SET/NET/TAIT 2026
8.05K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Shivaji University Recruitment 2022_@Mahabharti.in.pdf
656.7 KB
Shivaji University Recruitment 2022_@Mahabharti.in.pdf
Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha Kolhapur.pdf
217 KB
Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha Kolhapur.pdf
advertisement_for_post_of_assistant_professors_on_temporary_basis.pdf
258.7 KB
advertisement-for-post-of-assistant-professors-on-temporary-basis-for-ay-22-23-at-unaided-section-scb-college-for-women.pdf
AT_NF_944(2)_15082022.pdf
1.9 MB
AT_NF_944(2)_15082022.pdf
SET/NET/TAIT 2026
AT_NF_944(2)_15082022.pdf
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे सहायक प्राध्यापक (कंत्राटी)रिक्त पदे जाहिरात
Forwarded from SET/NET- 2026
PETExam2022Advt.pdf
4.2 MB
सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठ
पी एच. डी. प्रवेश पूर्व परीक्षा 2022
https://youtu.be/zZdqgI-Qelg
*शैक्षणिक वार्ता:Ph.D*
*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा 6 नोव्हेंबर 2022 रोजी होणार; अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022*
        सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बहुप्रतिक्षित पीएच.डी प्रवेशाची शैक्षणिक वर्ष 2022 साठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. पीएच.डी प्रवेशासाठी विविध विषयांसाठीच्या  3187 रिक्त जागांसाठी पेट परीक्षा घेण्यात येणार आहे.पेट परीक्षेच्या अर्जाबाबत महत्वपूर्ण तारखा,परीक्षा स्वरूप, शुल्क, अभ्यासक्रम व परीक्षा तयारी याबाबत माहिती सविस्तरपणे पुढीलप्रमाणे आहे.
  
*पीएच.डी प्रवेश परीक्षा (PET) महत्वपुर्ण दिनांक*

★ऑनलाइन पेट परीक्षा दिनांक - 6 नोव्हेंबर 2022

★ऑनलाइन अर्ज दिनांक - 15 सप्टेंबर 2022 ते 30 सप्टेंबर 2022

★पेट परीक्षा निकाल- 10 नोव्हेंबर 2022

★ऑनलाइन अर्ज  संकेतस्थळ व पीएच.डी नियम व रिक्त जागा माहिती संकेतस्थळ-
http://bcud.unipune.ac.in/phd_entrance/applicant/login.aspx

         *परीक्षा फिस*
खुला प्रवर्ग - 1000 रुपये
मागास प्रवर्ग - 750 रुपये
   नेट - सेट, गेट व इतर युजीसी नियमानुसार पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतून सवलत देण्यात आली आहे, त्याची माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यांच्याकरिता परीक्षा फिस खुला प्रवर्ग 800 व मागास प्रवर्ग 600 रुपये आहे.

*पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET) अभ्यासक्रम स्वरुप व तयारी*
      युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पेट परीक्षेत दोन पेपर आहेत. यामधील पेपर एक Research Methodology (संशोधन पद्धती) व पेपर दोन Subject  Specific (विषयाशी निगडित) आहे. पेट पेपर एक 50 प्रश्न संशोधन पद्धतीवर आधारित आहेत, तसेच पेपर दोनमध्ये पदव्युत्तर विषयाशी निगडित 50 प्रश्न विचारले जाणार आहेत.दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम वेबसाइटवर उपलब्ध आहे.
        पेट परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असून एकूण प्रश्न 100 असणार आहेत. परीक्षेस निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू नाही.
       या दोन्ही पेपरमधील अभ्यासक्रमाचे स्वरूप व त्यासाठी आवश्यक मूलभूत संदर्भ ग्रंथ पुढील प्रमाणे आहे 

*पेपर एक - संशोधन पद्धती*
    यातील पहिला पेपर सर्व विषयांसाठी अनिवार्य असून तो संशोधन पद्धती (Research Methodology) म्हणून ओळखला जातो.या पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे संशोधन समस्या, संशोधन अहवाल,परिकल्पना, चले, संशोधन पद्धती, संशोधन प्रकार, गुणात्मक व संख्यात्मक संशोधन, संशोधनासाठी संख्याशास्त्राचा उपयोग, संशोधनासाठी संगणकाची उपयुक्तता इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती पेपरची व्याप्ती व अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा सराव करणे आवश्यक आहे.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत.
१.पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती" परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते (तिसरी आवृत्ती) के'सागर पब्लिकेशन्स,पुणे
२.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे,विद्या प्रकाशन, नागपूर
३.Research Methodology - C.R.Kothari
४.Research in Education-J.W.Best
५.Designs of Social Research - Das, D.K.Lal
६. सामाजिक अनुसंधान - राम आहुजा (हिंदी/इंग्रजी माध्यम)
७.NET/SET पेपर पहिला अध्यापन व संशोधन अभियोग्यता - डॉ.शशिकांत अन्नदाते (सातवी आवृत्ती)
८. सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.सुधीर बोधनकर

*पेपर दोन - विषयाशी संबंधित*
      पीएच.डी प्रवेश परीक्षेतील पेपर दोन हा  पदव्युत्तर पदवी विषयाशी संबंधित असतो.या पेपरच्या तयारीसाठी नेट सेट अभ्यासक्रमाची पेपर दोनची पुस्तके तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संदर्भ ग्रंथ अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील.
      पीएच.डी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्ग  50 टक्के व मागास प्रवर्ग 45 टक्के गुण आवश्यक आहे.
       *पीएच.डी करिता फेलोशिप*
     पीएच.डी पदवीसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप(NET JRF), जे.आर.डी. टाटा फेलोशिप, राजीव गांधी फेलोशिप मिळते तसेच बार्टी, सारथी, महाज्योती संस्थेकडूनही पीएच.डी साठी विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते.

  (सदर उच्च शिक्षणाशी संबंधित माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती.)
     
नेट परीक्षा वेळापत्रक