MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
#current
#mpscsimplified

उपग्रहाबाबत थोडक्यात
1228 किलो : उपग्रहांचे एकूण वजन
5 : देशांचे उपग्रह (भारत, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इंडोनेशिया)

एकाच वेळी सोडलेले उपग्रह
33 : रशिया (2014)
29 : नासा (2013)
20 : भारत (2016)
#current
#mpscsimplified
#mpscmain_paper4

सीओईपीच्या 'स्वयम्'चेही प्रक्षेपण

महासागरात भरकटलेले जहाज किंवा जंगलात हरवलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी उपयुक्त ठरणारा "स्वयम्' उपग्रह पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) तयार केला आहे.

त्याचे प्रक्षेपणही आज श्रीहरिकोटा येथून झाले आहे.

जगातील सर्वांत लहान दुसरा असलेला हा उपग्रह तयार करण्यासाठी महाविद्यालयात 2008 पासून संशोधन सुरू होते.

त्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेशी करार करण्यात आला होता.

आतापर्यंत 176 विद्यार्थ्यांनी या उपग्रहाच्या निर्मितीसाठी योगदान दिले आहे.

हा संपूर्णतः भारतीय बनावटीचा आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तयार केलेला उपग्रह आहे.

त्याचा शंभर मिलिमीटर बाय शंभर मिलिमीटर बाय 113 मिलिमीटर एवढा लहान आकार आहे.
#hr
#current

जागतिक निर्वासित

एकूण लोकसंख्येच्या 1 टक्के लोक निर्वासित

स्वदेशातील अशांतता, युद्धजन्य वातावरण आणि इतर काही कारणांमुळे इतर देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या जगभरातील नागरिकांच्या संख्येने यंदा उच्चांक गाठला आहे. 2015 या वर्षाच्या अखेरीस 6 कोटी 53 लाख नागरिकांना घर सोडावे लागल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितले आहे.



स्थलांतरितांच्या संख्येने प्रथमच सहा कोटींचा आकडा पार केला आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.

अफगाणिस्तान, इराक, सीरिया, येमेन, पॅलेस्टाईन येथील अशांत परिस्थितीमुळे मोठ्या संख्येने नागरिक युरोपमध्ये प्रवेश करत आहेत.

बेघर झालेल्यांपैकी 60 टक्के नागरिक त्यांच्याच देशात इतरत्र आश्रय घेत असले तरी 40 टक्के नागरिक देशच सोडून जात आहेत. या देशांमधील स्थिती अजूनही सुधारण्याची चिन्हे नसतानाच स्थलांतरितांमुळे त्यांना सामावून घेणाऱ्या देशांमध्येही नवे प्रश्‍न निर्माण होत आहेत.

या देशांमधील गुन्ह्यांमध्ये 17 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

मानवतेच्या दृष्टिकोनातून बहुतेक देश स्थलांतरितांना आश्रय देत असले तरी त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायाने समाजावर पडणाऱ्या ताणामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ लागला आहे.

जर्मनीमध्ये सर्वाधिक निर्वासितांनी आश्रय घेतला आहे.

निर्वासितांची परिस्थिती
7.34 अब्ज : जगाची लोकसंख्या
6.53 कोटी : निर्वासितांची संख्या
58 लाख : निर्वासितांमध्ये झालेली वाढ
49 लाख : सीरियामधील निर्वासित
27 लाख : अफगाणिस्तानमधील निर्वासित
11 लाख : सोमालियामधील निर्वासित
#economics
#upscpre

Deputy Governors of RBI:

The RBI has four deputy governors and typically two are from the outside, of which traditionally one is a commercial banker and the other an economist.

The two others are promoted from within the central bank’s ranks.

A central bank Deputy Governor can be appointed for a term with a maximum of five years or till the age of 62, whichever is earlier.
#upscpre
#current

GI tag:

The GI tag is an indication which is definite to a geographical territory. It is used for agricultural, natural and manufactured goods. For a product to get GI tag, the goods need to be produced or processed or prepared in that region. It is also essential that the product has special quality or reputation.

Recently The fight is between Odisha and West Bengal, with each one claiming ownership of rasagolla.
#stimains
#mpscsimplified
#mpscmain_paper4
#upscpre

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

1.शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.

2.केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये सन 2015-16 पासून ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ या समाविष्ट केली आहे.

3.प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे (more crop per drop) हा या योजनेचा उद्देश आहे.

4.सन 2014-15 पर्यंत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना 80:20 (केंद्र 80 टक्के व राज्य 20 टक्के) या प्रमाणात राबविण्यात येत होती.

5.केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र व राज्य हिश्श्याच्या अर्थसहाय्याचे प्रमाण 60:40 निश्चित केलेले आहे.

योजनेची व्याप्ती :
राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे.

योजनेची उद्दिष्ट्ये :
1. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे.
2. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे.
3. कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात   वृद्धी करणे.
4. समन्वयित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे.
5. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याची वृद्धी व प्रसार  करणे.
6.  कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.

योजनेत अंतर्भूत घटक :
1.ठिबक सिंचन: इन लाईन, ऑन लाईन, सबसरफेस, मायक्रोजेट, फॅनजेटस.
2. तुषार सिंचन: मायक्रो स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, पोर्टेबल स्प्रिंकलर व रेनगन.