MPSC SIMPLIFIED(official)
34.4K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा
━━━━━━━༺༻━━━━━━━
आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे.
━━━━━━━༺༻━━━━━━━

» कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी
» केंद्रीय अर्थसंकल्प २०२१
» केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१
» महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल
» १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल
» भारतातील कोविड -१९ लसीकरण

━━━━━━━༺༻━━━━━━━
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले
📱 9423333181 | 8788639688
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇

www.simplifiedcart.com
Forwarded from MPSC Mantra (Simplified Publication abhijit Thorbole)
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा
━━━━━━━༺༻━━━━━━━
12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध
━━━━━━━༺༻━━━━━━━
» कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी
» केंद्रीय अर्थसंकल्प २०२१
» केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१
» महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल
» १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल
» भारतातील कोविड -१९ लसीकरण

━━━━━━━༺༻━━━━━━━
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले
📱 9423333181 | 8788639688
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇

www.simplifiedcart.com
_____________________________
What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी
What's App no 09923906500 / 08087722277
🟧CSIR-NIO संस्थेचा ‘हिंद महासागरातील जीनसंच मानचित्रण’ प्रकल्प

गोवा येथील CSIR-राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था (CSIR-NIO) ‘हिंद महासागरातील जीनसंच मानचित्रण’ (Genome Mapping in the Indian Ocean) नामक एक नव्या प्रकाराचा प्रकल्प राबविणार आहे.

प्रकल्पाच्या अंतर्गत हिंद महासागरातील सूक्ष्मजीवांच्या जीनसंच मानचित्रणासाठी नमुने गोळा करणे आणि त्याविषयीची जैविक रसायनात्मक माहिती समजणे आणि हवामान बदल, पोषक घटकांचा अभाव आणि वाढते प्रदूषण अश्या परिस्थितीला त्यांचा प्रतिसाद कसा आहे याविषयीची माहिती गोळा केली जाणार आहे.

▪️महासागराविषयी

पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर पाणी, बर्फ व जमीन यांचे आवरण आहे. त्यापैकी सु. 71 टक्के भाग खाऱ्या पाण्याच्या प्रचंड जलाशयाने व्यापलेला असून त्याला ‘जागतिक महासागर’ वा ‘महासागर’ म्हणतात. महासागर हे पृथ्वीचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य असून सोयीसाठी याचे भौगोलिक दृष्ट्या विभाग पाडले जातात.

याच्या प्रमुख खंडांशी तुल्य अशा विभागांनाही ‘महासागर’ म्हणतात. अटलांटिक, प्रशांत (पॅसिफिक), हिंद, आर्क्टिक व अंटार्क्टिक हे परंपरागत प्रमुख महासागर मानले जातात. यांपैकी आर्क्टिक व अंटार्क्टिक काहींच्या मते स्वतंत्र महासागर नसून आर्क्टिक हा अटलांटिकचाच भाग आहे तर अंटार्क्टिका खंडाभोवतीचा अंटार्क्टिक महासागर हा प्रशांत, अटलांटिक व हिंद महासागरांच्या विस्तारलेल्या शाखांचा बनलेला आहे. तथापि 1953 साली स्वीकारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संकेतानुसार आर्क्टिक हा चौथा महासागर मानला जातो. महासागरांलगतचे समुद्र आता त्यांचेच भाग मानले जातात.
🟧आझादी का अमृत महोत्सव’चे उद्दिष्ट नवीन भारताची निर्मिती करणे आहे -मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत.

15 मार्च पर्यंत आझाद मैदानावर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे विविध पैलू पहा.
 
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा प्रारंभ केला आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने आझाद मैदान, पणजी येथे लोक संपर्क विभागाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

आपल्या देशाच्या महान इतिहासाचे स्मरण करून नवभारताची निर्मिती करणे हे "आझादी का अमृतमहोत्सव"चे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की इतिहासाचे स्मरण  केल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही.
🟧पाकिस्तानला देणार ४.५ कोटी Made In India व्हॅक्सिन.

भारत पाकिस्तानला ४.५ कोटी लसींचा पुरवठा करणार आहे. United GAVI alliance अंतर्गत भारताकडून हा लसींचा पुरवठा होणार असल्याचं राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियमन आणि समन्वय फेडरल सेक्रेटरी आमीर अशरफ ख्वाजा यांनी सार्वजनिक लेखा समितीला सांगितलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

GAVI अंतर्गत लसींच्या पुरवठ्यासाठी हातमिळवणी करण्यात आली आहे. यामुळे जगातील अर्ध्याहून अधिक मुलांचं प्राणघातक आणि संसर्गजन्य रोगांविरोधात लसीकरण केलं जातं. करोना संकटाच्या काळातही पाकिस्तानला ही मदत केली जात होती. सप्टेंबर २०२० मध्ये पाकिस्तानला करोना लस पुरवण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

ख्वाजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, GAVI करारांतर्गत ४.५ कोटी लसीचे डोस मिळणार असून यामधील १.६ कोटी डोस हे जून महिन्यापर्यंत उपलब्ध होतील. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, समितीला माहिती देत असताना सिनेटर मुशहिद हुसैन सय्यद यांना लसीचे डोस कुठून येत आहेत यासंबंधी विचारणा करण्यात आली. यावेळी आरोग्य सचिवांनी पाकिस्तानला सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणारे लसीचे डोस मिळणार असल्याची माहिती दिली.

“GAVI करारांतर्गत भारतात निर्मिती करण्यात आलेली लस पाकिस्तानी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. विकसनशील आणि गरीब देशांना लस पुरवणं हा या कराराचा मुख्य हेतू आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
🟧रेल्वे पार्सल व्यवस्थापन प्रणालीत आमूलाग्र परिवर्तन

भारतीय रेल्वेची पार्सल सेवा विविध स्थानकांवरून छोट्या कन्साईनमेंटसाठी वाहतूक सुविधा पुरवत आहे.

छोटे व्यवसाय आणि व्यापारी (विशेषत: लहान शहरे आणि गावांमधील) मोठी   शहरे आणि उत्पादन केंद्रांमधून आपला माल व्यवसायाच्या ठिकाणी वेगवान, विश्वासार्ह आणि स्वस्त मार्गाने पोहचवण्यासाठी  या सेवांचा मोठ्या प्रमाणात वापर  करतात.

सामान्य माणूस देखील या सेवांचा वापर घरगुती सामान, फर्निचर, दुचाकी इत्यादींच्या वाहतुकीसाठी करतात - ज्यासाठी पार्सल सेवा ही सोयीस्कर वाहतुकीची सुविधा आहे.
पार्सलचे शुल्क केवळ वजन आणि आकाराच्या आधारे आकारले जाते, वस्तूंच्या प्रकारानुसार नाही.
🟧 आताची सर्वात मोठी बातमी! इंजिनिअर होण्यासाठी आता १२वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सची गरज नाही; AICTE चा निर्णय.

इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने(AICTE) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवं धोरण जाहीर केलं आहे. याअंतर्गत आता बारावीच्या विद्यार्थ्याने गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन विषय घेतले नसतील तरीही त्याला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेता येणार आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नव्या धोरणानुसार आता इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं गरजेचं नाही, हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत. त्यामुळे या विषयांचा अभ्यास कठीण जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा आता दूर झाला असून अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

AICTE संस्थेने आता १४ विषयांची यादी जाहीर केली असून इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशासाठी यादीतील १४ पैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा समावेश असेल. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी AICTE ने एक हँडबुक जारी केलं असून त्यातही याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.
🟧सी.आर.सी. नागपूरद्वारे दिव्यांग व्यक्तींसाठीचा ‘युवा टॅलेंट फेस्टिव्हल’ उत्साहात साजरा

दिव्यांग व्यक्तींच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अधीन असलेल्या स्थानिक यशवंत स्टेडीअम येथील  समेकित क्षेत्रिय कौशल्य विकास, पुनर्वसन तथा दिव्यांग सक्षमिकरण, केंद्र अर्थात सी.आर.सी.-नागपूरच्या मानसशास्त्र विभागाद्वारे दिव्यांग युवकांसाठी ‘युवा टॅलेंट फेस्टिव्हलचे’ आयोजन  व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून सी.आर.सी. केंद्राचे संचालक  प्रफुल्ल शिंदे ऑन-लाईन पद्धतीने उपस्थित होते.

सी.आर.सी. नागपुर केन्द्राद्वारा आयोजित ‘युवा टॅलेंट फेस्टिव्हल’ मध्ये नृत्य स्पर्धेसाठी शायरी मेघे, कुणाल बाडकर, पार्थ खांडकबन, पोल राजू यांना, गायन कोमल मेश्राम, प्रवीण मिश्रा, कुणाल बाडकर, अबोली जरित यांना, आणि ड्रॉइंग स्पर्धेसाठी दीपेश पार्सेकर, सुधीर मुरगडे, हर्षिनी, अश्वती के.एम्. यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच सर्व सहभागी दिव्यांग युवकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.
🟧बदललेल्या चिनीनीतीनंतर नवीन व्यूहविचार - नौदलप्रमुख

भारतीय नौदल चीनवर लक्ष ठेवून आहे. चीन इतरांप्रमाणे विचार करत नाही, त्यांची रणनीती वेगळी आहे. ते ध्यानात ठेवून आता भारतीय नौदलातर्फे नवीन व्यूहविचार आकारास येत असल्याचे प्रतिपादन नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी बुधवारी केले.

प्रोजेक्ट ७५ अंतर्गत कलवरी वर्गातील तिसरी स्टेल्थ स्कॉर्पिन पाणबुडी ‘आयएनएस करंज’ समारंभपूर्वक नौदलात दाखल झाली. या सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नौदलप्रमुख बोलत होर्ते. हिंदी महासागरातीलच नव्हे तर देशाच्या तिन्ही बाजूंना असलेल्या सागरी सीमा अभेद्या राहण्याची खातरजमा करण्यासाठी अलीकडे देशाच्या संपूर्ण किनारपट्टीवर व बेटसदृश्य असलेल्या केंद्रशासित प्रदेशांच्या सागरीसीमांवरही एकाच वेळेस ‘सी व्हिजिल’ युद्धाभ्यास पार पडला.

त्यामध्ये लक्षात आलेल्या काही बाबींनंतर सागरीसुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे, असे सांगून अ‍ॅडमिरल करमबीर सिंग म्हणाले की, ‘आयएनएस करंज’ ही आत्मनिर्भर भारत योजनेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे.

कारण यापूर्वी कलवरी वर्गातील दोन्ही स्टेल्थ पाणबुड्यांच्या निर्मिती- तपासणी आणि त्यावरील नौदलाच्या ताफ्याचे प्रशिक्षण यात फ्रेंच सहभाग होता. मात्र ‘आयएनएस करंज’ ही पूर्णपणे भारतीय नजरेखाली तयार झालेली पहिलीच पाणबुडी आहे. येणाºया काळात पाणबुडीचा ऊर्जास्रोत असलेल्या प्रोपल्शन यंत्रणेमध्येही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.
🟧नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.

साहित्य अकादमी पुरस्कार – २०२० आज (शुक्रवार) जाहीर झाले असून नागपूरचे नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठी सन २०२०चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसेच, ‘आबाची गोष्ट’ या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ.निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

साहित्य अकादमीने आज (शुक्रवार) २० भाषांसाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटकं, एक-एक संस्मरण आणि महाकाव्यांचा समावेश आहे.
❗️खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!!
🟧१ ली ते ११ वी सगळेच पास; विद्यार्थ्यांना सुखद धक्का.

करोना काळात देशभरात अनेक भागांमध्ये शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन घेण्यात आली. काही भागात विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील ऑनलाईन झाल्या. तर काही ठिकाणी प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. पुद्दुचेरीमध्ये मात्र वेगळंच चित्र दिसत आहे.

इयत्ता १ली ते इयत्ता ११वी अशा सर्वच विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी उत्तीर्ण करण्याच्या प्रस्तावाला पुद्दुचेरीच्या राज्यपालांनी मान्यता दिली आहे. पुद्दुचेरीच्या राज्यपाल तमिलसई सुंदरराजन यांनी पुद्दुचेरी प्रशासनाकडून १ ली ते ९ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. त्यावर आता राज्यपालांच्या मान्यतेची मोहोर उठल्यामुळे पुद्दुचेरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सुखद धक्काच ठरला आहे.