MPSC SIMPLIFIED(official)
34.4K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
🔳Join करा Simplified Discussion Group- Link 👇
@simplified_publication
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🟪​उत्तरप्रदेश: ‘जियोटॅग’ प्राप्त
समुदायिक स्वयंपाकगृहे असणारे
देशातले पहिले राज्य


🅾उत्तरप्रदेशातल्या समुदायिक स्वयंपाकगृहांना ‘जियोटॅग’ प्रदान करण्यात आले आहे, ज्यामुळे तयार झालेले अन्न कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आले आहे त्याविषयी माहिती उपलब्ध होते.

🔷इतर ठळक बाबी 🔷

🔥‘जियोटॅग’ सेवा मिळविण्यासाठी राज्य सरकारने गुगलकंपनीसोबत करार केला आहे.

🔥 राज्यातल्या 75 जिल्ह्यातल्या 7,368 स्वयंपाकगृहांमध्ये दिवसाला सुमारे 12 लक्ष डब्बे तयार केले जात आहेत. एकूण समुदायिक स्वयंपाकगृहांपैकी 668 धार्मिक संस्था आणि अशासकीय संस्था चालवित आहेत.

🔥भारताच्या ISROच्या रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर या संस्थेनी संचारबंदीच्या काळात जागोजागी अडकलेल्या गोरगरिबांना वेळेवर भोजन मिळावे त्याकरिता कार्यरत असलेल्या स्वयंपाकगृहांची भौगोलिक माहिती प्राप्त करण्यासाठी एक अनुप्रयोग विकसित केले आहे, जेणेकरून स्वयंसेवेचे व्यवस्थापन करता येणार आहे.
​​🟪मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा नवा सल्लागार गट.

✍काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेतील विषयांवर पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी एका सल्लागार गटाची स्थापना केली आहे.

✍माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या सल्लागार गटात 11 सदस्य असतील.तर यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अर्थमंत्री पी.चिंदबरम यांचाही समावेश आहे.

✍करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विषय सध्या चर्चेत आहेत. देशातील आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था याचबरोबर भविष्यासंदर्भातील वेगवेगळ्या विषयांवर पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी आणि ती जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसने हा सल्लागार गट तयार केला असल्याचे समजते.

✍माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या सल्लागार गटाचे अध्यक्ष असतील. तर राहुल गांधी, रणदीपसिंग सुरजेवाला, के.सी.वेगणुगोपाल, पी.चिदंबरम, मनिष तिवारी, जयराम रमेश, प्रविण चक्रवर्ती, गौरव वल्लभ आणि रोहन गुप्ता हे या सल्लागार गटाचे सदस्य असतील.
​​🟪“ही तर सुरुवात आहे, खरा विनाश तर अजून दिसायचाय”; WHO चा धोक्याचा इशारा

🅾करोनाने जगभरात थैमान घातला असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी खरा विनाश तर अजून दिसायचाय असं सांगत धोक्याचा इशारा दिला आहे. करोनाचा प्रभाव अद्यापही कमी झाला नसताना अनेक देश निर्बंध शिथील करत असल्याच्या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी हा इशारा दिला आहे. टेड्रोस यांनी यावेळी जगभरात जवळपास १ लाख ६६ हजारांहून जास्त जणांचा बळी घेणारा करोना व्हायरसचा प्रादुर्भाव का वाढेल याचं कोणतंही ठाम कारण सांगितलं नाही.

🅾जागतिक आरोग्य संघटनेने अफ्रिकेतून आजार पसरण्यास सुरुवात होईल असा दावा केला आहे. अफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्याने तेथून आजार पसरेल असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.  “आमच्यावर विश्वास ठेवा, खरा विनाश तर अजून दिसायचाय,” असं टेड्रोस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. “हे संकट रोखायला हवं. हा एक व्हायरस आहे जो अद्यापही अनेक लोकांना समजलेला नाही,” असंही ते बोलले आहेत.

🅾आशिया आणि युरोपातील काही देशांनी करोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर लॉकडाउनचे नियम शिथील केले आहेत. यामुळे शाळा, उद्योग सुरु करण्यात आले असून सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी उठवण्यात आली आहे. तसंच क्वारंटाइन होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.
🟪5मे पर्यंत इनकमिंग कॉलची सुविधा देण्याचा बीएसएनएलचा निर्णय

🔰कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडणे शक्य नसल्याने व रिचार्ज करणे अशक्य झाल्याने ज्यांची मुदत समाप्त झाली आहे, अशा ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बीएसएनएलने त्यांना 5 मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

🔰लॉकडाऊनमुळे रिचार्ज करण्यासाठी दुकाने बंद असल्याने अनेक ग्राहकांना रिचार्ज करता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्लँनची वैधता समाप्त झाल्याने त्यांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.

🔰तर ऑनलाइन रिचार्ज करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन बीएसएनएलतर्फे करण्यात आले आहे मात्र तरीही ज्यांना ऑनलाइन रिचार्ज करता येणे शक्य नाही त्यांना इनकमिंग कॉलची सुविधा कायम राहण्यासाठी पाच मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

🔰तसेच घर बैठे रिचार्ज व अपनो की मदद से रिचार्ज अशा दोन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. घर बैठे रिचार्ज योजनेत ग्राहकाने त्याचा क्रमांक नोंदवल्यावर बीएसएमएलचे प्रतिनिधी त्यांच्या घपी जातील व त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज करुन देतील.
🟪कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून भारताला 1 अब्ज डॉलरची मदत

🔰केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन 20 एप्रिल 2020 रोजी नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या (NDB) संचालक मंडळाच्या पाचव्या वार्षिक बैठकीत सहभागी झाल्या.

🔰बैठकीदरम्यान कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी भारताला 1 अब्ज डॉलर एवढा आपत्कालीन निधी देण्याची घोषणा बँकेकडून करण्यात आली आहे.

🔰बँकेनी आतापर्यंत भारताच्या 4,183 दशलक्ष डॉलर एवढ्या खर्चाच्या 14 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

🔴न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB)..

🔰BRICSच्या सदस्य देशांनी (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रीका) 2014 साली न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) स्थापन केली होती. 15 जुलै 2014 रोजी बँकेची स्थापना झाली. बँकेचे मुख्यालय शांघाय (चीन) येथे आहे. या बँकेचे पहिले आणि विद्यमान अध्यक्ष भारताचे के. व्ही. कामत हे आहेत.

🔰या बँकेचा उद्देश BRICS आणि अन्य उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्था आणि विकसनशील देशांमध्ये पायाभूत आणि शाश्वत विकास प्रकल्पांसाठी व्‍यापक संसाधने जमवणे हा आहे, जेणेकरून जागतिक विकासासाठी बहुराष्ट्रीय आणि क्षेत्रीय वित्तीय संस्थाद्वारे सध्या केल्या जात असलेल्या प्रयत्नांना गती देता येणार.

🔴कोविड-19 चा सामना करण्यासाठी भारतात केलेल्या विविध उपाययोजना...

🔰आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी भारत सरकारकडून 2 अब्ज डॉलर (15,000 कोटी रुपये) एवढ्या निधीची तरतूद केली गेली.गरीब आणि असुरक्षित वर्गातल्या लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी 25 अब्ज डॉलर एवढ्या निधीच्या सामाजिक सहायता योजनेची घोषणा केली.

🔰सध्या कार्यरत असलेल्या 22 लक्षापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रति व्यक्ती 67,000 डॉलर (50 लक्ष रुपये) विमासंरक्षण दिले.वैधानिक आणि नियामक अनुपालनात कंपन्यांना मदत देण्यासाठी अन्य तरतुदी तसेच भारतीय रिजर्व्ह बँकेद्वारे मुद्राधोरण उदार बनवण्याच्या उपाययोजना केल्या गेल्या.
🎇 न्या. दीपंकर दत्ता होणार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती.🎇

🔰मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायामूर्ती म्हणून न्या. दीपंकर दत्ता यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने शनिवारी केली.

🔰न्या. दत्ता सध्या कोलकाता उच्च न्यायालयात ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत. ते बढतीवर मुंबईत मुख्य न्यायाधीश म्हणून येतील.

🔰तसेच ‘कॉलेजियम’ची ही शिफारस आता केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाकडे जाईल व त्यानंतर न्या. दत्ता यांच्या नव्या नेमणुकीचे आदेश निघतील.तर सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. भूषण धर्माधिकारी येत्या 27 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.
🟪 ग्रेगरी मार्ग्युलिस आणि हिलेल फर्स्टेनबर्ग यांना 2020 या सालाचा एबेल पारितोषिक जाहीर.


📌 अमेरिकेचे गणितज्ञ ग्रेगरी मार्ग्युलिस
📌 इस्त्राएलचे गणितज्ञ हिलेल फर्स्टेनबर्ग

📌यांना संयुक्तपणे 2020 या सालाचा एबेल पारितोषिक जाहीर झाला आहे.

📌ग्रेगरी मार्ग्युलिस अमेरिकेच्या येल विद्यापीठात कार्यरत आहेत आणि हिलेल फर्स्टेनबर्ग इस्त्राएलच्या जेरुसलेम विद्यापीठात कार्यरत आहेत.

📌त्यांची संख्या शास्त्र आणि कॉम्बिनेटोरिक्स याबाबतच्या सिद्धांतामध्ये दिलेल्या योगदानासाठी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

🟢 एबेल पारितोषिक विषयी :-

📌‘एबेल पारितोषिक’ हा गणित शास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार आहे.

📌हा पुरस्कार नॉर्वेजियन अकॅडेमी ऑफ सायन्स अँड लेट्टर्स या संस्थेकडून दिला जातो.
🟪मॅट’च्या चेअरमनपदी न्या. मृदुला भाटकर यांची निवड

🔰महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण अर्थात ‘मॅट’च्या चेअरमनपदी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 7 एप्रिल रोजी त्यांनी आपल्या या पदाचा कार्यभार स्वीकारला.

🔰‘मॅट’च्या स्थापनेपासून आतापर्यंत गेल्या 28 वर्षात पहिल्यांदाच एका महिलेला चेअरमन पदाचा बहुमान मिळाला आहे.तसेच 8 जुलै 1991 ला मुंबई ‘मॅट’ची स्थापना करण्यात आली.

🔰 औरंगाबाद व नागपूर येथे ‘मॅट’चे खंडपीठ आहेत.न्या.मृदुला भाटकर आठ महिन्यांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाल्या. आता त्या ‘मॅट’च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळणार आहे.
🟪केरळमध्ये करोना चाचणीचा वेगवान, अचूक संच विकसित

🔰केरळमधील श्री चित्रा तिरूनाल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने करोनाचा किफायतशीर, वेगवान निदान चाचणी संच शोधून काढला असून त्यात दोन तासात चाचणीचा निकाल हाती येतो.

🔰तर ‘चित्रा जीन लॅम्प एन’ असे या संचाचे नाव असून त्याच्या मदतीने केलेल्या चाचण्या जास्त विश्वासार्ह आहेत.
‘रिव्हर्स ट्रान्सस्क्रिप्ट लुप मेडिएटेड अ‍ॅम्प्लिफिकेशन ऑफ व्हायल न्युक्लीइक अ‍ॅसिड’ (आरटी लॅम्प) पद्धतीने त्यात सार्स सीओव्ही 2 म्हणजे करोना विषाणूचा एन जनुक शोधून त्याच्या अस्तित्वाची खातरजमा केली जाते.

🔰तसेच संस्थेच्या संचालक डॉ. आशा किशोर यांनी सांगितले, जगात कुणी या विषाणूच्या ‘एन’ जनुकावर लक्ष केंद्रित करीत आहे की नाही हे माहिती नाही. आमचे तंत्रज्ञान स्वस्त, वेगवान असून पीसीआर (पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन) पद्धतीच्या तोडीस तोड चाचण्यांचे शंभर टक्के निकाल अचूक येत आहेत. देशभरात ही चाचणी वापरता येईल, कारण ती कमी खर्चिक व अचूक आहे.
करोना विषाणूतील ‘एन’ जनुकाच्या संदर्भातील ही चाचणी जगातील पहिलीच असू शकते. यात ‘आरटी लॅम्प’ हे तंत्र वापरले जाते.

🔰तसेच यातील चाचणी संच हा सार्स सीओव्ही 2 या विषाणूचे शरीरातील अस्तित्व शोधण्यासाठीच केलेला असून यात एन जनुकाचे दोन भाग तपासले जातात. त्यातील एका भागात उत्परिवर्तन झाले असेल तरी ही चाचणी चुकत नाही.
🟪JNCASR आणि IISc बंगळुरू यांनी कोविड-19 महामारीविषयी भविष्यवाणी करणारे तंत्र विकसित केले

🔰भारतीय विज्ञान संस्था (IISc बंगळुरू) आणि जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च (JNCASR) या संस्थेच्या संशोधकांनी कोविड-19 महामारीविषयी भविष्यवाणी करणारे तंत्र विकसित केले आहे.

🔴ठळक बाबी...

🔰या तंत्रामुळे विषाणूच्या बदलांचे आणि उत्परिवर्तनाबद्दल अल्पकालीन भविष्यवाणी आणि रोगाचा प्रसार झाल्यामुळे आवश्यक असलेल्या वैद्यकीय गरजा याविषयी शिफारसी प्रदान केले जातात.स्वरक्षण उपकरणे आणि व्हेंटिलेटरसारख्या वैद्यकीय साधनांची निश्चित आकडेवारी पुरविली गेली तर महामारीला व्यवस्थितपणे प्रतिसाद देण्यात हे तंत्र लक्षणीयरीत्या मदत करू शकते.

🔰तसेच हे तंत्र आवश्यक वैद्यकीय साठ्यांचा संपूर्ण आराखडा प्रदान करते, ज्याद्वारे जिल्हानिहाय गरजा पूर्ण करण्यात मदत होऊ शकते.हे तंत्र संपूर्ण देशाची राज्य आणि जिल्हानिहाय प्रगतीचा अंतर्दृष्टी देखील पुरवतो.