🟪नोबेल शांती पारितोषिक 2021.
मारिया रेसा (फिलिपिन्स) आणि दिमित्री मुराटोव्ह (रशिया) हे दोन पत्रकार '2021 नोबेल शांती पारितोषिक'चे विजेते ठरले आहेत.
▪️इतर क्षेत्रातील विजेते -
साहित्यातील ‘2021 नोबेल पारितोषिक’ विजेता - अब्दुलरजाक गुरनाह (टांझानियाचे कादंबरीकार).
रसायनशास्त्रातील ‘2021 नोबेल पारितोषिक’ विजेता - जर्मनीचे बेंजामिन लिस्ट आणि ब्रिटनचे डेव्हिड मॅकमिलन.
भौतिकशास्त्रातील ‘2021 नोबेल पारितोषिक’चे विजेते - सौकुरो मानेबे (जपान), क्लाऊस हॅसलमन (जर्मनी) आणि जॉर्जियो पॅरीसी (इटली).
'वैद्यकशास्त्र किंवा शरीरशास्त्र’ क्षेत्रातील ‘2021 नोबेल पारितोषिक' विजेते - डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पॅतापौटियन (अमेरिका).
▪️नोबेल पारितोषिकाविषयी
नोबेल पारितोषिक हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडिश आणि नॉर्वेजियन संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा सन्मान स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेच्या सन्मानार्थ सन 1895 पासून दिला जात आहे. पारितोषिकाचे वितरण विविध संस्थांकडून केले जाते. याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस.शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल
असेंब्लीसाहित्य: स्वीडिश अकादमी
शांती: हे पारितोषिक स्वीडिश संस्थेच्यावतीने नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.

🟪सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावरुन, सिंधुदुर्ग-मुंबई दरम्यानच्या पहिल्या विमानाचे उड्डाण आणि चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते आभासी पद्धतीने सिंधुदुर्ग विमानतळावरुन, अलायन्स एअर विमानाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग विमानतळावरुन विमानाला रवाना केले.
ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणजे, टाकावू समजल्या गेलेल्या गोष्टी, साहित्यापासून तयार करण्यात आलेले नवीन, पर्यावरणपूरक विमानतळ होय.
▪️सिंधुदुर्ग विमानतळाविषयी.
सिंधुदुर्ग विमानतळ हे एक ग्रीनफिल्ड विमानतळ आहे.
सिंधुदुर्ग हे केंद्रीय सरकारने मंजूर केलेल्या देशातल्या 21 ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी एक विमानतळ आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी-परुळे इथे एकूण 271 हेक्टर्स भूमीवर हे विमानतळ बांधण्यात आले आहे.
केंद्रीय सरकारच्या 'उडान' योजनेच्या अंतर्गत सिंधुदुर्ग विमानतळाला प्रादेशिक दळणवळण योजनेनुसार अधिसूचित केले आहे.

🟪"त्रिशूल" आणि “गरुड”: तीन मालवाहू रेलगाड्यांना जोडून तयार करण्यात आलेल्या रेलगाड्या.
प्रथमच, भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे (SCR) विभागाने दोन लांब पल्ल्याच्या मालवाहू रेलगाड्या चालवल्या, ज्यांना प्रत्येकी तीन मालवाहू रेलगाड्यांना जोडून तयार करण्यात आले.
या नवीन मालवाहू रेलगाड्यांना "त्रिशूल" आणि “गरुड” असे नाव देण्यात आले आहेत. या गाड्यांना 177 डब्बे जोडले गेले आहेत.
"त्रिशूल" गाडीने 7 ऑक्टोबर 2021 रोजी कोंडापल्ली स्थानकापासून ते पूर्व किनारी रेल्वेच्या खुर्दा विभागापर्यंत पहिला प्रवास केला.
"गरुड" गाडीने 8 ऑक्टोबर 2021 रोजी गुंटकल विभागातील रायचूर ते सिकंदराबाद विभागातील मनुगुरु पर्यंत पहिला प्रवास केला.याप्रकारे मालाची वाहतूक विक्रमी पद्धतीने होणार असून त्यामागील खर्च देखील कमी येणार आहे. तसेच लागणारे मनुष्यबळ देखील कमी लागणार.
▪️भारतीय रेल्वे विषयी.
भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे केंद्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो.
भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

🟪72 वा प्रादेशिक सैन्य दिवस: 9 ऑक्टोबर 2021
भारतीय लष्कराने 9 ऑक्टोबर 2021 रोजी 72 वा प्रादेशिक सैन्य दिवस साजरा केला.
प्रादेशिक सैन्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल प्रीत मोहिंदेरा सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. या निमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
▪️पार्श्वभूमी
18 ऑगस्ट 1948 रोजी प्रादेशिक सैन्य कायदा लागू करण्यात आला आणि प्रादेशिक सैन्य सध्याच्या स्वरूपात अस्तित्वात आले. सुरुवातीला, प्रादेशिक सैन्यात पायदळ, आर्मर्ड कॉर्प्स, हवाई संरक्षण तोफखाना, सिग्नल, पुरवठा आणि इतर विभागीय युनिट्सचा समावेश होता.
9 ऑक्टोबर 1949 रोजी पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी प्रादेशिक सैन्याची औपचारिकरित्या स्थापना केली, जो तेव्हापासून प्रादेशिक सैन्य दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
प्रादेशिक लष्करामध्ये भूमिपुत्र या संकल्पनेवर आधारित ‘होम’ आणि ‘हर्थ’ बटालियन / तुकड्या व्यतिरिक्त भारतीय लष्कराच्या विविध रेजिमेंटशी संबंधित अनेक एकक आहेत.
जम्मू व काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या देखरेखीसाठी इंजिनिअर TA बटालियन तैनात आहे. प्रादेशिक सैन्याकडे 10 इकोलॉजिकल TA बटालियन देखील असून, त्यांच्याकडे देशाच्या परिसंस्थेच्या संवर्धनाची जबाबदारी असून त्यादृष्टीने ते खडकाळ भागात आणि खराब हवामान असलेल्या भूभागात वृक्षारोपण करतात, पाणथळ जमिनींचे पुनरुज्जीवन करतात, जलाशये पुनर्संचयित करतात आणि चेक डॅम बांधून जलसंधारण उपाययोजना करतात. या व्यतिरिक्त, काही TA बटालियन भारतीय रेल्वे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात महत्वाच्या जबाबदाऱ्याही कौशल्याने पार पाडतात.

🟪आयपीएल गाजवलेल्या ‘त्या’ तिघांसाठी टीम इंडियाची दारं होणार खुली.
आयपीएल २०२१च्या अंतिम फेरीनंतर दोन दिवसांनी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेत विराट कोहली शेवटचे भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेली नाही.
अशा परिस्थितीत, विराटसह, बीसीसीआयची देखील इच्छा आहे, की त्याने कर्णधार म्हणून आपली आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्द विश्वचषक ट्रॉफीसह संपवावी. यासाठी बीसीसीआय आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या काही स्टार खेळाडूंना टीम इंडियासोबत जोडू शकते. या खेळाडूंमुळे संघाच्या प्रशिक्षण आणि कंडीशनिंग सत्रांमध्ये संघाला मदत होऊ शकते.
क्रिकबझच्या अहवालानुसार, निवड समितीने आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल, केकेआरचा फलंदाज व्यंकटेश अय्यर आणि गोलंदाज शिवम मावी, या सर्व खेळाडूंची निवड केली आहे. त्यांच्यामुळे टीम इंडियाच्या प्रशिक्षणामध्ये आवश्यक मदत देईल. यापैकी किमान दोन खेळाडूंना दुबईमध्ये राहण्यास सांगितले जाऊ शकते, जिथे सध्या भारतीय खेळाडू क्वारंटाइन आहेत.

🟪भारताला मिळणार आणखी एक विमान सेवा; राकेश झुनझुनवालांच्या ‘आकासा एअरलाईन्स’ला सरकारची NOC
शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरलाइन्सला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ‘आकासा’ एअर या ब्रँड नावाने काम करेल.
जर सर्व प्रक्रिया योग्यवेळी पार पडल्या तर पुढच्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये आकासा एअरलाईन्सची स्वस्त दरातील विमान सेवा सुरु करण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे. अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.
आता एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या आकासा एअर या ब्रँड नावाने उड्डाण करणार आहे.. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे असतील, ज्यांनी यापूर्वी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.
इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष, राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे हे आकासाचे सह-संस्थापक असतील.