MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Share image
#mpscpre2017
#upscpre2017
Surgical strikes are part of India’s Cold Start doctrine and have proved effective in foiling a new infiltration bid by terrorists groups across the LoC who were ready to attack several locations in Jammu and Kashmir and other Metro cities in India.

Telegram.me/mpsc_simplified
#upscpre2017
#mpscpre2017
#stimains2016
#enviornment

1.India announced to ratify the Paris agreement on October 2 to show its support for need to contain the rising global warming and the challenges emerging thereafter.

The Paris agreement will become operational post 2020 after the retirement of Kyoto protocol.

India has agreed to ratify the Paris Agreement—which aims to contain the increase in earth’s temperature to 2 degrees Celsius, and if possible 1.5 degrees Celsius, above pre-industrial levels.

Paris agreement materialized at the 21st Conference of Parties of the United Nations Framework Convention on Climate Change.

It requires 55 countries accounting for at least 55% of global greenhouse gas emissions to ratify it in order for it to come into force.

2.डिजिटल लॉकरमध्ये महाराष्ट्र टॉपर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ‘डिजिटल लॉकर योजने’चा देशात सर्वाधिक लाभ घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशातील सर्वांसाठी असलेल्या या सेवेमुळे वेळ व कष्ट वाचतोच, शिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या लॉकरमुळे कागदपत्रांची सॉफ्टकॉपी आपणास हवी तेव्हा मिळू शकते.

एकप्रकारे ‘इलेक्ट्रॉनिक तिजोरी’च असलेल्या या लॉकरचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. फेब्रुवारी २0१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ झाला. सध्या डिजिटलचे युग असल्याने सर्वच क्षेत्रांत पेपरलेस कामकाजाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे जन्मदाखल्यापासून शालेय, पदवीची प्रमाणपत्रे, महसूल विभागातील दस्तावेज, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, आदी अनेक महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवणे आणि सहजासहजी उपलब्ध करणे यामुळे शक्य होणार आहे. यासाठीच ‘डिजिटल लॉकर’ची सोय अतिशय फायदेशीर ठरली आहे.

‘डिजिटल लॉकर’चा वापर करण्यात महाराष्ट्र आघाडीवर असून, पंजाब सर्वांत कमी म्हणजे १३ व्या स्थानावर आहे. महाराष्ट्राने मात्र आघाडी घेतली असून, १.२ लाख नागरिकांनी नोंद केली असून, मुंबई राज्यात अव्वल स्थानावर आहे.
मेल हॅक होण्याचे प्रमाण वाढल्याने ई-मेलवर कागदपत्रे ठेवून धोका पत्करण्यापेक्षा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर कागदपत्रे डाउनलोड करून निश्चिंत राहण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे.

कसे उघडावे अकाऊंट
http://digitallocker.gov.in या वेबसाईटवर आधार क्रमांक आणि आपला मोबाईल क्रमांक लॉग इन करून खाते उघडता येते. मूळ कागदपत्रे स्कॅन करून या वेबसाईटवर डाउनलोड करता येतात. १0 एमबी ते १ जीबीपर्यंत डाटा अपलोड करण्याची क्षमता यामध्ये उपलब्ध आहे.

डिजिटल लॉकर म्हणजे काय?
आपल्या मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रती सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली योजना म्हणजे डिजिटल लॉकर होय. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाने सुरु केलेल्या या लॉकरमध्ये एका क्लिकवर आपली वैयक्तिक माहिती उपलब्ध होवू शकते. अतिशय सुरक्षित आणि सुलभ पध्दतीने कधीही आणि कोठेही लॉकर हाताळता येतो.

राज्यात मुंबईतील सदस्य सर्वाधिक

3.इस्रोच्या 'आकाशातील डोळ्या'ची लष्कराला मदत
.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांसाठी भारतीय लष्करानं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची - इस्रोची मदत घेतली होती. या धडक कारवाईत, 'आकाशातील डोळा' मानल्या जाणाऱ्या कार्टोसॅट उपग्रहाद्वारे मिळालेल्या हाय-रेझोल्युशन प्रतिमांचा खूपच फायदा झाला. एखाद्या मोठ्या 'ऑपरेशन'साठी कार्टोसॅट उपग्रहाची मदत घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे.
.
लष्कराला हव्या त्या भूभागाचे फोटो पुरवण्याचं महत्त्वपूर्ण काम इस्रोचं पथक करत असतं. कार्टोसॅट इमेजद्वारे त्यांना विशिष्ट भूभागाचा पूर्ण अंदाज येतो आणि त्यादृष्टीनं रणनीती आखता येते. 'कार्टोसॅट-२ सी'मुळे भारतीय लष्कराची पाळत ठेवण्याची आणि शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवण्याची क्षमता चांगलीच वाढली आहे. ०.६५ मीटरच्या हाय-रेझोल्युशन प्रतिमा या उपग्रहामुळे मिळू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात असे अनेक फोटो इस्रोकडून संरक्षण खात्याला पाठवण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतं. दहशतवाद्यांचे तळ ज्या भागात होते, प्रामुख्याने तिथले (एरिया ऑफ इंटरेस्ट) फोटो लष्कराने मागवले होते.
दरम्यान, अंतराळातून आलेल्या फोटोंवर हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये काम केलं जातं. अस्पष्ट फोटो स्वच्छ-स्पष्ट करून ते लष्कराला पाठवले जातात.

4.आशिया कप: भारताला जेतेपद

चुरशीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या मिनिटाला निर्णायक गोल डागून बांगलादेशचा पराभव करत भारताने १८ वर्षांखालील मुलांच्या आशिया कप हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. उपांत्य सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.


Telegram.me/mpsc_simplified
1ऑक्टोबर -विक्रिकर दिन
Mpsc timetable