MPSC SIMPLIFIED(official)
33.4K subscribers
34.7K photos
52 videos
3.66K files
9.42K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Available ✌️👍
🟪प्रकाश पादुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक बॅडिमटन महासंघाचा (बीडब्ल्यूएफ) प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार यंदा भारताचे महान बॅडिमटनपटू प्रकाश पादुकोण यांना देण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी भारतीय बॅडिमटन संघटनेकडून पादुकोण यांचे नाव पाठवण्यात आले होते. त्यानंतर पुरस्कार समितीच्या शिफारशीनुसार, जागतिक बॅडिमटन महासंघाने पादुकोण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारे माजी बॅडिमटनपटू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पदक जिंकून देणाऱ्या पादुकोण यांनी बॅडिमटन खेळाला मोठे योगदान दिले आहे.

२०१८मध्ये त्यांना भारतीय बॅडिमटन संघटनेने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले होते. विशेष सेवा पुरस्कारासाठी ‘बीडब्ल्यूएफ’कडून देवेंदर सिंग (हरयाणा बॅडिमटन संघटनेचे अध्यक्ष), एस. ए. शेट्टी (महाराष्ट्र बॅडिमटन संघटनेचे सचिव), डॉ. ओ. डी. शर्मा (भारतीय बॅडिमटन संघटनेचे उपाध्यक्ष) आणि माणिक साहा (माजी प्रशासक) यांना नामांकने देण्यात आली आहेत.
🟪केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘लाल सलाम’; पहिल्या पुस्तकाची केली घोषणा

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दंतेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यावर पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. स्मृती इराणी यांनी या पुस्तकाला ‘लाल सलाम’ असे नाव दिले आहे. स्मृती इराणी यांनी ट्विटरवर या पुस्तकाची घोषणा केली आहे. तसचे हे पुस्तक अॅमेझॉनवरून प्री-ऑर्डर केले जाऊ शकते, असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलंय. स्मृती इराणी यांचे हे पुस्तक वेस्टलँड या प्रकाशन संस्थेने आणले आहे.

स्मृती इराणी यांचे हे पुस्तक एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यापासून प्रेरित आहे. या हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले होते. स्मृती इराणी म्हणाल्या की, “ही गोष्ट त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून सुरू होती. मग मी ही कथा कागदावर उतरवण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष न करता लिहायला घेतली. मला आशा आहे की हे पुस्तक वाचणारे लोक पुस्तकाचा आनंद घेतील.”

लाल सलाम हे पुस्तक विक्रम प्रताप सिंग नावाच्या तरुण अधिकाऱ्याच्या जीवनावर आहे. त्यात विक्रम प्रताप सिंग यांना राजकारण आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या व्यवस्थेचा कसा सामना करावा लागतो हे सांगितले आहे. प्रकाशनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या पुस्तकाची माहिती देताना, नक्षलवादी आणि माओवादी बंडखोर भागात आव्हानांचा सामना करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे. हे पुस्तक २९ नोव्हेंबरपासून वाचकांना उपलब्ध होणार आहे.
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🟪 आगामी होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, Combine गट-ब पूर्व परीक्षासाठी उपयुक्त पुस्तके

SIMPLIFIED PUBLICATION ची सर्व पुस्तके पुन्हा एकदा नव्याने आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा.


👉Simplified Publication च्या अधिकृत Online Store वरुन ही आपण भरघोस सवलतीत पुस्तके खरेदी करु शकता.👇

http://www.simplifiedcart.com
http://www.simplifiedcart.com