नवी अर्थक्रांती
2.7K members
1.47K photos
25 videos
1.29K files
1.36K links
साक्षर, संपन्न व समृध्द महाराष्ट्राची जागतिक ओळख
Download Telegram
to view and join the conversation
✍️ उद्योजकता विजडम
--------
१२४. आपल्याला आयुष्यात काय करायचंय हे १०००% स्पष्ट हवे
--------
जबरदस्त कनफ्यूजन :

मला बऱ्याच पालकांचे, नोकरदारांचे ई-मेल आले, प्रत्येकजण जबरदस्त कनफ्यूज आहे, पालकांना समजेना नेमके मुलांना कोणते शिक्षण द्यावे? खूप खर्च करून शिकले, तरीपण नोकरी लागत नाही. उच्च शिक्षणाला टाकले आणि मुलगा नापास झाला तर? कोणत्या मुलाला किती शिकवावे? व्यवसाय काढून द्यावा तर कोणता? फेल झाला, तोटा झाला तर पुढे काय? मुलाचं कनफ्यूजन, आता इंजिनिअर झालो नोकरी लागत नाही... लागली तर पगार १५ हजार... घरचे लोक रोज ओरडतात... शिक्षणावर १० लाख खर्च केले... कित्येकांनी भले मोठे कर्ज काढून शिक्षण घेतले आहे... नोकरी नाही तर फेडणार कसे ?

नोकरदारांचे कनफ्यूजन :

बदली झाली... नोकरी लागल्यावर वाटलं होत आता आपण स्वर्गात गेलो, पण काही नाही... पूर्ण नैराश्य... फक्त पोटाची खळगी व ईएमआय भागवण्यासाठी नोकरी करतोय... मनापासून अजिबात इच्छा नाही... नोकरी जाईल या भीतीपोटी वरिष्ठांच्या रोज शिव्या खातोय... पगार कितीही वाढला तरी महागाई किती वाढते ते सांगू नका.... मुलाचं शिक्षण, घराचं कर्ज, मुलींची लग्नं, सर्व विचार केला तर निवृत्त झाल्यावर १ पैसा तर शिल्लक राहील का नाही हे कळत नाही... घोर नैराश्य...

लक्षवेधी :

एक विशेष व आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ज्या लोकांनी मला संपर्क साधला, त्यात फक्त ४ ते ५ जणंच यशस्वी उद्योजक आहेत. म्हणजे यशस्वी उद्योजक हा एकमेव असा सुखी व्यक्ती आहे, ज्याला माहिती असते की आपल्याला आयुष्यात काय करायचंय. आयुष्याची दिशा ठरलेली असते, गडगंज पैसा कमवलेला असतो. त्याच्या समोर आलेले प्रश्न तो चुटकीसरशी सोडवतो. तो कुणाला फार काही विचारत बसत नाही. थोडंफार शिक्षण झालं की मुलंसुद्धा बिझनेसमध्ये. स्वतःच्या व्यवसायात २४ तास व्यस्त. रोज पैसे कमवणे चालू, पैसा आल्यावर जीवनातले बरेचसे प्रश्न सुटतात, फक्त तो कसा वापरायचा हे माहित पाहिजे.

आयुष्यात काय करायचं? :

ज्यांच्या आयुष्यात आज कन्फ्युजन आहे, प्रॉब्लेम आहेत, नैराश्य आहे, बेकारी आहे, कर्जबाजारी आहे, दु:ख आहे, व्यसनी आहे, दिशाहीन आहे, चिंतेने ग्रासला आहे, सतत आजार आहे, गरिबी आहे, अज्ञान आहे, कलह आहे आणि जितके काही प्रश्न तुमच्या आयुष्यात आले आहेत ते केवळ एकाच गोष्टीमुळे; ती गोष्ट म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे हे स्पष्ट नाही, कस करायचं हे माहीत नाही, सर्वच आयुष्य दिशाहीन समुद्रात भरकटलेल्या होडीप्रमाणे झाले आहे.

प्रथम निश्चिती :

एखाद्या शांत ठिकाणी जा. काही तास, काही दिवस, काही आठवडे रहा, स्वतःलाच विचारा, 'तुला काय करायचं आहे आयुष्यात. तुझे ध्येय काय, तुझ्या मनाला काय पटतंय, तुला कोणती गोष्ट करण्यात आनंद मिळतो, तुला आयुष्यात काय मिळवायचं आहे, तुला ते कसे मिळवायचंय, ते मिळवण्याचे मार्ग कोणते, यापूर्वी मार्ग चुकला असेल तर तो का व कुणामुळे चुकला आहे, अगोदर झालेल्या चुकांवर काय इलाज आहे का? यापूर्वी कितीही मार्ग चुकलेला असो त्यातूनही फिनिक्स पक्षप्रमाणे झेप घेऊन आयुष्यात अति उच्च यश कसे संपादन करता येईल' अशा अनेक गोष्टींचा विचार करा. ते सर्व एका वहीत लिहा, एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्ती किंवा सल्लागारास दाखवा व पुढील आयुष्याची दिशा निश्चित करा.

- प्रकाश भोसले
व्हॉट्सॲप: 8082188307
------------------
नवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके विकत घेण्यासाठी
http://bit.ly/nabooks
✍️ उद्योजकता विजडम
--------
१२५. बिझनेस ऑटोपायलट मोडवर टाका
--------
बिझनेस व नोकरी ही मोठ्या अर्थाने जीवन जगण्याचे मार्ग आहेत. एक तर, दुसऱ्याकडे नोकरी करा व महिना ठराविक पगार येईल व त्यावर जगत रहा. दुसरा बिझनेस, म्हणजे तुम्ही स्वतः काही उद्योगधंदा करता व त्यातून तुम्हाला फायदा मिळतो व त्यावर तुम्ही जीवन जगता. नोकरी म्हणजे आपण दुसऱ्यासाठी काम करतो, तर बिझनेस म्हणजे आपण स्वतःसाठी काम करतो व काम करण्यासाठी माणसे नेमतो.

बिझनेसमध्येही दोन प्रकार पडतात: स्वयंरोजगार, उदा. किराणा मालाचे दुकान, चहाची गाडी, कार भाड्याने देणे/टॅक्सी चालविणे, क्लासेस चालवणे जेथे स्वतःची उपस्थिती अपरिहार्य असते, तुम्ही गैरहजर असाल तर शटर डाऊन, धंदा त्यादिवशी बंद. कारण येथे तुम्ही स्वतःच काम करता. ह्याला खऱ्या अर्थाने बिझनेस म्हणता येत नाही. पण ही बिझनेसची पहिली पायरी असू शकते.

खरा बिझनेस म्हणजे जेथे लोक तुमच्यासाठी काम करतात व तुम्ही फक्त मॅनेजमेंट करता. काहीजण तर त्याच्या पुढेही आहेत. ते मॅनेजमेंटही करीत नाहीत, ते फक्त गुंतवणूक करतात. खऱ्या अर्थाने बिझनेस तोच जो तुमच्या अनुपस्थितीतही सुरळीतपणे चालेल. टाटा ग्रुपच्या १२० हून अधिक कंपन्या आहेत. मग काय टाटा सर्व कार्यालयात रोज जातात? अनेकांचे अनेक रिटेल आऊटलेट असतात मग काय प्रत्येक आऊटलेटमध्ये ते स्वत: रोज जातात? तसे नाही, कारण त्यांनी त्यांच्या बिझनेसला ऑटोपायलट मोडवर टाकलेले असते. ते पूर्ण विचाराअंती बिझनेस निवडतात. तो चालवण्यासाठी कर्मचारी, मॅनेजर्स तयार करतात व व्यवसाय त्यांचेवर सोपवतात व स्वतः फक्त मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजीवर भर देतात. बिझनेस ऑटोपायलट मोडवर टाकल्यानेच तो वाढतो, कारण तुम्ही दैनंदिन गोष्टीत अडकून न राहता पुढील व्यवसाय वाढ, संशोधन इत्यादीवर काम करू शकता. प्रत्येक दिवशी स्वतः काऊंटरवर बसण्याची इच्छा असणारा व्यावसायिक आयुष्यभर त्या एकाच काऊंटरवर बसतो. त्याची फारशी वाढ होत नाही. बिझनेस ऑटोपायलट मोडवर टाकणेसाठी तशी यंत्रणा तयार करा व माणसे तयार करा व हळूहळू तुम्ही स्वतः एक मॅनेजमेंट व मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहा.

- प्रकाश भोसले
व्हॉट्सॲप: 8082188307
------------------
नवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके विकत घेण्यासाठी
http://bit.ly/nabooks
जगप्रसिद्ध मराठी उद्योजक विठ्ठल कामत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
------------
विठ्ठल कामत यांच नाव घेताच डोळ्यासमोर उभी रहातात 'सत्कार', 'ऑर्किड' आणि 'सम्राट' सारखी विविध खाद्यसंस्कृतींनी परिपूर्ण अशी उपहारगृह.

विठ्ठल कामत यांचा जन्म मुंबईतील ग्रॅंट रोड येथे वास्तव्यास असणाऱ्या कामत या कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताचीच, परंतु कष्ट करुन पोट भरण्यावर कामत कुटुंबियांचा कल. विठ्ठल कामत यांच्या वडील व्यंकटेश यांचे हॉटेल व्यवसाय होता. विठ्ठल यांच्या आईचेही असेच म्हणणे होते की, विठ्ठलनेही मोठे होऊन वडिलांचा व्यवसाय वाढवावा. परंतु, विठ्ठल कामत यांना हॉटेल व्यवसाय वेगळ्या पद्धतीने मोठा करायचा होता. आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाचे नाव जगभरात करायचे होते. दरम्यान, विठ्ठल यांनी आपले इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

हॉटेल इंडस्ट्रीमधील बारकावे शिकण्यासाठी कूकचे काम केले… वडिलोपार्जित ‘सत्कार’ हे हॉटेल चांगले चालत होते. दरम्यान विठ्ठल यांनी आपल्या आयुष्यातील मोठा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांनी आपल्या बाबांना सांगितला. मला जगभरातील हॉटेल्समध्ये काम करायचे आहे आणि मला हॉटेल व्यवसाय सुरु करण्यापूर्वी प्रॅक्टिकल ज्ञान घ्यायचे आहे. वडिलांनीही विठ्ठल यांच्या निर्णयाला होकार दिला. विठ्ठल कामत यांनी वेळ न दवडता लंडन गाठले आणि तिथल्या रेस्टॉरंटमध्ये कूक म्हणून नोकरीस रुजू झाले. या कामाचे विठ्ठल कामत यांना दर आठवड्याला ७५ पौंड मिळायचे. त्यांनी येथे कूकसहीत पडेल ते काम केले. जे काम जमत नव्हते त्याचे ज्ञान ग्रहण केले. आणि यातूनच त्यांना हॉटेल व्यवसायातील बारकावे कळत गेले.

हॉटेल एकट्याने कधीच चालत नाही. टीमवर्कचे चांगले उदाहरण म्हणजे हॉटेलिंग व्यवसाय. मुख्य शेफ, त्याच्या खाली काम करणारे कूक ते हॉटेलमध्ये साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला कसे सांभाळणे, टीम कशी उभी करणे, मुख्य म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचे धडे कॉलेजमध्ये न घेता विठ्ठल कामत यांनी देश-विदेशातील हॉटेल्समध्ये काम करुन ते शिकले आणि या सर्व अनुभवानिशी पुन्हा भारतात आले आणि आपला वडिलोपार्जित व्यवसाय वाढविण्याकरीता कामाला लागले. भारतात येऊन विठ्ठल कामत यांनी आपला वडिलोपार्जित व्यवसाय सुरु केला. त्यांना हा बिझनेस मोठा करायचा होता. त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरु केले. दरम्यान त्यांन कळाले की सांताक्रुझ एअरपोर्ट नजीकचे ‘प्लाझ्मा’ हॉटेल विकायला काढले आहे. विठ्ठल कामत यांनी त्यात रस दाखविला. परंतु, हे हॉटेल विकत घेण्याइतपत आर्थिक भांडवल त्यांच्याकडे नव्हते. तेव्हा त्यांनी आर्थिक जमवाजमव करुन हे हॉटेल खरेदी केले. त्याच जागेवर देशातील पहिले इको-टेल फाईव्ह स्टार हॉटेल्स सुरु केले आणि हॉटेलचे नाव ‘ऑर्किड’ असे ठेवले. याच व्यवहारानंतर विठ्ठल कामत यांचे मोठे हॉटेल उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले. याच दरम्यान एक साधारण मुंबईकरही हॉटेल व्यवसाय सुरु करु शकतो, हे साऱ्यांना कळून चुकले आणि विठ्ठल कामत प्रसिद्ध झाले.

देशातील पहिले इको-टेल फाईव्ह स्टार हॉटेल सुरु केल्यानंतर विठ्ठल कामत यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आपल्या बिझनेसची वाढ फ्रँचायझी पद्धतीने केली. आज देशातील सर्व मुख्य राष्ट्रीय महामार्गांवर विठ्ठल कामत यांचे हॉटेल आहेत. एवढेच नव्हे तर देश-विदेशातील ४५० हून अधिक ठिकाणी या हॉटेल्सच्या बिझनेस विस्तारला आहे आणि विठ्ठल कामत हे महाराष्ट्रातील आणि देशातील हॉटेलिंग व्यवसायातील प्रमुख नाव आहे. विठ्ठल कामत हे 'महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळा'चे अध्यक्ष राहिले असून, 'हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया'च्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष होते; या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक, औद्योगिक समितींवर सल्लागार तसंच विविध पदांवर नियुक्त आहेत, त्यासोबतच 'आय.आय.एम.' अहमदाबाद आणि इतर व्यावसायिक महाविद्यालयात ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्य कामत करत आहेत.

आत्तापर्यंत विठ्ठल कामत यांना शंभरापेक्षा ही जास्त राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. यामध्ये 'गोल्डन पिकॉक अॅवॉर्ड', 'पाटवा इंटरनॅशनल अचिवर अॅवॉर्ड', 'राजीव गांधी एन्वायर्मेंट अॅवॉर्ड', तर 'ऑर्किड'साठी 'इकोटेल' हा किताब मिळवण्याचा बहुमान विठ्ठल कामतांना जातो.

पूर्ण लेख वाचा - https://bit.ly/3fHZPpy