MPSC DECODED
8.88K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
polity imp points - Page 2
polity imp points - Page 3
polity imp points - Page 4
3 rd lecture on Human Rigth👆
Lecture no. 4 on NHRC
https://youtu.be/xsTpTI5GK1g


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा या परीक्षेतून निवड झालेल्या वर्ग २ च्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वनामती, नागपूर येथे होते. त्या प्रशिक्षणासंदर्भतील अनुभवाचा चा भाग-१ प्रत्येक अधिकाऱ्यांकडुन..

Join us @mpscdecoded
🤗 खुषखबर 'एमपीएससी'ची याच वर्षी होणार परीक्षा... 🤗
कधी ते नक्‍की वाचा 

🟢 युपीएससीसह अन्य परीक्षांच्या तारखा पाहून ठरेल वेळापत्रक 

🟡 राज्यातील दोन लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची (एमपीएससी) तयारी करीत आहेत. कोरोनामुळे दोनदा परीक्षांचे वेळापत्रक रद्द करावे लागले. तरीही आता 'युपीएससी'चे वेळापत्रक जाहीर झाले असून आणखी केंद्र व राज्य सरकारच्या अन्य कोणत्या विभागांच्या परीक्षा आहेत का, याचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार 'एमपीएससी'च्या परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित होईल. या वर्षात परीक्षा नक्‍की घेण्याच्यादृष्टीने तयारी सुरु आहे. 
👉 गीता कुलकर्णी, प्रभारी उपसचिव, एपीएससी, मुंबई 


🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य सेवेची पूर्व परीक्षा 26 मार्चला घेण्याचे ठरविले होते. त्यानंतर पुन्हा वेळापत्रकात बदल करावा लागला. मात्र, आता 'युपीएससी'च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता परीक्षा केंद्रांची उपलब्धता अन्‌ केंद्र व राज्य शासनाच्या अन्य विभागांच्या परीक्षांच्या तारखांचा आढावा 'एमपीएससी'कडून घेतला जात आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केल्याने डिसेंबरपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होतील आणि काही दिवसांत वेळापत्रक जाहीर होईल, असे 'एमपीएससी'च्या प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सांगितले. 

🔵 कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होतील का, याबाबत संभ्रम आहे. तर दुसरीकडे राज्यातील परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि अन्य परीक्षांची आढावा घेऊन राज्य सेवेची पूर्व परीक्षा आणि पोलिस उपनिरीक्षक व मंत्रालयीन सहायक या पदांची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक 'एमपीएससी'कडून निश्‍चित केले जात आहे. कोविड-19 च्या संशयित तथा बाधित रुग्णांसाठी राज्यातील बहूतांश महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. आता खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्स ठेवावा लागणार असल्याने जास्तीत जास्त इमारती तथा वर्ग खोल्यांची गरज लागणार आहे. तर दुसरीकडे बहूतांश विद्यार्थी युपीएससी, एमपीएससीसह राज्य शासनाच्या विविध परीक्षांची तयारी करीत असतात. त्यामुळे त्या परीक्षांच्या तारखा सोडून परीक्षा कोणत्यावेळी घेणे विद्यार्थ्यांसह 'एमपीएससी'ला सोयीस्कर होईल, पुरेशा प्रमाणात परीक्षक उपलब्ध होतील का, याचे नियोजन सुरु झाले आहे. तर दुसरीकडे जिल्हाबंदीचा परीक्षांवर काही परिणाम होईल का, याचीही स्थिती जाणून घेतली जात आहे. दरम्यान, डिसेंबरपर्यंत निश्‍चितपणे 'एमपीएससी'ची परीक्षा घेतली जाईल, असा विश्‍वासही उपसचिव कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्‍त केला.

All about HDI Index 👆
*श्री. गुरु गोबिंद सिंगजी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियरिंग अँन्ड टेक्नोलॉजी, विष्णूपुरी (नांदेड*) यांनी आपल्या महाविद्यालयातील कतृत्ववान *माजी विद्यार्थीची यशोगाथा* येणाऱ्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन व प्रेरणादायी ठरावी यासाठी *एसजीजीएस आयकाँन* असा एक उपक्रम राबवत आहेत. त्यामध्ये *अश्विनी शेंडगे, डीवायएसपी,पवनी* यांची यशोगाथा.

Join us @mpscdecoded


एसजीजीएस आयकॉन....

रोल मॉडेल पोलीस उपअधीक्षक: अश्विनी शेंडगे
-- प्रा. डॉ. रवींद्र जोशी
"दररोज नवीन नवीन आव्हाने येत असतात, आपल्याला तत्पर राहणे गरजेचे असते. दिवस-रात्र, शनिवार-रविवार, सणवार, कुठल्याही क्षणी कॉल येतो. इथे घटना घडली, तातडीने या. आहे त्या मनुष्यबळासोबत घटनास्थळी त्वरित पोहोचावे लागते. तत्परतेने परिणामकारक निर्णय जागेवर घ्यावा लागतो आणि स्थिती नियंत्रणात ठेवावी लागते. लेडीज ऑफिसर जेव्हा चौकात उभी असते तेव्हा समाज विशेषतः मुली एक आत्मनिर्भर, रोल मॉडेल म्हणून आपल्याकडे पाहात असतात आणि तशी कामगिरी करावी लागते.' पोलीस उप अधीक्षक अश्विनी शेंडगे या शंकरराव चव्हाण सभागृहाच्या मंचावरून तरुणाईला संबोधीत करत होत्या. टाळ्यांचा कडकडाट झाला, तरुणांची दंड फुलली, मुली स्वयंनिर्भरतेने भुवया उंचावत होत्या. ज्या मंचासमोर त्यांनी २०-२५ प्रशासकीय सेवेतील यशस्वी अधिकाऱ्यांची भाषणे ऐकली होती, आज त्याच मंचावर त्या वक्ता होत्या. अशा आत्मनिर्भर, रोल मॉडेल, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे एसजीजीएस नांदेडच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या २०१४ सालच्या विद्यार्थिनी आहेत.
अश्विनी मूळची सांगली जिल्ह्यातील झरे या गावची. ज्या गावात वर्षातले सात महिने टॅंकरने पाणीपुरवठा होतो, मुलं-मुली, बायका पाण्यासाठी रांगेत थांबायची, त्या गावची ती. वडील रामचंद्र शेंडगे व्यवसायाने शिक्षक, तीन मुली, एक मुलगा एकूण चार अपत्य, त्यापैकी अश्विनी एक. ती लहानपणापासून सर्वगुणसंपन्न अशी गुणी मुलगी होती. शाळेत सरांनी दिलेली आव्हाने, ती पुढाकार घेऊन स्वीकारायची. पाचवीत असताना ९५% गुण घेऊन शाळेत पहिली आली. तेव्हा प्राचार्यांनी अभिनंदन करून सांगितलं, एकदा टॉप राहणं सोपं असतं पण सातत्य ठेवणं हे कठीण. हे शब्द कोमल मनावर कोरले गेले आणि ती सतत दहावीपर्यंत शाळेत टॉप असायची. वडील गणिताचे शिक्षक, 'पोरगी काय दहावीला गणितात दिवे लावणार? त्यात ती आजारी आहे,' असा शिक्षकांनी टोमणा मारला. वडिलांना मान खाली घालण्याची वेळ येऊ द्यायची नाही. तिने आव्हान स्विकारले, जिद्दीने पेटली आणि गणितात १५०/१५० गुण मिळविले.
अभ्यासापेक्षा खेळात जास्त आवड. ती मुलांसोबत जास्तीत जास्त खेळ खेळायची. क्रिकेट हा सर्वात आवडीचा खेळ. तसेच वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला, बक्षीसेसुद्धा पटकावली. नृत्यकलेत तर ती निपुण होती. आठवीत असताना राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. सर्वांगिण व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असताना, प्रशासकीय सेवेत जायचं, याचं बीज शालेय जीवनातच तिच्या मनात रोवल्या गेलं. सांगलीच्या कलेक्टर मनीषा मेह्स्कर मॅडमला ऐकलं होतं, वर्तमानपत्रात वाचलं होतं. त्यांच्या प्रभावशाली कर्तृत्वान प्रशासनाने ती प्रभावित झाली. पूर्व सांगली जिल्हात जेव्हा पाण्याचे दुर्भिक्ष होते तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंधारणाचे परिणामकारक उपयुक्त प्रकल्प घडवून आणले. स्त्रियांसमोरचा पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न सोडवला. तेव्हा गावातील स्त्रिया त्यांच्याबद्दल चर्चा करायच्या, त्या म्हणायच्या, 'ती कलेक्टर बाई लई गुणी पोरगी आहे.' यामुळेच अश्विनीची मनीषा मॅडम रोल मॉडेल झाली. आपण असंच अधिकारी व्हावं जेणेकरून आपल्याला समाजासाठी अधिकारपूर्वक कार्य करता येईल, अशी तिने शालेय जीवनात ध्येयनिश्चिती केली.
अश्विनी तर प्रतिबिंब होतं तिच्या आजीच. तिची आजी ९२ वर्षांची आहे, तरिही आज त्या दोन किलोमीटर स्वतः शेतात पायी जातात, कामे स्वतः पाहतात, सुईत दोरा सुद्धा स्वतः टाकतात, अशा खंबीर आजीचा तिला पाठिंबा. तिसरी मुलगी म्हणून कुटुंबाचा, समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. त्याकाळात सांगली जिल्ह्यात भ्रूणहत्येचे प्रमाण जास्त होतं, सर्वांना मुले पाहिजे होती. पण अश्विनीची आई तर आजीला एकुलती एक मुल.. आजी अशिक्षित असली तरीही ती मुलीचे महत्त्व ओळखून होती. अश्विनीला नवोदयला पाठवणार होते परंतु आजी खंबीर, 'लेकरू गुणी आहे, इथेच शिकणार,' आणि अश्विनी आजीच्या विश्वासास पात्र ठरून दहावीत पहिली आली आणि तिने बारावी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथून केले.
२०१० साली एसजीजीएसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. घरापासून ५०० किलोमीटर अंतरावर दूर मुलगी कशी राहणार, घरच्यांची काळजी. पण खंबीर अश्विनीने सर्वांना धीर दिला. तशी ती होमसिक नव्हती. द्वितीय वर्षात असताना नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली. त्यांनी स्तुत्य उपक्रम घडवून
1
आणला. विद्यार्थ्यांना यूपीएससीसाठी स्वतःच्या चेंबरमध्ये मार्गदर्शन करायचे. नंतर जागा कमी पडत होती, त्या उपक्रमाने वटवृक्षाचा आकार घेतला. मार्गदर्शनासाठी शेकडोच्या संख्येने मुलं-मुली यायची. शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व्हायची आणि अश्विनी पहिल्या रांगेत बसून सर्वांची भाषणे ऐकायची. एमपीएससी, यूपीएससी द्यायची, आता इरादा पक्का झाला होता. एसजीजीएसमध्ये सुद्धा यूपीएससी चॅप्टर होता. आठ-दहा जणांचा ग्रुप केला, इंजिनिअरिंगचा अभ्यास झाल्यानंतर ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे. अश्विनीने इंजिनिअरिंगच्या अभ्यासाला प्राधान्य दिले. तिला माहित होते, इथे आपण अव्वल राहिलो तरच आपण पुढे आयुष्यात यशस्वी होणार.
कॉलेजमध्ये असताना सुद्धा सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा हिरीरीने भाग असायचा. ती राष्ट्रीय सेवा योजनेची कॉर्डिनेटर व महिला प्रतिनिधी होती. कॉलेजच्या वार्षिक अंक 'दृष्टीत' सुद्धा सक्रिय सहभाग असायचा. तिला वाटायचे यामुळे आपला दृष्टिकोन सकारात्मक होणार. जलदिंडी कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग. गोदा नदीच्या तीरावरील गावांना भेटी, रात्री मुक्काम, ग्रामीण जीवनदर्शन, गावात भजन-कीर्तन, भारूडाच्या रूपाने जनजागृतीसाठी अनेक उपक्रम केले. तिला या सर्व गोष्टींचा एमपीएससीच्या मुलाखतीत खूप फायदा झाला कारण प्रात्यक्षिक अनुभवाने तिचा पाया मजबूत झाला होता. इंजिनीअरिंगच्या कंपन्याची मुलाखत दिलीच नाही कारण तिचं ठरलेलं होतं, प्रशासकीय सेवा. या ध्येयाने प्रेरित होऊन २०१४ साली चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन इंजिनिअरिंग मधून बाहेर पडली.
सोशल मीडियाचा भरपूर उपयोग केला, माहिती घेतली. पुण्यातील स्वरूपवर्धिनी सेवाभावी संस्थेचा शोध घेतला. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली. ही संस्था एक वर्ष लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ग्रंथालय व गेस्ट लेक्चर मोफत देत असते. अश्विनीने वडिलांना आपला निर्णय कळविला. एक वर्ष वेळ द्या, अभ्यासाचा प्रवाह जो आहे तो कायम राहील, यात यश नाही मिळाल्यास परत इंजिनिअरिंगच्या क्षेत्राकडे वळेल. वडिलांनी आधार दिला, खंबीर आजीचा आशीर्वाद घेतला. तिने पुण्यातल्या स्वरूपवर्धिनीच्या ग्रंथालयात बसून १२-१४ तास दररोज स्वतः अभ्यास केला कारण इंजिनीअरिंगमध्ये उत्तम गुण मिळवल्यामुळे स्वतःवर विश्वास होता, आपण करू शकतो. मोबाईल, सोशल मीडिया, नातेवाईक, मौजमजा, खेळ, मित्र सगळ्यांपासून दूर, एकच ध्येय एमपीएससी. ती जिद्दीने पेटली, २०१५ साली फॉर्म भरला. तांत्रिक अडचणी आल्या, परीक्षा देऊ शकली नाही. ती खचली नाही, अजून जोमाने अभ्यास केला. २०१६ साली ती पहिल्याच प्रयत्नात प्री, मेन्स, इंटरव्यू यशस्वी होऊन २०१७ साली पोलीस उपधीक्षाक (Dy.SP/ACP) या पदावर निवड झाली. आजीला फोन केला, आजी आनंदाने गहिवरली, 'गुणी पोरगी, मला माहित होतं तू जिंकणार.' ज्या समाजाला, कुटुंबाला मुली जड वाटतात, नको असतात, गुरुजींच्या मुली डॉक्टर, शिक्षिका व अश्विनी प्रशासकीय सेवेतील उच्च अधिकारी झाली. गावात सत्कार, मानसन्मान, 'पोरीने बापाचं नाव मोठं केलं', तीच लोक म्हणायला लागली.
ध्येयवादी लोकांच कार्य सुद्धा सिद्धीस जाते. अश्विनीला प्रशिक्षणानंतर परीविक्षाधिन कालावधीत नांदेडला पोस्टींग मिळाली. ज्या महाविद्यालयात ती शिकली, घडली, मौजमजा केली, जिथे प्रेरणादायी व्यक्तींचं कर्तृत्व पाहिलं, ऐकलं; त्याच ऑडिटोरियमच्या मंचावरती विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी ती वक्ता म्हणून आली होती. अभिमानाने ती गहिवरली. आनंदाश्रू तिच्या गालावर नकळत आले, तिने लपविण्याचा प्रयत्न केला. पण खंबीर, आत्मनिर्भर अश्विनी विद्यार्थ्यांना खड्या आवाजात मार्गदर्शन करत होती. विद्यार्थी, प्राध्यापक आपल्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांनीचे यश पाहून टाळ्यांनी प्रतिसाद देत होती. डॉ. यशवंत जोशी, डॉ. एल. एम. वाघमारे आणि डॉ. अरुण पाटील यांचे मार्गदर्शन, सहकार्य लाभले, अशी तिने कृतज्ञता व्यक्त केली.
तरूणाईला पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे संबोधित करत होत्या, 'आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा, स्वतः निर्णय घ्या. आपल्या व्यक्तिमत्त्वाला काय जमतंय ते पहा. प्रेरणास्थान, रोल मॉडेल ठरवा. त्यांच्यावर विश्वास ठेवा, अनुकरण करा, स्वप्न पहा. ध्येय निश्चिती करा, मग मात्र थांबू नका. अडचणी, संकटं येणारचं थांबू नका, ढळू नका, मार्ग आपोआपच निघतो. जिद्दीने पेटा कारण तो तुमचा स्वप्नांचा पाठलाग करतानाचा उच्च काल असतो. यश तुमच्या पाठीशीच असते, फक्त तुम्ही किती खंबीर आहात हे तपासत असते. सोनेरी पहाट प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असते. पण तुमच्या स्वप्नांची पहाट उजाडल्यानंतर स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा आणि त्या यशाच्या सोनेरी किरणांच्या पहाटेचा आनंद घ्या.' टाळ्यांच्या कडकडाट चालूच होता. असा वातावरणात भाव पसरला होता....
"जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
शिखरे यशाची सर तुम्ह
ी करावी,
पाहता वळूनि मागे यश तुमच्या पाठीशी असू दे,
तुमच्या यशाचा झेंडा यशोशिखरावरती फडफडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे,
भाग्यवान या शब्दांची प्रेरणा तरुणाईला आपणापासून मिळू दे"...
परिविक्षाधीन कालावधीनंतर त्यांना पहिली पोस्टिंग नक्षल प्रभावित क्षेत्रात भंडारा जिल्ह्यात मिळाली. स्त्री-पुरुष असा काही भेदभाव नसतो. रात्री-बेरात्री घटना घडली की तातडीने घटनास्थळी पोहोचावे लागते आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी लागते. समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिस प्रशासनावर असते. याच समाजातील १६-१८ वर्ष या वयोगटातील मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. समाज म्हणतो, फूस लावली. परंतु या वयात मुली शारीरिक आकर्षण, मॉडेलिंग, मॉडर्न जमाना, ग्लॅमर याकडे आकर्षित होतात आणि करिअर घडायच्या वेळेस चुकीच्या मार्गावर जातात. त्यात स्वतःचे, कुटुंबाचे न भरून येणारे नुकसान होत असते. यासाठी अश्विनीने सामाजिक चळवळीतून युवा संवाद साधला. भरकटलेल्या तरुणाईला समुपदेशन करत असतात. पालकांनाही मुला-मुलीला समजून घ्यायला सांगतात. 'गाडीचा अपघात झाला तर आपण फेकून देत नाही, त्याचे इन्शुरन्स काढतो, सर्व्हिसिंग करतो. मग या जीवित गाड्यांचा अपघात झाला तर त्यांना दुरुस्ती करा,' असे आवाहन करत असतात.
स्वतः अभियंता असल्यामुळे पोलिस प्रशासनात त्यांना खूप उपयोग होत आहे. आजकाल चोरी, दरोडा, हाणामारी याचे प्रमाण तर आहेच. पण सायबर क्राईमचे प्रमाण ही दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडियाचे कोणी अकाउंट हॅक केल्यास इंजिनीयर या नात्याने त्या आयपी ऍड्रेस लवकरच शोधतात. इतर गोष्टींना सुद्धा तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. कर्मचाऱ्यांना सुद्धा संगणक, ॲप विषयी त्या प्रशिक्षण देत असतात. वेळोवेळी येणाऱ्या प्रसंगामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव येतो. त्यासाठी त्या वेळात वेळ काढून व्यायाम आणि ध्यान करत असतात. त्यांना सांभाळून घेणाऱ्या जोडीदाराचा आई-वडिल शोध घेत आहेत. अश्विनीला शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
यासाठी हार्दिक शुभेच्छा…


Join us @mpscdecoded
*सुशांतसिंग च्या निमित्ताने..*

✍🏻 आदित्यराजे पवार..

गेल्या काही दिवसांत काही प्रसिद्ध सिनेअभिनेत्यांचं निधन झालं. जनसामान्यांची हळहळ व्यक्त केली आणि social media च्या माध्यमातून दुःख व्यक्त केल. अशावेळी काही विरुद्ध प्रतिक्रिया या अर्थाच्या होत्या की एखादा अभिनेता गेला म्हणून इतकं दुःख का? कि त्याचा जीव हा जास्त मौल्यवान आहे? तुलनेसाठी नुकत्याच शहिद झालेल्या जवानांचे तसेच आपली सेवा बजावताना प्राण गामावलेल्यांची उदाहरणे दिली गेली.

प्रत्येकाचे जीवन बहुमोल आहे आणि प्रत्येकाला एक quality life जागण्याचा अधिकार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा ती/तो आपल्याला परत कधी म्हणजे कधीच परत भेटणार नाही हि जाणीव दुःखाचे प्रमुख कारण ठरते . आता जर एखादी व्यक्ती आपल्या नात्यातील असेल, मैत्री वा प्रेमाचे संबंध असतील किंवा फक्त परिचित असेल तर त्यानुसार हि काहीतरी गमावल्याची भावना कमी अधिक तीव्र असेल.

सिनेमा हि अशी गोष्ट आहे की जिथं कलाकार एक असामान्य असं जग आपल्यासमोर उभं करत असतात. या सिनेमाच्या निमित्ताने जगातील कितीतरी वेगवेगळे प्रदेश आणि लोक आपल्याला बघायला मिळतात. मी जेव्हा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट बघतो तेव्हा त्या निवांत जीवन जगण्याच्या स्वप्नात हरवून जातो. जेव्हा 'थ्री एडिअट्स' हा चित्रपट बघितला तेव्हा बरेच विद्यार्थी स्वतःला रँचो आणि अभ्यासू मुलांना चतुर समजू लागले. जेव्हा चित्रपटात एखादी यशस्वी प्रेमकहाणी रंगवली जाते तेव्हा प्रेक्षकांतील कित्येक प्रेमवीराना समाधान मिळते. बऱ्याचदा चित्रपटाचा नायक हा अपप्रवृत्ती अथवा असमान अशा व्यवस्थे विरुद्ध लढणारा असतो आणि त्याचा लढा बरेच काही शिकवून जातो. त्या नायकाचे डायलॉग्स बऱ्याचदा काहीतरी सकारात्मक संदेश देऊन जातात, जगण्यास नवीन ऊर्जा देतात आणि विशेषतः तरुणांना व्यक्त होण्यासाठी आयतेच शब्द देऊन जातात.

चित्रपट बघतानाच्या त्या 2-3 तासात माणूस एक वेगळं जीवन जगत असतो. बऱ्याचदा तिथं नवीन स्वप्न जन्म घेतात तर कधी अपूर्ण स्वप्न त्या चित्रपटात का होईना पण कुणाच्यातरी माध्यमातून पूर्ण होताना दिसतात. चित्रपट हा कलेचा असा आविष्कार आहे की जो समजण्यासाठी फार काही बौद्धिक परिश्रम लागत नाहीत आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला हि त्याचा आनंद घेता येतो. आणि चित्रपटाची प्रेरणा सुद्धा समाजजीवनचं आहे. त्यामुळे अभिनयाची प्रतिभा लाभलेले कलाकार सामान्य माणसाला परिचित व जवळचे वाटू लागतात.

जेव्हा असा कलाकार आपल्यातून निघून जातो तेव्हा कुणीतरी जवळची व्यक्ती गेल्यासारखी वेदना होणे साहजिक आहे. या ठिकाणी कुणाला तो कलाकार सैनिकांच्या, पोलिसांच्या, खेळाडूच्या मित्राच्या वा प्रेमीच्या भूमिकेत आठवतो. त्या कलाकाराने आपल्या अभिनयातून ज्या वेगवेगळ्या प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण केल्या त्या दुरावल्याची भावना यावेळी तयार होते.

निर्गुण वा अमूर्त स्वरूपातील देव कल्पिने माणसाला शक्य होत नाही म्हणून मूर्तिपूजा. जेव्हा चित्रपटातून का होईना पण डोळ्यासमोर फिरतोय असा कलाकार मृत पावतो आणि त्याचवेळी समाजात महत्वपूर्ण योगदान असणारा पण अपरिचित कधीही न पाहिलेला व्यक्ती जातो तेव्हा इथं कुणाचा जीव जास्त महत्वाचा हा प्रश्नच अयोग्य. आणि सामान्य माणसाकडून प्रत्येक गोष्टीला फार वैचारिक बौद्धिक प्रतिसाद अपेक्षित करणे देखील चुकीचे. इथं वाटलं वाईट म्हणून ठेवलं असेल व्हाट्सप् ला स्टेटस. इतकंच. आणि प्रत्येकजण प्रत्येक जीवासाठी संवेदनशील असेल इतक्या जाणीवा जागृत होणं अशक्यच.

आता राहिला विषय आत्महत्येचा तर जीवनात फक्त काळोखच दिसतोय आणि प्रकाशाचा एकही किरण येण्याची अपेक्षाच नाही तेव्हा उचललेल हे एक टोकाचं पाऊल. मग या समाजात त्या व्यक्तीला सावरू शकेल अस कुणीही न भेटणं म्हणजे समाजाचाच पराभव. मग जर कुणी म्हणतय तसं हे पाप असेल तर ते सुद्धा समाजाचच. आता एक अभिनेता आत्महत्या करतोय आणि इतकी हळहळ मग शेतकरी आत्महत्येला काही किंमतच नाही का?

शेतकरी हा व्यवस्थेचा बळी आहे. शेतकरी आत्महत्या मानसिक कमी सामाजिक जास्त आहे. सुखवस्तू जीवनासाठी प्रयत्नशील असणाऱ्याला ते मिळवण्यात येणार अपयश हे सुद्धा बऱ्याचदा आत्महत्येचं कारण ठरत. सामान्य नजरेतून जे जीवनात हवं ते सर्वकाही असणारी व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते तेव्हा प्रश्न विचारला जातो की 'बाबा तुला काय कमी होत?'. जे मिळवण्यासाठी तुम्ही सर्व धडपडत आहात ते मिळाल्यावर सुद्धा मानसिक स्वास्थ्य नसेल तर ते सगळं कसं निरर्थक ठरत याच उदाहरण म्हणून या घटनेकडे बघितल गेलं. एका सर्वपरिचित व्यक्तीने आत्महत्या केली या कारणाने मानसिक आरोग्याकडे लक्ष वेधन्यासाठी यावर जास्त चर्चा झाली. या चर्चेतून सकारात्मक बदल घडावेत इतकीच अपेक्षा😊🙏🏻


- आदित्य पवार


Join us @mpscdecoded
Mpsc prelim 13 September