MPSC SIMPLIFIED(official)
33.4K subscribers
34.7K photos
52 videos
3.66K files
9.42K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
🟪कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा : रिदम-विजयवीरकडून ‘सुवर्णदशकपूर्ती’

रिदम सांगवान आणि विजयवीर सिद्धू या भारतीय जोडीने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या खात्यावरील २३व्या पदकाची नोंद केली.

रिदम-विजयवीर जोडीने अंतिम सामन्यात थायलंडच्या कॅनयाकॉर्न हिरूनफोइम आणि श्वॅकोन ट्रिनीफॅक्रोन जोडीवर ९-१ असा दिमाखदार विजय मिळवून भारताला १०वे सुवर्णपदक जिंकून दिले. याच प्रकारात तेजस्वनी आणि अनिश भानवाला जोडीने थायलंडच्या शॅविसा पॅडुका आणि रॅम खाम्हाइंग जोडीला १०-८ असे नमवून कांस्यपदक मिळवले.

महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात प्रसिद्धी महत, निश्चल आणि आयुशी पॉडर या त्रिकुटाने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम लढतीत अमेरिकेच्या एलिझाबेझ मॅक्घिन, लॉरेन झॉन आणि कॅरोलिन टकर या त्रिकुटाने भारताला ४७-४३ अशा फरकाने हरवले.
🟪 अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री पॉवेल यांचे निधन.

अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री कॉलीन पॉवेल यांचे करोनापश्चात प्रकृतीत उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी सोमवारी दिली. ते ८४ वर्षांचे होते.

पॉवेल यांच्या कुटुंबियांनी समाजमाध्यमांद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पॉवेल यांना करोना संसर्ग झाला होता. त्यांचे लसीकरणही झाले होते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. पॉवेल यांच्या रूपाने आम्ही एक असामान्य आणि प्रेमळ पती, वडील, आजोबा आणि महान अमेरिकी असामी गमावली आहे, असेही त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.

पॉवेल १९८९ मध्ये पहिले कृष्णवर्णीय परराष्ट्रमंत्री आणि ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ’चे अध्यक्ष होते. १९९१च्या आखाती युद्धानंतर त्यांची प्रशंसा केली गेली. पॉवेल यांच्याच कारकीर्दीत अमेरिकेने पनामावर आक्रमण केले आणि १९९१ मध्ये कुवैतमधून इराकी लष्कराला हुसकावण्यासाठी लष्करी कारवाई केली होती.

परंतु २००३ मध्ये इराक युद्धाचे समर्थन करताना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला त्यांनी दिलेल्या असत्य माहितीमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. सद्दाम हुसैन यांनी नरसंहारासाठी गुप्तपणे शस्त्रे सज्ज ठेवल्याच्या माहितीचा चुकीचा हवाला त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दिला होता.
🟪निर्भिड, निष्पक्ष पत्रकारांना शांततेचे नोबेल.

फिलिपाईन्समधील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव यांना २०२१चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे.

नॉर्वेच्या नोबेल समितीचे बेरिट रेस अँडरसन यांनी शुक्रवारी या मानकऱ्यांची घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे, ‘‘की मुक्त, स्वतंत्र, तथ्याधिष्ठित पत्रकारितेच्या रक्षणासाठी या दोघांनी सत्तेचा गैरवापर, खोटारडेपणा, युद्धखोरीजन्य प्रचार याविरोधात लढा दिला. अभिव्यक्ती आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य, देशांमधील बंधुभाव, नि:शस्त्रीकरण याशिवाय चांगल्या जगाची निर्मिती होऊ शकत नाही.’’

रेसा यांनी २०१२ मध्ये रॅपलर हे वृत्तसंकेतस्थळ स्थापन केले असून अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्या वादग्रस्त राजवटीविरोधात, अमली पदार्थांच्या घातक वापराविरोधात मोठा लढा दिला आहे. समाजमाध्यमे कशा खोट्या बातम्या पसरवतात, विरोधकांचा छळ कसा होतो, सार्वजनिक पातळीवरील चर्चेला भलतीच दिशा दिली जाते यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
🟪2021 या वर्षातील नौदल कमांडरांची द्वितीय बैठक नवी दिल्ली आयोजित

2021 या वर्षातील भारतीय नौदलातील कमांडर श्रेणीच्या अधिकाऱ्यांची द्वितीय बैठक नवी दिल्ली येथे 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग या परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर उपस्थित नौदल कमांडरांशी संवाद साधतील.

▪️ठळक बाबी.

नौदल प्रमुख आणि इतर उपस्थित नौदल कमांडरांमध्ये यावेळी चर्चिल्या जाणाऱ्या अनेक मुद्द्यांमध्ये, नौदलने गेल्या काही महिन्यात हाती घेतलेल्या परिचालन, सामग्री, मनुष्यबळ विकास, प्रशिक्षण आणि प्रशासनविषयक प्रमुख उपक्रमांचा समावेश असेल, तसेच नौदलच्या महत्त्वाची कार्ये आणि उपक्रम याविषयीच्या भविष्यातील योजनांबद्दल उहापोह होईल.

भारतीय संरक्षण दलांच्या तिन्ही सेवांमध्ये परिचालनविषयक सामायिक वातावरण निर्माण करणे आणि त्रि-सेवा समन्वय वाढविणे या दृष्टीने भारतीय संरक्षण सेना प्रमुख आणि लष्करप्रमुख आणि हवाई सेना प्रमुख नौदल कमांडरांशी या परिषदेमध्ये संवाद साधतील.

युध्दनीतीच्या पातळीवरील महत्त्वाच्या सागरी सुरक्षा संबंधित मुद्द्यांसंबंधी चर्चा करण्यासाठीचा मंच म्हणून तसेच ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी संस्थात्मक पातळीवरून संवाद साधण्यासाठीचे माध्यम म्हणून ही परिषद उपयुक्त ठरते.
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.

👉 आजच आपली प्रत राखून ठेवा.

👇Online Booking Available👇


www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
1183(1).pdf
2.5 MB
#syllabus

🟪 Combine गट ब exam syllabus
अभ्यासक्रम.
Gr C Combined .pdf
164.3 KB
#syllabus

🟪अभ्यासक्रम संयुक्त गट क सेवा परीक्षा
Excise SI, TAX assistant, Clerk
5_6307780285928834154.pdf
102 KB
🟪 मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करिता शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कोल्हापूर, नाशिक व पुणे येथील पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम.
🔳 नाव, वेळ या PDF मध्ये आहे.
4145.pdf
575.8 KB
🟪 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करिता शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कोल्हापूर, नाशिक व पुणे येथील पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
#simplified_Publication
#Comprehensive_Csat

◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th
Full Updated Edition

डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी


◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध .

» CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी
» 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण
» सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश
» आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे
» 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण
» अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश.
» CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त
» तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy.
» कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas
» CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त.
» आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल.

🔳👇Buy Online👇
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
🟪आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
#simplified_Publication
#Comprehensive_Csat

◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th
Full Updated Edition

डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी


◼️लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होत आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांकडे Pre Booking करा.

» CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी
» 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण
» सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश
» आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे
» 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण
» अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश.
» CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त
» तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy.
» कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas
» CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त.
» आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल.

🔳👇PRE BOOKING AVAILABLE👇
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
🟪 जिओस्पॅशीयल एनर्जी मॅप ऑफ इंडिया

नीती आयोगाने भारताचे व्यापक भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) सक्षम ऊर्जा मानचित्र विकसित केले आहे आणि त्याला जिओस्पॅशीयल एनर्जी मॅप ऑफ इंडिया (अर्थात ‘भारतीय भूस्थानिकी ऊर्जा मानचित्र / नकाशा’) असे नाव देण्यात आले.

हा नकाशा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) सहकार्याने तयार करण्यात आला आहे.

▪️ठळक बाबी.

हा नकाशा देशाच्या सर्व ऊर्जा स्त्रोतांचे एक समग्र चित्र प्रदान करते, जे 27 विषयागत स्तरांद्वारे पारंपारिक ऊर्जा संयंत्रे, तेल आणि वायू विहिरी, पेट्रोलियम शुद्धीकरण केंद्रे, कोळसा क्षेत्रे, अक्षय ऊर्जा वीज प्रकल्पांची जिल्हानिहाय माहिती आणि अक्षय ऊर्जा स्त्रोत क्षमता इ. घटकांसारख्या ऊर्जा आस्थापनांचे दृश्य-चित्र प्रदर्शित करते.

ते नियोजन आणि गुंतवणूकीचे निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच उपलब्ध ऊर्जा संपदेचा वापर करून आपत्ती व्यवस्थापनात मदत करेल.
ऊर्जा संपदेचे GIS-मानचित्रण भारताच्या ऊर्जा क्षेत्राचे वास्तविक वेळेत आणि एकात्मिक नियोजन सुनिश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
🟪सोवा-रिगपा औषध पद्धतीसंबंधी पदवी अभ्यासक्रमाला UGCची मान्यता

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) ‘बॅचलर ऑफ सोवा रिगपा मेडिसिन अँड सर्जरी’ या विशेष स्नातक अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. पदवीचा कालावधी किमान 5 वर्षांचा असेल.

▪️सोवा-रिगपा पद्धतीविषयी..

भारतातल्या हिमालयीन पट्ट्यातली सोवा-रिगपा ही पारंपरिक औषध पद्धती आहे.

सोवा-रिगपा प्रणाली लद्दाख, हिमाचल प्रदेश (स्पीति आणि लाहौल), जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, दार्जिलिंग, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम यासारख्या हिमालय प्रदेशातील समाजांमध्ये लोकप्रिय आहे.

सोवा-रिगपा याला भारत सरकारद्वारे एक पारंपरिक वैद्यकीत चिकित्सा प्रणालीच्या रूपात मान्यता आणि प्रोत्साहन दिला गेला आहे. बौद्ध धर्माच्या प्रसाराप्रमाणे, सोवा-रिगपाने देखील जगभरात आपला प्रभाव स्थापित केला आहे. “अमची चिकित्सा पद्धती’ याच्या रूपात देखील ही प्रणाली ओळखली जाते, जी चीनच्या काही भागात, भारताच्या हिमालय प्रदेशात, मंगोलिया, नेपाळ, रशिया आणि भूटान या देशांमध्ये प्रचलित आहे.

सोवा-रिगपाला आयुर्वेदिक दर्शनाच्या समान मानले जाते. भारतीय मूळ असलेल्या बहुअधिक औषधी वनस्पती जश्या अश्वगंधा, गुग्गुल, त्रिफळा, अशोक, हरिद्रा, इत्यादींचा उपयोग सोवा-रिगपा प्रणालीमध्ये उपचारासाठी केला जातो.
🟪 जागतिक बॉक्सिंग स्पर्धेपासून मानाचा पट्टा, पांढरे ग्लोव्हज.

बेलग्रेड येथे होणाऱ्या आगामी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेपासून मानाचा पट्टा आणि परंपरागत लाल-निळ्या ग्लोव्हजऐवजी पांढरे ग्लोव्हज वापरण्यात येणार आहे, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडून (एआयबीए) करण्यात आली आहे.

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा २४ ऑक्टोबरपासून बेलग्रेड (सर्बिया) येथे सुरू होणार असून विजेत्या आणि उपविजेत्या बॉक्सिंगपटूंना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके दिली जातील. त्यामुळे बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्याला मानाचा पट्टा, पदक आणि रोख पारितोषिक असे तिहेरी इनाम लाभणार आहे.

२६ लाख डॉलर रकमेची रोख पोरितोषिके देण्यात येणार असल्याचे ‘एआयबीए’ने आधीच जाहीर केले आहे. याशिवाय सहभागी क्रीडापटूंना क्रीडा साहित्यावर त्यांच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
🟪 भास्करब्दा चंद्र-सौर दिनदर्शिका’: आसाम सरकारची अधिकृत दिनदर्शिका.

आसाम सरकारने अशी घोषणा केली की यापुढे सरकारी कामकाजासाठी ‘भास्करब्दा चंद्र-सौर दिनदर्शिका’ याचा उपयोग केला जाणार. राज्य सरकारची अधिकृत दिनदर्शिका म्हणून त्याचा उपयोग केला जाईल.

वर्तमानात, आसाम सरकार अधिकृत दिनदर्शिका म्हणून साका आणि ग्रेगोरीय दिनदर्शिकांचा उपयोग करीत आहे. आणि आता नवीन दिनदर्शिका वापरली जाईल.

ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार दिवसाची सुरुवात मध्यरात्री होते; तर आसामी दिनदर्शिकेनुसार दिवसाची सुरवात आणि शेवट सुर्योदयाला होते, ज्यात संपूर्ण 24 तास असतात.

ग्रेगोरीय दिनदर्शिका सौर-चक्र यावर आधारित आहे तर साका आणि भास्करब्दा दिनदर्शिका चंद्र-सौर चक्र म्हणजेच चंद्र वर्ष आणि सौर वर्ष अश्या दोनही टप्प्यांच्यावर आधारित आहे.

भास्करब्दा दिनदर्शिकेनुसार वर्षाची सुरुवात 7 व्या शतकातील स्थानिक शासक भास्कर वर्मन यांच्या स्वर्गारोहणाच्या तारखेपासून केली जाते.