MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनाला सर्वांनी आपली उपस्थिती नोंदवावी.

आपला PMC चा मुद्दा कांगणे सरांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या Civil चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तर PMC, MJP मध्ये झालेल्या गोंधळावर चर्चा होईल. परीक्षा निकालातील Excel Sheet एडिट केल्याचा मुद्दा, तसेच iLovePDF संदर्भातील चर्चा पुन्हा समोर येईल. IBPS च्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले जाईल.

याच पार्श्वभूमीवर आपली स्पष्ट मागणी आहे की, तांत्रिक पदांच्या परीक्षा देखील MPSC मार्फत ऑफलाइन पद्धतीनेच झाल्या पाहिजेत. ना TCS, ना IBPS, ना इतर कोणतीही ऑनलाइन परीक्षा प्रणाली. तांत्रिक भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून ऑफलाइन परीक्षाच घेण्यात याव्यात.
माझ्या वैयक्तिक निरीक्षणानुसार, TCS आणि इतर कॉम्प्युटर परीक्षा केंद्रांचे मुख्य लक्ष ऑनलाइन परीक्षा सुरू ठेवण्यावर आहे. कारण MPSC ने जर पूर्णपणे ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय थांबू शकतो.

पण जर ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला, तर मुख्यमंत्री दोन्ही बाजूंचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता वाटते. त्यामुळे तांत्रिक (Technical Cadre) पदांच्या परीक्षा ऑनलाइन ठेवून, इतर सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्याचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. म्हणजे दोन्ही बाजूंचा समतोल साधला जाईल.

म्हणूनच माझी तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे की, ही बाब तुमच्या मित्रपरिवारापर्यंतही पोहोचवा आणि या विषयात सक्रिय रहा.
🔴BMC JE CASE UPDATE🔴

🔸BMC JE भरती संदर्भातील WP/18052/2024 हे प्रकरण सलग दोन दिवस सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे.

🔸दिनांक 6 जुलै 2026 रोजी प्रकरण Directions साठी ठेवण्यात आले असून, त्यानंतर दिनांक 7 जुलै 2026 रोजी हे प्रकरण High on Board मध्ये अनुक्रमांक 4 वर सूचीबद्ध आहे.

🔴सलग दोन दिवस सुनावणीसाठी प्रकरण ठेवण्यात आल्यामुळे या सुनावण्यांमध्येच प्रकरण अंतिम टप्प्यात जाऊन कुठल्याही परिस्थितीत निकाली निघण्याची दाट शक्यता आहे.

🔸त्यामुळे BMC JE भरती प्रक्रियेवर आलेले ग्रहण अखेर दूर होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

🔸पुढील सर्व घडामोडींबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल.


Join @mpsc_learner
❤1
प्रति,
मा. अध्यक्ष महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

विषय : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ऑफलाईन (OMR आधारित) पद्धतीने घेण्याबाबत निवेदन.

महोदय,

आम्ही खाली सही करणारे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन (OMR आधारित) पद्धतीनेच घेण्यात याव्यात, अशी नम्र विनंती करीत आहोत. (अभियांत्रिकी सेवेतील पद आयोगामार्फत भरताना ती पदे सुद्धा ऑफलाईन OMR पद्धतीनेच भरली जावी)

स्पर्धा परीक्षा ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे परीक्षेची पारदर्शकता, निष्पक्षता, समान संधी आणि विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास अबाधित राहणे आवश्यक आहे.

ऑनलाईन परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक अडचणी, परीक्षा केंद्रांमधील असमानता तसेच प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत विविध शंका आणि चिंता व्यक्त होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ राहावा आणि परीक्षेची विश्वासार्हता कायम राहावी यासाठी ऑफलाईन (OMR आधारित) परीक्षा पद्धतीच कायम ठेवण्यात यावी, अशी आमची कळकळीची विनंती आहे.

महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भावना व सार्वजनिक हित लक्षात घेऊन आमच्या निवेदनाचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

दिनांक : ___

ठिकाण : ___

अ.क्र.|    नाव|   गाव/शहर|  मो क्र|   स्वा.
1
2
3
निवेदन सह्या करून स्पष्ट pdf @helpspardhaa ह्या id वर पाठवा 👍🏻👍🏻

कोणाला काही बदल करावा वाटल तर बिनधास्त बदल करून तुमचं स्वतः च निवेदन द्या 👍🏻👍🏻
5_6217268252507119672.pdf
34.7 KB
5_6215007922888386063.pdf
निवेदन वर सह्या करून @helpspardhaa ह्या id वर पाठवा 👍🏻👍🏻👍🏻
100+ reactions dya mi pn Good news deto 😏😌
❤141😁14🔥9👏1🤔1🎉1🤩1🙏1
document(24).pdf
279.4 KB
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) सेवा प्रवेश नियम (RR)....!
📢 WRD JE (Civil) सेवा प्रवेश नियम 2026 मधील महत्त्वाचा बदल

पूर्वी पदोन्नती : सरळसेवा = 25 : 75 असे प्रमाण होते. आता नवीन सेवा प्रवेश नियमांनुसार ते 35 : 65 करण्यात आले आहे.

✅ 35% पदे – CEA (Civil Engineering Assistant) मधून पदोन्नतीने भरली जातील.

- किमान 7 वर्षांची नियमित सेवा आवश्यक.
- विभागीय/व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक (सूट असल्यास अपवाद).

✅ 65% पदे – MPSC मार्फत सरळसेवा भरतीने भरली जातील.

- पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी.
- भरती MPSC स्पर्धा परीक्षेद्वारे होईल.

ही बदललेली भरतीची रचना नवीन सेवा प्रवेश नियम, 2026 मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे.


Join @mpsc_learner
❤5🔥2💯1
लवकरच WRD चा आकृतीबंध (cabinet) मंत्रिमंडळातून मंजूर होऊन पुढील भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल.

Join @mpsc_learner
🔥13👍2❤1
करा आता
नाही तर 2029 नका करू फक्त
सारखं RR च कारण देत होते राव
💯11❤2🔥2
सर्वप्रथम Engineers Association च्या सर्व Admins चे मनापासून आभार आणि अभिमान व्यक्त करतो. 🙏

आम्ही डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, तुमचा मनापासून आदर करतो आणि तुमचा अभिमान वाटतो.

Engineers Association ने विद्यार्थ्यांसाठी उभं केलेलं हे व्यासपीठ केवळ एक Telegram चॅनेल नाही, तर हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास आहे.

तुम्ही गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांसाठी जे काम केलं, ते खरंच कौतुकास्पद आहे. अनेक अशक्य वाटणारे प्रश्न मार्गी लागले, विविध भरतींचा सातत्याने पाठपुरावा झाला, विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तेव्हा हा प्लॅटफॉर्म त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. हजारो इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचं काम या चॅनेलने केलं.

म्हणूनच एक नम्र विनंती आहे...

हा चॅनेल डिलीट करू नका.

उद्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोण करणार?

इथेच तर राज्यभरातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी एकत्र जोडले गेले आहेत. याच चॅनेलमधून भरतीसाठी काय करायचं, कोणता पाठपुरावा करायचा, विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर त्याविरोधात कसं उभं राहायचं, याची माहिती मिळते.

हा फक्त Telegram चॅनेल नाही, तर प्रत्येक इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा एकत्रित आवाज आहे.

संघर्ष अजून संपलेला नाही... अजून खूप काम बाकी आहे. अनेक विभागांच्या जाहिराती यायच्या आहेत, अनेक भरतींचा पाठपुरावा करायचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अजूनही लढायचं आहे.

आज हा एक मोठा प्लॅटफॉर्म संपला, तर विद्यार्थी पुन्हा विखुरले जातील. एकजूट कमी होईल, सामूहिक आवाज कमकुवत होईल आणि भविष्यातील लढे लढणं अधिक कठीण होईल.

ही केवळ विनंती नाही, तर हजारो इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या भावना आहेत.

एकजूट जपा... हा आवाज जिवंत ठेवा.
❤26🙏2💯2🔥1
आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार MPSC च्या ऑनलाइन (CBT) परीक्षा फक्त सरकारी केंद्रांवरच नाही, तर खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रनिकेतने यांनाही परीक्षा केंद्र म्हणून वापरले जाऊ शकते. तसेच तांत्रिक सेवा पुरवठादार संस्थांची (TCS Ion, private centers ) CBT केंद्रे देखील वापरली जातील. 😐

Join @mpsc_learner
😢13❤3🤯3😱2🕊1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «11 May च्या मेसेजमध्येच आपण सांगितलं होतं की,भविष्यात MPSC परीक्षा TCS मार्फतच होण्याची शक्यता आहे. कारण टेंडरची प्रक्रिया खूप आधीपासूनच सुरू झाली होती आणि त्या प्रत्येक घडामोडीवर आपली बारकाईने नजर होती. आता सध्याची परिस्थिती पाहता MPSC हा निर्णय बदलण्याची…»
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Abhijeet Dipke in Chh. Sambhajinagar Tommorow 🔥
#mpsc_andolan
❤13👍1🔥1😁1
📢 आज छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या आंदोलनात शक्य तेवढ्या उमेदवारांनी सहभागी व्हावे.

आम्हीही येत आहोत... तुम्हीही नक्की या! ✊

📅 दिनांक: 06 जुलै 2026
🕙 वेळ: सकाळी 10.00 वाजता
📍 ठिकाण: विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर.
🔥5👍2💯1
"घाबरले कोण आहेत, ते बंदोबस्तच सांगतोय...
आता उरलेलं काम विद्यार्थ्यांच्या एकजुटीचं!" 🚩🔥
विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला इतकी भीती कशाची? 🤔

जेवढा बंदोबस्त, तेवढाच आमचा निर्धार !🔥
🔥12❤1💯1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💥 आंदोलनस्थळी मा. कांगणे सरांचे आगमन! ✊
❤5🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रोहित पवार साहेबांचे आंदोलनस्थळी आगमन... आता आवाज आणखी बुलंद होणार! 💥
🔥3❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मोठमोठ्या हस्ती एकत्र... आता सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकलाच पाहिजे!
🔥5❤1