MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Channel created
Channel photo updated
Channel name was changed to «MPSC Target 2019»
नमस्कार, सर्व प्रथम सर्वांचे स्वागत . आम्ही राज्यसेवा २०१७ मधुन काही विविध पदासाठी पात्र ठरलेले , मुलाखतीपर्यंतचा अनुभव असणारे आणि काही सिलेक्शनच्या अंतिम टप्प्यावर असणाऱ्यांचा एक ग्रुप तयार केला आहे. आम्ही आपल्या सर्वांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांसाठीच्या प्रवासास फुल न फुलाची पाकळी म्हणुन हातभार लावण्याचा निर्धार केला असून त्यासाठी या टेलिग्राम चँनेलचा प्रपंच करत आहोत.

t.me/mpsctarget2019

स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये चुकांमधुन शिकत जाणे व त्या चुका परत न होण्यसाठी प्रयत्न हे खुप गरजेचे असते. पण त्या चुका आपण स्वत:च करव्यात असे काही नाही. दुसऱ्यांच्या चुकांमधुन सुद्धा आपल्याला शिकता आले पाहिजे.

आम्ही सुद्धा पुढच्यास ठेच मागचा शहाणा या तत्वावर काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या टीम ला असलेल्या अनुभवांचा फायदा ह्या चुका कशा टाळता येतील आणि यश लवकरात लवकर कसे गाठता येईल यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करणार आहोत.

त्यासाठी आपण---

👉 प्रश्न,प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण,प्रश्न कसे सोडवावे इ.
👉विषयांच्या शॉर्ट नोट्स
👉ऑडीओ
👉व्हिडीओ
👉 अभ्यास पद्धती उदा- अँन्टी अभिमन्यु मेथड,बिरबल मेथड,सँटेलाईट-GPS मेथड इ.
👉 चालु घडामोडीमधुन अभ्यास
👉 शंका निरसन
👉 प्रेरणा

टीमचा थोडक्यात परिचय :

१ .अमोल पवार , यांचे UPSC २०१७ मधुन IRS या पदी निवड झाली आहे.

२. डॉ संतोष मोरे, मुख्याधिकारी २०१७.

३. प्राची कचरे मँडम ,सहा . प्राध्यापिका फर्ग्युसन कॉलेज ,राज्यसेवा मुलाखत २०१५, २०१७.

४ . विश्वजीत गुंड, नायब तहसिलदार २०१७.

५ .रुपेश जाधव ,राज्यसेवा मुलाखत २०१५ ,२०१७.

६. अभिजित हजारे ,सहायक गटविकास अधिकारी २०१७.

Channel link :👇

t.me/mpsctarget2019
State Services Preliminary Examination.pdf
35.1 KB
राज्यसेवा पुर्व परीक्षा अभ्यासक्रम
राज्यसेवा पुर्व परीक्षेसाठी उपयोगी पडणाऱ्या पुस्तकांची यादी काही अधिकारी व राज्यसेवा परीक्षेचा अनुभव विद्यार्थांशी चर्चा करुन उद्या पोस्ट करण्यात येईल .

धन्यवाद

Join us @mpsctarget2019
या वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याच्या बाकी असलेल्या परीक्षा म्हणजे विक्रीकर निरीक्षक आणि सहायक मुख्य परीक्षा तसेच पोलिस उपनिरीक्षक ची मैदानी चाचणी व मुलाखत . जे या परीक्षांना नाहीत त्यांनी राज्यसेवा पुर्व परीक्षेचा अभ्यास सुरु करण्यास हरकत नाही .राज्यसेवा पुर्व परीक्षांसाठी ज्या पुस्तकांचा वापर करण्यास सांगणार आहोत त्यातुन राज्य सेवा पुर्व परीक्षेचा अभ्यास तर होईलच पण राज्यसेवा मुख्य परीक्षेचाही सुमारे ३०० मार्कांचा अभ्यास निश्चितपणे पुर्ण होईल . (ह्या ३०० मार्कांचे विश्लेषण उद्या विस्तृतपणे सांगु )त्यामुळे अत्यंत सुक्ष्मपणे या सगळ्यांचा अभ्यास करुन पुस्तकांची यादी बनवत आहोत .

आपले चँनेल जास्तीत जास्त विद्यार्थांपर्यंत पोहचवावे ही सर्वांना विनंती

Join us @mpsctarget2019
Channel photo updated
पुर्व परीक्षा पुस्तकांची यादी :

@mpsctarget2019

*१.इतिहास:*
-प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत
स्टेट बोर्ड सहावी व सातवी, व ल्युसेंट जी के मधील प्राचीन मध्ययुगीन चा भाग वाचुन घेणे
-आधुनिक भारताचा इतिहास-
ग्रोव्हर, कोळंबे सर
-महाराष्ट्राचा इतिहास-
११वी स्टेट बोर्ड, कठारे

*२.भूगोल:*
-जगाचा प्राकृतिक सह :६ ,७, ८ ११ वी स्टेट बोर्ड ,११वी NCERT शक्य झाल्यास G C Leong

-भारताचा:
- ५वी व १० वी स्टेटबोर्ड
-९, १०, ११ वी NCERT
-Lucent or Arihant GK

-महाराष्ट्र :
जास्त प्रश्न नसतात पुर्व परीक्षेसाठी तरीही दीपस्तंभ चे पुस्तक वाचावे कारण मुख्यपरीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या भूगोल या घटकावर भरपुर प्रश्न येतात

*३. सामाजिक व आर्थिक:*
-कोळंबे सर व देसले सर अर्थशास्त्र दोन्ही चांगले वाचुन घ्यावे (वेळ असल्या कारणास्तव दोन्ही वाचुन घ्यावे मुख्य परीक्षेसाठी फायदाच होईल ) *रिव्हीजनच्या वेळी मात्र पुर्व परीक्षेच्या दृष्टीकोनातुन वाचावे*
-देसले सरांचे Development चे पुस्तक वाचावे

*४.राज्यशास्त्र :*
-लक्ष्मीकांत/कोळंबे सर
- पंचायतराज लवटे सर

*५.सायन्स :*
- ८ वी ते १० स्टेट बोर्ड व NCERT
- Tata Macgrow Hill चे General Science (Chemistry and Physics) वाचावे
-General Science भस्के सर


*६ पर्यावरण :*
-सुमंत साळुंखे सरांच्या प्राकृतिक भुगोल पुस्तकातील पर्यावरण चा भाग
-किंवा युनिक चे पर्यावरणाचे पुस्तक
-शंकर IAS Selected Topics शक्य असल्यास

*७.चालु घडामोडी*
- पृथ्वी परिक्रमा लोकसत्ता किंवा म टा वृत्तपत्र दररोज

Join us @mpsctarget2019
आता पुर्व परीक्षेसाठी वापरणाऱ्या. स्त्रोतामधुनच मुख्य परीक्षेसाठीची ३०० मार्कांची तयारी कशाप्रकारे होते ते पाहु .

१.इतिहास हा विषय मुख्य परीक्षेसाठी ६० मार्कांसाठी आहे. यामध्ये आधुनिक भारत स्वातंत्र्योत्तर भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास यांचा समावेश होतो . यापैकी स्वातंत्र्योत्तर भारत १० मार्क वगळता इतर अभ्यास ५० मार्कचा पुर्व परीक्षेच्याच स्त्रोतातुन होतो.

२.भुगोल या विषयामध्ये मुख्य परीक्षेसाठी प्राकृतिक भुगोल हवामान आणि महाराष्ट्राचा भुगोल या घटकांवर जास्त भर असतो हे घटक आपण पुर्व परीक्षेसाठी सुद्धा वाचतो त्यामुळे याघटकांचे ४० गुण पुर्व परीक्षेच्या स्त्रोतामधुनच कव्हर होतात


३.राज्यशास्त्राचे लक्ष्मीकांत आणि पंचायतराज या पुस्तकांच्या आधारे आपण मुख्यपरीक्षेचे जवळपास ९० गुणांचे प्रश्न सोडवु शकतो.


४.अर्थशास्त्र हा विषय मुख्य परीक्षेसाठी ११० गुणांसाठी आहे बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे वरील प्रश्न वगळता कोळंबे सर आणि देसले सरांच्या पुस्तकांच्या आधारे ९० प्रश्न सोडवु शकतो .

५.सामाजिक आणि आर्थिक या घटकामधील सामाजिक उपघटकासाठी देसले सरांचे Development हे पुस्तक उपयोगी पडतं हेच पुस्तक मुख्य परीक्षेमधील मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या विषयासाठी सुद्धा उपयोगी पडतं या पुस्तकाच्या आधारे किमान ३० प्रश्न सोडवु शकतो .

अशाप्रकारे जर पुर्व परीक्षेचा अभ्यास व्यवस्थितपणे केला तर मुख्य परीक्षेची ३०० मार्कांची तयारी होते .

Join us @mpsctarget2019
Hello Warriors...

लवकरच आपण राज्यसेवा परिक्षेसाठीच्या (MPSC) महत्त्वाच्या विषयावरील काही मुद्दयांवर चर्चा करणार आहोत.
ही चर्चा Audios च्या स्वरूपामध्ये असणार आहे. 👍

या सर्व मार्गदर्शनाचा लाभ आपल्या जवळच्या मित्र मैत्रीण आणि सहकार्याना व्हावा यास्तव आपण ह्या उपक्रमाचे जास्तीत जास्त sharing करावे.

Join us @mpsctarget2019
MPSC DECODED pinned «नमस्कार, सर्व प्रथम सर्वांचे स्वागत . आम्ही राज्यसेवा २०१७ मधुन काही विविध पदासाठी पात्र ठरलेले , मुलाखतीपर्यंतचा अनुभव असणारे आणि काही सिलेक्शनच्या अंतिम टप्प्यावर असणाऱ्यांचा एक ग्रुप तयार केला आहे. आम्ही आपल्या सर्वांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध…»
स्टेट बोर्ड च्या भूगोल या विषयामधील काही interesting माहिती शेअर करत आहे .भूगोल या विषयाचे स्टेट बोर्ड पुर्व परीक्षेच नाही तर मुख्य परीक्षेस सुद्धा उपयोगी पडतात . भूगोल हा विषय चांगला समजुन घेतला तर त्याचा उपयोग मुलाखती मध्ये सुद्धा होतो .उदाहरार्थ पाण्याचे दुर्भिक्ष पाहता मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ऊसाचे पीक न घेता कोणती पिके घ्यावी ?पश्चिम महाराष्ट्राच्या जलसिंचनाच्या वाढीची कारणे कोणती ?इ. म्हणुन या विषयाचा खुप चांगला अभ्यास करावा हा विषय खुप स्कोअरिंगचा आहे .

Join us @mpsctarget2019
अमेझिंग अँमेझॉन :

📘उगम-पेरु देशातील लॉरीकोचा सरोवरात. पेरुमधील इकिटॉस पर्यंत मऱ्यान्यान नावाने ओळखतात.

📘जगातील २०%वाहते पाणी या नदीत. १४ उपनद्यांची लांबी १६०० कि.मी पेक्षा जास्त.

📘जगातील सर्वात जास्त पाणी वाहुन नेणारी नदी

📘पेरु देशातील इंका संस्कृती याच नदी खोऱ्यात.

📘मुखाजवळ नदी पात्राची रुंदी ३३३ कि.मी आहे. दक्षिण अटलांटिक महासागरात जाऊन मिळते.

Join us @mpsctarget2019
अंटार्क्टिका खंड

Join us @mpsctarget2019
👍1
भुकंपा विषयी

Join us @mpsctarget2019
जपान विषयी विशेष

माहिती स्त्रोत इयत्ता सहावी भुगोल

Join us @mpsctarget2019
NCERT आधारित भूगोल विषय पुर्णपणे समजुन घ्यायचा असेल तर मृणल पटेल यांच्या यु टुब चँनेल वरील व्हिडीओ नक्की पहावे . Content English (संकल्पनांची नावे इ. ) मध्ये आहे मात्र समजावुन हिंदी भाषेत सांगितले आहे त्यामुळे समजण्यास काहीच अडचण येत नाही . व्हिडीओची खाली लिंक पाठवत आहे.आम्ही स्वतः हे व्हिडीओ नुसते पाहिले नाहीत तर अभ्यासले आहेत .व्हिडीओ पाहण्याआधी Geograpgy च्या NCERT अभ्यासल्या असतील तर जास्त फायदा होईल .

Join us @mpsctarget2019..
पुण्यामध्ये आत्ता सध्या पडत असलेल्या पावसामुळे मातीचा जो सुगंध दरवळत आहे तो सुगंध अँक्टीनोमायसेटिस या जीवांणुमुळे येतो .

Join us @mpsctarget2019
सुगंध मातीचा

Join us @mpsctarget2019

पहिला पाऊस पडला की, मातीचा गंध आपल्याला धुंद करून जातो, सुखावून जातो. कुठल्याही अत्तराच्या कुपीत नसलेला हा सुगंध कसा तयार होतो, असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल पण उत्तर मात्र मिळाले नसेल. माती वरून कोरडी दिसत असली तरी आत थोडा ओलावा असतो. त्यात अँक्टीनोमायसेटिस नावाचे जीवाणू वेटोळी करून राहात असतात. जेव्हा जमीन वाळते तेव्हा या जीवाणूमुळे मातीचे स्पोअर्स (बीजूक) तयार होतात. जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा अँक्टीनोमायसेटिसच्या जीवाणूंचे स्पोअर्स हवेत उधळतात. पावसाच्या पाण्यातील बाष्प हे एरोसोलसारखे काम करतात. त्यामुळे एरोसोल थेट आपल्या नाकापर्यंत येतात, त्यामुळे भिजलेल्या मातीचा मृदगंध आपल्याला येतो व आपण हरखून जातो. या स्पोअर्समध्ये मातीचा सुवास असतो. हा जीवाणू जगभर आढळतो त्यामुळे पाऊस पडल्यानंतर गोडसर असा वास येतो. हे जीवाणू ओलाव्यात वाढतात. पावसाच्या आम्लतेमुळेही वेगळ्या प्रकारचा वास येतो. वातावरणातील रसायनांमुळे पावसाचे पाणी आम्लधर्मी बनते. हे पाणी मातीवर पडल्यानंतर या आम्लधर्मी पाण्याशी अभिक्रिया होते व सुवास तयार होतो. मातीतील खनिजे या पाण्याने सुटी होऊन त्यांची अभिक्रिया गॅसोलिनशी होते. त्यामुळे अतिशय वेगळा विचित्र वास येतो. बॅक्टेरिया स्पोअर्समुळे निर्माण झालेला वास हा मनाला प्रसन्नता देणारा असतो. पावसामुळे तिसऱ्या प्रकारचा वासही तयार होतो. वनस्पती व झाडे जे तेल सोडतात त्यामुळे हे तेल खडकावर व कडक भागावर पडते. ते सेंद्रिय व इतर रसायनांशी म्हणजे गॅसोलिनशी अभिक्रिया करते, हा गंधही जीवाणूंच्या स्पोअर्ससारखा आनंददायी व हरखून टाकणारा असतो.

Join us @mpsctarget2019