MPSC SIMPLIFIED(official)
34.4K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
👆दि 23 फेब्रुवारी T21 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे वरीलप्रमाणे👆
@drajit
@nageshpatil
www.simplifiedcart.com
www.mpscsimplified.com
www.simplifiedpublication.com

👍Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP
@Simplified_Publication
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🏆सर्वाधिक विद्यार्थी प्रिय🏆 असलेला एकमेव COMBINE सराव प्रश्नसंच

◼️सिम्प्लिफाईड
❇️COMBINE सराव प्रश्नसंच
"गट 'ब' व गट 'क' परीक्षा"

MPSC / PSI/STI/ASO/, Exci SI/CL-Ty/TaxAsst / सरळसेवा / सह आगामी होणाऱ्या मेगाभरती साठी उपयुक्त
___________________________
🎯Science चे घटकनिहाय Simplified Mind Map/FlowChart चा समावेश
🎯आयोगाप्रमाणे Comprehensive प्रश्नपत्रिकांसह विषयनिहाय प्रश्नपत्रिका
✅ बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण
🎯1500+ सर्व प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण
🎯संपूर्ण 100 गुणांची परिपूर्ण तयारी
🎯भौतिकशास्त्राच्या प्रत्येक गणिताचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण.


◼️मार्गदर्शक
डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी
◼️लेखक
नागेश नवनाथ पाटील
BA.Ded. M.A.(Pol.Sci)


✅ या पुस्तकाच्या प्रथमावृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या सर्व परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹आजपासून पुन्हा एकदा नव्याने महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले
📱 9423333181 | 8788639688
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

✅ ONLINE BOOKING AVAILABLE👇आवश्य भेट द्या👇
━━━━━━━༺༻━━━━━━━
www.simplifiedcart.com

https://www.myownshop.in/simplifiedbooks
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE 
          सराव प्रश्नसंच👆
🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले.

◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश.

◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश.

◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत
आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश.

◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश

◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019
मध्ये 14 प्रश्नांचा समावेश

◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019
मध्ये 153 प्रश्नांचा समावेश

◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश

◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश.

◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश.

◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश.

✅ BUY ONLINE ✅

👇Directly Publication Store👇

www.simplifiedcart.com

📚📚महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आहे
🟧​​पहिल्या ४० तेजसमध्ये इस्रायली बनावटीचे रडार आहेत
▪️वेल डन DRDO! ‘तेजस’ फायटर जेटमध्ये देशी ‘उत्तम’ रडार


स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला बळकटी देणारी एक चांगली बातमी आहे. पुढच्या काही काळात इंडियन एअर फोर्समध्ये १२३ 'तेजस' फायटर विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यातील ५१टक्के 'तेजस'मध्ये स्वदेशी बनावटीची 'उत्तम' रडार यंत्रणा असेल. आधी निर्मिती करण्यात आलेल्या काही '_तेजस'मधील इस्रायली रडारच्या जागी, ही उत्तम रडार यंत्रणा बसवण्यात येईल.

इंडियन एअर फोर्सला १२३ 'तेजस' फायटर जेट मिळणार आहे. त्यात ४० विमाने फायनल ऑपरेशनल क्लियरन्समध्ये आहेत. ८३ तेजस मार्क-१ए साठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात ऑर्डर देण्यात आली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानांचे उत्पादन करत आहे. पहिल्या ४० तेजसमध्ये इस्रायली बनावटीचे रडार आहेत तर, ८३ तेजस मार्क-१ए AESA रडार यंत्रणा असेल.
"तेजस मार्क-१ए मध्ये उत्तम रडार यंत्रणा असेल. आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये उत्तमने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. HAL बरोबर आम्ही सामंजस्य करार केला आहे" असे डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी सांगतिले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. ८३ पैकी ६३ तेजस विमानात उत्तम रडार यंत्रणा असेल.

डीआरडीओच्या बंगळुरुमधील LRDE प्रयोगशाळेने हे रडा*र विकसित केलेय. मोदी सरकार संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीवर भर देत आहे. उत्तम रडारमुळे तेजसमध्ये स्वदेशी घटकांचे प्रमाण वाढणार आहे. तेजसच्या निर्मितीमध्ये ६२ ते ६५ टक्के स्वदेशी घटक वापरण्याचा HAL चा प्रयत्न आहे. उत्तम रडारमुळे HAL ला त्यांच्या उद्दिष्टात मदत होणार आहे. उत्तम रडारमध्ये एकाचवेळी वेगवेगळया लक्ष्यांना शोधण्याची तसेच उच्चप्रतीचे फोटो काढण्याची क्षमता आहे.
🟧पूर्व लडाखमधून भारत आणि चीन यांनी आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केल्यानंतर चीनने भारताला पाठिंबा दर्शविला आहे.

🟧‘ब्रिक्स’ यजमानपदासाठी भारताला चीनचा पाठिंबा


ब्रिक्स शिखर परिषदेचे या वर्षीचे यजमानपद भारताने स्वीकारण्यास चीनने पाठिंबा दर्शविला असून पाच सदस्य असलेल्या देशांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारतासमवेत काम करण्याची तयारीही दर्शविली आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीन यांनी आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केल्यानंतर चीनने भारताला पाठिंबा दर्शविला आहे.

भारताने २०२१ च्या ब्रिक्स शिखर परिषदेचे (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) अध्यक्षपद स्वीकारण्याचे गृहीत धरले असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सुषमा स्वराज भवनातील ब्रिक्स सचिवालयात भारताचे ब्रिक्स २०२१ संकेतस्थळ सुरू केले.

ब्रिक्स हा आता आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये सकारात्मक, स्थिर आणि रचनात्मक शक्ती आहे, असे ते म्हणाले. मात्र, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग शिखर परिषदेला उपस्थिती राहणार आहेत का, त्याबाबत वांग यांनी कोणतेही भाष्य केले नाही.
🟧राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा; केंद्र सरकारची सूचना

महाराष्ट्रासह काही राज्यांत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या असून अद्याप अनेक आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे.

राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवले पाहिजेत, किमान चार दिवस तरी लसीकरणाचे काम झाले पाहिजे तसेच त्यापुढील टप्प्यात पन्नाशीपुढील व्यक्तींचे लसीकरणही हाती घेण्याची गरज आहे. काही राज्यांनी आठवड्यातून दोन दिवस लसीकरण सुरू ठेवले असून काही राज्यांत चार दिवस लसीकरणाचे काम केले जात आहे. कोविन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे पत्रात म्हटले आहे.

१९ फेब्रुवारीच्या पत्रात म्हटले आहे की, आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना अजून लस मिळालेली नाही. त्यामुळे यात आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवण्याची गरज आहे. आतापर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या अनेक आढावा बैठका घेण्यात आल्या असून लसीकरण वाढवण्याची गरज त्यातून दिसून आली आहे. वयस्कर लोकांनाही तातडीने लस देणे सुरू करावे लागणार आहे. मार्च २०२१ पासून सहआजार असलेल्या पन्नाशीवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू करावे लागेल.

२१ फेब्रुवारीअखेर ११०८५१७३ लस मात्रा २३०८८८ सत्रात देण्यात आल्या असून त्यात ६३९१५४४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा दिली आहे तर ९६०६४२ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. आघाडीच्या कर्मचाऱ्यांत ३७३२९८७ जणांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
🟧केंद्र-राज्ये एकत्रित प्रयत्नांचे पंतप्रधानांचे आवाहन

जुनाट व कालबाह्य कायदे मोडीत काढून आम्ही उद्योगस्नेही वातावरण देशात तयार केले, त्यामुळे आता केंद्र व राज्ये यांनी एकत्र येऊन आर्थिक विकासाची गती वाढवली पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

निती आयोगाच्या संचालक मंडळ बैठकीत त्यांनी सांगितले, की खासगी क्षेत्राला यात पूर्ण संधी असून सरकारच्या आत्मनिर्भर योजनेत त्यांनी सहभागी व्हावे. केंद्र व राज्य सरकारे यांनी एकत्र काम केले तरच देशाची प्रगती होणार आहे. सरकारला आर्थिक प्रगतीचे श्रेय खासगी क्षेत्रालाही द्यावे लागणार आहे कारण त्यांचे प्रतिनिधित्वही यात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून देशाला विकासात प्रगतिपथावर नेण्याची गरज आहे.

शेती क्षेत्राबाबत त्यांनी सांगितले, की खाद्यतेल उत्पादनात भारत कमी पडत आहे. खाद्यतेलाची आयात कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना तेलबियांची लागवड करण्यासाठी उत्तेजन दिले पाहिजे. राज्यांनी तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर काही नियम कमी केले पाहिजेत, कारण काही नियम व कायदे आता कालबाह्य झाले आहेत.
🟧हॉट स्प्रिंग, गोग्रा, देपसांगमधून माघारीचाही भारताचा आग्रह

भारत व चीन यांच्यात शनिवारी लष्करी पातळीवरील दहाव्या फेरीची चर्चा सुरू झाली असून हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा, देपसांग, या पूर्व लडाख भागातील माघारीबाबत यात विचार करण्यात येणार आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी या चर्चेचा लाभ होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दहाव्या कोअर कमांडर पातळीवरील चर्चा ही भारत व चीन यांच्या लष्करादरम्यान पँगाँग सरोवराच्या उत्तर व दक्षिण बाजूकडील सैन्य माघारीनंतर घेण्यात आली. त्यात सैन्य माघारीबरोबरच शस्त्रसामग्री व तंबूही काढण्यात आले.

चर्चेची दहावी फेरी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हद्दीतील मोल्दो येथे सुरू झाली. हॉट स्प्रिंग, गोग्रा व देपसांग भागातून लवकर माघारीचा भारताचा आग्रह असून त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव निवळण्यास मदत होणार आहे.

चर्चेचा भर हा सैन्य माघारीवरच असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. ११ फेब्रुवारीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत जाहीर केले होते, की भारत-चीन यांच्यात पँगॉग सरोवराच्या उत्तर व दक्षिण भागातून सैन्य माघारीचा करार झाला असून दोन्ही देशांनी आघाडीच्या छावण्यातील सैन्य टप्प्याटप्प्याने माघारी घेण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर आठ भागापर्यंत चिनी सैन्य माघारी जाणे अपेक्षित आहे.
🟧नवं संकट - सात जणांना ‘बर्ड फ्लू’ची लागण; जगातील पहिलीच घटना.

आतापर्यंत कोंबड्या आणि पक्ष्यांपर्यंत मर्यादीत असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा (एच५एन८) माणसालाही धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांपासून बर्ड फ्लूचा माणसाला संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची ही जगातील पहिलीच घटना असून, या घटनेची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे. त्यामुळे करोना पाठोपाठ आणखी एक नवं संकट उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रशियासह युरोप, चीन, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये बर्ड फ्लू’चा (एच५एन८) उद्रेक झाला आहे. मात्र, केवळ पोल्ट्री कोंबड्यांना या विषाणूचा संसर्ग होत असल्याचं दिसून येत होतं. मात्र, आता माणसालाही याचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. रशियात पहिल्यादाच बर्ड फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. ग्राहक आरोग्य वॉचडॉक रोस्पोट्रेबनाडझोरचे प्रमुख अॅना पोपोवा यांनी रोशिया २४ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे.

“अनेक दिवसांपूर्वीच आम्ही आमच्या निष्कर्षांबद्दल निश्चित झालो होतो. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता नाहीत. मात्र, बर्ड फ्लूने संक्रमित जिवंत वा मृत कोंबडीच्या थेट संपर्कात आल्यानं संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थितपणे शिजवून खालेलं अन्न सुरक्षित आहे. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे,” असं पोपोवा म्हणाल्या.
🟧मंगळावर पाय ठेवण्याआधी

मंगळ ग्रह हा पृथ्वीचा सहोदर मानला जातो, म्हणजे जेव्हा सौरमालेची निर्मिती झाली तेव्हापासून या ग्रहाशी पृथ्वीचे जवळचे नाते आहे. पत्रिकेत जरी मंगळ त्रासदायक वाटत असला तरी तो लोभसवाणा आहे. या ग्रहावर पूर्वी सूक्ष्म जीव असावेत या शक्यतेतून तेथे सातत्याने शोध घेतला जात आहे.

संभाव्य अवकाश थांब्यावर पहिला सेल्फी - सध्या संयुक्त अरब अमिरात (होप), चीन (तियानवेन १) यांची मंगळयाने मंगळाच्या कक्षेत आहेत, तर अमेरिकेच्या नासा व युरोपीय अवकाश संस्थेची परसिव्हिरन्स ही बग्गीसारखी गाडी तेथे उतरण्यात यशस्वी झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी गाडी आहे. मंगळ हा इतर ग्रहांवरील मोहिमांसाठी थांबा (स्टॉप) ठरू शकतो अशीही एक कल्पना आहे. मंगळावर मानवी वसाहतींची कल्पनाचित्रेही तयार आहेत.

अमेरिकेसाठी रोव्हर गाडी मंगळावर उतरवणे हे फार अवघड काम नाही हे खरे असले तरी, ही सर्वात मोठी गाडी असून तिच्या मदतीने तेथील विवरातील खडक गोळा करून ते पृथ्वीवर आणले जाणार आहेत, हे या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय त्यावरील कॅमेरे प्रथमच रंगीत छायाचित्रे घेत असून रोव्हर गाडीने मंगळावरचा सेल्फीही काढून पाठवला आहे.
🟧कर्नाटकमध्ये द्वितीय ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ खेळवले जातील.

कर्नाटक राज्याच्या बेंगळुरु शहरात द्वितीय ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ खेळवले जाण्याची घोषणा क्रिडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.

▪️ठळक बाबी

कार्यक्रमाचे आयोजन ‘भारतीय विद्यापीठ संघ; यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहेत.25 वर्ष वयोगटाखालील 4,000 हून अधिक क्रिडापटू स्पर्धेत भाग घेणार आहेत, ज्यांची निवड राष्ट्रीय संघासाठी केली जाणार.खेळांच्या द्वितीय आवृत्तीत मल्लखांब आणि योगासन हे दोन नवीन क्रिडाप्रकार समाविष्ट करण्यात आले आहेत.

▪️‘खेलो इंडिया’ विषयी

एप्रिलपर्यत 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘खेलो इंडिया’ या नवीन योजनेचा प्रारंभ केला. सुरुवातीच्या काळात या योजनेत मैदानी खेळ, वॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, जूडो, हॉकी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, बास्केट बॉल आणि कुस्ती या खेळांचा समावेश करण्यात आला होता आणि पुढे त्याची व्याप्ती इतर खेळांसाठी वाढविण्यात आली आहे.

भारतीय क्रिडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत गुणवंत तरुण खेळाडूंची निवड करून त्यांना सलग 8 वर्षांसाठी प्रत्येकी 5 लक्ष रूपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.

ही स्पर्धा अगदी तळागळातील उत्कृष्ट खेळाडूंना समोर आणण्याच्या उद्देशाने आहे. यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्टता साध्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🟧 Simplified चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2021
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

👉1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडीवर आधारित

👉 बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्नांचा समावेश

👉 700+ परीक्षाभिमुख प्रश्नांचा समावेश

▪️महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

━━━━━━━༺༻━━━━━━━
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले
📱 9423333181 | 8788639688
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇

www.simplifiedcart.com

https://www.myownshop.in/simplifiedbooks
👇दि 24 फेब्रुवारी T21 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे खालीलप्रमाणे👇
@drajit
@nageshpatil
www.simplifiedcart.com
www.mpscsimplified.com
www.simplifiedpublication.com

👍Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP
@Simplified_Publication