स्पर्धा परिक्षा पॉईंटस
84.8K subscribers
18.2K photos
280 videos
1.12K files
7.08K links
▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
चालू घडामोडी नोट्स
भूगोल
इतिहास
राज्यघटना
अर्थव्यवस्था
या विषयाच्या नोट्स
टीप - इथे फक्त कॉलिटी
📱प्रतिक्रिया 👇
@SPardha_Pariksha_Points

सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी जॉईन करा.
Download Telegram
🙏🙏उमेदवार मित्रहो..🙏🙏
सर्वांसाठी गोड बातमी आहे.
सकाळपासुन शिक्षण विभागातील आधिकारी वर्गाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो आत्ता संपर्क साधला.
20ते25(अडथळे नाहि आले तर)जाहिराती दिसतील.
6ते8ला पदवी+डी.एड./ बी.एड.+2tet उमेदवारांना संधी मिळणार आहे.
पोर्ट्लवर ज्या जाहिराती येतील त्या स्था.स्व.सं. +खा.सं.असतिल.
भरती आचारसंहितेच्या आत पूर्ण करण्याचा नियोजन झाले आहे.(अडथळे नाहि आले तर)
दर आठवडा vc वर अपडेट देणे बंधनकारक.
जिल्हा आणि स्तर निवड हे imp आहे.
खा.सं.विना पोर्ट्ल भरती करणे कठीण आहे.
TET उमेदवारांना हि भरती म्हणजे सुवर्ण संधी मिळाली आहे. join मिशन नोकरी
*प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचा छोडो भारत चित्ररथ*


राजपथावर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी होणार्‍या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने सादर करण्यात आलेल्या छोडो भारत या चित्ररथाची निवड करण्यात आली आहे. 1942 च्या चळवळीची हाक देणारे मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानावरील छोडो भारत चळवळीचे सादरीकरण या माध्यमातून देशपातळीवर होणार आहे. 

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षाचे निमित्त साधून देशाच्या 70 व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणार्‍या संचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने छोडो भारत  चळवळ  दर्शविणारा  चित्ररथ  राजपथावर प्रदर्शित होणार आहे. देशभरातून 29 राज्यांनी  राजपथावरील प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती. विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील 15 राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी  करण्यात आली आहे. वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची महाराष्ट्राची दीर्घ परंपरा असून राज्याने आतापर्यंत सात वेळा प्रथम क्रमांक पटकवला आहे.
असा असणार चित्ररथ
चित्ररथाच्या पुढील भागात राष्ट्रपिता महात्मा गांधी  यांची दृढनिश्चय व करूणामयी स्वभाव दर्शविणारी  मोठी प्रतिमा उभारण्यात येणार आहे. स्वदेशी वस्तूंचे प्रतीक असणारा चरखा आणि मुंबईची खास ओळख गेट वे ऑफ इंडियाच्या मोठ्या प्रतिमाही चित्ररथावर असणार आहेत. 1942 मध्ये  तत्कालीन गवालीया टँक अर्थात ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या छोडो भारत चळवळीची भव्यता दर्शविणारा  जनसागर चित्ररथाच्या दोन्ही बाजूस  विविध  म्युरल्सच्या  माध्यमातून  दर्शविण्यात येणार आहे. छोडो भारत चळवळीचे महत्व पटवून देणार्‍या गीताची  धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे. https://t.me/joinchat/AAAAAEo2_MePS1gFaZamRQमिशन नोकरी