MPSC SIMPLIFIED(official)
33.4K subscribers
34.7K photos
52 videos
3.66K files
9.42K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.

👉 आजच आपली प्रत राखून ठेवा.

👇Online Booking Available👇


www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
🟪झायकोव्ह-डी’ लशीसाठी १९०० रुपये किंमत प्रस्तावित

‘झायकोव्ह-डी’ या करोना प्रतिबंधक लशीच्या किमतीबाबत केंद्र सरकार व झायडस कॅडिला कंपनी यांची चर्चा सुरू असतानाच, तीन मात्रांच्या या लशीसाठी १९०० रुपये अशी किंमत या कंपनीने सुचवली असल्याचे कळते.

तथापि, ही किंमत कमी करण्याबाबत सरकार वाटाघाटी करत असून, याबाबत अंतिम निर्णय या आठवडय़ात घेतला जाण्याची शक्यता असल्याचे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

झायडस कॅडिलाच्या पहिल्या डीएनएवर आधारित सुईविरहित करोना प्रतिबंधक लशीचा लवकरच देशव्यापी लसीकरण मोहिमेत समावेश केला जाईल, असे सरकारने गुरुवारी सांगितले होते.

‘तीन मात्रांच्या या लशीसाठी कंपनीने सर्व करांसह १९०० रुपयांची किंमत प्रस्तावित केली आहे. लशीच्या किमतीबाबत सर्व पैलूंचा फेरविचार करण्यास कंपनीला सांगण्यात आले असून, त्याबाबत अंतिम निर्णय या आठवडय़ात होईल’, असे एका सूत्राने सांगितले.