MPSC SIMPLIFIED(official)
34.4K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
🟪सूर्यप्रकाशात करोना विषाणू नष्ट होतात, अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा दावा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌺करोनाचे विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतात असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे.

🌺मात्र हा रिसर्च अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार विल्यम ब्रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सरकारी शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा विषाणूंवर परिणाम होत असल्याचा शोध लावला आहे. यामुळे उन्हाळ्यात करोनाचा फैलाव कमी होईल अशी आशा निर्माण झाली आहे”.

🌺“आतापर्यंतचा सर्वात मोठं निरीक्षण करताना सूर्याची किरणं जमीन आणि हवेत दोन्हीकडे विषाणूंचा खात्मा करत असल्याचं लक्षात आलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. “तापमान आणि आर्द्रता अशा दोन्ही वेळेला आम्ही पाहणी केली असता तोच परिणाम होत असल्याचं आमच्या लक्षात आलं. तापमान आणि आर्द्रता वाढवणं करोनाच्या विषाणूंसाठी कमी अनुकूल आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

🌺मात्र अद्याप हा रिसर्च सार्वजनिक करण्यात आलेला नाही. समिक्षा करण्यासाठी हा रिसर्च पाठवण्यात येणार आहे. यानंतरच तज्ज्ञ हा दावा कितपत खरा आहे याबद्दल सांगतील.

🌺अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये निर्जंतुकीकरण प्रभाव असल्याचा दावा याआधी करण्यात आला आहे. तसंच प्रयोग करताना अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता आणि तरंगलांबी कितपत ठेवण्यात आली होती, हा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला करण्यात आला आहे. “प्रयोग कसा करण्यात आला आणि निकालाचे निकष काय होते हे पहावं लागेल,” असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ ‘इंग्रजी’ आणि ‘स्पॅनिश’ भाषा दिन: 23 एप्रिल

दरवर्षी 23 एप्रिल या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘इंग्रजी भाषा दिन’ आणि ‘स्पॅनिश भाषा दिन’ पाळला जातो.

पार्श्वभूमी

संयुक्त राष्ट्रसंघाची 6 भाषांना मान्यता आहे. या सहाही भाषांना समान रूपाने उपयोगात आणण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी प्रत्येकी एक दिन पाळला जातो.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत –

🔸अरबी (18 डिसेंबर)

🔸फ्रेंच (20 मार्च)

🔸चीनी (20 एप्रिल)

🔸इंग्रजी (23 एप्रिल)

🔸स्पॅनिश (23 एप्रिल)

🔸रशियन (6 जून)

23 एप्रिलला प्रसिद्ध विल्यम शेक्सपियर यांचा जन्म आणि मृत्यू झाला. तसेच प्रसिद्ध लेखक मिगुएल डी. सर्वेन्टेस यांची पुण्यतिथी आणि अनेक महान लेखकांची जयंती याच दिवशी येते. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी 2010 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजनिक माहिती विभागाने भाषा दिनाची स्थापना केली.

बहुभाषिक आणि सांस्कृतिक विविधता पाळणे तसेच संघटनेत सर्व सहा अधिकृत भाषेचा समान वापर होण्यास प्रोत्साहन देणे हा भाषा दिनाचा उद्देश आहे.
🟪 DRDO ने पंधरा दिवसात उभी केली दिवसाला हजार करोना टेस्ट करणारी प्रयोगशाळा.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी मोबाइल व्हायरॉलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक प्रयोगशाळेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. या लॅबमुळे Covid-19 शी संबंधित संशोधन आणि चाचण्या वेगाने करणे शक्य होणार आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओ, हैदराबादस्थित एक हॉस्पिटल आणि खासगी उद्योगाने मिळून ही MVRDL लॅब विकसित केली आहे.

करोना व्हायरसविरोधात अनेक सरकारी संस्था आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. DRDO अशाच संस्थांपैकी एक आहे. व्हेंटिलेटर, पीपीई किटसह करोनावर उपचारासाठी आवश्यक ठरणाऱ्या उपकरणांची निर्मिती डीआरडीओने केली आहे.

डीआरडीओने बायोसेफ्टी लेव्हल २ आणि ३ ही प्रयोगशाळा विक्रमी १५ दिवसांमध्ये उभी केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अशी प्रयोगशाळा उभी करण्यासाठी सर्वसाधारणपणे सहा महिने लागतात.
🟪 मराठी प्रकाशक संघाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिलीप माजगावकर यांना जाहीर

⭐️जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी देण्यात येणा-या जीवनगौरव पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ प्रकाशक आणि राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर यांची, तर साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांची निवड करण्यात आली आहे.

⭐️अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती, जीवनगौरव आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली.तर दरवर्षी जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून प्रकाशक संघातर्फे जाहीर समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.

⭐️मात्र यावर्षी उद्धवलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादूभार्वामुळे सध्या केवळ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, भविष्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव संपल्यानंतर या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षा शशिकला उपाध्ये, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर आणि प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीने कळविले आहे.

⭐️तसेच आत्तापर्यंत जीवनगौरव पुरस्कराने पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, बेळगाव येथील नवसाहित्य प्रकाशनाचे जवळकर बंधू, अमरावती येथील नंदकिशोर बजाज, बॉम्बे बुक डेपोचे पां. ना. कुमठा, परचुरे प्रकाशन मंदिराचे आप्पा परचुरे आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. तर, साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने आजपर्यंत द.मा.मिरासदार, निरंजन घाटे आदी साहित्यिकांना गौरविण्यात आले आहे.
🟪भारतीय सशस्त्र दलाच्या कार्यप्रणालीचा आणि कोविड-19 विरोधी लढ्यातील सज्जतेचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आढावा

🍥भारतीय सशस्त्र दलाच्या कार्यप्रणालीचा आणि कोविड-19 विरोधी लढ्यातील सज्जतेविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व प्रमुख कमांडर सोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज आढावा घेतला.

🍥संरक्षण विभाग प्रमुख आणि सैन्य व्यवहार विभागाचे सचिव जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग, वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस.भदौरिया, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि सचिव (संरक्षण वित्त) गार्गी कौल यांनी संरक्षणमंत्र्यांसोबत या परिषदेत भाग घेतला.

🍥स्थानिक नागरी प्रशासनास सशस्त्र सेनेतर्फे करण्यात येत असलेल्या मदतीसाठी आणि कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात सशस्त्र सेनेच्या उपाययोजनांच्या सज्जतेविषयी संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या भूमिकेचे  कौतुक केले.

🍥कोविड- 19 विरुद्धच्या लढ्यासाठी सशस्त्र दलाने उपाययोजना करण्याबरोबरच या परिस्थितीचा शत्रूला गैरफायदा घेता येऊ नये यासाठी सज्ज राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

🍥कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर आर्थिक बोजा लक्षात घेता होणारी नासाडी टाळून आर्थिक संसाधने खर्च करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी सैन्य दलाला दिले.

🍥सैन्य दलांच्या संयुक्ततेच्या गरजेवर जोर देत संरक्षणमंत्र्यांनी मुख्य कमांडरना सांगितले की, लॉकडाउन संपल्यानंतर लवकरात लवकर करता येणारी कामे ओळखून त्यांना प्राथमिकता द्यावी जेणेकरून अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनास मदत मिळेल.
🟪केवळ 9⃣ 0⃣ रुपयांत सामाजिक दुरीकरण यंत्राची निर्मिती

🎇विरार : सध्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सामाजिक दुरीकरण ठेवणे आणि आपला हात तोंड आणि नाक यांच्या जवळ न नेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण कळत नकळत हे नियम तोडले जातात आणि करोनाचा धोका संभवतो. यावर विरारमधील एका किशोरवयीन मुलाने तोडगा काढला आहे.

🎇टाळेबंदीच्या काळात या मुलाने आपली कलात्मकता पणाला लावून घरातील वस्तूंपासून एक यंत्र तयार केले आहे. जे मनगटावर बांधल्यास तुम्हाला कुणालाही हात मिळविताना अथवा आपला हात तोंडावर नेताना सावध करणार आहे. केवळ ९० रुपयांत बनवलेले हे यंत्र करोनाच्या लढय़ात महत्त्वाचे ठरणार आहे.

🎇करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कुणाला हस्तांदोलन करू नका, चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू नका असे सल्ले तज्ज्ञांकडून देऊनही त्याचे पालन केले जात नसल्याने विरार फुलपाडा परिसरात राहणाऱ्या हर्ष चौधरी या नववीत शिकणाऱ्या मुलाने मोठय़ा कल्पकतेने यावर तोडगा म्हणून एक घडाळ्याच्या आकाराचे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र आपण हस्तांदोलन करताना आणि चेहऱ्याला स्पर्श करताना आपल्याला इशारा देते. हर्षने अगदी माफक दरात घरातील वस्तू वापरून हे यंत्र तयार केले आहे.