------------------------
Join » @spardhavahini
स्पर्धावाहिनी | #DailyQuiz
═════════════════
या उपक्रमात तुम्हाला दररोज एका विषयाचे 15 ते 20 दर्जेदार प्रश्न विश्लेषनासह दिले जात आहेत. प्रश्नांचा दर्जा राज्यसेवा पूर्व परीक्षेला अनुसरून आहे.
मागील Quiz डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

📙 Daily Quiz 01 : Polity
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
📙 Daily Quiz 02 : Economics
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
📙 Daily Quiz 03 : Geography
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
📙 Daily Quiz 04 : History
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
📙 Daily Quiz 05 : Science
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
📙 Daily Quiz 06 : Polity
[ Download ] [ Solve ]
---------------------------------------
www.spardhavahini.com
═════════════════
इतर अभ्यास साहित्य डाउनलोड करण्यासाठी आजच जॉईन करा
👇👇
Join » @spardhavahini
---------------------------------------