MPSC SIMPLIFIED(official)
33.4K subscribers
34.7K photos
52 videos
3.66K files
9.42K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
🟪नीरज चोप्रासह १२ जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. नीरज चोप्रासह १२ खेळाडूंचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सर्वांना राजभवानात पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यामध्ये क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनिल छेत्री, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवीकुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीतसिंह यांनाही खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, कृष्णा नागर, नेमबाज एम नरवाल, पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमीत अंतिल यांना देखील पुरस्कार देण्यात आला.

यामध्ये क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनिल छेत्री, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवीकुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीतसिंह यांनाही खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, कृष्णा नागर, नेमबाज एम नरवाल, पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमीत अंतिल यांना देखील पुरस्कार देण्यात आला.
🟪अंतराळात जन्म, तरंगती घरं आणि पृथ्वीवर पिकनिक…जेफ बेझोसनं वर्तवलं मानवजातीचं भविष्य

आपल्या विश्वाच्याही पलीकडे कोणतं विश्व आहे की नाही, याची उत्सुकता गेल्या कित्येक वर्षांपासून मानवाला राहिली आहे. त्यासोबतच पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मर्यादित साठा लक्षात घेता असाच साठा बाहेरच्या जगात कुठे आहे का याचाही शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. पण जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मानानं झळकणाऱ्या जेफ बेझोसनं मात्र मानवजातीच्या भवितव्याविषयी एक भन्नाट भाकित वर्तवलं आहे.

एखाद्या सायफाय चित्रपटात सापडावं, असं हे भाकित अस्तित्वात आलं, तर माणसाचं आयुष्य किती अमूलाग्र बदलून जाईल, याचीच कल्पना बेझोसच्या या भाकितानंतर केली जाऊ लागली आहे.

वॉशिंग्टनमध्ये झालेल्या ‘२०२१ इग्नॅशियस फोरम’मध्ये जेफ बेझोस सहभागी झाला होता. पृथ्वीवरचं जीवनमान वाचवण्यासाठी अंतराळाचा कसा उपयोग होऊ शकतो, याविषयीच्या चर्चेत त्यानं भाग घेतला होता.

यावेळी पृथ्वीवरील मानवजातीचं भवितव्य काय असेल? या मुद्द्यावर बेझोसनं एक भन्नाट भाकित वर्तवलं आहे. जे सत्यात येण्याची पूर्ण शक्यता असल्याचं देखील त्याचं म्हणणं आहे.
🟪२०२४चा ट्वेन्टी-२० विश्वचषक अमेरिकेत

लॉस एंजलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात यावा, या हेतूने २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद अमेरिकेला देण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) विचार करत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांना संयुक्तपणे २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद देण्यात येईल, असे समजते. त्या विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होण्याची शक्यता असून ५५ सामने खेळवण्यात येऊ शकतात. यंदाच्या तसेच पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात प्रत्येकी १६ संघ सहभागी असून ४५ लढती खेळवण्यात येणार आहेत.

‘‘२०२४ ते २०३१ या कालखंडात होणाऱ्या ‘आयसीसी’ स्पर्धाचे यजमानपद अद्याप ठरवण्यात आलेले नाही. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात यावा, यासाठी ‘आयसीसी’ फार पूर्वीपासून प्रयत्नशील आहे. त्याशिवाय क्रिकेटमधील उदयोन्मुख संघांनाही जागतिक पातळीवरील स्पर्धाच्या आयोजनाची संधी मिळावी, असा ‘आयसीसी’चा मानस आहे.

त्यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धाचा विचार करता २०२४चा ट्वेन्टी-२० विश्वचषक अमेरिकेत खेळवणे खेळाच्या दृष्टीने सोयीचे ठरू शकते. लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल’’ असे ‘आयसीसी’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
Forwarded from MPSC Mantra (Abhijit)
💥💥DIPAWALI OFFER💥💥

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक

» २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त..

» १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश..

पुस्तके सर्वत्र उपलब्ध..

» १८ वा अंक : १ जानेवारी ते १० मार्च २०२१
» १९ वा अंक : १० मार्च ते १० जुलै २०२१
» २० वा अंक : ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
@ 300/- 35% OFF (₹ 460/-)
3 BOOKS COMBO offer
📍📍📍📍📍📍📍📍📍

Buy Online 👇
http://www.simplifiedcart.com

Contact 9423333181 / 8788639688
4_5813439703461921474.pdf
526.6 KB
4_5813439703461921474.pdf
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
🔰Simplified कृषिशास्त्र 🔰

» *वैशिष्टये -*

1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक
2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी
3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण
4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश.
5) भारताच्या व महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार अद्ययावत आकडेवारी.

*लेखिका*
*स्वाती थोरात*
*M.Sc. (Agri), L.L.B.*
*सहायक राज्यकर आयुक्त*

*संकल्पना*
*डॉ. अजित थोरबोले*
*(उपजिल्हाधिकारी)*

*‼️पुढील लिंकवर क्लिक करून आजच आपली प्रत नोंदवा‼️*
👇👇👇👇👇👇
www.simplifiedcart.com



https://www.ksagaronline.com/krushishastra-swati-thorat-simplified-publication.html

महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध !
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
#simplified_Publication
#Comprehensive_Csat

◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th
Full Updated Edition

डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी


◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध .

» CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी
» 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण
» सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश
» आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे
» 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण
» अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश.
» CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त
» तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy.
» कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas
» CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त.
» आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल.

🔳👇Buy Online👇
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
🟪इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धा - श्रीकांत, प्रणॉय दुसऱ्या फेरीत

भारताचे बॅडिमटनपटू किदम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी दिमाखदार विजयांसह इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अभियानाला बुधवारी प्रारंभ केला. परंतु बी. साईप्रणीत आणि पारुपल्ली कश्यप यांचे आव्हान संपुष्टात आले.

श्रीकांतने जागतिक क्रमवारीत ७१व्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्हचा एक तास, १५ चाललेल्या सामन्यात २१-१८,१५-२१, २१-१६ असा पराभव केला. प्रणॉयने मलेशियाच्या लीव डॅरेनला २२-२०, २१-१९ असे नामोहरम केले. जागतिक क्रमवारीत १६व्या क्रमांकावर असलेल्या साईप्रणीतने इंडोनेशियाच्या शेसार रुस्टाव्हिटोविरुद्ध २१-१६, १४-२१, २०-२२ अशी हार पत्करली.

माजी राष्ट्रकुल विजेत्या कश्यपने डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्ग व्हिटिंगहसकडून १०-२१, १९-२१ असा पराभव पत्करला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या प्रवीण जॉर्डन आणि मेलाटी ओक्टाव्हियांटीवर २१-११, २२-२० असा विजय मिळवला. बी. सुमीत रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांना इंडोनेशियाच्या हाफीज फैझल आणि ग्लोरिया विडजाजा जोडीने २१-१५, २१-१६ असे पराभूत केले.
🟪चंद्राभोवती फिरणाऱ्या चांद्रयान २ ची टक्कर टळली

इस्त्रोचे चांद्रयान २ हा उपग्रह ऑगस्ट २०१९ पासून सुमारे १०० किलोमीटर उंचीवरुन चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. चांद्रयान २ वर असलेल्या विविध उपकरणांच्या माध्यमातून चंद्राबद्दलची विविध माहिती ही गोळा केली जात आहे. तर नासाचा Lunar Reconnaissance Orbiter (LRO) हा उपग्रह जून २००९ पासून चंद्राभोवती २० किलोमीटर ते १८०० किलोमीटर अशा लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत चंद्राचा अभ्यास करत आहे. हे दोन्ही उपग्रह चंद्राच्या उत्तर ध्रुवावरुन जात असतात. मात्र या दोन्ही उपग्रहांची टक्कर होणार होती.

चंद्राभोवती फिरणाऱ्या नासाच्या आणि इस्त्रोच्या या उपग्रहांची टक्कर ही २० ऑक्टोबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ११ वाजुन १५ मिनीटांनी होणार होती. यावेळी या दोन्ही उपग्रहांच्या कक्षेमध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असणार होते. या उपग्रहांचा आकार आणि सोलर पॅनेलचा विस्तार बघता ही टक्कर अटळ होती.

अर्थात नासा आणि इस्त्रो या अवकाश संस्थांना हा संभाव्य धोका काही दिवस आधीच लक्षात आला. दोन्ही संस्थांनी चर्चा केल्यावर इस्त्रोने चांद्रयान २ ची कक्षा बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा १८ ऑक्टोबरला म्हणजे संभाव्य टक्कर होण्याच्या दोन दिवस आधीच इस्त्रोने चांद्रयान २ च्या कक्षेत बदल केला आणि चंद्राच्या भोवती उपग्रहांची होणारी टक्कर ही टाळण्यात आली.

पृथ्वीभोवती काही हजार उपग्रह हे फिरत आहेत. तेव्हा उपग्रहांवर सातत्याने नजर ठेवावीच लागते. अनेकदा दोन उपग्रहांमध्ये टक्कर होऊ नयेत म्हणून उपग्रहांच्या कक्षेत बदल केला जातो. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे उपग्रहाच्या कक्षेत तेही चंद्राभोवती फिरणाऱ्या उपग्रहाबाबत बदल करण्याची वेळ इस्त्रोवर आली.
💥💥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक

» २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त..

» १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश..

पुस्तके सर्वत्र उपलब्ध..

» १८ वा अंक : १ जानेवारी ते १० मार्च २०२१
» १९ वा अंक : १० मार्च ते १० जुलै २०२१
» २० वा अंक : ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
@ 300/- 35% OFF (₹ 460/-)
3 BOOKS COMBO offer
📍📍📍📍📍📍📍📍📍

Buy Online 👇
http://www.simplifiedcart.com

Contact 9423333181 / 8788639688
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
#Correction 👉 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक २० मधील पेज क्रमांक ४२ वर भारतातील उपासमारीची पातळी भयावह (Alarming) असे दिले आहे. त्याठिकाणी गंभीर (Serious) असा बदल करून घ्यावा..🙏