SET/NET/TAIT 2026
8.04K subscribers
1.76K photos
3 videos
499 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from SET/NET- 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पी एच डी पूर्व(PET)परीक्षा 2021
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या व्हिडिओमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पी एच डी पूर्व परीक्षा 2021 (PET) जाहिरात, परीक्षा पॅटर्न, पात्रता, अभ्यासक्रम व महत्त्वाची पुस्तके याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.
https://youtu.be/ZcZqX-gPMPM
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
स्त्री ने यशस्वी होणं म्हणजे काय असतं?
समाजाने तिला 'स्त्री' म्हणून आखून दिलेल्या चौकटी आणि भूमिका पार पाडल्यानंतर पुढे तिनं काही करून दाखवलं तर ते तिचं यश. ते तिचं कर्तृत्व.
थोडक्यात घर सांभाळून पुढे ती जे काही करेल ते छान, उत्तम, प्रशंसनीय वैगरे..समजा घर न सांभाळता फक्त स्वतःच्या कामासाठी तिने झोकून द्यायचं ठरवलं तर?
एकतर तिने लग्न करू नये ही अपेक्षा..किंवा अशाने तिचं लग्न मोडकळीस येईल हे गृहीतक.
मुलं झाली असतील तर त्यांचे हाल होणार नाहीत का, वाली चर्चा!
म्हणजे पुन्हा आम्ही नेमून दिलंय ते आधी कर मग बाकी सगळं..त्या मानाने पुरुषांचं जरा सोपं असतं. त्यांनाही चौकटी आहेतच पण त्यांना एकाच दिशेने धावायचं आहे.
स्त्रीचं यश आणि कर्तृत्व पुरुषी चौकटीतून बघणं बंद करूया का जरा..
मर्दानी
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून
पुरुषांच्या एक पाऊल पुढे
छोरोंसे क्या कम है
घराचं सगळं सांभाळून करते हो..
तिचं यश आणि अपयश तिचं आहे. जेव्हा आपण तिला पुरुषाच्या फुटपट्टीतून मोजायला लागतो तेव्हा कुठेतरी आपण बाईला दुय्यम समजतो. पुरुष तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहे या गृहितकावर आपण बाईचं मूल्यमापन करायला शिकलोय...जरा पाटी पुसायला हविये. नव्याने लिहायला हवंय. बाई आणि पुरुष यांची आपण सतत तुलना करतो. बाईचं आणि पुरुषाचं यश, अपयश, कर्तृत्व त्यांचं त्यांचं म्हणून बघायला, बोलायला, वाचायला शिकण्याची गरज आहे. अगदी शाब्दिक आणि सिम्बॉलीक स्वरूपातही तुलना करणारे शब्द नकोत. कारण स्त्री आणि पुरुष यांची तुलना शक्य नाही.
ते एकमेकांचे सहाय्यक आहेत, एकमेकांना पूरक आहेत. त्यांचा तुलनात्मक विचार करायला ते एकमेकांचे स्पर्धक नाहीत.
- मुक्ता चैतन्य
💠Set Exam 2021: Study Plan💠
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या व्हिडीओमध्ये 26 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या सेट परीक्षेचा अभ्यास, नियोजन व तयारीविषयी चर्चा करण्यात आली आहे.
https://youtu.be/Jf7Dllnzowo
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Ph.D Entrance Test 2021 (PET Exam)
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षांची (PET) तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
Ph.D Entrance Test 2021 (PET Exam)
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षांची (PET) तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
Forwarded from K'Sagar Publications
5_6332523085714948643.pdf
3.4 MB
5_6332523085714948643.pdf
Forwarded from K'Sagar Publications
एका वजनाचा प्रवास... विनीत वर्तक ©

असं म्हणतात की एका रात्रीत यश मिळण्यासाठी अनेक रात्री जागाव्या लागतात. कदाचित हाच अनुभव आज 'मीराबाई चानू' घेत असेल. आज संपूर्ण देश तिचं ऑलिम्पिकमधील यश साजरं करतो आहे. पण या यशासाठी गेली कित्येक वर्षं घेतलेली मेहनत आहे. यश-अपयश यांच्यातून रस्ता शोधताना आलेले कटू अनुभव आहेत. यशाच्या शिखरावर असताना आलेला पराभव हा तिच्या आत्मविश्वासाला तडा देणारा ठरला. वेटलिफ्टिंगमधली आपली लय हरवल्यावर तिने आपली आणखी पडझड न होऊ देता आपल्या पुढल्या लक्ष्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि आज ते पूर्ण करून तिने इतिहास घडवला आहे. वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्य पदक जिंकणारी आणि ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताला पदक मिळवून देणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.

भारतातील सो-कॉल्ड सुशिक्षित लोक आणि समाज ज्या भारताच्या भागाला आणि तिथल्या लोकांना आपलं मानत नाही, त्याच भागातून मीराबाई चानू येते. मणिपूरसारख्या भारताच्या अतिपूर्वेकडील राज्याचं ती प्रतिनिधित्व करते. अतिशय साधी राहणी आणि दोन वेळची चूल पेटवण्यासाठी जंगलातून लाकडं आणून ती घरी द्यायची. ते करताना आपला वेटलिफ्टिंगचा छंद तिने जोपासला. वजन उचलायचे प्राथमिक धडे जंगलात भटकताना लाकडाचं वजन उचलून तिने गिरवले. कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसताना तिने आपला प्रवास सुरू ठेवला.

एकामागोमाग एक स्पर्धा जिंकत आपल्या खांद्यावर अपेक्षांचं ओझं घेत ती २०१६ साली रिओ ऑलिम्पिकला पोहोचली. लहानपणापासून खेळाडू होण्याचं आणि देशासाठी मेडल जिंकण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची ती वेळ होती. पण छोट्या कुटुंबातून जागतिक स्तरावर खेळताना अपेक्षांचं ओझं मात्र तिला डोईजड झालं, आणि आयुष्यातील सगळ्यात मोठ्या कटू अनुभवाला ती सामोरी गेली. स्पर्धा संपताना आपलं भविष्य आणि स्वप्न कोलमडून पडल्याची तिला जाणीव झाली. यात ती निराशेच्या गर्तेत अडकली. पण संपूर्ण तोल जाण्याआधी तिने स्वतःला सावरलं. यात तिचे कोच, भाऊ, कुटुंबीय यांचं मोठं योगदान होतं. मानसिक स्वास्थ सुदृढ करण्यासाठी तिने प्रोफेशनल कोचची मदत घेतली. पुन्हा एकदा तिने २०१७ ला आगमन केलं. आपला दर्जा उंचावत नेला. पण पाठीच्या दुखण्याने आणि खांद्याच्या दुखण्याने ती चाचपडत होती. ऑलिम्पिक स्पर्धा तोंडावर होत्या, पण खांद्याच्या दुखण्याने तिला आपला सर्वोत्तम खेळ खेळायला अडचणी येत होत्या.

भारत सरकार, खेळ मंत्रालाय आणि वेटलिफ्टिंग फेडरेशनकडे तिने उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची मदत मागितली. गेल्या काही वर्षांत खेळ-मंत्रालयानेही कात टाकली आहे. जिकडे उपचाराच्या नावावर पार्ट्या व्हायच्या, पैसे इकडून तिकडे व्हायचे आणि खेळाडूंच्या पदरी निराशा यायची. ह्या सगळ्यांत आता बदल झाला आहे. त्यामुळेच जेव्हा तिने सरकारकडे याबद्दल मदत मागितली, तेव्हा तिच्या उपचारांची गरज लक्षात घेऊन भारत सरकारने तिच्या अमेरिकन दौऱ्यासाठी तब्बल ७१ लाख रुपयांचा खर्च केला. अमेरिकेत जाऊन योग्य उपचार आणि मार्गदर्शन घेतल्यावर ती टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार झाली.

आज जेव्हा भारतासाठी तिने पहिलं पदक जिंकलं, तेव्हा देशाने तिच्यावर केलेल्या खर्चाची तिने व्याजासकट आणि ऋण न फेडता येणाऱ्या अश्या क्षणांनी परतफेड केली आहे. जंगलातून लाकडं गोळा करणारी मुलगी ते ऑलिम्पिक रौप्य पदक हा तिचा प्रवास सगळ्यांना प्रोत्साहन देणारा आहे. पण त्याचवेळी भारतीयांसाठी अनेक गोष्टी उघड्या पाडणारा आहे. आज जिकडे सगळ्या सुखसोयी उपलब्ध असणारी तरुणपिढी ड्रग्स, सेक्स, दारू, नशा आणि जस्ट-चिल म्हणत आपल्या उद्दिष्टापासून भरकटते आहे, तिकडे गावांतून कोणत्या सोयी उपलब्ध असणाऱ्या भारताचे खेळाडू भारताला पदक मिळवून देत आहेत.

१३४ कोटी भारतीयांमधून फक्त १२७ भारतीय १८ विविध खेळांसाठी पात्र ठरले आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाबही आहे. आपल्यापेक्षा कितीतरी छोटे देश सुविधा नसताना ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत आपलं नाणं खणखणीत वाजवत असतात. पण आपण मात्र दरवेळी त्यात कमी पडतो यावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे. एकावेळी जिकडे हा विरोधाभास दिसून येतो, तिकडे 'मीराबाई चानू'चे यश अजून जास्ती खुलून दिसते. तिने केलेला वजनाचा प्रवास भारताच्या चमूतील इतर खेळाडूंना प्रोत्साहन देणारा ठरेल आणि अशी अनेक पदकं भारताच्या नावावर लागतील, याच आशेने तिचं आजचं यश साजरं करतो आहे. मिराबाई चानू, प्रत्येक भारतीयाला तुझा अभिमान आहे आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

https://vartakvinit.blogspot.com/2021/07/blog-post_24.html
UGC-fellowships and scholarships.pdf
162 KB
UGC-fellowships and scholarships.pdf
'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'... विनीत वर्तक ©

सद्गुरू श्री वामनराव पै यांनी एक शिकवण दिली आहे, ती म्हणजे "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार". हे वाक्य समजायला मला तरी खूप वर्षं जावी लागली. आयुष्यातील कित्येक वर्षं मी स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत परिपूर्ण करण्यासाठी जगत आलो. या सगळ्या प्रवासात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. काही चुका मी केल्या, तर काही वेळा न केलेल्या चुकांची शिक्षा मला मिळाली. काहींना मी दुखावलं तर काहींनी मला दुखावलं. सगळ्याची गोळाबेरीज केली तर कुठेतरी परिपूर्ण राहण्याचा अट्टाहास यामागे होता, असं मला उमजून आलं. ती परिपूर्णता ही कोणा दुसऱ्या व्यक्तींसाठी होती, ज्यांच्या गावीही नव्हतं. तसेच ज्या गोष्टींसाठी मी परिपूर्ण व्हायचा प्रयत्न करत होतो, त्या गोष्टी माझ्याशी कधी जुळतंच नव्हत्या. स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत सिद्ध करण्यासाठी आणि त्यातून आपला आनंद शोधण्याचा माझा प्रयत्न मात्र फक्त काही क्षणांसाठीच आनंद देत होता पण खूप काही हिरावून नेत होता. मी त्या काळात अनेक गोष्टी चुकीच्या केल्या आणि चुकीचं वागलो. चांगली माणसं गमावली आणि चुकीच्या माणसांना आयुष्यात स्थान दिलं.

अचानक काहीतरी घबाड हाताशी लागलं, की आपण ज्या पद्धतीने हावरट बनतो तशीच अवस्था माझीही झाली होती. त्या काळात अनेक चुका मी केल्या. अनेकवेळा नको त्या वादात उडी घेऊन आपणही कोणीतरी महत्वाचं असल्याचं दाखवण्याचा अट्टाहास केला. तेव्हा जाणीव होत गेली, की आपण घडवतो आहे ते शिल्प किती चुकीचं आहे. त्या शिल्पाला परिपूर्ण करण्याच्या नादात किंवा कोणाला तरी चांगलं दाखवण्याच्या नादात आपण त्याचा सगळा चेहरामोहराच बदलवून टाकला आहे. जी प्रतिमा घडते आहे त्यात मी खरा कुठेच नाही. जो आहे तो देखावा. ती वेळ होती जेव्हा त्या वाक्याचा खरा अर्थ मला उमजला. आपल्यापैकी प्रत्येकजण माझ्यासारखंच या बदलातून कधी ना कधी जातो. ती वेळ कधी तरुण असताना येते, तर कधी आयुष्याच्या संध्याकाळी, पण येते मात्र नक्की. अर्थात तिला समजून आपलं शिल्प आपण घडवायचं हे समजण्याची प्रगल्भता किती जण दाखवतात आणि त्यात ते कितपत यशस्वी होतात यावर प्रत्येकाचा आपला अभ्यास असू शकेल.

आयुष्यात यशस्वी व्हा, चांगले व्हा, नेहमीच चांगलं वागा, दुसऱ्याला दुखवू नका, कोणाचा द्वेष करू नका, सतत चांगला विचार करा आणि अश्या आशयाच्या ढीगभर पोस्ट, पुस्तके आणि ओळी रोज आपल्या कानावर आणि डोळ्यांवर आदळत असतात. 'सतत आनंदी रहा' असं सांगणारे अनेक प्रथितयश पॉझिटिव्ह थिंकर आणि मोटिव्हेशनल स्पीकर आपल्याला नेहमीच आपल्यातच काहीतरी कमी आहे, असं नकळत दाखवून देत असतात. कारण आपण कधी ना कधी दुःखी होत असतो, कळत-नकळत कोणाला तरी दुखावत असतो, कळत-नकळत आपल्याला दुसऱ्या कोणाचा द्वेष वाटतो आणि आपला द्वेष करणारे आपल्याच आजूबाजूला असणारी आपली माणसं असतात. आपण आनंदी राहायचं म्हणजे नक्की काय? ही व्याख्याच आपल्याला समजून येत नाही. मग सुरू होतो परिपूर्णतेचा अट्टाहास, कारण तिथे पोहोचल्यावर तरी आपण आनंदी राहू असे आपल्याला वाटत असते. त्या सगळ्यांत आपण स्वतःचं अस्तित्व विसरून जातो.

कोण असा आहे, की जो कधी दुःखी नाही झाला? कोण असा आहे, की ज्याची स्वप्नं कधी अपूर्ण नाही राहिली? कोण असा आहे की ज्याने दुसऱ्यांना दुखावलं नाही? कोण असा आहे की ज्याच्यावर समाज बोट ठेवत नाही? अहो जिकडे गुलाबात पण त्याचे काटे मोजणारे आहेत तिकडे आपल्यासाठी वाईट बोलणारे आपल्यावर गॉसिप करणारे, आपल्याच व्यक्तिमत्वाची मज्जा घेत तिखट मीठ लावून सांगणारी माणसं सगळ्यांच्या वाटेला येतात. फरक यात आहे की आपण त्यांना कसं स्वीकारतो. सुंदर दिसणाऱ्या कमळाच्या फुलाला पण चिखलाचा संदर्भ द्यावाच लागतो. त्या प्रमाणे आपल्याही बाबतीत असं बोलणारे आणि गोष्टी चिकटवणारे असतातच की. कालच्या चुकांवर बोट ठेवून सगळ्यांना सांगता येतं पण त्या चुका बदलवून आपला आज, एक पायरी वर नेणं आपल्या हातात असतं. त्या चुका जरी आपल्याशी आयुष्यभर चिकटल्या तरी त्यानंतर आपण काय प्रवास केला, हा फरक तुम्हाला तुमच्या आयुष्याचा शिल्पकार बनवतो. कारण ते घडवलेलं शिल्प त्याच कटू अनुभवातून आकाराला आलेलं असतं. कदाचित समाजाच्या दृष्टीने ते परिपूर्ण नसेलसुद्धा पण ते घडवण्याची जबाबदारी घेणं माझ्या मते आयुष्यात प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने टाकलेलं एक पाऊल असतं.

प्रत्येकवेळी आपण सर्वांना आनंदी ठेवू हे शक्य नसते. घरातील चार माणसांना आपण एकाचवेळी आनंदी नाही करू शकत तर समाज फार लांबची गोष्ट आहे. नावं ठेवणारे नावं ठेवणार आणि वाईट बोलणारे वाईट पसरवणार, प्रश्न हा आहे की आपण या सर्वाला सामोरं कसं जातो. गौतम बुद्धाचं एक वाक्य नेहमीच मला आवडते, "अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता जास्ती महत्वाची आहे". प्रत्येकवेळी आपण प्रतिक्रिया न देणं हे केलेल्या गोष्टीचं समर्थन नसतं, तर अनेकदा आपली पायरी सोडून न देण्याची प्रगल्भता असते. आपण कोणाला अडवू शकत नाही पण आपण
स्वतःला सावरू शकतो आणि तेच जर आपण योग्य रितीने केलं तर आपण एक पायरी कालच्यापेक्षा वर जातो आणि जे शिल्प उभं राहतं त्याचे शिल्पकार आपणच असतो. म्हणूनच परिपूर्णतेच्या अट्टाहासापेक्षा आपल्या कालच्या असलेल्या शिल्पात आपण काय चांगला बदल केला तेच आपल्याला एक चांगलं शिल्पकार बनवतं.

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

https://vartakvinit.blogspot.com/2021/07/blog-post_33.html