MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
🟪९४ व्या साहित्य संमेलनाआधीच ९५ व्याची लगबग

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे संमेलन नाशिकमध्ये आयोजित करण्यावर गेल्या आठवडय़ात शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता ९५वे संमेलन घेण्यासाठी स्थळ ठरवण्यावर पदाधिकाऱ्यांमध्ये मंथन सुरू आहे.

पुढील वर्षांच्या मार्चअखेपर्यंत जमा-खर्चाचा ताळेबंद मांडण्यासाठी महामंडळाला सहा महिन्यांत दोन संमेलने घेणे सोयीस्कर व्हावे, या दृष्टीने ९५वे संमेलन घेण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, पुढील वर्षी शतक महोत्सवी वर्षांत पदार्पण करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाने ९५ वे संमेलन घेण्याविषयीचा प्रस्ताव मागे घेतल्याने महामंडळाची अडचण झाली आहे. विदर्भ साहित्य संघाचा २०२३ मध्ये संमेलन घेण्याचा विचार आहे.

औरंगाबादमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत नाशिकमधील संमेलनाचे नियोजन, त्यासंदर्भाने पत्रव्यवहार करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, ९५ वे संमेलनस्थळ निवडण्यासह मार्गदर्शन समिती नियुक्त करण्याचाही विषय बैठकीच्या विषयपत्रिकेत होता. नाशिकचे संमेलन नोव्हेंबरमध्ये घेण्याची चर्चाही महामंडळाच्या बैठकीत झाली.

नोव्हेंबरमध्ये ९४ वे संमेलन घेण्यात आले तर पुढीलवर्षी मार्चच्या आत ९५ वे संमेलन घेण्यासाठी महामंडळाची घाई सुरू आहे. त्या अनुषंगाने संमेलनस्थळ निवडण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा विषय बैठकीत होता. मात्र, औरंगाबादबाहेरून आलेल्या महामंडळाच्या घटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आधी नाशिकचे नियोजित संमेलन करोना साथीच्या काळात निर्विघ्न पार पडू द्या, मग ९५ व्या संमेलनाबाबत ठरवू, अशी भूमिका मांडली.
🟪प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1 कोटीहून अधिक घरांना मंजूरी

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ याच्या आतापर्यंतच्या प्रगतीची माहिती जाहीर केली आहे.

योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 12 लाखांहून अधिक घरे मंजूर झाली आहेत.
आतापर्यंत लाभार्थी 50 लक्ष घरांमध्ये स्थानांतरीत झाले आहेत.

🔳प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)

प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारद्वारे संचालित केली जाणारी योजना आहे. या योजनेचा शुभारंभ दिनांक 25 जून 2015 रोजी झाला. वर्ष 2022 पर्यंत “सर्वांना घर” हे उदात्त उद्दिष्ट असलेली योजना हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. योजनेंतर्गत ऋण आधारित व्याज अनुदान योजना (CLSS) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमजोर, कमी उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना कर्जाची व्‍यवस्‍था करून दिली जाते.
🟪जॉन्सन अँड जॉन्सन’च्या एक मात्रा लशीस परवानगी.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या करोना प्रतिबंधक एक मात्रेच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शनिवारी दिली.

‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या लशीला परवानगी देण्यात आल्याने करोनाविरोधातील भारताच्या लढ्याला बळ मिळेल, असे मंडाविया यांनी सांगितले. जॉन्सन अँड जॉन्सन ही अमेरिकी औषध उत्पादक कंपनी आहे.

‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या एक मात्रेच्या लशीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून आता आपत्कालीन वापरासाठी भारतात पाच लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे भारताच्या करोनाविरोधी लढाईला चालना मिळेल, असे आरोग्यमंत्री मंडाविया यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे. तर लस वापरास परवानगी मिळाल्याने करोनाची साथ संपवण्याच्या दिशेने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने म्हटले आहे.

भारत सरकारने ७ ऑगस्ट २०२१ रोजी आमच्या एक मात्रेच्या लशीस आपत्कालीन वापराचा परवाना दिला आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जाऊ शकते. ही लस डेल्टासह, करोनाच्या सर्व उत्परिवर्तित प्रकारांपासून संरक्षण देते. तिची परिणामकारकता ८५ टक्के आहे.
🟪प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान.

7 ऑगस्ट 2021 रोजी केंद्रीय सरकारने जाहीर केले की 2 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान योजनेच्या अंतर्गत सुमारे 5 कोटी लाभार्थ्यांची नावनोंदणी झाली आणि 4 कोटी लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यात 2 कोटींहून अधिक महिला लाभार्थी आहेत.

🟪प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान...

देशात डिजिटल व्यवस्थेचा प्रचार करणे आणि त्यांच्या माध्यमाने कामे करण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाची रचना करण्यात आली आहे.

योजनेच्या अंतर्गत मार्च 2022 पर्यंत सहा कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या सुमारे 6 कोटी लोकांना डिजिटल साक्षर करण्यासाठी हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ,अल्पसंख्यांक, दारिद्र्य रेषेखालील, महिला, दिव्यांग आणि तरुण अश्या विविध गटांमधील उपेक्षित भागांचा विकास करण्यासाठी कार्य केले जात आहे.
ही योजना ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमाच्या अंतर्गत अंमलात आणली जात आहे.
🟪१३५ देशांत डेल्टाचा कहर; जागतिक रुग्णसंख्या २० कोटींवर

करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील १३५ देशांमध्ये झाला आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील करोना रुग्णांची संख्या २० कोटी पार करेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं ३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या साप्ताहिक करोना अपडेटमध्ये म्हटलंय.

जागतिक स्तरावर १३२ देशांमध्ये बीटा व्हेरिएंट आणि ८१ देशांमध्ये गामा व्हेरिएंटची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर, अल्फा व्हेरिएंट १८२ देशांमध्ये पसरला आहे. दरम्यान, २६ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान ४० लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असेही अपडेटमध्ये म्हटले आहे.

जागतिक पातळीवर नोंदवल्या गेलेल्या प्रकरणांची एकत्रित संख्या आता जवळपास १९.७ कोटी झाली असून एकूण मृतांची संख्या ४२ लाख झाली आहे. रुग्णांची संख्या याच गतीने वाढत राहिली तर पुढच्या आठवड्यात रुग्णसंख्या २० कोटींचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता वर्तवली आहे.गेल्या आठवड्यात सर्वात जास्त ५ लाख ४३ हजार ४२० रुग्ण अमेरिकेत आढळले असून त्यापाठोपाठ २ लाख ८३ हजार ९२३ रुग्ण भारतात आढळले आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया, नंतर ब्राझील आणि इराण आहेत. तर, गेल्या आठवड्यात सर्वाधिक मृत्यू १२ हजार ४४४ इंडोनेशियात झाले असून त्यापाठोपाठ भारतात ३ हजार ८०० मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे.
🟪वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा “आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच”

👍संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने (UNGA) वंशभेद, असहिष्णुता, परदेशांबददल वाटणारा तिरस्कार आणि वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्ञांचा सल्ला मिळवण्यासाठी एक मंच स्थापन करण्यासाठी एका ठरावाला 2 ऑगस्ट 2021 रोजी मान्यता दिली.

👍त्या मंचाचे “आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच” (Permanent Forum of People of African Descent) हे नाव असेल. ती 10 सदस्य असलेली एक सल्लागार संस्था असेल, जी जिनेव्हा मानवी हक्क परिषदेसोबत कार्य करेल. एकूण सदस्यांपैकी 5 जणांना सदस्य देशांच्या सरकारांनी नामांकन दिलेल्या व्यक्तींमधून निवडले जाणार तर इतर पाच जणांची नियुक्ती संयुक्त राष्ट्रसंघ मानवी हक्क परिषद करणार.

🔴संयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी...

👍आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.

👍1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.

👍संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.

👍संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.

👍संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.
संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -

👍संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (General Assembly)
👍संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (Security Council)
👍संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council / ­ECOSOC)
👍संयुक्त राष्ट्रसंघ सचिवालय
आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice)
👍संयुक्त राष्ट्रसंघ विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).

🔴संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -

👍जागतिक बँक समूह
जागतिक आरोग्य संघटना (WHO)
जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program)
संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization / UNESCO)
संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund / UNICEF)