MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
#simplified_Publication
👆वरील सर्व संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.
👆सदर पुस्तके Online उपलब्ध आहेत. महाराष्ट्रासह देशभरात कोठे घरपोच सेवा उपलब्ध आहे.

🟧 संपर्क :- अभिजीत थोरबोले

8788639688, 9423333181


👍 Online Booking 👇

www.simplifiedcart.com
MPSC SIMPLIFIED(official) pinned «#simplified_Publication 👆वरील सर्व संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👆सदर पुस्तके Online उपलब्ध आहेत. महाराष्ट्रासह देशभरात कोठे घरपोच सेवा उपलब्ध आहे. 🟧 संपर्क :- अभिजीत थोरबोले 8788639688…»
🔵आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक :- 10/08/T20
दिवस :- 53 वा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
2⃣ COMBINE Exam संयुक्त पूर्व परीक्षा 2020 [गट-ब]
🔘 Strategy Video Link👇

https://youtu.be/DPOcqNILUA0
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳विषय= सामान्य विज्ञान [दिवस 04]
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔵 सामान्य विज्ञान आजचा अभ्यास घटक👇
━━━༺༻━━━

उती व उतींचे प्रकार, पोषण.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅ दररोज सामान्य विज्ञानाचा एक घटक अभ्यासणे.
✅ दररोज 90 मिनिटे कायदे व संगणकाचा अभ्यास करणे.
✅ मागील प्रश्नपत्रिका सोबत ठेवणे.
✅ चालू घडामोडीचा रोज 30 ते 45 मि. अभ्यास करावा.
━━━༺༻━━━
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔷Join करा👉@mpscsimplified
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳 MPSC | Simplified Strategy राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 | Play List Link👇
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://www.youtube.com/playlist?list=PLQbxgDZvWRH7PGvKtnCn9u0SuL4HQx8Ya
━━━༺༻━━━
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳 COMBINE | Simplified Strategy संयुक्त पूर्व परीक्षा 2020 | Play List Link👇
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://www.youtube.com/playlist?list=PLQbxgDZvWRH6QLsv0eCdy7tAJhECEk_hC
━━━༺༻━━━
🔵आजचा अभ्यास
#Study_Simplified
दिनांक :- 10/08/T20
दिवस :- 53 वा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
1⃣ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
🔘 Strategy Video Link👇

https://youtu.be/yHxmvEHba_Y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳विषय= सामान्य विज्ञान [दिवस 09]
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔵 सामान्य विज्ञान आजचा अभ्यास घटक👇

━━━༺༻━━━

गती, गतीचे प्रकार व गतीविषयकचे नियम,द्रव्य, द्रव्याची संकल्पना, द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण.


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅दररोज किमान 03 तास CSAT चा सराव करणे.सराव दु.2.00pm ते 5.30pm याच वेळेत करावा.
✅ दररोज राज्यघटनेचा एक घटक अभ्यासणे
✅ मागील प्रश्नपत्रिका सोबत ठेवणे.
✅ चालू घडामोडीचा रोज 30 ते 45 मि. अभ्यास करावा.
━━━༺༻━━━
◼️CSAT सिम्प्लिफाईड पुस्तक विषयी-
https://youtu.be/3HpmtK6pLAA
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔷Join करा👉@mpscsimplified
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳 MPSC | Simplified Strategy राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 | Play List Link👇
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://www.youtube.com/playlist?list=PLQbxgDZvWRH7PGvKtnCn9u0SuL4HQx8Ya
━━━༺༻━━━
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔳 COMBINE | Simplified Strategy संयुक्त पूर्व परीक्षा 2020 | Play List Link👇
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://www.youtube.com/playlist?list=PLQbxgDZvWRH6QLsv0eCdy7tAJhECEk_hC
━━━༺༻━━━
🟧T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच.

T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली.

व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत २०२१ आणि २०२२च्या टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाबद्दल निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार २०२१चा टी-२० विश्वचषक भारतातच होणार असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त टाईम्सनाऊने दिले आहे. याशिवाय २०२१मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वन डे विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.

महिलांचा २०२१ एकदिवसीय विश्वचषक तसेच पुरुषांचे पुढील दोन टी-२० विश्वचषक यांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०मध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२१च्या यजमानपदासाठी आग्रही होते.

त्यामुळे भारताला २०२१ऐवजी २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते असे बोलले जात होते. पण अखेर २०२१च्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडेच कायम असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे.
🟧अवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत.

करोना संकटातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणजे त्यावरची लस. ही लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या देशांमध्ये असलेल्या गरीबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे. त्या दृष्टीने आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने आणखी एक पाऊल उचललं आहे.

सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे.

GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला करोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल. सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
‼️पंतप्रधानांच्या हस्ते कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत आर्थिक सुविधांचा शुभारंभ होणार.‼️

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

⚜भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून “कृषी पायाभूत सुविधा निधी” (Agriculture Infrastructure Fund) अंतर्गत एकूण 1 लक्ष कोटी रुपयांच्या आर्थिक सुविधांचा शुभारंभ करणार आहेत.

⚜पंतप्रधान पीएम-किसान योजनेच्या अंतर्गत 8.5 कोटी शेतकऱ्यांना 17,000 कोटी रुपयांच्या सहावा हप्त्याच्या निधीचे वितरण देखील करणार आहेत.

💠पार्श्वभूमी...

⚜8 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने "कृषी पायाभूत सुविधा निधी" अंतर्गत 1 लक्ष कोटी रुपयांच्या केंद्रीय वित्तपुरवठा सुविधा योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना कापणीच्या हंगामानंतर व्यवस्थापन, पायाभूत सोयी-सुविधा आणि सामुदायिक कृषीविषयक मालमत्तांसाठी व्यवहार्य प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याच्या हेतूने व्याज अनुदान आणि आर्थिक सहाय्याद्वारे मध्यम-दीर्घ मुदतीसाठी कर्जपुरवठा सुविधा उपलब्ध करुन देणार.

⚜राष्ट्रीय बँका आणि वित्तीय संस्था या योजनेच्या अंतर्गत प्राथमिक कृषी पत संस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संघटना, बचत गट, शेतकरी, संयुक्त दायित्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषी-उद्योजक, स्टार्टअप, एकत्रित पायाभूत सुविधा पुरविणारे आणि केंद्र/राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्प यांना सुमारे एक लक्ष कोटी रुपयांचे कर्ज प्रदान करणार.

⚜योजनेचा कालावधी आर्थिक वर्ष 2020 ते आर्थिक वर्ष 2029 अर्थात 10 वर्षांचा असणार आहे.

⚜चालू आर्थिक वर्षात 10,000 कोटी रुपये आणि पुढील तीन आर्थिक वर्षांत प्रत्येकी 30,000 कोटी रुपये असे चार वर्षांत हे कर्ज वितरित केले जाणार आहे. भारत सरकारकडून 10,736 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.

⚜या सुविधेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व कर्जावर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मर्यादेवर दरवर्षी 3 टक्के व्याज अनुदान देण्यात येणार.

⚜ कमाल 7 वर्षांसाठी हे अनुदान उपलब्ध आहे. शेतकरी उत्पादक संघटनेच्या बाबतीत, कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या FPO प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत तयार केलेल्या सुविधेमधून कर्ज हमी मिळू शकणार.

⚜तात्काळ देखरेख आणि प्रभावी समीक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरीय देखरेख समित्यांची स्थापना केली जाणार आहे.

⚜हा निधी शीतगृह, संकलन केंद्र, प्रक्रिया केंद्र यासारखी सामुदायिक शेती मालमत्ता आणि कापणी नंतरचे पायाभूत सुविधा व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरणार.