MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Yethun pudhe form bhartana female candidatene vichar karun bharava(mpsc)
Ajit Thorbole:
#radionews


आकाशवाणी रेडिओ बातम्या-25 जून 2016

-पुणे,औरंगाबाद,मुंबई आणि नागपूर केंद्राच्या दिवसभरातील बातम्या pdf स्वरूपात

-फक्त लाल चिन्हांकित बातम्या वाचा

http://www.mpscsimplified.com/2016/06/radio-news-25-june-2016/

शेअर करा
मंत्रालय सहायक परीक्षेत राज्यात प्रथम आलेले आणि विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात द्वितीय आलेले अजिंक्य आजगेकर यांनी सांगितलेली विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा पुस्तकसूची

http://www.mpscsimplified.com/2016/06/sti-main-booklist/

शेअर करा
#current
#stimains

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्याच्या स्मार्ट सिटी योजनेमधल्या 14 प्रकल्पांचा प्रारंभ करत स्मार्ट सिटी या पथदर्शी मोहिमेचा प्रारंभ केला. अभियानाची मार्गदर्शक तत्त्व प्रसिद्ध झाल्यानंतर बरोबर एका वर्षाने पंतप्रधानांनी हा उपक्रम मार्गी लावला.
पुण्यातल्या शिव छत्रपती क्रीडा संकुलातल्या भरगच्च जनसमुदायाला संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, स्मार्ट सिटी उपक्रम हा संकल्पनेनुसारच लोकांची चळवळ म्हणून यशस्वी होत आहे. स्मार्ट सिटी योजनेत लोकांच्या सहभागाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या मोहिमेसाठी विविध शहरातल्या 25 लाखांहून अधिक जनतेने mygov.in वर महत्त्वपूर्ण सूचना केल्या, असे पंतप्रधान म्हणाले. स्मार्ट सिटीची निवड केंद्र सरकारने केली नसल्याचे स्पष्ट करत, पंतप्रधान म्हणाले की, शहर आव्हान स्पर्धे अंतर्गत लोकांनीच या शहरांची निवड केली आहे. जनतेला सक्षम केले आणि विकास प्रक्रियेत सहभागी करुन घेतले तर देश अधिक वेगाने प्रगती करेल, असे पंतप्रधान म्हणाले.
स्पर्धेच्या युगामुळे शहरी भागातील परिस्थितीत सुधारणा झाली असून, संबंधित महानगरं आणि शहरातील स्थिती सुधारण्यासाठी नागरिकांनी आव्हानांना तोंड द्यायला सज्ज व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. स्मार्ट सिटी अभियानाच्या गेल्या एका वर्षातील प्रगतीचा आपण नुकताच आढावा घेतला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सर्वंकष स्मार्ट सिटी योजनेच्या निर्मितीत लोकांचा उत्साहपूर्ण आणि मोठ्या प्रमाणावरील सहभाग, स्मार्ट शहरांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या शहर आव्हान स्पर्धेची पद्धत आणि या अंतर्गत प्रकल्पांची आखणी तसेच या प्रकल्पांचा प्रारंभ याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या मार्गदर्शनाखालील चमूचे त्यांनी कौतुक केले.
आपल्या 35 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी स्मार्ट सिटी संकल्पनेबाबत तसेच त्यातून मिळणाऱ्या लाभांबद्दल विस्तृत विवेचन केले. स्मार्ट सिटी अभियान हे शहरी गरीबांना सर्वंकष पद्धतीने निवारा उपलब्ध करुन देणाऱ्या सुविधेसह इतर आवश्यक पायाभूत सोयीसुविधांच्या माध्यमातून लोकांना सर्व मूलभूत सुविधा प्राप्त करुन देत असल्यामुळे या संकल्पनेकडे केवळ काल्पनिक संकल्पना म्हणून बघता कामा नये, यावर पंतप्रधानांनी भर दिला. प्रशासन आणि सार्वजनिक सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेमधे डिजिटल तंत्रज्ञानाच्या व्यापक वापराचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
गरीबीची तीव्रता कमी होते आणि गरीबांचे सक्षमीकरण होते, यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, याकडे एक समस्या म्हणून न पाहता, आलेली संधी म्हणून पाहण्याची गरज आहे.
लोकांचे सक्षमीकरण होऊन ते विकास प्रक्रियेत सहभागी झाले तर देश अधिक वेगाने प्रगती करेल, यावरही पंतप्रधानांनी भर दिला. महानगर आणि शहरात स्पर्धेचे युग कायम राहणार असल्यामुळे नागरिकांनी आपापल्या शहरी भागांच्या विकासाचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
बदललेल्या दृष्टीकोनाबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकार हे केवळ निधीदाता असल्याचे दिवस गेले असून, आता केंद्र सरकारकडे कल्पनांचा स्रोत म्हणून बघितले जात आहे. याबाबत अधिक विस्तृतपणे बोलतांना पंतप्रधानांनी सांगितले की, नुकत्याच घेतलेल्या सर्व सर्वेक्षणानुसार स्वच्छ भारत अभियान हे सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांपैकी सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे, कारण स्वच्छतेबाबतची ही संकल्पना लोकांना आवडली आहे.
पंतप्रधानांनी यावेळी ‘मेक युवर सिटी स्मार्ट’ या स्पर्धेचाही प्रारंभ केला,
ज्यामधे लोकांकडून मोकळ्या जागा, चौक आणि रस्त्यांसाठी आरेखनं मागवण्यात आली आहे. याचबरोबर पंतप्रधानांनी ‘स्मार्ट नेट पोर्टल’चेही उद्‌घाटन केले. हे पोर्टल स्मार्ट शहर विकासासाठी संकल्पना आणि संबंधित समस्यांचे निराकरण यांची देवाणघेवाण करण्यासाठीचे नेटवर आधारीत व्यासपीठ आहे.
आज सुरु करण्यात आलेले स्मार्ट सिटी प्रकल्प हे देशात कार्यरत होत असलेल्या शहरी पुर्नर्जीवनाची पहिली पालवी आहे, असे केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. केंद्र सरकारने हाती घेतलेल्या शहरी विकासाच्या दृष्टीकोनातला हा मोठा बदल आहे, असेही ते म्हणाले. शहरी भागाच्या परिवर्तनाचा हा प्रवास टीम इंडिया स्पिरीटच्या माध्यमातून सुरु झाला असून, त्यात राज्य सरकारे, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जनता यांचा एकत्रित सहभाग आहे. हे परिवर्तन ‘विकसित भारताची निर्मिती’ या उपक्रमाचे अविभाज्य अंग असल्याचे ते म्हणाले.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी व्हिडीयो लिंकद्वारे त्यांच्या राज्यातील स्मार्ट शहरांच्या दृष्टीकोनाबद्दल माहिती दिली.
#current
#mpscsimplified
#environment
#mpscmain

कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याबरोबर नवीकरणीय ऊर्जा वापरास दिलेले प्राधान्य यामुळे गुजरातमधील राजकोट शहराला "नॅशनल अर्थ अवर कॅपिटल- 2016' पुरस्कारने गौरविण्यात आले आहे. "वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर'च्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) वतीने आयोजित केलेल्या "ग्लोबल अर्थ अवर सिटी चॅंलेज' (ईएचसीसी) स्पर्धेत 21 देशांतील 125 शहरांचा सहभाग होता, त्यातून राजकोटची निवड करण्यात आली आहे.

हवामान बदलाविरोधात लढा देण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करणाऱ्या शहरांची निवड ईएचसीसी स्पर्धेतून केली जाते. यंदा राजकोटला हा मान मिळाला असून, विविध देशांतील इतर 17 शहरांनाही नॅशनल अर्थ अवर कॅपिटल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत राजकोटशिवाय भारतातील 11 शहरांनीही सहभाग दर्शविला होता. त्यापैकी पुणे, कोइमतूर या शहरांनी अंतिम फेरीतपर्यंत मजल मारली होती. डब्ल्यूडब्ल्यूएफ व ग्लोबल कन्सल्टन्सी असेंचरने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शहरांचे प्राथमिक मूल्यमापन केल्यानंतर यासाठी नेमण्यात आलेली 17 सदस्यांची निवड समितीने प्रत्येक देशातील एका शहराची नॅशनल अर्थ अवर कॅपिटल व ग्लोबल अर्थ अवर कॅपिटल या पुरस्कारांसाठी निवड करते. या वेळी ग्लोबल अर्थ अवर कॅपिटल पुरस्कारासाठी समितीने फ्रान्सची राजधानी पॅरिस या शहराची निवड केली. विकास साधताना कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, नवीकरणीय ऊर्जा वापरास प्राधान्य देणे, तसेच ऊर्जेची कार्यक्षमता यासाठी राजकोटने अवलंबलेली धोरणे उल्लेखनीय असून, त्याची दखल घेत शहराची निवड केल्याचे डब्ल्यूडब्ल्यूएफने म्हटले आहे.

सौजन्य-सकाळ
#current
#economics
#stimains
#mpscmains
#mpscsimplified

ब्रेक्‍झिट शॅाक; ब्रिटन महासंघाच्या बाहेर

ब्रिटनमधील ५१.९ टक्के नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केले.

-ब्रिटन हा महासंघाच्या बाहेर पडणारा ग्रीनलॅंडनंतरचा दुसरा देश.(ब्रिटनच्या स्पेलिंगमधील ‘बी’ आणि ‘आर’ ही अक्षरे आणि ‘एग्झिट’ (बाहेर पडणे) यांना जोडून ‘ब्रेग्झिट’ शब्द तयार केला आहे. अशाच प्रकारे पूर्वी युरोपीय संघातून ग्रीस हा देश बाहेर पडण्याची शक्यता होती तेव्हा ‘ग्रेग्झिट’ असा शब्द वापरण्यात आला होता.)
-पंतप्रधान कॅमेरॉन यांचा राजीनाम्याचा निर्णय
-कॅमेरॉन यांची पंतप्रधानपदांची दुसरी टर्म अल्पजीवीच
-जागतिक बाजारात पडझड
-ब्रेक्‍झिट' नावाने चर्चेत आलेले हे मतदान युकेतील 1992 नंतरचे सर्वांत मोठे मतदान ठरले.
-मतदानाचा निकाल येत असताना पौंडचे मूल्य तीस वर्षातील निचांकी पातळीवर पोचले
-युकेतील एका नेत्याने या निकालानंतर हा युकेसाठी "स्वातंत्र्य दिन' असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
-युरोपीयन महासंघात राहण्याच्या बाजूने लंडन आणि स्कॉटलंडमधील नागरिकांनी सर्वाधिक अनुकूलता दर्शविली.
-ऑक्‍सफोर्डमधील 49424 नागरिकांनी रिमेनच्या बाजूने पसंती दर्शविली तर 20,913 मतदारांनी "लिव्ह' पर्याय निवडला.
-डॉलर आणि रुपयासमोर पौंडचे अवमूल्यन झाले आहे
-यापूर्वी युरोपीय संघातून कोणता देश बाहेर पडला होता का?
-आजवर कोणताही स्वतंत्र देश युरोपीय संघातून बाहेर पडलेला नाही. मात्र डेन्मार्कचा एक स्वायत्त भाग असलेल्या ग्रीनलँड या अटलांटिक महासागरातील मोठय़ा बेटावर १९८२ साली या प्रश्नावर सार्वमत घेण्यात आले होते. त्या वेळी ग्रीनलँडच्या जनतेने ५२ टक्के विरुद्ध ४८ टक्के अशा फरकाने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
-ब्रिटन गेली ४३ वर्षे युरोपीय संघात आहे
-ब्रिटनमध्ये युरो या संयुक्त चलनाऐवजी स्टर्लिग पाऊंड हेच चलन प्रचारात होते.
-शेंगेन करारानुसार युरोपीय संघाच्या सदस्य देशांच्या सीमा बऱ्याच खुल्या करण्यात आल्या होत्या. ब्रिटनचा त्यात सहभाग नव्हता.
-पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह (हुजूर) पक्षातील काही सदस्य, युनायटेड किंगडम इंडिपेंडन्स पार्टी (यूकेआयपी) आणि अन्य स्तरांतून सार्वमत घेण्याची मागणी होत होती. याच विषयावर ब्रिटनने १९७५ साली एकदा सार्वमत होते आणि त्या वेळी ब्रिटिश जनतेने युरोपीय संघात राहण्याचा निर्णय घेतला होता.
-कॅमेरून यांनी जनतेला वचन दिले होते की जर ते २०१५ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिंकून आले तर ते या विषयावर मतदान घेतील. त्यानुसार गुरुवार, २३ जून रोजी ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात आले.
-ब्रिटनच्या ७१.८ टक्के मतदारांनी म्हणजे सुमारे ३० दशलक्ष नागरिकांनी सार्वमतादिवशी मतदान केले. त्यापैकी ५२ टक्के नागरिकांनी ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडावे या बाजूने कौल दिला. तर ४८ टक्के नागरिकांनी ब्रिटनने युरोपीय संघाचे सदस्यत्व कायम ठेवावे या बाजूने मतदान केले.
-लिस्बन करारातील ५०वे कलम लागू करण्याची जबाबदारी नवे पंतप्रधान पार पाडतील, असे कॅमेरून यांनी सांगितले. त्यानुसार ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू होईल. ती पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा किंवा त्याहून अधिक काळ लागेल. त्या काळात ब्रिटनला युरोपीय संघाशी केलेल्या जुन्या करारांशी आणि नियमांशी बांधील राहावे लागेल. मात्र संघाच्या निर्णय प्रक्रियेत भाग घेता येणार नाही.
-ब्रिटनला पुन्हा संघात सामील व्हायचे असल्यास तसे करता येऊ शकते. पण त्यासाठी सर्व प्रक्रिया नव्याने सुरू कराव्या लागतील आणि सर्व सदस्य अनुकूल असतीलच असे नाही.
-विभागवार निकाल

* इंग्लंड आणि वेल्स प्रांतांमध्ये प्रामुख्याने बाहेर पडण्याच्या बाजूने तर स्कॉटलंड आणि उत्तर आर्यलडमध्ये संघात राहण्याच्या बाजूने मतदान झाले.

* इंग्लंडमध्ये संघात राहण्याच्या बाजूने ५३.४ टक्के तर बाहेर पडण्याच्या बाजूने ४६.६ टक्के नागरिकांनी मतदान केले.

* वेल्समध्ये ५२.५ टक्के नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने तर ४७.५ टक्के नागरिकांनी संघात राहण्याच्या बाजूने मतदान केले.

* स्कॉटलंडमधील ६२ टक्के नागरिकांनी संघात राहण्याच्या बाजूने तर ३८ टक्के नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केले.

* उत्तर आर्यलडमधील ५५.८ टक्के नागरिकांनी संघात राहण्याच्या बाजूने तर ४४.२ टक्के नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केले

Source--loksatta and sakal
विविध परिक्षकरिता लागणारे daily फॅक्टस
👇
http://www.mpscsimplified.com/daily-facts/

प्रश्न विचारा
👇
@ajit_thorbole

Telegram channel जॉईन करा
👇
Telegram.me/mpsc_simplified
पुण्यातील विविध अभ्यासिका,त्यांचे नाव,contact no. येथे नोंद करा

http://www.mpscsimplified.com/forums/topic/पुण्यामधील-विविध-अभ्यासि/#.V27AGcrhXqA
Emailing 5_929556670906892292.pdf
Mpscmains science space👇
Mpsc simplified वरील सर्व ऑडिओ नोट्स

Telegram.me/simplified_audio
Channel photo updated
Channel photo updated
Channel photo updated
#upscmain
#mpscpre

भारताला 80 अब्ज डॉलरची संधी
परदेशी पर्यटक आणि परकी गंगाजळी यांना आकर्षित करण्याची संधी भारताला असून, यात तो मागे पडत आहे. यामुळे भारताला दरवर्षी 80 अब्ज डॉलरवर पाणी सोडावे लागत आहे. वैद्यकीय पर्यटनात भारताचा वाटा 3 अब्ज डॉलर असून, तो 2020 पर्यंत 7 ते 8 अब्ज डॉलरवर जाणे अपेक्षित आहे. थायलंडसारख्या लहान देशांमध्ये कोट्यवधी पर्यटकांचा ओघ सुरू असून, भारतात मात्र, ही संख्या त्या तुलनेत अतिशय कमी आहे.
#current

अमेरिकेचे 99 टक्के तंत्रज्ञान भारतासाठी खुले

अमेरिकेशी संरक्षण सहकार्य करार केलेल्या देशांपैकी केवळ भारतालाच लवकरच अमेरिकेच्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानापैकी 99 टक्के तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे. अमेरिकेने भारताला "महत्त्वाचा संरक्षण सहकारी' म्हणून जाहीर केल्यामुळे भारताला हा फायदा होणार

"भारताला हा दर्जा दिला गेला असल्याने आमच्या इतर सहकाऱ्यांना न मिळू शकणारी माहिती भारताला मिळणार आहे. अमेरिकेने असा दर्जा दिलेला भारत हा एकमेव देश आहे,'
#geography
#mpscsimplified

## झंझावात, तुफान, चक्रीवादळ, आवर्ती किंवा अभिसारी चक्रवात... वाहणाऱ्या वाऱ्याला त्याच्या वेगानुसार आणि प्रकारानुसार अशी कितीतरी वेगवेगळी नावं आहेत.

#पश्‍चिम अटलांटिकमध्ये तयार होणाऱ्या वादळांना झंझावात (हरिकेन) म्हणतात, तर पश्‍चिम प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या वादळांना आवर्ती किंवा अभिसारी चक्रवात (टायफून) म्हणायची प्रथा आहे. बाकीच्यांना चक्रीवादळ (सायक्‍लोन) असं म्हटलं जातं.


#मॉन्सूनच्या मुख्य पावसाआधी येणाऱ्या पावसाला आपण ‘वळिवा’चा पाऊस असं म्हणतो. जोराचं वारं, अचानक आभाळ भरून येणाऱ्या ढगांची बहुतेक वेळा सायंकाळ होण्याआधी होणारी गर्दी आणि नंतर येणाऱ्या जोरदार सरींनी त्याची हजेरी लागते. उकाड्यानं हैराण झालेले आपण या अचानक होणाऱ्या शिडकाव्यानं आनंदून जातो; पण या अचानक आलेल्या सरींमध्ये ‘पावसाळ्या’ची नुसती चाहूलच असते. प्रत्यक्ष पावसाळा मात्र काही दिवसांनी सुरू होतो; पण हे मधले काही दिवस मात्र तगमग देणारे असतात. हेच दिवस जगभर आणखी एका गोष्टीसाठी, ‘मोसमी वादळांच्या सुरवाती’चे दिवस ठरतात.

#साधारणतः २१ किंवा २२ जूनला सूर्य आकाशात सर्वात उत्तरेकडं असतो. त्यानंतर त्याचं दक्षिणायन सुरू होतं.

-उन्हाळ्यात जे जोराचे वारे वाहतात, त्यांना आपण सहसा वादळ म्हणत नाही. गोलाकार फिरणारी धुळीची वावटळ मात्र पठारी प्रदेशात जागोजागी दिसते; पण जी जोरात आणि सलग वाहणारी गरम हवा; विशेषतः दुपार ते संध्याकाळ या वेळात दिसून येते, तिला ‘लू’ म्हणतात.

# वाऱ्याची दिशा आणि वेग यावर तो ‘मंद वारा’ आहे, झुळूक आहे की तो सोसाट्याचा वारा आहे हे ठरत असतं. पूर्वी नाविकांसाठी वाऱ्याच्या वेगाकरिता ‘बोफोर्ट-क्रमांक’ वापरत असत. एका नाविक अधिकाऱ्यानं, फ्रान्सिस बोफोर्टनं १८०५ मध्ये हे कोष्टक तयार केलं होतं. (यात एक नॉट म्हणजे ताशी १.८५२ किलोमीटर वाऱ्याचा वेग धरलेला आहे.)
(० ते १ नॉट) क्रमांक ० = स्तब्ध हवा, हालचाल नाही. या वेळी शेकोटीचा धूर सरळ उभा वरच्या दिशेनं जातो.

(१ ते ३ नॉट) क्रमांक १ = वाऱ्याची दिशा धुरामुळं कळते; पण दिशादर्शक यंत्रावर मात्र परिणाम दिसत नाही.
(४ ते ६ नॉट) क्रमांक २ = झाडाची पानं सळसळतात, तोंडावर वारा जाणवतो, सामान्य दिशादर्शकही हलतो.
(७ ते १० नॉट) क्रमांक ३ = झाडाच्या डहाळ्या म्हणजे छोट्या फांद्या डोलू लागतात, लहान झेंडे फडफडतात.
(११ ते १६ नॉट) क्रमांक ४ = झाडाच्या छोट्या फांद्या हेलकावे घेत हलू लागतात, धूळ उडते, कागदाचे कपटे या वाऱ्यानं उडू लागतात.
(१७ ते २१ नॉट) क्रमांक ५ = लहान झाडंच आता डोलू लागतात. तलावाच्या पाण्यावर या वाऱ्यानं छोट्या छोट्या टोकदार लाटा तयार होतात.
(२२ ते २७ नॉट) क्रमांक ६ = झाडाच्या मोठ्या शाखा डोलतात. छत्री सांभाळणं कठीण होतं. दूरध्वनीच्या टांगलेल्या तारांमधून शीळ घातल्यासारखा आवाज येऊ लागतो.
(२८ ते ३३ नॉट) क्रमांक ७ = संपूर्ण वृक्ष हलू लागतात. झाडांच्या छोट्या नाजूक फांद्या तुटायला लागतात. या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं चालणं मुश्‍किल होतं.
(३४ ते ४० नॉट) क्रमांक ८ = वृक्षांच्या फांद्या तुटायला लागतात. सामान्य मानवी जीवनाला अडथळे निर्माण होऊ लागतात. (३५ नॉटच्या वर वाऱ्याचा वेग असेल, तर म्हणजेच सुमारे ६३ किलोमीटर ताशी वेगाचे वारे म्हणजे वादळ असं आजकाल मानण्यात येतं.)
(४१ ते ४७ नॉट) क्रमांक ९ = इमारतींना धोका निर्माण होतो. कौलं, छताचे पत्रे उडतात, भिंती कोसळतात.
(४८ ते ५५ नॉट) क्रमांक १० = जमिनीवर एवढ्या प्रमाणातला वारा फारच कमी प्रमाणात अनुभवास येतो. मात्र, उंच इमारतींचा फार मोठा विध्वंस या वाऱ्यामुळं होतो. या वाऱ्याच्या वेगानं वाहनं रस्त्याबाहेरही फेकली जातात. गाड्या रुळावरून खाली घसरतात. गलबतांना-जहाजांना तर फारच धोका; कारण ते उलटतात किंवा लाटांच्या तडाख्यानं फुटतातही.
(५६ ते ६३ नॉट) क्रमांक ११ = फारच क्वचित अनुभवास येतो; पण चक्रीवादळात वाऱ्याला एवढा वेग असू शकतो. त्यानं फार मोठा आणि विस्तृत प्रदेशात विध्वंस होतो.
(६४ नॉटच्या पुढं) क्रमांक १२ = अपरिमित नुकसान करणारी स्थिती. ही स्थिती फक्त काही ठिकाणीच अनुभवास आलेली आहे.

#वारा किंवा हवेत हालचाल निर्माण होण्याची प्रमुख कारणं म्हणजे वातावरणातल्या हवेवर होणाऱ्या निरनिराळ्या प्रेरणांचा (बलांचा) परिणाम.
१) पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, जे सर्वच पदार्थांवर सततच कार्य करत असतं,
२) कमी-अधिक उष्णतेमुळं हवेची घनता कमी-अधिक होणं,
३) त्यामुळंच हवेच्या दाबात होणारा फरक,
४) कोरिऑलिस बल,
५) घर्षण आणि
६) केंद्रोत्सारी (सेंट्रिफ्युगल) बल या प्रेरणा हवेच्या स्थितीवर बदल घडवून आणतात. त्यामुळं वारे निर्माण होतात. गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम हा जमिनीपासून वर उभ्या दिशेनं होत असल्यानं तो वादळी वाऱ्यांसाठी फारसा परिणाम दाखवत नाही; पण कोरिऑलिस बल मात्र वाऱ्यांवर जागतिक परिणाम दाखवतं


#काय आहे कोरिऑलिस बल?

-फ्रेंच गणिती गास्पार ग्युस्ताव
कोरिऑलिस यानं हे बल कसं कार्य करतं ते त्याच्या १८३५ च्या एका शोधनिबंधात दाखवून दिलं. यात होतं काय की पृथ्वीच्या रोजच्या परिवलनामुळं - एका दिवसात स्वतःभोवती एक फेरी घेण्याच्या वेगामुळं - विषुववृत्तावरून जसजसे वर किंवा खाली म्हणजे उत्तरेस किंवा दक्षिणेस जाणाऱ्या वाऱ्याची दिशा एका कमानीसारखी वळताना भासते. उत्तर गोलार्धात ही गती चक्राकार; पण घड्याळ्याच्या उलट दिशेनं असते, तर दक्षिण गोलार्धात घड्याळ्याच्या सुलट्या दिशेनं असते. त्यामुळे जागतिक वाऱ्यांच्या दिशांवर हा परिणाम सततच दिसून येतो.

#जमिनीवर असणारी धूळ, धूर आणि इतर पदार्थांमुळं वारे अधिक सघन होतात. त्यामुळं ते वाहताना त्यात होणारं घर्षण जास्त, तर महासागरावर असणाऱ्या वातावरणात घर्षणबल कमी आढळतं. या सगळ्याचा परिणाम वारे वाहण्यावर होतो. वाऱ्याचा वेग वाढला, की त्यालाच आपण ‘वादळ’ म्हणतो
#geography
#mpscsimplified

# चक्रीवादळं ही उष्णकटिबंधात तयार होणारी आणि दोन्ही गोलार्धांत विषुववृत्तापासून दूर कमानीच्या आकारात पसरत मार्गक्रमण करणारी असतात.
-वादळांचे विविध प्रकार आहेत. (हरिकेन) झंझावात, (स्टॉर्म) तुफान, (सायक्‍लोन) चक्रीवादळ, (टायफून) आवर्ती किंवा अभिसारी चक्रवात, असे शब्द त्यासाठी आहेत.
- या प्रकारात जरी थोडे फरक असले, तरी या साऱ्यांचा उगम उष्णकटिबंधात (ट्रॉपिकल रीजनमध्ये) होत असल्यानं सगळ्यांनाच ‘ट्रॉपिकल सायक्‍लोन’ म्हणजे ‘उष्णकटिबंधीय
चक्रीवादळं’ म्हणतात.

#विषुववृत्तावर कधीही चक्रीय वादळ तयार होत नाही
कारण कोरिओलीस बल तेथे नसते.

#चक्रीवादळं कशी तयार होतात?

-चक्रीवादळं तयार होण्यासाठी मुख्य सहभाग असतो समुद्राच्या पृष्ठभागावरच्या पाण्याचं तापमान किती झालं आहे याचा.
-उन्हाळा-पावसाळा आणि हिवाळा-उन्हाळा या दोन्ही ऋतुबदलांच्या दरम्यान ही वादळं तयार होतात असं दिसतं. -विषुववृत्ताच्या पाच अंश उत्तर ते पाच अंश दक्षिण या भागात या वादळांचा अभाव दिसतो; पण त्याच्या वरच्या १८ अंश अक्षांशादरम्यानच्या सागरी विभागात आणि जिथं सागराच्या पृष्ठभागाचं तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस होतं, तिथंच ही वादळं निर्माण होतात असं दिसतं.
-या ठिकाणी वाऱ्यांची आणि वादळांचीही दिशा आधी पूर्वेकडून पश्‍चिमेकडं आणि नंतर ती वर उत्तरेकडं वळत कमानीसारखी परत ईशान्येकडं जाताना दिसते.
-सागरावरच्या अधिक तापमानाच्या जागी गरम हवा वरच्या दिशेनं आधी जाऊ लागते. त्यामुळं तिथं एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो. या जागेकडं (कमी दाबाच्या स्तंभाकडं) वाहणारे वारे सोबत पावसाळी ढगही घेऊन येतात. कारण वाढलेल्या तापमानानं सागराच्या पाण्याची वाफही हवेत बरीच तयार झालेली असते. वर जाणाऱ्या हवेच्या स्तंभाकडं येणारे वारे आणि ढग त्याभोवती वक्राकार, वर्तुळाकार फिरू लागतात. वर वर उचलले जाऊ लागतात. त्यांची जागा दुसरे ढग आणि वारे घेत ते मोठ्या वेगानं गोलाकार घुमू लागतात.
-पृथ्वीच्या परिवलनामुळं, कोरिऑलिस प्रेरणेमुळं हे वारे कमानीच्या मार्गानं पुढं कूच करू लागतात, त्यातून घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा जन्म होतो.
-पाण्याचं बाष्प असणारे ढग यात खूप उंचीवर पोचले, की तिथल्या थंड वातावरणानं त्या बाष्पाचं द्रवीभवन होऊन पाऊस पडू लागतो.

-चक्रीवादळाच्या मधल्या जणू रिकाम्या राहिलेल्या भागाला चक्रीवादळाचा ‘डोळा’ असं म्हणतात. त्या जागी वाऱ्याचा आडव्या दिशेनं फारसा वेग नसतो; पण या जागेकडं येणारे वारे मात्र प्रचंड वेगवान असतात, तर वर गेल्यावर ते जेव्हा पसरट होतात, तेव्हा त्यांचा वेग मंदावतो.
-या डोळ्यापासून जसजसे दूर जाऊ तसतसाही हा वेग कमी झालेला दिसतो. कधी कधी अशी चक्राकार गती असणारे अनेक स्तंभ एकाच मोठ्या चक्रीवादळाचा भाग बनतात. अशा वेळी त्यांची एकूण ऊर्जा वाढते. ते जास्त हानिकारक ठरतात.

# उच्च अक्षांशमधील चक्रीवादळे

-उत्तरेकडं अधिक अक्षांशावरही चक्रीवादळं तयार होतात. त्यांचा मार्ग या उष्णकटिबंधातल्या वादळांच्या उलट दिशेनं असतो.
- तिथले वारे पश्‍चिमेकडून पूर्वेकडं जाणारे असतात त्यामुळं असं होतं;
-शिवाय अशा वादळांचा कालावधीही वेगळा असतो. ही वादळं नोव्हेंबरच्या दरम्यान अधिक असतात. यांच्यामुळं पावसाऐवजी बर्फ जास्त प्रमाणात पडतो आणि थंडीची लाटही येते.

#चक्रीय वादळे नावे

-वादळं कुठं होतात, त्यांच्या जागा, त्यांचा अंदाजित कालावधी आणि त्यांच्यातल्या वाऱ्याचा वेग या वर्गीकरणातून विविध हवामान संस्थांना अशा चक्रीवादळांची नावं देण्यासाठी ठराविक क्षेत्रांसाठी नेमून दिलेलं आहे.
-त्यांनी आधीच ठरवलेल्या यादीतून ही नावं देण्यात येतात.
- साधारणपणे ताशी ६३ किलोमीटरपेक्षा जास्त वाऱ्याचा वेग आहे, अशा चक्राकार फिरणाऱ्या वादळाला, ते पाच ते सहा दिवसांपेक्षा जास्त टिकणारे असल्यास नाव देण्यात येतं.
- उत्तर अटलांटिक; तसंच पूर्व प्रशांत महासागराच्या क्षेत्रासाठी अमेरिकेतल्या, पश्‍चिम प्रशांत महासागरासाठी जपान, उत्तर हिंदी महासागरासाठी भारतीय, दक्षिण-पश्‍चिम हिंदी महासागरासाठी मादागास्कर, ऑस्ट्रेलियाशेजारच्या विभागासाठी इंडोनेशिया, दक्षिण प्रशांत महासागरासाठी न्यूझीलंड, तर दक्षिण अटलांटिक महासागरासाठी ब्राझीलच्या हवामान वेधशाळांना अशी नावं देण्याची मुभा असते.
- ही नावं आधीच तयार केलेल्या आणि मान्यता मिळवलेल्या यादीतून देण्यात येतात.

@mpsc_simplified