MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Permissible Limit of PM 2.5 is 60 and PM 10 is 100..

#Environment

Join us @mpsctarget2019
particulate matter (PM).

What is particulate matter?

Particulate matter or particle pollution is the general term for a mixture of solid particles and liquid droplets found in the air. There are a wide range of minute particles in the air that can be seen only using an electron microscope. It includes sulphates, nitrates, black carbon, particle-bound water, metals (cadmium, copper, nickel, zinc) and hydrocarbons. In addition, biological components such as allergens (pollen, dust mites) and microbial compounds (fungi) are also PM.

What are the different sizes of PM?

PM10: inhalable particles, with diameters that are generally 10 micrometres (average human hair is about 70 micrometres in diameter).

PM2.5: fine inhalable particles, 2.5 micrometres and smaller.

What are the sources of PM?

The major man-made sources are

· Emission from power stations, factories, industries, incinerators, diesel generators and automobiles

· Dust from construction sites and unpaved roads

· Burning of garbage

What are the harmful effects of PM?

When inhaled, PM can cause a wide range of respiratory disorders. “Continuous exposure to PM can cause asthma, chronic obstructive pulmonary disease and any type of bronchitis. PM can penetrate deep inside the lungs and damage it. Any bacteria or virus can now attack the lungs and this could even lead to serious life threatening infections,” explains Dr. R.P. Ilangho, Senior Consultant, Respiratory Medicine, Apollo Main Hospital, Chennai. PM can also cause chest tightening, watery eyes, sneezing, and running nose. According to the World Health Organisation (WHO) almost 3.7 million premature deaths annually are attributed to outdoor air pollution. About 80% of those deaths are due to heart disease and stroke, while another 20% are from respiratory illnesses and cancers related to exposure to PM2.5.

What are the standard values for PM?

According to the National Ambient Air Quality Standards of the Central Pollution Control Board (CPCB) of India, the 24-hour average for PM10 is 100 microgram/cubic metre and 60 microgram/ cubic metre for PM2.5.



How can I reduce exposure to PM?

According to the WHO Global Urban Ambient Air Pollution Database, more than 80% of people living in urban areas are exposed to air quality levels that exceed the WHO limits. “There are no protective masks than can filter these PM. As individuals, we should stop burning our garbage, use public transportation and take medications for allergies as the PM can worsen existing allergies. We need to raise our voice to sensitise the issue. All of us have seen vehicles which emit massive clouds of smoke. The State Pollution Control board should understand the seriousness and start inspecting vehicles,” says Dr. D.J. Christopher, Professor and Head, Pulmonology Medicine, CMC, Vellore.

,
#Environment
#TheHindu

Join us @mpsctarget2019
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
________________
स्पर्धा-परीक्षेत यश आणि अपयश कसे स्वीकारावे?
________________

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे किंवा संघ लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये काही हजार विद्यार्थ्यांमधून 1 जण, असे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. म्हणजे तसे पहिले 99.9 % विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात.

पण इथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी की "अनुत्तीर्ण" विद्यार्थ्यांचे प्रमाण जरी जास्त असले तरी "अपयशी" विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र अतिशय कमी आहे. अनुत्तीर्ण म्हणजे अपयशी हे समीकरण इथे लागू पडत नाही. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी राज्यसेवेतून चांगली पदे मिळवतात, राज्यसेवेत यश न मिळालेले इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतात. आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यासाच्या जोरावर आज अनेक जण बँकिंग, journalism, education या क्षेत्रात प्रचंड यश संपादित करत आहेत. तर अनेक जण यशस्वी उद्योजक आहेत. आणि ते अगदी सहज आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून घेताना दिसतात. त्यामुळे अशा लोकांना अपयशी म्हणता येणार नाही. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून मिळालेले ज्ञान, आलेली प्रगल्भता ही आयुष्यात खूप उपयोगी ठरते. जगण्याची दिशाच बदलून जाते असे म्हणा हवे तर. तरी पण अभ्यास सुरु असताना आपले vision इतके क्लिअर नसते. त्यामुळे प्रत्येक अनुत्तीर्ण परीक्षा हे एक मोठे अपयश वाटते तर साधी prelims पास झाल्यावर देखील काही जणांच्या डोक्यात हवा जाते. म्हणून अभ्यास करतानाच्या काळात यश आणि अपयश म्हणजे काय हे नीट ओळखले पाहिजे आणि दोन्ही गोष्टी पचवायच्या कशा ते देखील पाहिले पाहिजे.

सर्वात अगोदर स्पर्धापरिक्षा करतोय म्हणजे आपण प्रचंड मोठं असं काहीतरी करतोय, असा जो समज असतो तो अगोदर काढून टाका. कोणत्याही इतर परिक्षांसारखीच ही देखील एक परीक्षा आहे आणि इतर कोणत्याही नोकरीसारखी पगार देणारी ही एक नोकरी आहे हे लक्षात ठेवायला हवं. परीक्षेचे अवडंबर माजवले नाही तर त्या परीक्षेचा अभ्यास व परीक्षा सोपी जातेच. पण महत्वाचे म्हणजे तसे केल्याने यश वा अपयश पचवणे फारसे अवघड जात नाही. स्पर्धा परीक्षेच्या जगात अपयश पचवता येणे आणि त्यातून लवकरात लवकर मार्ग काढून वाटचाल चालू ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान आणि सर्वात उपयुक्त कौशल्य आहे.

स्पर्धा परीक्षा पहिल्या प्रयत्नात पार करणारे अगदी बोटावर मोजण्याइतके कमी असतात आणि त्यातील बहुतेक जण अजून चांगली पोस्ट मिळावी म्हणून परत प्रयत्न करतात. तसेच स्पर्धापरिक्षेचे एका मागून एक टप्पे लागून येत राहतात, त्यामध्ये कुठेही निवांत होण्यास किंवा खूप विचार करत बसण्यास वेळ नसतो. अशावेळी जर अपयशातून येणाऱ्या नैराश्यात किंवा यशातून येणाऱ्या समाधानामध्ये तुम्ही थोडा वेळ जरी गुरफटला तर तुम्ही स्पर्धेतून मागे पडण्याची दाट शक्यता निर्माण होते. म्हणून अपयश आले तर त्यावर अडून निराश न होता त्याची कारणे शोधावीत.
आपली अभ्यासाची दिशा आणि प्रत्यक्ष परीक्षेवेळचे नियोजन यातील नक्की काय चुकले याचा आढावा घ्यावा. बऱ्याचदा अपयश आले की आपण आत्तापर्यंत केलेले सगळेच चुकीचे होते असा समज विद्यार्थी करून घेतात व सर्व गोष्टी बदलायचा विचार करू लागतात. Sources बदलायचे का, दुसरा क्लास लावायचा का, library बदलायची का, अभ्यासाची पद्धत बदलायची का असे नानाविध प्रश्न मनात घर करतात आणि मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि कोणत्या तरी असंबंध गोष्टीवर अपयशाचे खापर फुटते आणि त्यातून एखादा वेगळाच निष्कर्ष काढून अनावश्यक बदल करून अभ्यास सुरु केला जातो. खरे तर बऱ्याचदा अभ्यासात जास्त काही चुकलेले नसतेच. परिक्षेवेळी योग्य वेळी योग्य निर्णय न घेता आल्याने किंवा सराव कमी पडल्याने किंवा तणावाखाली पेपर दिल्याने अपयश आलेले असते. ही कारणे मात्र कधीच समोर आणली जात नाहीत. मग अभ्यासात बदल करायच्या वेडापायी ज्या गोष्टी योग्य होत्या त्याही बदलल्या जातात आणि अभ्यासाचा पायाच बदलल्याने परत सगळी मेहनत नव्याने करावी लागते आणि यात वेळ गेल्याने नुकसान होण्याची शक्यताच जास्त असते.

यावर सोप्पा उपाय म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्राचे rational analysis करणे. त्यातून यशस्वी होण्यासाठी सर्वसाधारणपणे किती वेळ लागतो आणि आपण स्वतःला किती वेळ दवणार आहोत याचे गणित पक्के मांडणे. जे यावर्षी यशस्वी आहेत ते देखील कधीकाळी अयशस्वी होते याची जाण ठेवणे. रोजच्या रोज आपण योग्य दिशेने जात आहोत का ते पडताळणे. अपयशाचा विचार करत बसल्याने किंवा त्याचा ताण घेतल्याने गेलो तर आपण यशापासून दूरच जाऊ याची कल्पना असली की आपण त्यात अडकून राहत नाही.
त्यातही अपयश पचविण्यासाठी लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास. स्वतःवर विश्वास असेल तरच या क्षेत्रात तुम्ही टिकून राहू शकता. त्यासाठी स्वतःला स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास हवा. परीक्षेच्या निकालावरून स्वतःचे यशापयश या क्षेत्रात ठरवता येत नाही
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
.

"परीक्षा पास होण्यासाठी, आणि मला शक्य होते तेवढे प्रयत्न मी केले का?" हा प्रश्न स्वतःला विचारावा आणि जर याचे उत्तर होकारार्थी असेल तर परीक्षेचा निकाल काहीही लागला तरी तुम्हाला समाधानी राहता आले पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत तेच आपल्या नियंत्रणात असते. निकाल काय लागणार, पेपर कसा येणार, cutoff चे काय होणार यावर आपले कसलेच नियंत्रण नसते. किती अभ्यास करणे आणि कसा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि मी तसे केले का? एवढी साधी गोष्ट लक्षात ठेवली की स्पर्धापरिक्षेचा ताण टाळता येतो. आणि ताण नसेल तर यशाचा मार्ग अधिक सुकर बनतो. तसेच यावेळी उत्तीर्ण झालेले बरेच लोकं पुढच्या वर्षी आपल्या बरोबर परीक्षेला असणारच आहेत. त्यामुळे फार निराश होण्यासारखे काही नसतेच आणि पुढील वर्षी अशा लोकांशी स्पर्धा करायची असेल तर यावर्षी त्यांच्याइतका अभ्यास करावाच लागेल. त्यासाठी अपयशाने निराश होऊन बसणे परवडणार नाही. म्हणून जरी अपयश आले असले तरी आपण 80% गोष्टी बरोबर केल्या आणि त्या आपल्याला इथून पुढेही तशाच करायच्या आहेत हे लक्षात ठेवावे. आपल्या फक्त 20% गोष्टींमध्ये थोडे वरखाली झालेले असते. या एवढ्याच गोष्टी थोड्याफार बदलाने सुधारून घ्याव्यात. असे केल्याने परत अभ्यास नव्याने सुरु न होता फक्त value addition होते आणि तीच गरजेची असते. असे केल्याने चूक सुधारायला वेळ आणि ऊर्जा मिळते. अन्यथा माझे सगळेच चुकले असा विचार केल्याने सगळे काही नव्याने सुरु करण्याच्या नादात नक्की चुकले काय याचा थांगपत्ता लागत नाही आणि पुढील वर्षी देखील त्याच चुकांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण होते. अनेक वर्षे देऊनही यश न मिळण्यामागे बऱ्याचदा हेच कारण असते. यावरून हे लक्षात येते की अपयश नीट हाताळता आले की ते आपोआप आपल्याला यशाकडे घेऊन जाते.


याचप्रमाणे जर यश व्यवस्थित हाताळता नाही आले तर ते आपल्याला अपयशाकडे घेऊन जाते. राज्यसेवा तीन टप्पे असणारी परीक्षा आहे. तिन्ही पार केल्या तरच आपण इच्छित ठिकाणी पोचतो. पण बऱ्याचदा फक्त पूर्वपरीक्षा पास झाल्यावर सुद्धा काहीजणांच्या डोक्यात हवा जाते. आपण पूर्वपरीक्षा पास झालो म्हणजे अर्धे अधिकारी झालो असेच यांचे मत होते आणि त्यात ते हुरळून जातात. त्यामुळे अभ्यासावर परिणाम होऊन मुख्यपरिक्षेत अवघड परिस्थिती निर्माण होते. तसेच मुख्यपरिक्षेनंतर मुलाखतीच्या तयारीवेळी होण्याची शक्यता असते. म्हणून मग एका टप्प्यावरचे यश हे डोक्यात न जाऊ देता जास्त जोमाने पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागावे. कोण पास झाले आणि कोण नाही, कोणाचे काय चुकले असल्या गप्पांमध्ये वेळ न घालवता पुढील तयारीला लागावे. त्यामुळे अंतिम यश मिळण्याची शक्यता नक्कीच वाढेल. तसेच जरी एखादी पोस्ट मिळाली तरी बऱ्याचदा ती क्लास 2 असते. पुढे आपल्याला क्लास 1 ची देखील तयारी करायची असते किंवा क्लास 2 मधील आणखी आपल्या आवडीची पोस्ट मिळण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. अशावेळी जर मागील यश साजरे करण्यात गरजेपेक्षा जास्त वेळ आणि ऊर्जा गेली की मग अवघड होऊन बसते. आनंद साजरा नक्की करावा, कारण आपण कित्येक महिने केलेल्या कष्टाचे ते चीज असते. त्याचबरोबर यात समाधान देखील असावे, कारण समाधान मानण्याची वृत्ती नसेल तर तर कायम अतृप्तीची भावना राहते आणि आपण बऱ्याच आनंदाला मुकतो. पण त्याचवेळी यात हुरळून जाऊनही फायदा नाही. तसे झाल्यास पुढे वाट पाहत असलेले मोठे यश तुमच्या हातातून निघून जाईल. बऱ्याचदा पोस्ट मिळूनही आपण extension घेऊन अभ्यास करत असतो.

पण बऱ्याच पोस्ट मिळालेल्या लोकांचे इतर विद्यार्थ्यांशी वागणे या काळात बदलून जाते. आपण काहीतरी खूप मोठे मिळवले आहे आणि बाकीच्यांना ते तितकेसे जमणार नाही असा अविर्भाव अनेकांच्या वागण्यात दिसतो. ती अध:पतानाची नांदी असते. अशा लोकांनां इर्षेने यश मिळेलही पण समाजमान्यता आणि समाधान कधीच नाही मिळणार. म्हणून यशाकडे देखील अमुक एक परीक्षा उत्तीर्ण झालो असेच पाहावे. मी खूप मोठा कोणतरी झालोय असा विचार डोक्यात बसला की प्रगतीची दारे बंद होतात हे नक्की. म्हणून यश मिळाले तरी स्थितप्रज्ञता कायम ठेवावी. त्यामुळे प्रत्यक्ष त्या पदावर काम करताना लागणारे गुण तुमच्याकडे आहेत याचा देखील दाखल मिळेल.

यश- अपयश हा स्पर्धा परीक्षेचा अविभाज्य भाग आहे. पण त्यावरून स्वतःची किंमत करणे कदापिही योग्य नाही. परीक्षा तुमच्यापेक्षा मोठी नाही हे कायम लक्षात असुद्या. स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा आणि त्यावरूनच स्वतःची परीक्षा करा. हे जमले तर आयुष्यात यशस्वी होण्याची हमीच मिळते.

By - अमोल मांडवे (DYSP/ACP)
@MpscClub
#Csat Series (Part 6)

Csat साठी time management कसे करावे? काही Tips.. (अजून इतर काही tips आठवल्या, तर पुढच्या पार्ट मध्ये शेअर करेन.. - अभिनव बालुरे )


1. सर्वप्रथम एक गोष्ट लक्ष्यात घ्या, time management म्हणजे केवळ स्पीड नव्हे. Speed इतकीच accuracy पण महत्त्वाची आहे. csat ची तयारी करताना सर्वप्रथम accuracyला (प्रश्नाचे उत्तर बरोबर येण्याला) महत्व द्यावे. त्यानंतर सरावाने त्या प्रश्नाला लागणारा वेळ कमी करता येईल.

2. प्रत्येक भागासाठी (passages, maths and reasoning आणि decision making यासाठी अंदाजे वेळ ठरवावा, तो कटाक्षाने पाळावा. )

उदाहरणार्थ,
Decision making :10 min
Passage: 1 hr 10 min
Math/Reasoning : 40 min

3. Attempt किती झालाय, हे मोजत बसण्यात काही जण वेळ घालवतात.
असे attempt(केलेले गोल) मोजत बसायचे नाही. जे प्रश्न सोडवायचे राहिलेत तेवढ्यापुरते लक्ष्य द्यायचे.

4. आणखी एक महत्त्वाचे, Logical reasoning अणि non verbal reasoning च्या प्रश्नांमध्ये (यापुढील आकृती ओळखा, कोण कुठे काय करतो-A हा बंगलोर ला engineer असून तो B चा भाऊ आहे, यांसारखे प्रश्ण ) सुटले तर लगेच उत्तर येतात नाहीतर 5-6 मिनिटे पण सुटत नाहीत. अश्या प्रश्नां पासून सावध राहायला हवे. शक्यतो असे प्रश्ण शेवटी ठेवावे आणि ते सोडविताना कायम वेळेचे भान असावे..

5. कधी-कधी काही कोड्या सारखी interesting प्रश्न असतात (उदा. मागे एकदा नदीतून फुले तोडून देवाला वाहण्याचा प्रश्न विचारला होता). या प्रकाराला पण शेवटी सोडवावे. (कारण असे प्रश्न सोडविताना आपण काहीसे हट्टाला पेटतो व वेळेचे भान राहत नाही.)

6. Passage चे 3/4 प्रश्न येतात, राहिलेल्या एका प्रश्नासाठी काहीजण पुर्ण Passage परत वाचत बसतात. (तरीपण त्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही)..

एका प्रश्नासाठी passage परत-परत वाचत बसणे, हे पण परवडणारे नाही..

@MpscClub
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
2nd Sample Copy of CSAT Decoded.. .pdf
996.8 KB
Sample copy (part 2) of CSAT DECODED book..
यात लेखक मित्रांनी माझे गुरूवर्य Abhaysinh Mohite सरांची csat strategy शेअर केली आहे..

I hope this will help you..
@MpscClub
MPSC DECODED
1 Sample Copy CSAT DECODED Sarathi publication final.pdf
Sample copy no.1

Includes :

1.CSAT Strategy by Adityaraje Pawar,IRS.

2 . 5 Passage (1 English)

3. Explaination of Difficult questions..

4.Scorecard.

5. Space to right your self analysis.

Join us @mpsctarget2019.
Mpsc Club🔥🚨
2nd Sample Copy of CSAT Decoded.. .pdf
Sample copy no.2

Includes :

1.CSAT Strategy by Abhaysinh Mohite Sir, Deputy Collector

2 . 5 Passage (1 English) (5 passages are Different than sample copy no.1)

3. Explaination of Difficult questions..

4. Scorecard.

5. Space to right your self analysis.

Join us @mpsctarget2019.
MPSC DECODED
Photo
CSAT DECODED च्या day wise plan मध्ये विशेष आहे तरी काय???

- CSAT DECODED मध्ये प्रत्येक दिवसाला सरावासाठी पाच उतारे दिले आहेत 35 मिनिटात हे उतारे सोडवने अपेक्षित आहे
- हे पाचही उतारे पाच वेगवेगळ्या लेखकांनी set केलेले असल्याने प्रश्नाबाबत येणारा monotonous म्हणजेच तोच तो पणा दिसत नाही
- दिवसाचे 5 ही उतारे वेगवेगळ्या विषयावर आहेत यामध्ये आयोग चे उतारे बाबत विषयांची विविधता व त्यांचे प्रमाण याबाबत सारखेपणा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे
- या पाच उताऱ्यामध्ये विज्ञान, तत्वज्ञान, पर्यांवरण, biotechnology, आर्थिक, ऐतीहासिक, conceptual, वृत्तपत्रातील लेख या सर्वांचे योग्य प्रमाण ठेवले गेले आहे
- दिवसाचे पाच उतारे संपताच त्याची उत्तरतालीका दिलेली आहे
- score card सुद्धा दिलेले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे analysis करता येईल व त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करता येईल
- अवघड आणि किचकट प्रश्नाचे विश्लेषण दिलेले असल्याने विद्यार्थ्यांचा होणारा गोंधळ आणि confusion कमी होईल

अशा प्रकारे परीक्षेसाठी आवश्यक सराव आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी याचा पूर्ण अभ्यास करून या पुस्तकाची मांडणी केली आहे
या पुस्तकाचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ होईल अशी अपेक्षा आहे..

Join us @mpsctarget2019
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
CSAT DECODED by Abhinav Balure.pdf
666.4 KB
Csat decoded पुस्तकामध्ये आलेली माझी strategy..

शब्दांकन लेखक रुपेश जाधव सर यांनी केले आहे..
Mpsc Club🔥🚨
CSAT DECODED by Abhinav Balure.pdf
CSAT Strategy By Abhinav Balure(SP Excise)..
Disorders Caused by Iodine Deficiency

Join us @mpsctarget2019
New Doc 2018-01-15_1.pdf
833.4 KB
सिंधु संस्कृती ते वेद संस्कृती..

Ancient History..

Join us @mpsctarget2019
New Doc 2018-01-15_2.pdf
1 MB
भारतीय षड दर्शने..

Ancient History..

Join us @mpsctarget2019
New Doc 2018-01-15_3.pdf
779.4 KB
जैन व बुद्ध Philosophy...

Ancient History.

Join us @mpsctarget2019
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (Abhinav Balure)
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 साठी booklist...

By- अभिनव बालुरे
(SP Excise 🚨, 2017 batch)
Mpsc राज्यसेवा-2017 मध्ये राज्यात सहावा रँक..

@MpscClub