MPSC SIMPLIFIED(official)
33.4K subscribers
34.7K photos
52 videos
3.66K files
9.42K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
🟪'सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : पहिल्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक

‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बरोबरी
पत्करल्यानंतर आता गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या लढतीत पहिला विजय मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय संघाचे खेळाडू मैदानात उतरतील.

कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या गोलमुळे भारताने सोमवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या लढतीत १-० अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर त्यांच्या एका खेळाडूला लाल कार्डही दाखवण्यात आले. तरीही बांगलादेशने भारताला १-१ असे बरोबरीत रोखले. त्यामुळे भारताच्या बचावफळीसह प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांनाही टीकेला सामोरे जावे लागले.

आतापर्यंत सात वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी उत्तम आहे. त्यातच सलग दोन सामन्यांत पराभूत झाल्याने श्रीलंकेवर अधिक दडपण असेल. मालदीव नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर होणाऱ्या उभय संघांतील या लढतीत छेत्रीव्यतिरिक्त गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू, मनविर सिंग, चिंग्लेनसना आणि अनिरुद्ध थापा यांच्यावर प्रामुख्याने भारताची भिस्त आहे.

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या ७७ गोलच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी सुनील छेत्रीला अवघ्या एका गोलची आवश्यकता आहे.
🟪झायकोव्ह-डी’ लशीसाठी १९०० रुपये किंमत प्रस्तावित

‘झायकोव्ह-डी’ या करोना प्रतिबंधक लशीच्या किमतीबाबत केंद्र सरकार व झायडस कॅडिला कंपनी यांची चर्चा सुरू असतानाच, तीन मात्रांच्या या लशीसाठी १९०० रुपये अशी किंमत या कंपनीने सुचवली असल्याचे कळते.

तथापि, ही किंमत कमी करण्याबाबत सरकार वाटाघाटी करत असून, याबाबत अंतिम निर्णय या आठवडय़ात घेतला जाण्याची शक्यता असल्याचे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

झायडस कॅडिलाच्या पहिल्या डीएनएवर आधारित सुईविरहित करोना प्रतिबंधक लशीचा लवकरच देशव्यापी लसीकरण मोहिमेत समावेश केला जाईल, असे सरकारने गुरुवारी सांगितले होते.

‘तीन मात्रांच्या या लशीसाठी कंपनीने सर्व करांसह १९०० रुपयांची किंमत प्रस्तावित केली आहे. लशीच्या किमतीबाबत सर्व पैलूंचा फेरविचार करण्यास कंपनीला सांगण्यात आले असून, त्याबाबत अंतिम निर्णय या आठवडय़ात होईल’, असे एका सूत्राने सांगितले.
🟪भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत.

वर्ष २०२१ मधील तिसरी तिमाही व चौथ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न हे करोनापूर्व पातळीच्या वर गेले असून भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत झाले आहेत, असे मत निती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी रविवारी व्यक्त केले.

त्यांनी सांगितले, की अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होण्याकडे वाटचाल करीत असली तरी कोविड १९ साथ संपुष्टात आणण्यासाठी देशात वेगाने व निर्णायक प्रयत्न झाले पाहिजेत. लसीकरणाच्या पातळीवर चांगल्या बातम्या येत आहेत.

तिसरी व चौथी तिमाही पाहिली तर वास्तव सकल राष्ट्रीय उत्पन्न हे कोविड १९ पूर्वीच्या पातळीपेक्षा वर गेले आहे. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेचे पायाभूत घटक मजबूत आहेत. दरम्यान एप्रिल-जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ झाली असून गेल्या वर्षांत ती फारच कमकुवत होती. उत्पादन व सेवा क्षेत्रात भारताने चांगली कामगिरी केली असून कोविड १९ ची दुसरी लाट जास्त घातक होती.

आता भारताची गाडी रूळावर येत असून यावर्षी जास्त विकास दर गाठण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत विकास दराचा अंदाज पूर्वीच्या १०.५ टक्क्य़ांवरून ९.५ टक्के केला असून जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ८.३ टक्क्य़ांनी वाढेल असा अंदाज दिला आहे.
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.

👉 आजच आपली प्रत राखून ठेवा.

👇Online Booking Available👇


www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
4_5991113463886250697.pdf
424.8 KB
4_5991113463886250697.pdf