MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
*भारत आणि रशिया यांच्या नौदलात दरवर्षी होणारा द्विपक्षीय सागरी सराव ‘इंद्रा नेव्ही’ 14 ते 21 डिसेंबर 2016 दरम्यान बंगालच्या उपसागरात होणार आहे. दोन्ही देशांच्या नौदलात सागरी सुरक्षा मोहिमांसाठी सामायिक प्रक्रिया विकसित करणे आणि आंतर कार्यान्वयन वाढवणे हा इंद्रा नेव्ही-16 चा उद्देश आहे. 2003 पासून सुरू झालेला सराव, व्याप्ती, सहभाग यासह इतर दृष्टीकोनातूनही विस्तारत आहे.

भारताची, क्षेपणास्त्र विनाशिका आयएनएस रणवीर, आयएनएस सातपुडा, आयएनएस कामोटी यांच्यासह डॉर्नियर लघु पल्ल्याचे सागरी गस्त विमान प्रामुख्याने या संयुक्त सरावात सहभागी होणार आहेत.*

_telegram.me/mpsc_simplified
राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तकसूची -अतुल कानडे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1132349533489335&id=10000142896789
प्रश्न
Sir kai other grup aahe te tumchech aahe ka i m sub wise group aahe te

Mpsc Simplified चा कोणताही दुसरा ग्रुप नाही..आपलं सर्व विचार धोरणे आणि कृती हि सिम्पलिफाइड आहे..नो कॉम्प्लिकेशन त्यामुळं फक्त एकच चॅनेल आहे..आणि ऑडिओ नोट्स चा एक चॅनेल आहे..

Telegram.me/mpsc_simplified

Telegram.me/simplified_audio
प्रियांका चोप्रा सदिच्छा दूत
नैराश्यग्रास्थ देशात भारत
राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची

१)इतिहास-

           शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,११,१२           NCERT-6,7,8 अथवा

           NCERT मराठी सारांश-विभोर बोठे-युनिक प्रकाशन

           प्राचीन  व मध्ययुगीन भारत          डॉ.बिरादार(ज्ञानदीप प्रकाशन) आधुनिक भारताचा इतिहास -ग्रोव्हर/कोळंबे/बिपीन चंद्रा/जयसिंगराव पवार(यापैकी कोणतेही एक) महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे

(प्रश्नाचे स्वरूप खूपच बदलले आहे.खूप प्रश्न या पुस्तकात सापडत नाहीत.त्यामुळे खूप पुस्तके वाचण्याच्या फांदात न पडता जे वाचणार ते चांगले करा.जे प्रश्न कुठेच मिळत नाही ते कोणालाच परीक्षेमध्ये येत नाहीत.जास्त पुस्तके वाचण्याचा मोह टाळा आणि कमीत कमी वेळ या विषयाला द्या.)

२)भूगोल-

     शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०,११,१२    NCERT-१०,११,१२ अथवा

    NCERT मराठी सारांश-विभोर बोठे,युनिक प्रकाशन

    भूगोल  – सुमंत सोळंके (मुख्य परीक्षेला पण खूप उपयोगी)    महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/दीपस्तंभ/खतीब यापैकी कोणतेही एक  Atlas-student atlas oxford publication/सवदी/नवनीत प्रकाशन (यापैकी कोणतेही एक)यातील प्रश्नांचा खूप सराव करा.संकल्पना समजल्या शिवाय पुढे जाऊ नका.

3)अर्थशास्त्र–

  शालेय पाठ्यपुस्तक १०.११.१२  NCERT मराठी सारांश-विभोर बोठे,युनिक प्रकाशन  अर्थशास्त्र-रंजन कोळंबे आणि किरण देसले (दोन्ही महत्वाची)–हि पुस्तके लेटेस्ट वापरावीत  महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2015-16  Developmet book-किरण देसले(अत्यंत महत्वाचे)

४)विज्ञान-

शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०(80% प्रश्न या पुस्तकातून येतात.परंतु आपण ते काळजीपूर्वक वाचत नाही.आपण फक्त पुस्तके वाचून  संपवण्यावर भर देतो.काळजीपूर्वक वाचा.)  NCERT- 8,9,10 (नाही वाचली तरी चालतात) सामन्य विज्ञान-ज्ञानदीप प्रकाशन/दीपस्तंभ प्रकाशन/युनिक प्रकाशन(कोणतेही 2)

५)राज्यव्यवस्था आणि पंचायतीराज

 शालेय पाठ्यपुस्तक ,८,९,१०,११,१२NCERT मराठी सारांश-विभोर बोठे,युनिक प्रकाशन Indian Polity-Laxmikant(वाचायला हवे.मुख्य परीक्षेत खूप प्रश्न यातून आले होते..हिंदी मध्ये पण उपलब्ध आहे.मराठी मध्ये नाही)भारतीय राज्यव्यवस्था-रंजन कोळंबे/तुकाराम जाधव(यापैकी कोणतेही एक)पंचायती राज- किशोर लवटे

६)पर्यावरण-

शालेय पाठ्यपुस्तक ९,१०,११,१२पर्यावरण -तुषार घोरपडे,युनिक प्रकाशनShankar IAS नोट्स(इंग्लिश मध्ये आहे,जमले तर वाचासोबत पर्यावरण विषयक चालू घडामोडी करा.त्यावर खूप प्रश्न पडतात.

७)चालू  घडामोडी

  लक्षवेध/एकनाथ पाटील/दत्ता सांगोलकर/देवा जाधवर/राजेश भराटे/कल्पवृक्ष/ज्ञानदीप/रमाकांत कापसे (कोणतेही एक वाचा,सर्व वाचण्याची गरज नाही)  Magazine- लोकराज्य , परिक्रमा/युनिक बुलेटिन/ज्ञानदीप एक्सप्रेस(कोणतेही एक)

 मराठी वर्तमानपत्र -सकाळ/लोकसत्ता/महाराष्ट्र  टाइम्स(कोणतेही एक,खूप वेळ जात असेल तर वाचले नाही तरी चालेल,परंतु आसपास काय चालू आहे त्याबद्दल माहिती कळते.आपली वैचारिक पातळी वाढते.)सकाळ पेपर वार्षिकी(सोबत असावे)

8) पेपर २

  CSAT सिम्पलीफाइड-डॉ.अजित थोरबोले,ज्ञानदीप प्रकाशन(passage कसे सोडवायचे त्याच्या tricks पहा.यातून दररोज 4 passage सोडवायचे.आपण कोठे चुकतो त्या लिहून काढायच्या आणि त्या दुरुस्त करायच्या.मागील प्रश्नपत्रिकेत कसे प्रश्न विचारलेत त्याचे analysis करा.यातील बुद्धिमत्ता आणि अंकगणित चे मागील प्रश्न पहा.)  Csat comprehension-महेश शिंदे (आणखी passage सोडवण्यासाठी)  अंकगणित–    *खालीलपैकी कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा)

i)सूजित पवार – युनिक प्रकाशन

ii)मिलींद पाटील – दीपस्तंभ प्रकाशन

iii)ज्ञानदीप प्रकाशन

  बुद्धिमत्ता–

*खालीलपैकी कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा)

i)सूजित पवार – युनिक प्रकाशन

ii)मिलींद पाटील – दीपस्तंभ प्रकाशन

iii)ज्ञानदीप प्रकाशन

iv)अनिल अंकलगी यांचे पुस्तक

८)इतर उपयोगी-

5500 प्रश्नसंच-किशोर लवटे(अत्यंत महत्वपूर्ण,प्रत्येक टॉपिक ला सुरवात करण्यापूर्वी आयोगाने कसे अगोदरच्या वेगवेगळ्या परीक्षेत प्रश्न विचारले त्याबद्दल या पुस्तकातून कळते)अभ्यास ते अधिकारी -मनोहर भोळे,युनिक प्रकाशन(जेव्हा केव्हा अभ्यास करताना अडचणी येत असतील तेव्हा यातून त्या सुटतील)  झ्झतात्यांचा ठोकळा-एकनाथ पाटील(जलद revision साठी)महाराष्ट्र वार्षिकी २०१५-१६ युनिक प्रकाशन(वेळ मिळेल तेव्हा नक्की यातील महाराष्ट्रविषयी भाग वाचा)    लोकसत्ता वार्षिकी


लक्षात घ्या हि पुस्तकांची परीक्षा नाही..कोणतेही पुस्तक घ्या..त्यातून तुम्ही परिक्षेकरिता तयार व्हायला हवे..एकदम पुस्तके विकत घेऊ नका..कारण पुस्तकाच्या edition मध्ये सारखे बदल होत असतात..खूप जणांनी सांगितलेले बुकलिस्ट वेगवेगळी असू शकते..म्हणून सर्व जण जे सांगितले ते सर्व पुस्तके विकत घेऊ नका..कोणतेही बुकलिस्ट वापरा..परंतु एकाच विषयाची भरमसाठ पुस्तके वाचू नका"
Telegram.me/mpsc_simplified
*राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 पेपर-1(GS) तयारी*

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज दि. 14 डिसेंबर 2016 रोजी
_राज्यसेवा पूर्व परीक्षा-2017_ साठीची *155*पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. सलग दुसऱ्या वर्षी अपेक्षेपेक्षा कमी पदांची जाहिरात आल्यामुळे थोडी नाराजी आहेच, पण जाहिरातीतील मुद्दा क्रमांक 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे उपलब्ध पदसंख्येत शासनाच्या विविध विभागांच्या मागणी नुसार बदल होऊ शकतो असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे पदांची संख्या वाढेल या सकारात्मक विचाराने अभ्यासास जोरात सुरवात करायला हवी. उपलब्ध पदे कमी असल्यामुळे पूर्व परीक्षेचे कटऑफ जास्तच लागणार हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही. राज्यसेवा पूर्वपरीक्षा हि सर्व परीक्षांमध्ये अवघड समजली जाते कारण पूर्वपरिक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची अमाप संख्या, पूर्व परीक्षेचा संक्षिप्त स्वरूपात दिलेला अभ्यासक्रम, प्रश्नांचे बदलते स्वरूप आणि काठिण्य पातळी.

राज्यसेवा पूर्व परिक्षेत पेपर 1 मध्ये एकूण 7 घटक दिले आहेत.

*घटक 1* -चालू घडामोडी
चालू घडामोडी मध्ये राज्य,राष्ट्रीय आणि आतरराष्ट्रीय घटक असा अभ्यासक्रम दिला आहे. चालू घडामोडी हा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी खूप महत्वाचा घटक मानला जातो. चालू घडामोडी मधील प्रश्नांचे विश्लेषण केल्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटक जास्त विचारले जातात असे आढळून येते. अलीकडच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यास त्यात व्यक्तिविशेष त्यातही निधन झालेल्या व्यक्ती यांच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. म्हणून निधन झालेल्या व्यक्तींची यादी बनवून त्यांच्या जीवनातील महत्वाच्या बारकाव्यांची टिपणे तयार करावीत उदाहरणा दाखल- जयललिता,आनंद यादव,महाश्वेता देवी, फिडेल कॅस्ट्रो, दिलीप पाडगावकर, निदा फाजली इत्यादी. विविध राज्यांनी सुरु केलेले नावीन्यपूर्ण उपक्रम यात अमुक तमुक सुरु केलेले पहिले राज्य. विविध पुरस्कार, समित्या, बैठका, नेमणूका, चर्चेतील व्यक्ती, शासनाच्या नवीन योजना, धोरणे, निर्णय, इतर राज्यांशी तुलना, लोकसंख्या-आरोग्य-शिक्षण विषयक तुलनात्मक आकडेवारी यावर भर द्यावा. चालू घडामोडी साठी लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स (Infographics), सकाळ वृत्तपत्रे, लोकराज्य मासिके (एक वर्षाची), MPSC Toppers ही Website, Press Information Bureau Website, ज्ञानदीप अकादमी, पृथ्वी अकादमी, राजपथ अकादमी यापैकी कोणत्याही 2 मासिकांचे वर्षभराचे अंक वाचावेत.

*घटक 2* -इतिहास
वारंवार बदलणाऱ्या sources मूळे इतिहास हा विषय पूर्व परिक्षेत एक अनिश्चित घटक होऊन बसला आहे. इतिहास विषयात _महाराष्ट्राचा इतिहास_ यावर प्रामुख्याने भर दिसून येतो. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी सर्व प्रथम 11 वी इतिहास हे स्टेट बोर्डाचे पुस्तक वाचावे, त्यानंतर गाठाळ यांचे महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक वाचावे, ग्रोव्हर (आणि रंजन कोळंबे )हे पुस्तक 'आधुनिक भारताचा इतिहास' साठी यातील गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांच्या कालावधीतील महत्वाच्या घटनांची यादी करावी. या पुस्तकातील चळवळी आणि लढे यांना इंडियन struggle फॉर इंडिपेंडेन्स या पुस्तकाचा के.सागर अनुवाद याची जोड द्यावी. अर्वाचीन आणि प्राचीन इतिहास हा नेहमीचा दुर्लक्षित परंतु मार्क्स मिळवून देणारा घटक आहे हे विसरून चालणार नाही. अर्वाचीन आणि प्राचीन इतिहासासाठी सर्व प्रथम स्टेट बोर्ड च्या पुस्तकाची टिपणे काढावीत, लुसेन्ट प्रकाशनाचे जनरल नॉलेज या पुस्तकातील ancient आणि medival हा घटक खूप महत्वाचा आहे. Timeline तयार केल्यास विविध ऐतिहासिक घटनांचा क्रम लक्षात राहील.

*घटक 3* -भूगोल
भूगोल मध्ये महाराष्ट्र,भारत आणि जगाचा भूगोल असा अभ्यासक्रम आहे. भूगोल या विषयात स्टेट बोर्डच्या नवीन पुस्तकांवर भर द्यावा. सर्व पाठयपुस्तके संकल्पना समजून चांगली वाचावीत. भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्र अँटलास आणि ऑक्सफर्ड स्टुडेंट अँटलास जवळ ठेवावीत. सवदी यांचे महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक सविस्तर वाचावे. NCERT आणि G.C leong या पुस्तकातून काही संकल्पना केल्यास फायदा होईल. राज्य, देश आणि जगातील पातळीवरील प्रमुख नद्या,डोंगररांगा,वने,खनिजे,पर्वते,पठारे, वारे,मैदाने, हवामान, इ गोष्टींचे चार्ट बनवावेत.

*घटक 4*- भारतीय राज्यघटना
हा तुलनेने सोप्पा आणि मार्क्स मिळवून देणारा घटक. राज्यसेवा मुख्य परीक्षेतील राज्यघटनेच्या पेपर च्या तुलनेत पूर्व परीक्षेत सोप्पे परंतु थोडे गोंधळात टाकणारे प्रश्न विचारतात. या घटकातील प्रश्नात चूकीला माफी नाही. राज्यघटना या घटकासाठी M. Laxmikant यांचे पुस्तक आत्यावश्यक. इंग्रजी वाचनाचा प्रॉब्लेम असेल तर रंजन कोळंबे यांचे आणि unique academy चे राज्यसेवा मुख्य परीक्षासाठीचे भाग 1 हे पुस्तक वाचावे. पंचायत राज साठी किशोर लवटे यांचे पुस्तक सर्वोत्तम राहील. राज्यघटना विषयात rights issues हा एक घटक आहे यात विविध आयोगाचे ज्ञानदीप अकादमीने बनविलेले चार्ट खूप छान आहेत. राज्यघटनेचे प्रश्
न हे नेहमी चालू घडामोडीला धरून तयार केलेले असतात म्हणून मासिकांमधील राजकीय हा भाग वाचत असताना त्याला घटनात्मक बाबींची जोड दिल्यास खूप फायदा होतो. चालू निवडणुकांमधील विविध पक्षांचा तुलनात्मक परफॉर्मन्स पाहून घ्यावा.

*घटक 5*-आर्थिक सामाजिक घडामोडी
या घटकात प्रामुख्याने दारिद्र्य, शिक्षण, आरोग्य,समतोल विकास, रोजगार, लोकसंख्या, विविध योजना यावर प्रश्न विचारले जातात. या घटकासाठी दीपस्तंभ प्रकाशनाचे किरण देसले लिखित Development पुस्तक अत्यावश्यक. या भागासाठी आर्थिक पाहणी च्या तुलनात्मक नोट्स काढणे फायदेशीर ठरते. मासिकांमधील आर्थिक व सामाजिक घडामोडी हा भाग काळजी पूर्वक अभ्यासणे.

*घटक 6*पर्यावरण
हा आणखीन एक तुलनेने सोप्पा घटक या घटकासाठी तुषार घोरपडे आणि गजानन टोम्पे लिखित पर्यावरण ही पुस्तके वाचावीत. इंग्रजी मधून शंकर IAS यांचे पुस्तक पण छान आहे.

*घटक 7*- सामान्य विज्ञान
सर्वाधीक प्रश्न विचारला जाणारा हा घटक पूर्व परीक्षा पास होण्यासाठी अतिमहत्त्वाचा आहे. या घटकांमध्ये बायॉलॉजी या विषयावर जास्त प्रश्न विचारले जातात. या घटकावर पकड मिळवण्यासाठी सर्वप्रथम 8 वी ते 12 वी सर्व पुस्तके समजून सविस्तर वाचावी. लुसेन्ट प्रकाशन च्या जनरल सायन्स या पुस्तकातील चार्ट आणि वेळ असेल तर सर्व पुस्तक वाचावे. डॉ संदीप भस्के लिखित सामान्य विज्ञान मराठीतील उपलब्ध पुस्तकातील उत्तम पुस्तक आहे. जास्तीचा वेळ असेल तर direct NCERT ची पुस्तके वाचावीत.


यासोबत नेहमी जवळ असावी अशी पुस्तके
किशोर लवटे -5500 प्रश्नसंच
मोहन देसले-पूर्वपरीक्षा स्रटेजिस्ट
तात्यांचा ठोकळा

सर्वांना सर्वकाळ शुभेच्छा 💐

*विशाल नाईकवाडे*
(प्रोबेशनरी तहसीलदार, धुळे)
Document from DIPTEE
SIMPLIFIED:
MPSC State Services Preliminary Exam 2017

Booklist in english👇

https://www.mpscsimplified.com/mpsc-preliminary-examination-books-in-english/#.WFFo5HrhXqA


💐💐💐💐💐💐💐💐💐

जॉईन mpsc सिम्पलिफाइड टेलिग्राम ग्रुप
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

√Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
√उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
√फक्त परिक्षाभिमुख माहिती
√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
💎join kara---https://telegram.me/mpsc_simplified

शेअर करा
Economics
Infograohics-nuclear power
Economics-currency
Geography
Politics-handicapped person:resevation
Channel name was changed to «MPSC SIMPLIFIED(official)»
SIMPLIFIED:
New username. @mpscsimplified