MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
े वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.

बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हा चॉइस देवाने प्रत्येकालाच दिलेला आहे, अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत!

आता आपण बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे....
Forwarded from Nagesh Patil
साेलापूर- माढा: विठ्ठलवाडीचे सचिन व सोनाली कदम भावंडं झाले डीवायएसपी

माढा (जि. साेलापूर)- महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत माढा तालुक्यातील तिघांनी यश संपादित केले. विठ्ठलवाडी या ग्रामीण भागातील सचिन व सोनाली तुकाराम कदम या बहीण-भावांची एकाच वेळेस महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण हाेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी पदी निवड झाली आहे. तर माढा शहरातील प्रियंका तानाजी सुळे हिची तहसीलदार म्हणून यशस्वी झाली आहे.

प्रियंका सुळे ही तहसीलदारच्या पदासाठी झालेल्या परीक्षेत राज्यात दुसरी आली. तिचे शालेय शिक्षण माढ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माढ्याच्या रयत महाविद्यालयात बीएनंतर घरीच अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करून यश मिळवले आहे. अगोदरही प्रियंका हिची सहाय्यक गटविकास अधिकारी, विक्रीकर निरीक्षक अधिकारी या दोन परीक्षेत तिची निवड झाली होती. तिचे वडील ग्रामसेवक,भाऊ गटविकास अधिकारी आणि बहीण मंत्रालयात कक्ष प्रमुख आहे.

विठ्ठलवाडी (ता.माढा) येथील बहीण-भाऊ दोघांची एकाच वेळी उपविभागीय पोलिस अधिकारीपदी निवडी झाली. ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा केला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना प्रयत्न आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. सन २०१६ मध्ये झालेल्या राज्यसेवा परीक्षेत सचिन कदम हा डीवायएसपी परीक्षेमध्ये राज्यात सहावा आणि सोनाली कदम मुलींमध्ये राज्यात सहावी तर एकूण रँकमध्ये २५ वी आली आहे. सध्या ती विक्रीकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.
Forwarded from GovInd Bondar
अजित थोरबोले:
राज्यसेवा परीक्षा 2 एप्रिल 2017
शेवटचे 15 दिवस
--कोणतेही नवीन पुस्तक वाचायला आता घेऊ नका..
--revison किमान एखादा तरी झालीच पाहिजे
--आता येथून पुढे कोणतेही टेस्ट पेपर देऊ नका(खासकरुन gs 1 चे,csat che 1-2 दिले तरी चालतील
--casual परीक्षा घेऊ नका
--एखादा विषय राहिला असेल वाचयांचा.. तर नाही केला तरी चालेल.
--जर अवघड गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्नाचा सराव नसेल केला तर आता करू नका..जे केलेत त्यांचीच परत सराव करा
--कट ऑफ चा विचार करू नका
--पेपर कसा येईल याचा विचार करू नका
--माझा खूप अभ्यास राहिला आहे असा विचार करू नका
--स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका
--अभ्यासाचे आणि परीक्षेचे टेन्शन घेऊ नका
--मागील परीक्षेत आणि सराव परीक्षेतील चुका टाळा
--स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नका
--इतरांची परिक्षा घेण्यासाठी अवघड प्रश्न विचारू नका..
--आहार आणि झोप वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात घ्या
--दडपण येऊ देऊ नका
--स्वतःला सकारत्मक ठेवा
--अपेक्षांचे ओझं स्वतःवर लादु नका.
--2 तास खूप महत्वाचे
--हि परीक्षा सर्वांचीच..फक्त तुमचीच नाही..
--स्वतःला कमी लेखू नका..
--csat मोस्ट important

ऑल थे बेस्ट
👆
Brother and sister
Sachin and Sonali kadam
at ,post-Vitthalwadi
tal-Madha
Dist-Solapur

got DYSP post.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
csat तयारी आणि शेवटचे 15 दिवसाचे नियोजन या संबंधी बुलढाणा येथे झालेलं माझ्या lecture चे ऑडिओ क्लिप
ऑल थे बेस्ट👍
भूषण अहिरे (उपजिल्हाधिकारी, राज्यात प्रथम)

"Topper first...."

साधारणतः मे 2014 ची गोष्ट असावी...

मी माझ्या ऑफिसमध्ये निवांत बसलो होतो. तसंही मे महिन्यात कामाचा ताण कमी असतो. हळूच दार ढकलून एक मुलगा आत आला...
"सर, माझं नाव भूषण अहिरे."
हळूच मी बसण्याची खूण केल्यावर चेहऱ्यावरचा तणाव manage करत हे व्यक्तिमत्त्व शांतपणे बसलं.
"सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय..."
"सर, मी आपल्या Unique Academy मध्ये डिसेंबर 2011 च्या बॅचला होतो.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु करून दोन वर्षे झालीत.कायम badluck असते. पहिल्या वर्षी STI चे पद एका mark ने गेले.यावर्षी Dy.Sp चे पदसुद्धा केवळ एका mark ने गेले आणि मला कक्ष अधिकारी हे वर्ग 2 चे पद मिळाले".
हळूच डोळ्यातून पाण्याचे थेंब पडले.
हा संवाद बराच वेळ चालला. या संवादात आम्ही दोघांनीही एकमेकांना समजून घेतले. म्हणजे आमची ओळख आज तीन वर्षांची झाली.
यावर्षी राज्य शासनाने extension चे सरकारी परिपत्रक (G.R) काढले. म्हणजेच निवड झालेले उमेदवार join होण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढवून घेऊ शकत होते,पुढील वर्षी join न केल्यास मात्र ते पद रिक्त समजले जाईल. म्हणजेच पुढील वर्षी पद स्वीकारले नाही तर हातचे जाणार.
केवळ एका गुणाने Dy.Sp चे पद गेले असल्याने येणारी परीक्षा नव्या जोमाने देण्यासाठी आम्ही extension चा निर्णय घेतला. Extension घेऊन अभ्यास जोरात सुरु केला. मुख्य परीक्षेच्या अभ्यासावर भर देण्यात आला. काही महिने गेले.
पूर्व परीक्षा झाली.
ही 2015 ची पूर्व परीक्षा.
कदाचित या वर्षाने आम्हा दोघांना भूकंपाचा धक्का देण्याचा निर्णय घेतला असावा.
दि.27 जुलै 2015 या दिवशी पूर्व परीक्षेचा result लागला.
भूषण अहिरे ; पूर्व परीक्षा थेट नापास.
आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीनच हादरली.
Job साठी extension घेऊन prelims out.
दोघांनीही रात्रभर जागरण केले.
काय करावं काही सुचत नव्हतं..
दुसरे दिवशी भेटल्यावर दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं.
अगोदर भूषणच्या आणि तो निघून गेल्यावर माझ्या.
सगळी planning फिसकटली. एक वर्ष पाण्यात गेलं.
आयुष्याच्या या अडचणीच्या काळात भूषणला आईवडील, मैत्रीण गौरी सावंत (Dept. Collector) यांनी खूप आधार दिला. धीर दिला.
आता आमच्यापुढे दोन पर्याय होते...
1)कक्ष अधिकारी वर्ग 2 हे पद join करणे,
2) कक्ष अधिकारी वर्ग 2 हे पद join न करता ते सोडण्याची risk घेणे.
भूषणने मला सल्ला विचारला..
मी कधीही कोणाला आहे तो job सोडायला सांगत नाही,भावनिक सल्ला देत नाही..
पण काय माहित......
मी म्हणालो..
" नको होऊ join, आपण परत प्रयत्न करू.फक्त बाजू लावून धर.हिंमत ठेव".
कालांतराने वाईट दिवस निघून गेले.
सन 2016 च्या पूर्वपरीक्षेचा result सकारात्मक येणार याची खात्री होती. प्रत्येक क्षण वापरत आम्ही नियोजनबद्द अभ्यास केला. Value addition, rivision, सराव चाचण्या, बहुपर्यायी प्रश्नसंच सोडविण्याचा सराव इत्यादी अनेक टप्प्यांतून अभ्यास गेला.
अभ्यास मजबूत झाल्यामुळे मुख्य परीक्षेत पहिल्या answer key ने तब्बल 430 एवढा score आला.
700 पैकी 430...My God...
शांतीत क्रांती करायची हे आमचे सूत्र होते. परिणामी आपण कोठेही focus मध्ये यायला नको म्हणून आम्ही सर्वांना अनेक दिवस 380 एवढाच score सांगायचो.
डोंगराएवढा score आल्यामुळे पहिल्या 10 मध्ये येणार हे स्पष्ट झालं..
आम्ही दोघांनी ठरवलं...
"Will try for first rank".
एक स्वप्न उराशी बाळगून आम्ही झटलो.
मुलाखतीची साधारणतः 4 महिने तयारी केली. कोणतीही उणीव राहणार नाही याची काळजी घेतली.
शेवटी,
16 मार्च 2017 हा दिवस उजाडला.
MPSC कडून अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली.
यादीत नाव झलकलं..
भूषण अहिरे ; उपजिल्हाधिकारी
महाराष्ट्रात सर्वप्रथम (1st Rank).
क्षणभर आम्हा दोघांनाही हे स्वप्न का वास्तव हेच कळत नव्हतं...
पण हे वास्तव होत..
हे वास्तव होत स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचं..
यावेळीसुद्धा आम्ही रात्रभर झोपलो नाही..
मला भल्यापहाटे 3.45 वाजता भूषणचा message आला..
"सर, मला रात्रभर झोपच लागली नाही".
मी परत message केला,"मलासुद्धा".
भूषण नाशिकला आणि मी पुण्यात रात्रभर जागीच होतो..
दोघांचेही मन म्हणत होते...
"याची साठी केला होता अट्टाहास".
उडु दे झोप , उडाली तर उडाली..
सगळं जग झोपेत असताना आमची अवस्था होती.....
"Celebrating success"

मनोहर भोळे,

"राजमुद्रा", "अटेंशन प्लीज" आणि
"अभ्यास ते अधिकारी"
या पुस्तकांचे लेखक.
csat तयारी आणि शेवटचे 15 दिवसाचे नियोजन या संबंधी बुलढाणा येथे झालेलं माझ्या lecture चे ऑडिओ क्लिप
ऑल थे बेस्ट👍
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
आर्थिक
तंत्रज्ञान
लेख
जी के
शैक्षणिक
व्यक्तिवेध