MPSC SIMPLIFIED(official)
42.4K subscribers
25.8K photos
23 videos
2.41K files
7.11K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
to view and join the conversation
🟧आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखलं; ७००० किमीचं अंतर केलं पार.

फ्रान्सकडून विकत घेतलेली अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांची तिसरी बॅच गुरुवारी भारतात दाखल झाली. नॉनस्टॉप ७००० किमीचं अंतर या विमानांनी पार केलं. दरम्यान, हवेतचं या इंधन भरण्याची कमालही या विमानांनी केली. भारतीय हवाई दलानं बुधवारी ही माहिती दिली.

फ्रान्सच्या इस्ट्रेस एअर बेसवरुन निघालेली ही तीन विमानांची बॅच भारतातील एअर बेसवर दाखल झाली. या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी युएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टँकरसाठी भारताने ट्विटद्वारे आभार मानले.

भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात तीन बॅचमध्ये एकूण ९ विमानं दाखल झाली आहेत. येत्या मार्चमध्ये तीन आणखी राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमानं येतील. पाच विमानांची पहिली बॅच भारतात २८ जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती.
🟧एकाचवेळी १४३ उपग्रहांचे प्रक्षेपण; Elon Musk यांच्या कंपनीकडून नवा विक्रम

जागतिक स्तरावर आरामदायी वाहन निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या 'टेस्ला' या कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या Elon Musk यांच्या एका वेगळ्या कंपनीने एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम आधी भारताच्या नावावर होता.

Elon Musk यांच्या 'स्पेसएक्स' या कंपनीकडून अंतराळात एकाच वेळी १४३ उपग्रह यशस्वीरित्या सोडण्यात आले आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये भारताने एकाचवेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम केला होता. भारताच्या या विक्रमाला मागे टाकत स्पेसएक्स यांनी तब्बल १४३ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत. यामुळे स्पेस एक्सने नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.

सर्व १४३ उपग्रह 'फाल्कन ९'मधून प्रक्षेपित करण्यात आले. फ्लोरिडा येथील कॅप केनेवरल येथून भारतीय वेळेनुसार, रविवारी रात्री ०८ वाजून ३१ मिनिटांनी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात हे उपग्रह सोडण्यात येणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला. Elon Musk यांची कंपनी उपग्रह सोडण्यासाठी तब्बल १० लाख डॉलर घेते, अशी माहिती मिळाली आहे.

अंतराळात उपग्रह सोडण्याचे स्वप्न घेऊन Elon Musk वयाच्या ३० व्या वर्षी रशियात पोहोचले. मात्र, दोनवेळा प्रयत्न करूनही रशियाने उपग्रह देण्यास नकार दिला. यानंतर Elon Musk यांनी स्वतःच उपग्रह निर्मितीचा चंग बांधला आणि स्पेसएक्स या कंपनीची स्थापना केली. या प्रवासात Elon Musk यांनी अनेक आव्हाने, संकटे आणि अडचणींचा सामना केला. मात्र, अखेर Elon Musk यांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले, असे सांगितले जाते. आताच्या घडीला Elon Musk जागतिक स्तरावरील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये आघाडीवर आहेत.
🟧राम मंदिराच्या उभारणीस विलंब.

अयोध्येत राम मंदिराचा पाया खोदताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्या दूर करण्यासाठी देशभरातील ‘आयआयटी’ तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात येत आहे. या प्राथमिक विलंबामुळे राम मंदिर उभारणीचे काम २०२४ अखेरीपर्यंत किंवा २०२५मध्ये पूर्णत्वास जाण्याची चिन्हे असून ते वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या ५ ऑगस्टला झाले. मंदिराचा पाया बांधण्यासाठी मृदा चाचणी आणि खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले होते. सुमारे २०० फूट खोदकाम करून खांब बसविण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होते. मंदिरासाठी सुमारे १२०० खांब बसवण्यात येणार आहेत. मंदिराचे वजन आणि भूकंप किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे मंदिराचे कोणतेही नुकसान होऊ नये आणि ते एक हजार वर्षे टिकावे, असे नियोजन करून मजबूत पायाउभारणी करण्यात येत आहे.

पायाच्या खांबांना सुमारे ७०० टन वजन पेलावे लागेल, हे गृहीत धरून तेवढे वजन खांबावर ठेवले असता तो दोन सेंटिमीटरऐवजी चार सेंटिमीटर खोल गेला. शरयू तीरी मंदिर उभारणी होत असल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे तेथील मुरूम थोडा मऊ आहे.

त्यामुळे मुंबई, रुरकी, गुवाहाटी, मद्रास या आयआयटी, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट (रुरकी), नॅशनल जिओग्राफिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट (हैदराबाद) अशा दहा नामांकित संस्थांमधील तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात येत आहे. त्यांनी पाया उभारणीत तांत्रिक दृष्टीने काही बदल सुचविले असून आता चुनखडी, कठीण दगड आणि सिमेंट काँक्रीट अशा तीन घटकांचा वापर करून पाया भक्कम करण्यात येणार आहे, अशी माहिती अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुपकुमार झा यांनी दिली.
🟧राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना

समुद्रात मोठ्या प्रमाणावर असलेल्या विविध प्राण्यांचे आणि सागरी कासवांचे संवर्धन करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्यावतीने ‘सागरी महा प्राणी संपत्ती मार्गदर्शक तत्वे’ आणि ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर करण्यात आली आहे.

▪️ठळक बाबी

भारताला 7500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. समुद्रामध्ये समृद्ध जैवविविधता आहे. त्यामध्ये रंगबिरंगी मासे पासून शार्क, देवमासे, वेगवेगळ्या प्रकारची कासवे, महाकाय सस्तन प्राणी, डॉल्फिन, चमकदार प्रवाळ अशा असंख्य प्रकाराच्या सागरी प्रजाती भारतामध्ये आहेत. सागरी प्राण्यांमुळे मानवी आरोग्यासाठीही आवश्यक साधनसामुग्री मिळते.

सागरी व्यापार आणि वाहतूक, अन्न, खनिज स्रोत, सांस्कृतिक परंपरा, त्याचबरोबर अध्यात्मिक मूल्ये आणि विश्वभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सागरी किनाऱ्यांच्या स्रोतांवर लक्षावधी लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.

भारतामध्ये सागरी अधिवासांला आर्थिक, पर्यावरणीय महत्व आणि सांस्कृतिक मूल्ये असूनही सागरातल्या महा प्राणी संपत्तीला आणि सागरी कासवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागाबरोबरच समन्वय साधून कृती करण्याची आवश्यकता आहे. यामुळे सागरी प्रजाती आणि त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मदत मिळू शकणार आहे.

कृती योजनेमध्ये सागरी प्राणी संपत्ती संवर्धनासाठी आंतर-क्षेत्रीय कार्यक्रमाला चालना मिळणार आहे, तसेच सागरी सस्तन प्राण्यांच्या संवर्धनातल्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आणि समाज तसेच संबंधित भागधारक यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणे शक्य होणार आहे.
🟧आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील स्थिगिती वाढवली; डीजीसीएचा निर्णय.

भारतातून परदेशात जाणाऱ्या व्यावसायिक विमान उड्डाणांवरील स्थगिती पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे, डीजीसीएने याची घोषणा केली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत ही उड्डाणं बंद असतील असं डीजीसीएनं आपल्या निर्णयात म्हटलं आहे.

डीजीसीएनं म्हटलं की, “काही निवडक मार्गांवरच विशेष कारणासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सक्षम प्राधिकाऱ्यांच्यामार्फत परवानगी दिली जाऊ शकते. ताज्या निर्णायाचा आंतरराष्ट्रीय विमान वाहतुक आणि त्यांच्यासाठी मंजूर उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नाही. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर २८ फेब्रुवारीपर्यंत स्थिगिती देण्यात आली आहे.”

भारतात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय उड्डाणं करोना महामारीमुळं २३ मार्चपासून बंद आहेत. मात्र, मे महिन्यांत ‘वंदे भारत’ मोहिमेंतर्गत विशेष विमान उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय जुलैपासून काही निवडक देशांसोबत एअर बबल करारानुसार उड्डाण केली जात आहेत.
🟧चित्रपटगृहे, स्विमिंग पूल जास्त क्षमतेनं वापरता येणार; केंद्रानं दिली परवानगी.

करोनाच्या संकटकाळात गर्दी टाळण्यासाठी विविध बाबींवर घालण्यात आलेले निर्बंध आता कमी केले जात आहेत. दरम्यान, यापूर्वीच चित्रपटगृह आणि जलतरण तलाव मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे आता अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून याबाबत एसओपी जाहीर करण्यात येणार आहे.

गृह मंत्रालयाने नवी एसओपी जाहीर करत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की, निरिक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्देश १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहेत.

त्याचबरोबर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कन्टेंमेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल. सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपींप्रमाणे परवानगी दिली जाईल.
🟧कला उत्सव 2020

28 जानेवारी 2021 रोजी ‘कला उत्सव 2020’ या कार्यक्रमाची सांगता झाली. कला उत्सव 2020 डिजिटल मंचाद्वारे 10 जानेवारी 2021 रोजी ऑनलाइन सुरू करण्यात आला होता.

▪️ठळक बाबी.

कार्यक्रमामध्ये विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समितीच्या एकूण 35 संघांनी भाग घेतला होता आणि 576 विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखविले. कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी 287 मुली आणि 289 मुलगे आणि चार दिव्यांग होते.

11 ते 22 जानेवारी 2021 या कालावधीत आयोजित केलेल्या कला उत्सव 2020 च्या स्पर्धांमध्ये सामील करण्यात आलेले एकूण नऊ कला प्रकार होते. ते पुढीलप्रमाणे आहेत - शास्त्रीय गायन, पारंपारिक लोकगीते, शास्त्रीय वाद्ये, पारंपरिक / लोक वाद्ये, शास्त्रीय नृत्य, लोक नृत्य, व्हिज्युअल आर्ट्स (द्विमितीय), व्हिज्युअल आर्ट्स (त्रिमितीय) आणि स्थानिक खेळ-खेळणी.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये कला आणि संस्कृतीच्या संवर्धनावर भर देण्यात आला आहे. कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्या शिफारशींचा समावेश करण्यात आला आहे.
Simplified YearBook 2020.pdf
264.5 MB
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
🟥 सिम्प्लिफाईड YEAR BOOK 2020 मोफत PDF Link👇

https://drive.google.com/drive/folders/1VmS3SDSg3rvSxjRgJsIrXBvQuOLkulDi?usp=sharing
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
Simplified+GS+CSAT+Ebook_reduce.pdf
7.6 MB
◼️ सिम्प्लिफाईड Comprehensive GS+CSAT राज्यसेवा सराव प्रश्नसंच

📒सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या या
पुस्तकाची "प्रथम आवृत्ती" Ebook
(Pdf) स्वरूपात सर्वत्र मोफत उपलब्ध


📍MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
साठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच.
📍GS+CSAT च्या Comprehensive
प्रश्नपत्रिका.
📍सर्व प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख
विश्लेषण.
📍अल्पावधी तयारीसाठी व Revision
साठी उपयुक्त.


डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी
नागेश नवनाथ पाटील
BA.Ded. M.A.(Pol.Sci)


◼️Buy Simplified Publication Online Book Store👇

www.simplifiedcart.com

www.simplifiedpublication.com
Contact - 8788639688

◼️Join करा Simplified Discussion Group👇
@simplified_publication
14th simplified Dairy All Page.pdf
6 MB
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 14 वा
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●

🔻01 जानेवारी 2020 ते 29 फेब्रुवारी 2020 दरम्यानच्या चालू घडामोडींचा समावेश


🔻#Covid19 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण राज्यभरातील Offline / Online बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचा " सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 14" वा PDF स्वरूपात सर्वांना या अगोदरच मोफत उपलब्ध करुन दिला आहे.

🔘 सध्या आपले "सिम्प्लिफाईड YEAR BOOK 2021" महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे.

⭕️ देशात कोठेही घरपोच पुस्तके मिळविण्यासाठी आजच SIMPLIFIED PUBLICATION ONLINE SORTE ला एक वेळ आवश्य भेट द्या👇

www.simplifiedcart.com

www.simplifiedpublication.com
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●
🟥 सिम्प्लिफाईड YEAR BOOK 2020 मोफत PDF Link👇

https://drive.google.com/drive/folders/1VmS3SDSg3rvSxjRgJsIrXBvQuOLkulDi?usp=sharing
●▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬●

🔻01 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 दरम्यानच्या चालू घडामोडींचा समावेश


🔻#Covid19 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण राज्यभरातील Offline / Online बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचे" सिम्प्लिफाईड YEAR BOOK 2020" विकत घेता आलेले नाही. तसेच येणाऱ्या केवळ "राज्यसेवा पूर्व परीक्षामध्ये सदरचे बुक अत्यंत उपयोगी असल्यामुळे ते आम्ही PDF स्वरूपात सर्वांना मोफत उपलब्ध करुन देत आहोत. या अगोदर आम्ही "सिम्प्लिफाईड GS+CSAT या सराव प्रश्नसंचाच्या प्रथम आवृत्तीसह सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 14 वा अंक" मोफत उपलब्ध करुन दिला होता.

🔘सध्या 01 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यानच्या चालू घडामोडींचा समावेश असलेले "सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी YEAR BOOK 2021 [17व्या अंकासह]" महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.

⭕️ देशात कोठेही घरपोच पुस्तक मिळविण्यासाठी आजच SIMPLIFIED PUBLICATION ONLINE STORE ला एक वेळ आवश्य भेट द्या👇

www.simplifiedcart.com

Thank You!
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा
सुवर्ण मयूर चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
44%
Into the Darkness
31%
Silent Forest
11%
Never Cry
14%
Valentina
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne) via @like
१) 🔵 २) 🔴 ३) ⚪️ ४) ⚫️
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne) via @like
१) 🔵 २) 🔴 ३) ⚪️ ४) ⚫️
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne) via @like
१)🔵 २)🔴 ३) ⚪️ ४) ⚫️
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
यातील पर्याय क्रमांक ३ हे उत्तर बरोबर आहे. 1985 ते 86 या कालावधीत शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत होते. तसेच ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
यामधील पर्याय क्रमांक २ हे उत्तर बरोबर आहे. यातील पाहिले विधान चुकीचे आहे कारण मंगळ ग्रहाला दोन चंद्र आहेत फोबोस आणि डीमॉस.
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne) via @like
1-🔵 2- 🔴 3-⚪️ 4-⚫️
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne) via @like
1-🔵 2-🔴 3-⚪️ 4-⚫️
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne) via @like
1-🔵 2-🔴 3-⚪️ 4-⚫️