SET/NET/TAIT 2026
8.02K subscribers
1.76K photos
3 videos
499 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from K'Sagar Publications
Forwarded from K'Sagar Publications
🌹अरुण कुमार मिश्रा: राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याचे नवीन अध्यक्ष

✍भारताचे राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांची भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.

🌹राष्ट्रीय मानवी हक्क आयोग विषयी

✍‘मानवी हक्क संरक्षण कायदा 1993’ अन्वये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहेत.

✍ राष्ट्रीय मानवी हक्क आयोगास या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान केले गेले आहेत.

✍राष्ट्रीय वा राज्य मानवी आयोग स्वत:देखील मानवाधिकार उल्लंघनाची दखल घेऊन कारवाई करु शकतात. याबाबतच्या विविध तक्रारीचे निवारण करणे, गुन्हेगारास इतर कायद्यांतर्गत न्यायालयाद्वारे शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे काम आयोग करीत असते.

✍मानवी हक्क म्हणजे काय, त्यांचे स्वरूप, त्यांचे उल्लंघन झाल्यास तक्रार करण्याची पध्दत, मानवी हक्क आयोगाचे अधिकार या सार्‍यांबाबत या कायद्यात विवेचन करण्यात आले आहे.

✍संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने स्वीकृत केलेल्या नागरी, राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अधिकारांच्या आंतरराष्ट्रीय जाहिरनाम्यांमध्ये व इतरही आंतरराष्ट्रीय जाहिरनाम्यातील भारतीय केंद्र सरकारने मान्य केलेले सर्व अधिकार, ज्यांना भारतीय संविधान व विविध कायद्यात मान्यता दिली गेली आहे आणि ज्यांची अंमलबजावणी भारतीय न्यायालये करु शकतात, असे सर्व अधिकार मानवी हक्क समजले जातात.
Forwarded from K'Sagar Publications
https://youtu.be/uGCjftaKtXU
जाणून घ्या यशस्वी झालेल्या अधिकाऱ्याकडून MPSC pre exam paper Analysis -पर्यावरण
- योगेश नेतनकर सर सहाय्यक आयुक्त, वस्तू व सेवा कर विभाग
Forwarded from K'Sagar Publications
📚 भारतीय राजकारण-राजकीय व्यवस्थेतील गतिमान मुद्दे......
#MPSC #Polity
5_6185783994743784538.pdf
582.7 KB
NET/SET उच्च शिक्षण प्रणाली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद पीएच.डी प्रवेश नोंदणी दूसरा टप्पा
Ph.D Entrance Test 2021 (PET Exam)
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षांची (PET) तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
💦💦SDG इंडिया निर्देशांक आणि डॅशबोर्ड 2020-21.💦💦

♒️नीती आयोगाने (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) 3 जून 2021 रोजी भारताच्या शाश्वत विकास ध्येये (SDG) निर्देशांकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली.

🅾ठळक बाबी....

♒️नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी 'SDG इंडिया इंडेक्स अँड डॅशबोर्ड 2020–21: पार्टनरशिप्स इन द डिकेड ऑफ अॅक्शन' या शीर्षकाच्या अहवालाचे प्रकाशन केले.
तिसर्‍या आवृत्तीत 17 ध्येये, 70 लक्ष्ये आणि 115 निर्देशांकाचा समावेश आहे.

🅾निष्कर्ष...

♒️2019 साली दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेश आघाडीच्या श्रेणीतली (दोनहीसह 65-99 दरम्यान गुण) आहेत. 2020-21 या वर्षात आणखी बारा राज्ये / केंद्रशासित प्रदेश या श्रेणीत येत आहेत. उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मिझोरम, पंजाब, हरयाणा, त्रिपुरा, दिल्ली, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे, जम्मू व काश्मीर आणि लडाख यांनी (दोनहीसह 65 आणि 99 दरम्यान गुण) आघाडीच्या श्रेणीत स्थान पटकावले आहे.

♒️देशाच्या एकूण SDG गुणात 6 अंकांनी सुधारणा होऊन हे गुण वर्ष 2019 मधील 60 वरून 2020-21 या वर्षात 66 वर पोहोचले आहे.

♒️केरळ राज्य एकूण 100 गुणांपैकी 75 गुण मिळवून SDG प्राप्त करण्यासंबंधीच्या प्रगतीमध्ये अग्रेसर आहे. त्याखालोखाल तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.

♒️झारखंड, बिहार आणि आसाम या राज्यांनी याबाबतीत सर्वात कमकुवत कामगिरी केली आहे.

🅾पार्श्वभूमी...

♒️डिसेंबर 2018 या महिन्यात प्रथम प्रकाशित करण्यात आलेला हा निर्देशांक देशातील शाश्वत विकास ध्येयांसंबंधी प्रगतीवर लक्ष ठेवण्याचे प्राथमिक साधन बनले आहे आणि त्याचबरोबर जागतिक उद्दिष्टांवर मानांकने प्रदान करून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धेला चालना दिली आहे.

♒️2030 SDG कार्यसूची साध्य करण्याच्या प्रवासाचा एक तृतीयांश प्रवास भारताने पूर्ण केला असून निर्देशांकाच्या अहवालाची ही आवृत्ती भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करते.

🅾शाश्वत विकास ध्येये (SDGs) विषयी...

♒️2015 सालासाठी ठरविण्यात आलेली सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यांपासून 2030 सालासाठी शाश्वत विकास ध्येये (SDGs) विकसित झाली आहेत. 2000 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहस्त्राब्द (मिलेनियम) शिखर परिषदेनी ठरविलेल्या 2015 सालासाठीच्या सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यामध्ये 18 लक्ष्यांसह आठ आंतरराष्ट्रीय विकास ध्येयांची एक सूची होती. हा जगभरातल्या आव्हानांना सोडविण्यासाठी केला गेलेला प्रथम आणि एकमात्र वैश्विक प्रयत्न होता.

♒️शाश्वत विकास ध्येये (SDGs) ही 17 ध्येये, 169 लक्ष्ये आणि 306 राष्ट्रीय निर्देशकांची एक सार्वत्रिक सूची आहे, जे मानवी कल्याणासाठी 2030 सालापर्यंत कोणीही विकासाच्या दृष्टीने मागे राहणार नाही या उद्देशाने मोठ्या यशासाठी विकासात्मक कृतींचे नियोजन करण्यास आणि सुव्यवस्थित करण्यासाठी मदत करतात.

♒️सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या ऐतिहासिक संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या शिखर परिषदेत 193 सदस्य राष्ट्रांनी अंगिकारलेल्या आणि दि. 1 जानेवारी 2016 रोजी लागू झालेल्या “ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड: द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या पुढाकाराचा हा एक भाग आहे.

♒️सन 2030 साठीची शाश्वत विकास ध्येये (SDGs)....

ध्येय 1: दारिद्र्याचे संपूर्ण उच्चाटन
ध्येय 2: शून्य उपासमार (उपासमार थांबवणे, अन्न सुरक्षा आणि सुधारित पोषक आहार साध्य करणे आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे)
ध्येय 3: सर्वांसाठी निरोगी आरोग्य आणि सर्व वयोगटातील सर्वांसाठी कल्याणाचा प्रचार करणे
ध्येय 4: सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण (सर्वसमावेशक आणि न्याय गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी आजीवन शिक्षण संधींचा प्रचार करणे)
ध्येय 5: स्त्री-पुरुष समानता (लैंगिक समानता प्राप्त करणे आणि सर्व महिला व मुलींना सशक्त करणे)
ध्येय 6: सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता
ध्येय 7: सर्वांसाठी स्वस्त, विश्वासार्ह, शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा
ध्येय 8: सर्वांसाठी सभ्य काम आणि आर्थिक वाढ (सतत, सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, पूर्णकाळ आणि उत्पादनक्षम रोजगार तसेच सभ्य कामांना प्रोत्साहन देणे)
ध्येय 9: उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा (लवचिक अश्या पायाभूत संरचना तयार करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरणास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे)
ध्येय 10: असमानता कमी करणे (देशांच्या आतमधील आणि देशांदरम्यान असलेली असमानता कमी करणे)
ध्येय 11: शाश्वत शहरे आणि मानवी वस्ती
ध्येय 12: शाश्वत उपभोग आणि उत्पादन
ध्येय 13: हवामानविषयक कार्य (हवामानातील बदल आणि त्यांचे परिणाम टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे)
ध्येय 14: जलजीवन (शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी स्त्रोतांचे संवर्धन आणि सातत्यपूर्ण वापर)
ध्येय 15: थल जीवन (जमिनीवर पर्यावरणविषयक व्यवस्थे.
Ph.D Entrance Test 2021 (PET Exam)
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षांची (PET) तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
Ph.D Entrance Test 2021 (PET Exam)
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षांची (PET) तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
Ph.D Entrance Test 2021 (PET Exam)
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षांची (PET) तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
*सप्टेंबर 2021 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत 17 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.*
पुणे : महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी घेण्यात येणारी राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट यंदा 26 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. कोविड-19 प्रादुर्भावामुळे सेट परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत 17 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.यानंतरही अर्ज 25 जून 2021 पर्यंत भरता येतील पण त्यासाठी 500 रुपये अधिक विलंब शुल्क आकारण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार कळविण्यात आले आहे.राज्यातील 15 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
परीक्षेच्या तारखा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. एखाद्या विषयात विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर त्यास पुन्हा त्याच विषयातून सेट परीक्षा देता येणार नाही असा नवीन नियम यावर्षी करण्यात आला आहे.
यूजीसी कडून महाराष्ट्र आणि गोवा (Goa) या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 37व्या सेट परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. परीक्षेविषयीचे माहितीपत्रक, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका यांची अधिक माहिती https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
*सेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत*
17 मे 2021 ते 17 जून 2021

*विलंब शुल्कासह मुदत*
18 जून 2021 ते 25 जून 2021
(500 रुपये विलंब शुल्क)

*अर्ज दुरुस्तीचा कालावधी*
26 जून 2021 ते 30 जून 2021
(चुकीची माहिती भरली गेल्यास.)

*परीक्षा शुल्क*
1.खुला प्रवर्ग - *800 ₹*

2.OBC/SC/ST/EWS/PwD - *650 ₹*

*परीक्षा केंद्र* - मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पणजी(गोवा)

*सेट परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाचे स्वरूप*
■ सेट परीक्षा ३०० गुणांसाठी असते.
■ सेट परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात.
■ पहिली प्रश्नपत्रिका ५० प्रश्न १०० गुणांसाठी तर दुसरी प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न २०० गुणांसाठी असतात व दुसरा पेपर हा विषयाशी संबंधित असते.
▪️ परीक्षेत दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सहा टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील
▪️ त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान ४० टक्के (खुला प्रवर्ग) किंवा ३५ टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार
▪️ त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाते.

*सेट परीक्षेची तयारीसाठी महत्वाची संदर्भ पुस्तके*
*सेट पेपर पहिला संदर्भ*
सेट परीक्षेतील पेपर पहिला हा सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना समान असून या पेपरच्या अधिकाधिक गुणांवरच विद्यार्थ्यांचे यश अवलंबून आहे.सेट परीक्षेच्या पॅटर्ननुसार पेपर एकसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके पुढील प्रमाणे आहेत.
(1) नेट सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ.शशिकांत अन्नदाते (पाचवी आवृत्ती),के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (संपूर्ण अभ्यासक्रमासाठी अत्यंत उपयुक्त )
(2)नेट अनिवार्य पेपर एक- के.व्ही.एस मदान (इंग्रजी व हिंदी माध्यम)
(3)बुद्धिमत्ता चाचणी - अनिल अंकलगी/फिरोज पठाण/सतीश वसे
(4)पर्यावरण - एरीक भरुचा
(5)संशोधन पद्धती- डॉ.प्रदीप आगलावे
(6) संशोधन पद्धती पेट परीक्षा तात्विक विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(दुसरी आवृत्ती)
*इंग्रजी पेपर 2 पुस्तके*
(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham
(2) A history of english literature - e Albert
(3) English literature - R j Rees
(4) a background to the english literature - B Prasad
(5) English literature - Elizabeth drabble
(6) History of indian english literature - m k naik
(7) beginning theory - Peter Berry
(8)A critical history of english literature - David daiches
*मराठी पेपर 2 पुस्तके*
(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर
(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे
(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद
(4)अनिवार्य मराठी - के सागर
(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग
(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे
(7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक
*हिंदी पेपर 2 पुस्तके*
(1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल
(2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा
(3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ
(4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा
(5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह
(6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह
(7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रय
ोग - डॉ माधव सोनटक्के
(8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख
(9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह
(10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन
*इतिहास पेपर 2 पुस्तके*
(1)प्राचीन भारत- आर एस शर्मा
(2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र
(3)आधुनिक भारत- बिपीन चंद्र
(4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर
(7) प्राचीन भारत- डी. एन.झा.
(8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड
(9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक
(10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर
(11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे
(12)महाराष्ट्राचा इतिहास-
डॉ गाठाळ
*भूगोल पेपर 2 पुस्तके*
(1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ
(2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ
(3)विश्व भूगोल- मजीद हुसेन
(4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध
(5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते
(6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब
(7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित
(8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन
(9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी
(10)मानवी भूगोल - मजीद हुसेन
(11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे
(12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड

*शिक्षणशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1)केंद्र प्रमुख पेपर दुसरा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह - डॉ.शशिकांत अन्नदाते (शिक्षणशास्त्र विषयाच्या बेसिक माहितीसाठी अत्यंत उपयुक्त)
(2)शिक्षणशास्त्र दर्शन - डॉ.श्रीहरी दराडे
(4)शिक्षणाचे तात्विक व समाजशास्त्रीय अधिष्ठान - म बा कुंडले
(5)प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र - डॉ ह ना जगताप
(6)शैक्षणिक संशोधन पद्धती - बन्सी बिहारी पंडित
(7)शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन - डॉ मेघा गुळवणी
(8)शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह - डॉ नीलिमा सप्रे
(8)विशेष शिक्षण - एम एस सी ई आर टी च्या पुस्तिका
(9)प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञान -डॉ.ह.ना.जगताप
(10)शिक्षणशास्त्र सेट मी होणारच - डॉ कृष्णा पाटील, प्रा राहुल चित्रकार
(11)संपूर्ण बालमानसशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते
(12)शिक्षणशास्त्र नेट सेट - डॉ संजीवनी कदम

*समाजशास्त्र पुस्तके पेपर 2*
(1) समाजशास्त्र परिचय खंड 1 व 2-
विद्याभूषण व सचदेव
(२)सोशल चेंज- योगेंद्र सिंग
(3) समाजशास्रतील मूलभूत संकल्पना - सर्जेराव साळुंखे
(4)भारतीय समाज प्रश्न - प्रदीप आगलावे
(5)सामाजिक संशोधन पद्धती- प्रदीप आगलावे
(6)मूलभूत समाजशास्त्रीय विचार- प्रदीप आगलावे
(7)अरिहंत समाजशास्त्र नेट सेट गाइड
(8) वस्तुनिष्ठ समाजशात्र- पी के कुलकणी

*समाजकार्य पेपर 2 पुस्तके*
(1) समाजकार्य- प्राजक्ता टांकसाळे
(2)समाजकार्य वस्तुनिष्ठ- प्राजक्ता टांकसाळे
(3)समाज विज्ञान कोश- गर्गे
(4)मानवी हक्क- के सागर
(5) व्यावसाईक समाजकार्य: शिक्षण व व्यवसाय- डॉ देवानंद शिंदे
(6) भारतातील समाजकल्याण प्रशासन -डी आर सचदेव
(7) अरिहंत नेट सेट गाइड

*मानसशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1)मानसशास्त्र - म न पलसाने
(2)उपयोजित मानसशस्त्र -पलसाने
(3)मानसशास्त्र - सिसरेली
(4)सामाजिक मानसशास्त्र-रॉबर्ट बेरोन अनुवाद साधना नातू
(5)बालमानसशास्त्र - शशिकांत
अन्नदाते
(6)वेकासिक मानसशास्त्र - रा र बोरुडे
(7) बोधनिक मानसशास्त्र -बोरुडे
(8)अरुण कुमार सिंह यांची पुस्तके
(9)संशोधन पद्धती- भरत देसाई
(10)अरिहंत मानसशास्त्र नेट सेट गाईड

*लोकप्रशासन पेपर 2 पुस्तके*
(1)प्रशासकीय विचारवंत - प्रसाद
(2)न्यू होरायजन्स ऑफ पब्लिक -मोहित भट्टचार्य
(3)भारतीय प्रशासन - श्रीराम माहेश्वरी
(4)भारतीय प्रशासन- व्ही बी पाटील
(5)प्रमुख प्रशासकीय विचारवंत - के आर बंग
(6) विकास प्रशासन- के आर बंग
(7)भारत में लोकप्रशासन- पद्मा रामचंद्रन
(8) 21 वी शताब्दी में लोकप्रशासन -
अशोक कुमार दुबे

*राज्यशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1) भारतीय राज्यघटना - वि मा
बाचल
(2)भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवहार - के सागर
(3)पोलिटिकल थेअरी - ओ पी गाबा
(4)राजकीय सिद्धांत - भा ल भोळे
(5) आंतरराष्ट्रीय संबंध- देवळनकर
(6)इंडियन पॉलिटी - लक्ष्मीकांत
(7)भारतीय संसद -सुभाष कश्यप
(8)भारतीय संविधान- सुभाष कश्यप
(9)भारतीय राजकीय विचारवंत- बाचल
(10)भारतीय राज्यघटना- विनायक घायाळ
11.इंडियन पॉलिटी-लक्ष्मीकांत(अनुवादित)
12.गव्हर्नन्स इन इंडिया-लक्ष्मीकांत(अनुवादित)

*तत्वज्ञान पेपर 2 पुस्तके*
1. मराठी तत्वज्ञान महाकोश खंड 1 ते 3 - डी डी वाडेकर
2. पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास खंड 1 ते 3 - ग ना जोशी
3. भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित
4. देशोदेशीचे दार्शनिक - प्राचार्य शिवाजीराव भोसले
5.नेतीक व सामाजिक तत्वज्ञान - सु वा बखले