MPSC SIMPLIFIED(official)
34.4K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
सेल!! सेल!! सेल!! सेल!! सेल!!सेल!!
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

🟧 विजयादशमी दसरा निमीत्त विशेष सवलतीत सर्व पुस्तके घरपोच 🟧

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

👇आगामी राज्यसेवा पूर्व व संयुक्त परीक्षासाठी (Combine Exam) उपयुक्त सर्व पुस्तके सवलतीच्या दरात एकाच Platform उपलब्ध.

👉 सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके 50 टक्के विशेष सवलतीत उपलब्ध.
👉 इतर सर्व प्रकाशनाची पुस्तके 20% - 50% विशेष सवलतीत उपलब्ध.

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
‼️BUY ONLINE BOOKS ‼️
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

👉 SIMPLIFIED PUBLICATIONचे अधिकृत ONLINE BOOK STORE 👇

www.simplifiedcart.com

▪️ Door Delivery Available
▪️Home delivery
▪️Offer Only 26 October
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले
9423333181 | 8788639688
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟧 विजयादशमी दसरा निमीत्त सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!💐💐
www.simplifiedcart.com
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟧सूर्याचा प्रकाश पडत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी आहे: NASA

सूर्याचा प्रकाश पडत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) या अंतरराळ संशोधन संस्थेनी प्रथमच जाहीर केले.

NASAच्या ‘स्ट्रॅटोस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी फॉर इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी’ (सोफिया) नामक वेधशाळेतून चंद्रावरील प्रकाशित भागात पाणी असल्याची घोषणा करण्यात आली. ‘सोफिया’ ही जगातली सर्वात मोठी विमानामध्ये स्थापित एक वेधशाळा आहे. बोइंग 747 या विमानात बदल करून ही उंच आकाशात उडणारी वेधशाळा तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे केलेल्या निरीक्षणांवरून चंद्रावरील पाण्याबाबत निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यानुसार, चंद्राच्या दक्षिण गोलार्धातल्या क्लेव्हीयस दरीत पाणी असल्याचे आढळले आहे.

▪️ठळक बाबी

पृथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या, चंद्राच्या कायम सावली असलेल्या भागात पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते. मात्र, आता प्रथमच सूर्यप्रकाशित भागातही पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सूर्याच्या थेट प्रकाशात चंद्रावर पाणी टिकून राहणे अशक्य असल्याचे शास्त्रज्ञांचे यापूर्वी मत होते.

निष्कर्षानुसार, चंद्रावर पाणी प्रवाही नसून रेणूंच्या स्वरूपात आणि गोठलेल्या अवस्थेत आहे. सौर वादळे किंवा लघुग्रहांद्वारे चंद्रावर पाणी आले असण्याची शक्यता आहे. प्रत्येक चौरस मीटरमध्ये 350 मिलिलिटर पाणी असल्याचा अंदाज आहे. चंद्रावर 15 हजार चौरस मैलांवर पाणी असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अल्प प्रमाणात असूनही, या शोधामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी कसे तयार होते हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तसेच चंद्राच्या कठीण आणि हवारहित वातावरणात पाणी कसे टिकून राहते हा देखील एक प्रश्न आहे.
🟧अवैध कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम-1967’ अंतर्गत अठरा व्यक्ती दहशतवादी म्हणून घोषित

सुधारित ‘अवैध कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम-1967’ यामधील तरतुदीनुसार, केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये चार आणि जुलै 2020 मध्ये नऊ जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2020 रोजी सरकारने आणखी अठरा व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित केले आणि त्यांची नावे कायद्याच्या सूचीत समाविष्ट केली.

यादीत पाकिस्तानमधल्या “इंडियन मुजाहिद्दीन” या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सह-सदस्य असणाऱ्या मोहम्मद इकबाल आणि रियाझ इस्माईल शाहबंदरी यांचा समावेश आहे. ते जर्मन बेकरी (2010), चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू (2010), जामा मशिद (2010), शीतलाघाट (2010) आणि मुंबई (2011) सह भारतातल्या विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. तसेच दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीच्या सर्व गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड कारवाया पाहणारा ‘छोटा शकील’ देखील यादीत आहे.

▪️पार्श्वभूमी

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने एखाद्या व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या तरतूदीचा समावेश करण्यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये ‘अवैध कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम-1967’ यामध्ये दुरुस्ती केली होती. त्या दुरुस्तीपूर्वी केवळ संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले जात होते.