MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
🔹 सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि
🔹 बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत.

◾️ बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे.

◾️GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला करोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल.

◾️सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे.

◾️ या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

◾️सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषध निर्मिती करणारी कंपनी आहे.

◾️सिरमनेही
📌 ऑक्सफर्ड आणि
📌 अमेरिकेच्या Novavax या कंपनीसोबत लसींसंदर्भातला करार केला आहे.

◾️यांच्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि त्याला संमती मिळाली तर सिरम इन्स्टिट्युला लस उत्पादनासाठी निधी मिळणार आहे.
🅾पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्र (आरएसके)चे उद्घाटन केले. 🅾

◾️महात्मा गांधी यांना समर्पित राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची सर्वात पहिली घोषणा पंतप्रधान मोदी यांनी १० एप्रिल २०१७ रोजी गांधीजींच्या चंपारण्य सत्याग्रहास १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केली होती.

◾️आज राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी गांधीजींच्या नेतृत्वात झालेल्या भारत छोडो आंदोलनाची आठवण करून दिली.

◾️“भारत छोडोचे हे सर्व संकल्प स्वराज्यपासून सुराज्याच्या भावनेला अनुरुपच आहेत.

◾️याच अनुशगांने आज आपल्या सर्वांना ‘गंदगी भारत छोड़ो’ चा संकल्प देखील पुन्हा करायचा आहे. या आजपासून १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे स्वतंत्रता दिवसापर्यंत देशात एक आठवडा मोठे अभियान राबवूयात.”

◾️ असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्यासाठी ‘भारत छोडो’चा यावेळी नारा दिला.
🟧पूर्व नयाब राज्यपाल गिरीष चंद्र मूर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी आता मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🔰५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला एक वर्ष पूर्ण झालं.

🔰 मूर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू काश्मीरच्या नयाब राज्यपालपदाची शपथ घेतली होती

🔰त्यांच्या कार्यकाळात काश्मीर शांतता, स्थिरता आणि विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याचं सांगण्यात येतं.

🔰तसंच राज्यात दहशतवाद आणि दगडफेकीसारख्या घटनांमध्येही घट झाली आहे.

🔴 कोण आहेत मनोज सिन्हा?

🔰मनोज सिन्हा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहे.

🔰 २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

🔰 मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे रेल्वे मंत्री पदाची जबाबदारी होती
🟧देशातील पहिली किसान रेल्वेगाडी धावली, शेतकऱ्यांना असा होणार फायदा
फक्त शेतकऱ्यांसाठी ही ट्रेन धावेल

भारतीय रेल्वेने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. आज भारतीय रेल्वेमार्फत किसान रेल्वेगाडीची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवार या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते.

या रेल्वेतून फळ आणि पाले-भाज्यासारख्या सामानाची नेआण करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात ही ट्रेन नेमकी काय आहे आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार…

📚 कुठून कुठपर्यंत?

किसान रेल्वे गाडी महाराष्ट्र ते बिहार या राज्यात धावणार आहे. महाराष्ट्रातील देवळाली स्थानकातून सकाळी ११ वाजता ही रेल्वे रवाना होणार आणि बिहारच्या दानापुर स्थानकापर्यंत जाणार आहे.

✅ वैशिष्ट्ये काय?
किसान रेल्वे गाडीत रेफ्रिजरेटेड कोच लावण्यात आले आहेत. १७ टनपर्यंत माल वाहून नेहण्याची क्षमता या ट्रेनमध्ये आहे. याचं डिजायनही हटके आहे. कपूरथला येथील रेल्वे कारखान्यातून या रेल्वेच्या बोगी तयार करण्यात आल्या आहेत. यामधील कंटेनर फ्रीजसारखे असतील. ही रेल्वे म्हणजेच चालते फिरते कोल्ड स्टोरेज असणार आहे. या रेल्वेगाडीत शेतकऱ्यांच्या पालेभाज्या, भळे, मासे, मांस आणि दूधासारख्या पदार्थांना ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र-बिहार या मार्गावर किसान रेल्वेगाडी आठवड्यातून एकदा धावेल. महाराष्ट्रातील नाशिकमधील देवळाली स्थानकातून सकाळी ११ वाजता रवाना होणार आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४६ वाजता पटनाजवळील दानापुर स्थानकात पोहचेल. या रेल्वेगाडीला महाराष्ट्रातून बिहारमध्ये पोहचण्यासाठी ३२ तासांचा कालवधी लागणार आहे.

✅ कोणत्या स्थानकावर थांबणार? – 👇

देवळाली ते दानापुर या स्थानकादरम्यान एक हजार ५१९ किमी ट्रेन धावेल. देवळाली स्थानकातून निघाल्यानंतर नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, बुरहानपुर, खंडवा, इटारसी, जबलपुर, सतना, कटनी, मणिकपुर, प्रयागराज, पं दीनदयाल उपाध्याय नगर आणि बक्सर या स्थानकावर थांबणार आहे.