MPSC SIMPLIFIED(official)
34.4K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Forwarded from Nagesh Patil
◼️Buy Online Simplified Publication Books

www.simplifiedpublication.com

👉 No Shipping Charges
थाई मागूर माश्यांच्या संवर्धनावर महाराष्ट्रात बंदी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

◾विदेशी थाई मागूर माशांची संगोपन केंद्रे नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक विशेष मोहीम राबविण्यास हाती घेतली आहे.

◾थाई मागूर हा मासा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येही वाढू शकतो.

◾तो सर्वभक्षी आहे. त्यामुळे निसर्गात उपलब्ध इतर स्थानिक मासे प्रजातींना तो धोकादायक आहे.

◾यापूर्वीच, केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाने थाई मागूर माशांचे संवर्धन करू नये याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

◾राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार थाई मागूर माशांचे प्रजनन व मत्स्यपालनावर बंदी घातण्यात आली आहे.

◾या माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
नेर धामना सिंचन प्रकल्प

- अकोला जिल्हय़ातील तेल्हारा तालुक्यात नेर धामना हा सिंचन प्रकल्प आहे. त्याला ऑक्टोबर २००८मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रकल्पाकरिता १८१ कोटी १९ लाख रुपये खर्च ग्राहय़ धरण्यात आला होता. त्यानुसार, फेब्रुवारी २००९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागवण्यात आल्या.

- नेर धामना  प्रकल्प उभारण्यात येणारा परिसर खारपाणपट्टा होता. अशा भागात सिंचन करता येत नाही. हा संपूर्ण सपाट भाग असून त्या ठिकाणी पाणी अडवण्याची नैसर्गिक संरचना नाही. अशा परिसरात सिंचन केल्यास दोन ते तीन वर्षांत जमिनीच्या पोटातील क्षार वर येऊन जमीन खराब होते. असे असतानाही हा सिंचन प्रकल्प लादण्याचा निर्णय विदर्भ सिंचन विकास महामंडळाने (व्हीआयडीसी) घेतला.
संजय कोठारी: केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC)

राष्ट्रपतींचे सचिव असलेले संजय कोठारी ह्यांची नवे केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) पदावर नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती शरद कुमार ह्यांच्या जागेवर झाली.
या नियुक्तीव्यतिरिक्त केंद्रीय माहिती आयुक्त (CIC) पदावर वर्तमानात माहिती आयुक्तपदी कार्यरत असलेले बिमल जुल्का ह्यांचीही निवड केली गेली आहे.

🔸केंद्रीय दक्षता आयोग

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission) ही एक सर्वोच्च सरकारी संस्था आहे जी केंद्र सरकारच्या अंतर्गत होणाऱ्या भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी 11 फेब्रुवारी 1964 रोजी स्थापन करण्यात आली.

2003 साली आयोगाला वैधानिक दर्जा बहाल केला. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. आयोगात एक केंद्रीय दक्षता आयुक्त आणि जास्तीतजास्त दोन दक्षता आयुक्त असतात.
वर्तमानात एकही दक्षता आयुक्त नेमण्यात आलेलेल नाही
प्रियंका चोप्रा ठरली नंबर वन, केला नवा विक्रम.

◾️प्रियंका चोप्राने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडही गाजवले. आता प्रियंकाने आणखी एक उपलब्धी आपल्या नावे केली आहे. होय, इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड सेलिब्रिटी होण्याचा मान प्रियंकाच्या वाट्याला आला आहे.

◾️तसेच इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीयांच्या यादीत प्रियंका दुस-या क्रमांकावर (पहिल्या क्रमांकावर विराट कोहली – 5.3 कोटी फॉलोअर्स) आहे.

◾️तर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत ती अव्वल आहे. इन्स्टाग्रामवर प्रियंकाचे 4.99 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

◾️इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीत प्रियंकाने दीपिका पादुकोणला मागे टाकले आहे. दीपिकाचे 4.42 फॉलोअर्स आहेत.

◾️पाठोपाठ आलिया भटचे 4.32 कोटी तर अक्षय कुमारचे 3.68 कोटी फॉलोअर्स आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल पण प्रियंका एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्यासाठी तब्बल 1 कोटी 86 लाख रुपये घेते.
विद्यापीठाच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी रतन टाटा यांची सल्लागार परिषदेवर नियुक्ती.

🔸रतन टाटा यांच्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आणि आणि शैक्षणिक, औद्योगिक कार्यक्षेत्रातील जागतिक प्रवाहांचा सखोल अनुभव आता मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

🔸तसेच विद्यापीठात संशोधन व विकासविषयक धोरणे व कृती योजना याबाबत लवकरच शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्याकडून कार्यवाही होणार आहे.कारण मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर रतन टाटा आणि अनिल काकोडकर यांची राज्यपालांकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸तर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या नियमानुसार ही नियुक्ती केली असून महाराष्ट्र सरकारच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे.
उपायात्मक नियोजनासंबंधी विद्यापीठाला सल्ला देऊन विद्यापीठाच्या विकासासाठी विशेष काम हाती घेण्याचा पूर्ण अधिकार सल्लागार समितीच्या अध्यक्षास असतो.

🔸त्यामुळे सल्लागार परिषदेवर अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्या नामनिर्देशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


तसेच शिक्षण, संशोधन आणि विकास, प्रशासन यासंबंधीचे अहवाल कृती योजना सादर करून त्याद्वारे कुलगुरूंना सल्ला देणे, वित्तीय साधनसंपत्ती व सुशासन निर्माण करणे, जेणेकरून विद्यापीठ शैक्षणिकदृष्ट्या सशक्त, प्रशासनिकदृष्ट्या कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम व्यवस्था निर्माण करणे, यासाठी विद्यापीठाची सल्लागार परिषद काम करणार आहे.