MPSC SIMPLIFIED(official)
33.4K subscribers
34.7K photos
52 videos
3.66K files
9.42K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.

👉 आजच आपली प्रत राखून ठेवा.

👇Online Booking Available👇


www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
🟪डीडी चंदनाचे दहा लाखांहून अधिक सब्स्क्रायबर्स, डिजिटल प्रसार भारतीला दक्षिणेत चालना
 

दर्जेदार आशय आणि डिजिटल फर्स्ट दृष्टिकोनासह दक्षिण भारतात प्रसार भारतीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मने केवळ दोन वर्षात खूप मोठा पल्ला गाठला आहे.
डीडी चंदना (कर्नाटक) यूट्यूबवर दहा लाख  ग्राहकांचा टप्पा गाठणारी दक्षिण  भारतातील  पहिली वाहिनी बनली असून  डीडी सप्तगिरी (आंध्र प्रदेश) आणि डीडी यादगिरी (तेलंगणा) पाच लाखांच्या  दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत.

प्रत्येकी 1 लाखाहून अधिक यूट्यूब सब्सक्राइबर्ससह, तमिळ आणि मल्याळम वृत्त विभाग  आणि दूरदर्शनची केंद्रे एकमेकांशी आणि स्थानिक भाषा प्रसार माध्यम उद्योगाशी निकोप  स्पर्धा करत आहेत.

या यूट्यूब चॅनेलवर सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओमध्ये विनोदी कार्यक्रम, टेलिफिल्म्स, मान्यवरांच्या मुलाखती आणि शैक्षणिक सामग्री यांचा समावेश आहे.

दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांमध्ये, आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनी ‘डीडी इंडिया’ने अलीकडेच यूट्यूबवर 1 लाख प्रेक्षकांचा  टप्पा ओलंडला आहे. विशेषतः तरुण आणि जागतिक प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या भारताबाबत माहिती देणाऱ्या विशिष्ट आशयघन कार्यक्रमांचा यात महत्वाचा वाटा आहे.
🟪पहिल्यांदाच सूर्यमालेबाहेरील ग्रहावरुन मिळाले रेडिओ सिग्नल, सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याचा मिळाला एक नवा मार्ग

क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड इथली ‘राष्ट्रीय वेधशाळा’ यांनी संयुक्तरित्या संशोधन करत पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे. यामुळे रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून सूर्यमालेबाहेर ,आपल्या आकाशगंगेत विविध ताऱ्यांच्या भोवती असलेले पृथ्वीसदृश्य ग्रह (exoplanets) शोधण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे.

विद्युत चुंबकीय विकिरणातील एक भाग म्हणजे रेडिओ सिग्नल. आकाशगंगेत कृष्णविवर, अवकाशातील धुलीकण ज्याच्यातून ताऱ्यांची निर्मिती होते असते अशा ठिकाणाहून रेडिओ सिग्नल येत असतात. त्याचबरोबर रेडिओ सिग्नलचा आणखी स्त्रोत म्हणजे गुरु आणि शनी सारखे जे मोठे ग्रह. अशा महाकाय ग्रहांभोवती असलेले चुंबकीय क्षेत्र आणि सौर वारे यांमुळे ध्रुवीय प्रकाश (Aurorae) तयार होत रेडिओ सिग्नलची निर्मिती होते.

तेव्हा ग्रहांपासून मिळणाऱ्या रेडिओ सिग्नलच्या प्रकाराबद्दल माहिती होती. असं असतांना काही लाल बटु तारे (ताऱ्यांचा एक प्रकार, आपल्या सुर्यापेक्षा लहान आकाराचे तारे) यांच्याकडून रेडिओ सिग्नल मिळत असल्याचं संशोकांच्या लक्षात आलं.

Low Frequency Array ( LOFAR ) या रेडिओ दुर्बिणीच्या माध्यमातून आणखी संशोधन आणि निरिक्षणे केल्यावर संशोधकांच्या लक्षात आलं की हे रेडिओ सिग्नल संबंधित तारे उत्सर्जित करत नसून या ताऱ्या भोवती फिरणारे ग्रह फेकत आहेत.
🟪विशेष प्रकरणांमध्ये 24 आठवड्यांमध्ये गर्भपात करण्यास भारतात परवानगी

केंद्रीय सरकारने विशेष प्रकरणांमध्ये गर्भपाताची कालमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता, काही विशेष प्रकरणांमधून झालेल्या गर्भधारणेच्या 24 आठवड्यांमध्ये गर्भपाताची परवानगी दिली जाईल.

लैंगिक अत्याचार, बलात्कार, अल्पवयीन गर्भधारी मुली, गर्भधारी विधवा किंवा घटस्फोटित महिला तसेच शारीरिक अपंगत्व असलेल्या महिला यांच्यासाठी ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. शिवाय मानसिकदृष्ट्या आजारी महिला, आपत्ती किंवा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये असलेल्या गर्भधारी महिला देखील यासाठी पात्र असतील.

नवीन नियमांनुसार, राज्य वैद्यकीय मंडळ गर्भपाताच्या संदर्भात निर्णय घेतील. गर्भपातासाठी महिलेने केलेल्या विनंतीचा आढावा राज्य वैद्यकीय मंडळ घेणार आहे आणि विनंती प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार. विनंती मंजूर झाल्यास, पाच दिवसांच्या आत गर्भपात करावा लागेल.

▪️‘वैद्यकीय गर्भपात (दुरुस्ती) कायदा-2021’

‘वैद्यकीय गर्भपात (दुरुस्ती) कायदा-2021’ याद्वारे ‘वैद्यकीय गर्भपात कायदा-1971” यामध्ये दुरुस्ती केली गेली आहे. महिलांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात सेवेचा विस्तार करण्यासाठी, उपचारात्मक, मानवी आणि सामाजिक आधारावर हा कायदा तयार करण्यात आला आहे.

🟪नवीन नियमानुसार,

गर्भावस्थेच्या 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी एका वैद्यकाचा आणि गर्भावस्थेच्या 20 ते 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी दोन वैद्यकांचा सल्ला घेणे आवश्यक राहील.
गर्भपात करणाऱ्या महिलेचे नाव आणि इतर माहिती, कायद्याने अधिकार दिलेल्या व्यक्ती खेरीज इतर कोणत्याही व्यक्तीला दिली जाणार नाही.
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.

👉 आजच आपली प्रत राखून ठेवा.

👇Online Booking Available👇


www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com