MPSC DECODED
8.9K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत..

आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇

Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar
👍2
SPDP 60+ Students Feedback .pdf
2.8 MB
SPDP 60+ Students review
👍4
कर्मयोग/Yltp

Contact:
Sandesh : 9892798799
Mayuresh : 9820557071
Sudarshan: 8652778011

@Sudarshanjaybhay
👍7
202212071736126019.pdf
158.5 KB
#GR

🔸तलाठी भरती 2022..

👉  3110 तलाठी + 518 मंडळ अधिकारी पदे मान्यता...

👉 जाहिरात डिसेंबर end किंवा जानेवारी महिन्यात अपेक्षित..
9👍2
🔴 संपूर्ण तलाठी जाहिरात 2022 साठी..

👉 पाहिले मंजूर पदे 1012 पदे + आज Gr ने मान्यता दिलेली पदे 3110 असे
👉 एकूण = 4122 पदासाठी होईल.. 🙏🙏
👍4
मंडळ अधिकारी हे महसूल विभागातील पद आहे. प्रथम तहसिल कार्यालयाची पद रचना समजून घेवूया.

तहसिलदार, नायब तहसिलदार (हे विभाग निहाय असतात उदा. महसूल, पुरवठा), पेशकार, लिपीक, मंडळ अधिकारी, (एका मंडळ अधिकारीच्या क्षेत्रात ४ ते ५ तलाठी असु शकतात. मंडळाच्या भौगोलिक परिस्थिती नुसार तलाठी संख्या बदलु शकते) व शेवटी तलाठी.

आपण जेंव्हा एखादी शेत जमीन विकत घेता तेंव्हा मालकी हक्काच्या रकान्यात स्वतः ची नोंद घेण्यास अर्ज केल्या नंतर तलाठी खरेदीदाराची नोंद फेरफार वहीस घेतो. सदर नोंद मंजुर करायचे अधिकार मंडळ अधिकारी यांना असतात. तसेच आप-आपल्या क्षेत्रातील महसुल वसुली (शेतसारा, N.A. Tax), जात प्रमाणपत्र प्रकरणात पंचनामा, रेशनकार्ड प्रकरणात पंचनामा अशी विविध प्रकारचे महसुली काम करत असतात.

टिप : 👉तलाठी यांनी घेतलेला (म्हणजे मंडळ अधिकारींनी मंजूर केलेला) फेरफार रद्द करण्याचे अधिकार तहसीलदार यांना नसतात. सदर फेरफार फक्त उप विभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी (SDM) हे रद्द करू शकतात.
👍21
35👍3
1670323068_MPSC Adv.pdf
376.1 KB
1670323068_MPSC Adv.pdf
👍2
😍🔥
10👍6
कर्मयोग/Yltp

Contact:
Sandesh : 9892798799
Mayuresh : 9820557071
Sudarshan: 8652778011

@Sudarshanjaybhay
👍5
१. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली होती तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती.

२. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना आंबेडकर यांनी केली आणि या संस्थेमार्फत मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज सुरू केले आणि औरंगाबाद मध्ये मिलिंद कॉलेज सुरू केले.

३. महाड येथे मनुस्मृतीचे ग्रंथाचे दहन केले त्यावेळी अनंतराव चित्रे, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे आणि नाना टिपणीस इत्यादी लोकांचा सहभाग होता.

४. राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने लॉर्ड साऊथबरो च्या अध्यक्षतेखाली मतदान कमिटी भारतात १९१९ मध्ये पाठवली,अस्पृश्यांच्या राजकीय हक्काची मागणी करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे व डॉक्टर आंबेडकर यांची सरकारने यावेळी निवड केली होती.

५. 25 सप्टेंबर 1932 रोजी पुणे येथे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये करार झाला तो पुणे करार म्हणून ओळखला जातो. हा करार येरवडा कारागृहात झाला होता आणि पुणे करारानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ ऐवजी संयुक्त मतदारसंघ व 18 टक्के राखीव जागा ठेवण्याचा निर्णय झाला.


#Factshots
👍1
१. प्राचीन भारतातील व्यापार या विषयात प्रबंध लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी MA ही पदवी प्राप्त केली.

२. भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा : एक ऐतिहासिक पृथक्करनात्मक परिशीलन या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी बहाल केली.

३. रुपयाचा प्रश्न या विषयावर लंडन विद्यापीठाने Dsc ही अर्थशास्त्रातील पदवी त्यांना प्रदान केली.

४. १९२० रोजी कागल जहागिरीतील माणगाव येथे आप्पासाहेब पाटील यांच्या मदतीने परिषद भरवली होती त्यांचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते.


५. १९२४ रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन झाली त्या सभेच्या कार्यकारी मंडळाचे डॉक्टर आंबेडकर अध्यक्ष व सेक्रेटरी सिताराम शिवतरकर होते आणि सभेचे ब्रीदवाक्य शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे होते.


#Factshots
👍4
१. महात्मा गांधी आफ्रिकेमध्ये दादा अब्दुल्ला या व्यक्तीचा खटला लढण्यासाठी गेले होते.

२. राजकुमार शुक्ला या व्यक्तीने महात्मा गांधी यांना चंपारण मध्ये यावे यासाठी बोलावले होते.

३. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बेळगाव या एकमेव अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते (साल १९२४)

४. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते.

५. यंग इंडिया आणि हरिजन ही वृत्तपत्रे महात्मा गांधी यांनी सुरू केली होती.


#Factshots
👍3