MPSC SIMPLIFIED(official)
33.7K subscribers
34.7K photos
52 videos
3.68K files
9.46K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
New Doc 2017-04-12 (2) - Page 1
मागील चार -पाच दिवसात मला एक प्रश्न वारंवार विचारला जातोय.माझा एवढा स्कोर आला आहे..मी मेन ची तयारी करू का? मित्रानो कितीही स्कोर असला तरी तुम्ही पुढील परीक्षा देनार आहेत..मग अभ्यास करू का? का विचारात आहेत..हि परीक्षेतून तुम्ही अधिकारी बनणार आहेत..अधिकारी बनण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा व्यक्ती असा विचार नाही करणार? त्यामुळे cutoff विसरा अभ्यास करा..खूप दडपण येत असेल तर येथेच विसरा अधिकारी बनण्याचे स्वप्न ..पुढे जाऊन काम करताना खूप दडपण आनि समस्यांना तोंड द्यावे लागणार आहेत..
#स्पर्धा_परीक्षा_हि_फक्त_sincere_ उमेद्वारांचीच_अभियान
Photo from life is good
*महामानवाचा एकच आदेश*

नाचुन मोठे होऊ नका तर,
वाचून मोठे व्हा॥
माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा
माझे अपुर्ण राहीलेले काम प्राणपणाने पुर्ण करा॥
जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर. एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या॥
भाकर तुम्हाला जगविल, तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल॥

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
mpscsimplified.com-राजयसेवा मुखय परिकषेसाठी लागणारी संदरभ पुसतके 2017.pdf
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 पुस्तकसूची

https://www.mpscsimplified.com/mpsc_main_booklist/

ऑल थे बेस्ट
👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧पालकांसाठी थोडं महत्वाचं.👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧

एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर.
घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती.
एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.
इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले.
त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे.
आजोबा म्हणाले "इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत."

आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.

(मराठीमध्ये अनुवादीत)


डॉ. निखिल मु. पाटील.
होमिओपॅथिक तज्ञ.
साई सिद्ध क्लिनिक, नऱ्हे, पुणे ४११०४१.