5_6292035562886922898.pdf
313.5 KB
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पीएच.डी प्रवेश परीक्षा 2021 जाहिरात प्रसिद्ध
*शैक्षणिक वार्ता:Ph.D*
*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा 22 ऑगस्ट 2021 रोजी होणार; अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2021*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बहुप्रतिक्षित पीएच.डी प्रवेशाची शैक्षणिक वर्ष 2021 साठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. पीएच.डी प्रवेशासाठी विविध विषयांसाठीच्या रिक्त जागांसाठी पेट परीक्षा घेण्यात येणार आहे.पेट परीक्षेच्या अर्जाबाबत महत्वपूर्ण तारखा,परीक्षा स्वरूप, परीक्षा शुल्क, अभ्यासक्रम व परीक्षा तयारी याबाबत माहिती सविस्तरपणे पुढीलप्रमाणे आहे.
*पीएच.डी प्रवेश परीक्षा (PET) महत्वपुर्ण दिनांक*
★ऑनलाइन पेट परीक्षा दिनांक - 22 ऑगस्ट 2021
★ऑनलाइन अर्ज दिनांक - 12 जुलै 2021 ते 31 जुलै 2021
★पेट परीक्षा निकाल- 24 ऑगस्ट 2021
★ऑनलाइन अर्ज संकेतस्थळ व पीएच.डी नियम व रिक्त जागा माहिती संकेतस्थळ-
http://bcud.unipune.ac.in/phd_entrance/applicant/login.aspx
*परीक्षा फिस*
खुला प्रवर्ग - 1000 रुपये
मागास प्रवर्ग - 750 रुपये
नेट - सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतून सवलत देण्यात आली आहे.त्यांच्याकरिता परीक्षा फिस खुला प्रवर्ग 800 व मागास प्रवर्ग 600 रुपये आहे.
*पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET) अभ्यासक्रम स्वरुप व तयारी*
युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पेट परीक्षेत दोन पेपर आहेत. यामधील पेपर एक Research Methodology (संशोधन पद्धती) व पेपर दोन Subject Specific (विषयाशी निगडित) आहे. पेट पेपर एक 50 प्रश्न संशोधन पद्धतीवर आधारित आहेत, तसेच पेपर दोनमध्ये पदव्युत्तर विषयाशी निगडित 50 प्रश्न विचारले जाणार आहेत.
पेट परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असून एकूण प्रश्न 100 असणार आहेत. परिक्षेस निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू नाही.
या दोन्ही पेपरमधील अभ्यासक्रमाचे स्वरूप व त्यासाठी आवश्यक मूलभूत संदर्भ ग्रंथ पुढील प्रमाणे आहे
*पेपर एक - संशोधन पद्धती*
यातील पहिला पेपर सर्व विषयांसाठी अनिवार्य असून तो संशोधन पद्धती (Research Methodology) म्हणून ओळखला जातो.या पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे संशोधन समस्या, संशोधन अहवाल,परिकल्पना, चले, संशोधन पद्धती, संशोधन प्रकार, गुणात्मक व संख्यात्मक संशोधन, संशोधनासाठी संख्याशास्त्राचा उपयोग, संशोधनासाठी संगणकाची उपयुक्तता इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती पेपरची व्याप्ती व अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा सराव करणे आवश्यक आहे.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत.
१.पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती" परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते (दुसरी आवृत्ती) के'सागर पब्लिकेशन्स,पुणे
२.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे,विद्या प्रकाशन, नागपूर
३.Research Methodology - C.R.Kothari
४.Research in Education-J.W.Best
५.Designs of Social Research - Das, D.K.Lal
*पेपर दोन - विषयाशी संबंधित*
पीएच.डी प्रवेश परीक्षेतील पेपर दोन हा पदव्युत्तर पदवी विषयाशी संबंधित असतो.या पेपरच्या तयारीसाठी नेट सेट अभ्यासक्रमाची पेपर दोनची पुस्तके तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संदर्भ ग्रंथ अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील.
पीएच.डी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्ग 50 टक्के व मागास प्रवर्ग 45 टक्के गुण आवश्यक आहे.
*पीएच.डी करिता फेलोशिप*
पीएच.डी पदवीसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप(JRF), जे.आर.डी. टाटा फेलोशिप, राजीव गांधी फेलोशिप मिळते तसेच बार्टी व सारथी संस्थेकडूनही पीएच.डी साठी विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते.
*2021 पासून पीएच.डी.अत्यावश्यक*
युजीसीच्या धोरणानुसार 2021 पासून विद्यापीठात सहायक प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी अनिवार्य करण्यात आली आहे.तसेच नोकरीत असणाऱ्या प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी आवश्यक असणार आहे.
(सदर उच्च शिक्षणाशी संबंधित शैक्षणिक माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती.)
Ph.D Entrance Test 2021
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षांची (PET) तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07

Telegram
SET/NET/TAIT 2026
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
क्विन ऑफ स्पोर्ट्स... विनीत वर्तक ©
विम्बल्डन च्या इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले ज्यांच्या खेळाची जादू आजही कायम आहे. अगदी जॉन मेकॅन्रो, मार्टिना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ, बोरिस बेकर, पिट सॅम्प्रास, रॉजर फेडरर, विल्यम बहिणी.... अशी न संपणारी एक यादी प्रत्येकाची असेल. याच यादीत काल एक नवीन नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे 'ऍश बार्टी'. २०२१ सालची विम्बल्डन स्पर्धा जिंकून तिने एक नवीन इतिहास लिहिला आहे. विम्बल्डन च्या इतिहासातील अनेक चित्तथरारक सामन्यांपैकी एक असा कालचा सामना झाला नसला तरी ऍश बार्टी च्या यशाची किंमत कमी होत नाही. आज तिने जिंकलेल्या सामान्यापेक्षा चर्चा होते आहे ती तिच्या अचंबित करणाऱ्या प्रवासाची. नेहमीच्या रूढी आणि परंपरा ना छेद देतं तिने आपल्या यशाला गवसणी घातली आहे. वर उल्लेख केलेल्या अनेक खेळांडूंपेकी किंवा इतर खेळाडूंच्या करीअर चा विचार केला तर असं कोणी नसेल ज्यांनी आपलं टेनिस च करीअर अर्धवट सोडून त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या खेळात तितकं यश संपादन केलं असेल. ते करताना पुन्हा टेनिसला सुरवात करून ज्या सेंटर कोर्ट वर खेळणं प्रत्येक टेनिस खेळाडूच स्वप्न असते तिकडे नुसतं न खेळता विम्बल्डन स्पर्धा जिंकणं हे कोणाला आजवर शक्य झालेलं नाही. म्हणूनच ऍश बार्टी च यश हे जास्ती उजळते आहे.
कोणत्याही खेळाडूच करीअर हे अनेक उतार चढावांनी बनलेलं असते. प्रत्येकाच्या आयुष्यात यश-अपयशाचे अनेक क्षण येतात. त्या प्रत्येक क्षणांना तो खेळाडू कसं घेतो त्यावर त्याची पुढची वाटचाल असते. ऍश बार्टी च्या २५ वर्षाच्या आयुष्यात तिने जेवढे उतार- चढाव बघितले आहेत असे क्वचितच कोणत्या खेळाडूच्या वाट्याला आले असतील. ऍश बार्टी च्या प्रवासाची सुरवात ती अवघी ४ वर्षाची असताना झाली. एप्रिल २००० मधे तिने जिम जॉयसे च्या हाताखाली टेनिस शिकायला सुरवात केली. खरं तर अवघ्या ४ वर्षाच्या ऍश ला शिकवण्याची जिम ची इच्छा नव्हती. पण त्या लहान वयात तिचं हॅन्ड एन्ड आय कॉर्डीनेशन बघून तो थक्क झाला होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे ऍश बार्टी ने आपली चमक त्या लहान वयात दाखवायला सुरवात केली होती.
२०१० पर्यंत तिने प्रोफेशनल टेनिस खेळायला सुरवात केली होती. पण तिचं जे कर्तृत्व होत त्याला साजेशी कामगिरी तिच्याकडून होत नव्हती. जून २०११ ला मात्र ऍश बार्टी ने वयाच्या १५ व्या वर्षी ज्युनिअर विम्बल्डन स्पर्धा जिंकून संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. अचानक ऑस्ट्रेलिया च्या पटलावरून जागतिक पटलावर एका नवीन टेनिस खेळाडूचा उदय झाला होता. पण म्हणतात न की यश पचवता पण आलं पाहिजे. अवघ्या १८ व्या वर्षी ऍश बार्टीला आपल्या कडून वाढलेल्या अपेक्षांना सामोरं जाणं कठीण होऊ लागलं. तिने अचानक प्रोफेशनल टेनिन मधून ब्रेक घेण्याचं जाहीर केलं. तिच्या शब्दात,
“I needed some time to refresh mentally more than anything. It became a bit of a slog for me and I wasn’t enjoying my tennis as much as I would have liked to."
"I went from not being known anywhere in the world to winning junior Wimbledon and six months later playing the Australian Open. I was a victim of my own success, really.”
२०१४ ते २०१६ ऍश बार्टी टेनिस च्या पटलावरून गायब झाली. आपल्या करीअर घडवण्याच्या सर्वोत्तम काळात ऍश बार्टीला अपेक्षांच ओझं वाटायला लागलं. कदाचित आपण जो नैसर्गिक खेळ खेळतो आणि त्याची मजा घेतो ते सगळच कुठेतरी हरवलेलं होतं. प्रवाहासोबत जाण्यापेक्षा तिने आपल्या मनाचा रस्ता स्वीकारला. सगळं बाजूला ठेऊन ती टेनिस पासून लांब गेली. पण खेळाडू हा खेळाडू असतो. तिने त्या काळात क्रिकेट चे धडे घ्यायला सुरवात केली आणि चक्क ब्रिस्बेन हिट संघासोबत तिने प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरवात केली. ९ सामन्यात तिने या संघातर्फे क्रिकेट च्या मैदानात पाऊल टाकलं आणि ६८ धावा केल्या. हा काळ तिच्यासाठी खडतर असा होता. एकेकाळी टेनिस ची रॅकेट धरणारी आता क्रिकेट ची बॅट हातात घेऊन टेनिस च्या बॉल चा नाही तर सिझन बॉल चा सामना करत होती.
फेब्रुवारी २०१७ मधे तिने पुन्हा टेनिस मधे पुनरागमन केलं. त्याच वर्षी मलेशियन ओपन स्पर्धा जिंकून तिने जागतिक क्रमवारीत १७ व्या क्रमांकावर उडी घेतली. त्याचवेळी डबल्स मधे पहिल्या २० जोड्यांमध्ये आपला समावेश केला. यानंतर जून २०१९ मधे तिने मार्केटा वोन्डरौसोवा ला ६-१, ६-३ असं हरवत रोलँड गॅरोस वर फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून एक इतिहास रचला. वयाच्या २३ व्या वर्षी ४६ वर्षानंतर फ्रेंच ओपन जिंकणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन महिला ठरली. यशाच्या शिखरावर असताना २०२० मधे कोरोना ने सगळ्या जगात हाहाकार माजवला. पुन्हा एकदा ऍश बार्टी ने टेनिस मधून ब्रेक घेतला आणि ती गोल्फ खेळायला लागली. त्यात तिने ब्रुक वॉटर गोल्फ क्लब वूमन चॅम्पीनशिप जिंकली. गोल्फ च्या जागतिक क्रमवारीत क्रमांक ५ आणि ७ वर असणाऱ्या प्रोफेशनल गो

ल्फ खेळाडूंना तिने ही स्पर्धा जिंकताना पराभूत केलं. तिकडेच तिची भेट आपला प्रियकर गॅरी किससीक याच्याशी झाली जो की प्रोफेशनल गोल्फ खेळाडू आहे.
जानेवारी २०२१ मधे तिने पुन्हा प्रोफेशनल टेनिस मधे पुनरागमन केलं. दुखापतीमुळे तिला जून २०२१ मधे फ्रेंच ओपन स्पर्धेत माघार घ्यावी लागली. पण १० जुलै २०२१ ला ऍश बार्टी ने इतिहास रचताना कॅरोलिना पिल्सकोवा ला ६-३, ७-६, ६-३ असं हरवत आपलं एक स्वप्न पूर्ण केलं. तब्बल ४१ वर्षानंतर एखाद्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने विम्बल्डन च्या त्या डिश वर आपलं नाव कोरलं. ऍश बार्टी ने विम्बल्डन सुरु होण्यापूर्वीच सांगितलं होतं की मला विम्बल्डन जिंकायची आहे. अर्थात प्रत्येक खेळाडूच्या मनात तेच असते पण ऍश बार्टी ने उघडपणे हे बोलून दाखवलं होतं. तिच्या मते,
“If it doesn’t work out, it doesn’t work out. Yeah, she’s not afraid to try. If you get it wrong, you get it wrong. If you try and fail, that’s still OK.”
And if you succeed, it’s glorious.
ऍश बार्टी चा हा प्रवास मला व्यक्तिशः खूप काही शिकवून गेला आहे. आपली आवड आपण आपल्यासाठी जपणं हे सगळ्यात महत्वाचं असते. पुरस्कार, बक्षीस, मानसन्मान हे येत राहिल पण सगळ्यात महत्वाचं असते की आपल्याला जे मनापासून आवडते तेच करणं . लोकं काय म्हणतील हा मुद्दा ऍश बार्टी ने मागे ठेवला. जे तिला आवडत गेलं ते ती करत गेली. प्रत्येक ठिकाणी तिने आपली छाप सोडली आहे. टेनिस, क्रिकेट किंवा गोल्फ प्रत्येक ठिकाणी तिने सर्वोत्तम दिलं. कदाचित २०१४ साली तिने तो ब्रेक घेतला नसता तर अपेक्षांच्या ओझ्याखाली तीच करीअर संपुष्टात आलं असतं. आज तिने ज्या यशाला गवसणी घातली त्याच रहस्य तिच्या त्या विचारांमध्ये आहे. काल संपूर्ण सामना बघताना कॉमेंट्रेटर पासून ते दर्शकांपर्यंत फक्त कॅरोलिना च नाव होतं. ऍश बार्टी मात्र शांतपणे आपला खेळ खेळत होती. एखादा पॉईंट जिंकला अथवा गमावला तरी तिच्या चेहऱ्यावर ना उन्माद होता ना निराशा. ती फक्त खेळत होती. अगदी दुसरा सेट टायब्रेकर मधे गमावल्यानंतर पण पुढचे दोन्ही गेम तिने अगदी शांतपणे जिंकले. तिकडेच मला वाटते तो सामना ऍश बार्टी च्या बाजूने फिरला.
टेनिस, क्रिकेट आणि गोल्फ अश्या वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळात आपली छाप सोडणाऱ्या ऍश बार्टी ला 'क्विन ऑफ स्पोर्ट्स' असं म्हंटल तर ते वावगं ठरणार नाही. तिच्या विम्बल्डन यशासाठी तीच खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या अश्याच अनेक उत्तुंग शिखरांना पादाक्रांत करण्यासाठी शुभेच्छा.
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
https://vartakvinit.blogspot.com/2021/07/blog-post_10.html

Blogspot
क्वीन ऑफ स्पोर्ट्स... विनीत वर्तक ©
क्वीन ऑफ स्पोर्ट्स... विनीत वर्तक © विम्बल्डनच्या इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांच्या खेळाची जादू आजही कायम आहे. अगदी जॉन मेकॅन्...
Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पी एच डी पूर्व परीक्षा 2021 (Phd Entrance exams)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पी एच डी पूर्व परीक्षा 2021 (PET)
जाहिरात,परीक्षा पॅटर्न,पात्रता, अभ्यासक्रम व महत्त्वाची पुस्तके याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.
https://youtu.be/Y_pQvYBrdrc
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠SET / NET/ PET VIDEO💠 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠 Pet telegram channel💠
https://t.me/joinchat/WKShuSS6LLnwmfrt

esakal | Marathi News Latest & Breaking | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या | eSakal.com
https://www.esakal.com/education-jobs/upsc-principal-recruitment-2021-application-reopens-for-government-job-posts-check-details-here

eSakal - Marathi Newspaper
UPSC कडून अधिसूचना; प्राचार्यांच्या ३६३ जागांसाठी भरती
UPSC Principal Recruitment 2021 Application reopens for government job posts check details here
Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पीएच.डी प्रवेश परीक्षा(पेट), एम.फील प्रवेश परीक्षा, सेट व नेट परीक्षा अशा सर्व परिक्षेसाठी संशोधन पद्धती (Research Methodology) हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे पेट पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे 50 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी डॉ.शशिकांत अन्नदाते सरांचे पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती"परिक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/2I4PkQJ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------
सेट /नेट परीक्षा व्हिडिओ
👉 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB

सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/3uFwj9G

512) ……………………या पद्धतीने उत्तम अभ्यासाच्या सवयी विकसित करता येतात.
Anonymous Quiz
4%
A) व्याख्यान
12%
B) पर्यवेक्षित अध्ययन
59%
C) स्वयं-अध्ययन
25%
D) चर्चा
Forwarded from SET/NET- 2026
513) औषध निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जडधातू मानवास काविळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो ?
Anonymous Quiz
42%
A) आर्सेनिक
18%
B) निकेल
27%
C) शिसे
13%
D) क्रोमियम
मुंबई, दि. 14 : सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
श्री. भरणे यांनी सांगितले, ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. तसेच गट अ ची 4 हजार 417 पदे, गट ब ची 8 हजार 31 पदे आणि गट क ची 3 हजार 63 पदे अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पदभरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची 4 रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहितीदेखील श्री. भरणे यांनी यावेळी दिली.