MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
529 photos
122 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
🔴 MPSC Technical सरळसेवा संदर्भात

Syllabus , exam pattern आणि मागणीपत्र या तीनही महत्त्वाच्या विषयांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पूर्णपणे झोपलेले दिसत आहेत.

सिव्हिल शाखेसाठी अद्याप एकाही भरतीच्या मागणीपत्राची ठोस तयारी झालेली नाही. उद्या गट 'ब' आणि गट 'क' च्या जाहिराती आल्या आणि त्यामध्ये सिव्हिलच्या पुरेशा जागा नसतील, तर हजारो विद्यार्थ्यांची किमान दोन वर्षे वाया जाण्याची शक्यता आहे. त्यासोबत स्पर्धाही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.

याशिवाय, नवीन सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्न कसा असणार याबाबतही कोणताही ठोस पाठपुरावा होताना दिसत नाही. जर तो विद्यार्थ्यांच्या अपेक्षेप्रमाणे आला नाही, तर अनेक अभ्यासू आणि पात्र विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

लक्षात ठेवा, वेळ निघून गेल्यावर केलेली कोणतीही कृती फारशी उपयोगाची ठरत नाही.

सर्वात खेदाची बाब म्हणजे स्थापत्य क्षेत्रातील संघटना, ग्रुप आणि अकॅडमी चालक यांच्यात कोणताही समन्वय दिसत नाही. एखादी संघटना प्रयत्न करत असली, तरी बाकीचे आपणच कसे वरचढ आहोत हे दाखवण्यात अधिक व्यस्त आहेत.

अकॅडमी चालक स्वतःच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी पुढाकार घ्यावाच अशी अपेक्षा नाही, पण किमान विद्यार्थ्यांना नेमके काय चुकत आहे आणि पुढे काय करायला हवे याबाबत मार्गदर्शन तरी करावे. जसे नॉन-टेक अकॅडमी एकत्र येऊन निवेदन देतात, तसाच किमान एक प्रयत्न सिव्हिल क्षेत्रातूनही व्हायला हवा.

आत्ताच योग्य वेळ आहे. सर्व अकॅडमी चालक, सर्व संघटना आणि सर्व ग्रुप ॲडमिन यांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र यावे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी काय योग्य आहे यावर चर्चा करून ठोस भूमिका घ्यावी. पुढाकार घेतला तर सर्व विद्यार्थी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील.

अन्यथा होणारे नुकसान खूप मोठे असेल.

कृपया हा संदेश जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.
❤17🙏3💯2👏1
🚨 TMC भरतीबाबत अपडेट

गावदेवी मंडईतील दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने अग्निशमन दलासह अभियांत्रिकी विभागातील सुमारे ६०१ रिक्त पदे तातडीने भरण्याची घोषणा केली आहे.

📰 आयुक्तांनी नवीन जाहिरात प्रसिद्ध करून पुढील तीन महिन्यांत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे.

👉 त्यामुळे सध्याची TMC भरती प्रक्रिया रद्द करून नवीन जाहिरात येण्याची शक्यता खूप वाढली आहे. तसेच परीक्षा TCS मार्फत होण्याचीही चर्चा सुरू आहे.

⚠️ ही शक्यता सध्याच्या अधिकृत घोषणांवर आणि माध्यमांतील वृत्तांवर आधारित आहे. अंतिम निर्णय नवीन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

📚 ज्यांची तयारी सुरू आहे त्यांनी अभ्यासात कोणतीही खंड पडू देऊ नका. नवीन जाहिरात आल्यास त्याचा फायदा तयार विद्यार्थ्यांनाच होईल. 💯

Join @mpsc_learner
🔥7❤1💯1
Engineer's Association Official:
📍 #WCD

👉 #WCD साठी अमरावती आणि यवतमाळ मधील उमेदवारांनी पुढाकार घेणे महत्वाच आहे....!

👉 फक्त अमरावती आणि यवतमाळ मधील उमेदवारांचा एक तात्पुरता ग्रूप बनवत आहोत दोन जिल्ह्याव्यतिरिक्त कोणीही जॉइन करून गर्दी करू नये...!


(खालील लिंक वरती जाऊन ग्रूप जॉइन करा Only यवतमाळ आणि अमरावती)
👇 👇 👇 👇

https://t.me/+euS6hnU_PaAwMzY1
❤1
🔴MJP Result Update 🔴

मित्राने कॉल केला होता. ते म्हणाले, "लवकरच निकाल लागेल." त्याने विचारलं, "कधी?" तर उत्तर मिळालं, "उद्या-परवा."

म्हणून आता उद्यापासून आपण सर्वांनी ई-मेल आणि कॉल कॅम्पेन सुरू करायला हवं. तरच विभाग जागा होईल आणि निकाल लावेल. नाहीतर "उद्या-उद्या" करत हे लोक महिने घालवतात. हे आपण अनेकदा पाहिलं आहे.

त्यांच्या आश्वासनांवर आता पूर्ण विश्वास ठेवून चालणार नाही. निकाल लवकर लागावा यासाठी आपल्यालाच काहीतरी ठोस कृती करावी लागेल.

Join
@mpsc_learner
👍15💯6❤1👏1🙏1
Forwarded from Rohan G
🔴 TMC JE 🔴

12/08/2025 रोजी TMC ची जाहिरात आली होती. TMC JE परीक्षा लवकर व्हावी यासाठी सर्व उमेदवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना
🐁Gmail करून विनंती करा. 🙏🏼

जास्तीत जास्त मेल करा, एकत्रित प्रयत्न नक्कीच महत्त्वाचे ठरतील.💯🙏🏼
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दोष संविधानात नसतो, दोष तर चालवणाऱ्यांच्या नियतीचा असतो, प्रामाणिक हातात संविधान आलं की त्याची खरी ताकत दिसून येते ~ तुकाराम मुंढे
🔥23💯3👌2
🔴 सोमवारी MPSC #IMP बैठक ....

> मागणी पत्र
> रिक्त पदे
> सेवा प्रवेश नियम
> बिंदूनामावल्या


Join @mpsc_learner
❤2
लवकरच आयोग 2027 चे वेळापत्रक जाहीर करणार आहे …..🔥🔥🔥
🕊18❤1🔥1👏1💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴BMC JE CASE UPDATE🔴 🔸BMC JE भरती संदर्भातील WP/18052/2024 हे प्रकरण सलग दोन दिवस सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. 🔸दिनांक 6 जुलै 2026 रोजी प्रकरण Directions साठी ठेवण्यात आले असून, त्यानंतर दिनांक 7 जुलै 2026 रोजी हे प्रकरण High on Board मध्ये अनुक्रमांक 4…
#BMCJE Court Case Update

🔸सोमवार, दिनांक 13 जुलै 2026 रोजी आपले प्रकरण For Directions या उद्देशाने अनुक्रमांक 7 वर सूचीबद्ध करण्यात आले आहे. मागील आठवड्यात, म्हणजेच 6 जुलै रोजी संबंधित खंडपीठ (Bench) उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे ही तारीख देण्यात आली आहे.

🔸तथापि, (Cause List) मध्ये प्रकरणाचा समावेश असल्यामुळे सुनावणीस उपस्थित राहणे आवश्यक राहील.

🔸याशिवाय, अंतिम सुनावणीसाठी आपले प्रकरण दिनांक 16 जुलै 2026 रोजी High on Board अंतर्गत अनुक्रमांक 2 वर सूचीबद्ध करण्यात आले आहे.
❤3🔥1🎉1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «Engineer's Association Official: 📍 #WCD 👉 #WCD साठी अमरावती आणि यवतमाळ मधील उमेदवारांनी पुढाकार घेणे महत्वाच आहे....! 👉 फक्त अमरावती आणि यवतमाळ मधील उमेदवारांचा एक तात्पुरता ग्रूप बनवत आहोत दोन जिल्ह्याव्यतिरिक्त कोणीही जॉइन करून गर्दी करू नये...! (खालील…»
WCD CEA - दिवाळीच्या आसपास किंवा त्यानंतरच नवीन जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. (म्हणजे 2027)


जर जाहिराती वेळेवर आल्या नाहीत, तर संपूर्ण वर्ष निघून जाते.

सर्वांनी प्रयत्न करा, जाहिरात लवकर यावी WCD
😢8❤2💯1
Forwarded from Sahil Mali
तुमचं मत काय आहे? TPA भरती TCS मार्फत याच महिन्यात व्हावी की MPSC मार्फत पुढील वर्षी?

सध्या TCS कडील जाहिरात तयार आहे. मंत्रालयातूनही परवानगी मिळालेली आहे. मात्र काही विद्यार्थ्यांचा TCS मार्फत भरतीला विरोध असून त्यांना भरती MPSC मार्फतच हवी आहे.

त्यामुळे ज्यांना TCS मार्फत भरती व्हावी असं वाटत असेल, त्यांनी सोमवारपासून जास्तीत जास्त संख्येने टाऊन प्लॅनिंग मुख्य कार्यालय, पुणे येथे निवेदन देण्यास सुरुवात केली पाहिजे.
💯24❤2👍2
Forwarded from Sahil Mali
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
तुमचं मत काय आहे? TPA भरती TCS मार्फत याच महिन्यात व्हावी की MPSC मार्फत पुढील वर्षी? सध्या TCS कडील जाहिरात तयार आहे. मंत्रालयातूनही परवानगी मिळालेली आहे. मात्र काही विद्यार्थ्यांचा TCS मार्फत भरतीला विरोध असून त्यांना भरती MPSC मार्फतच हवी आहे. त्यामुळे…
आता TCS कडून जाहिरात आली नाही, तर पुढे भरती MPSC कडून Recruitment Rules बदलल्यानंतरच येईल. त्यासाठी किमान ७–८ महिने लागू शकतात. तसेच, त्यावेळी TPA पदासाठी अतिरिक्त पात्रता (Additional Eligibility) देखील समाविष्ट होण्याची शक्यता आहे. हा मुद्दाही लक्षात असू द्या.
💯25❤3👍3🔥2
एक मात्र खरं आहे जे अगोदर च जॉब वर आहेत ते लोक ईतर मुलांचा त्यांच्या सोयीनुसार फायदा घेतात manipulate करतात मुलांना त्यांना त्याचं स्वार्थ। साधायचा असतो मुलांचा वापर करून misguide त्यांना काय कळणार इथे लवकर जॉब ला लागण किती महत्वाच आहे त्यांना काय agodar च pagar suru TPA त्यांना MPSC च पाहिजे मंग कितीही उशिरा अॅड आली तरी चालते
💯34😁4❤3🔥2👌1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
<unknown> – 00919422159457(00919422159457)_20260709192129
आता तुम्हीच विचार करा... विभागाकडून अशी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे जर विभागाकडे TCS मार्फत TPA ची जाहिरात तयार असेल, तर ती लवकरात लवकर प्रकाशित झाली पाहिजे. MPSC कडे देऊन भरती नियम (RR) बदलण्याची वाट पाहण्यात काही अर्थ नाही. नाहीतर नंतर ATP आणि TPA एकत्र करण्याचा निर्णय RR नंतर घेतला जाईल, असेही म्हटले जात आहे.
🔥16💯7❤3
Engineers association official:

येणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा घेण्यासाठी
#TCS चे कर्मचारी सध्या #Govt_polytechnic आणि काही खासगी कॉलेज मध्ये मीटिंग घेत आहेत....!


वरील बातमी जास्तीत जास्त ग्रूप/
#telegram_channel नी शेअर करावी ही नम्र विनंती...!
❤4
विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत..
प्रति,
संचालक, नगररचना
महाराष्ट्र राज्य, पुणे


विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत

महोदय,

नगररचना विभागात रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) पदाची सन 2024 मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर मोठा कालावधी लोटला असून अनेक पदे आजही रिक्त असल्याचे दिसून येते. यामुळे विभागाच्या कामकाजावरही परिणाम होत आहे.

अलीकडे मिळालेल्या माहितीनुसार नगररचना विभागामध्ये पदभरती प्रक्रिया सुरू आहे, असे समजते. रचना सहाय्यक (गट ब अराजपत्रित) पदभरती परीक्षा पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने तत्काळ प्रसिद्ध करावी जेणेकरून परीक्षेची कार्यवाही, कागदपत्र पडताळणी व नियुक्ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल, ही नम्र विनंती आहे.

तसेच नगररचना विभागाच्या तांत्रिक कामकाजाच्या दृष्टीने रचना सहाय्यक गट ब या पदांची आवश्यकता मोठथा प्रमाणात आहे. त्यामुळे या पदांच्या जास्तीत जास्त जागा जाहीर करून पदभरती करण्याचा प्रयत्न करण्यात यावा, जेणेकरून विभागाचे कामकाज अधिक गतिमान व प्रभावी होईल.

वरील सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, ही नम्र विनंती. आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.

धन्यवाद!

आपला विश्वासू,
❤2