MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
📢 पुणे महापालिका (PMC) भरती अपडेट

महापालिकेतील १३ अत्यावश्यक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा!

भरती प्रक्रियेअंतर्गत वर्ग-१ ते वर्ग-३ मधील १३ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

🔹 वर्ग-१ पदे :
• त्वचारोग तज्ज्ञ
• एड्स मॉडेल अधिकारी
• न्यूरोसर्जन
• युरोसर्जन
• रक्तसंक्रमण अधिकारी
• उपमुख्य अग्निशमन अधिकारी

🔹 वर्ग-२ पदे :
• भूलतज्ज्ञ
• जीवशास्त्रज्ञ
• विभागीय अग्निशमन अधिकारी
• सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी
• राजशिष्टाचार अधिकारी / उपनगरसचिव

🔹 वर्ग-३ पदे :
• सहायक माहिती व जनसंपर्क अधिकारी
• मत्स्यालय पर्यवेक्षक सहाय्यक

📌 टीप: ही मंजुरी वरील १३ अत्यावश्यक पदांच्या भरतीसाठी देण्यात आली आहे. संबंधित भरतीची सविस्तर जाहिरात व अर्ज प्रक्रिया स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल.


Join @mpsc_learner
📚 ज्ञानाची किंमत वाढली की फक्त मार्केटिंगची?

🚨 MPSC चं नाव लावलं म्हणून विद्यार्थ्यांना लुटण्याचा परवाना मिळत नाही!

आज MPSC कडे परीक्षा गेली आणि दुसऱ्याच दिवशी हजारो रुपयांची फी वाढ? 🤔 हा नेमका शिक्षणाचा उत्सव आहे की मार्केटिंगचा?

💰 Mentorship साठी ₹9,___?
💰 One Shot Revision साठी ₹6,___?

आधी जी सरळसेवा बॅच ₹7,000 ला विकायचे, ती आता फक्त परीक्षा MPSC कडे गेली म्हणून डायरेक्ट ₹20,000 - ₹25,000 पर्यंत फी वाढवणे कितपत योग्य आहे?

📢 यांनी शिक्षणाला धंदा बनवून ठेवलाय. यांच्याकडून कधीच गोरगरीबांची पोरं अधिकारी होऊ शकणार नाहीत.

⚠️ "आजच Admission घ्या नाहीतर उद्यापासून ₹4,___ जास्त" अशा भीतीच्या मार्केटिंगपेक्षा विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.

▶️ आज YouTube वर अनेक दर्जेदार मोफत लेक्चर्स उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात आणि देशात असे अनेक शिक्षक आहेत जे अत्यंत कमी शुल्कात किंवा मोफत शिकवून हजारो विद्यार्थ्यांना अधिकारी बनवत आहेत.

👏 कांगणे सर, Khan Sir यांच्यासारख्या शिक्षकांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे—विद्यार्थी घडवणे हे ध्येय असते, फक्त कमाई नाही.

🌾 स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी कोण आहेत?
शेतकऱ्यांची मुलं, मजुरांची मुलं, मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण. आई-वडील कर्ज काढून, कष्ट करून घाम गाळून मुलांना शिकवतात.

🛑 विद्यार्थ्यांनो, फक्त जाहिराती, काउंटडाउन आणि "आज शेवटची संधी" अशा संदेशांना भुलू नका.

✅ बाजारात अनेक चांगले आणि परवडणारे पर्याय उपलब्ध आहेत. अभ्यासाची गुणवत्ता पाहा, शिक्षकांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहा आणि मगच निर्णय घ्या.

📌 MPSC चं नाव वापरून अवास्तव फी आकारणं योग्य नाही. शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी असावं, त्यांच्या आर्थिक अडचणी वाढवण्यासाठी नाही.

💭 विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर व्यवसाय उभा राहू शकतो, पण त्या स्वप्नांचा गैरफायदा घेऊ नये.

✊ जागरूक व्हा, विचार करूनच प्रवेश घ्या.


@mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
TPA (TCS) च्या 139 पदांची जाहिरात तयार असून, जुलैच्या मध्यापर्यंत ती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. ही जाहिरात यापूर्वीच आली असती, मात्र काही उमेदवारांनी TCS मार्फत परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला आहे. MPSC मार्फतच परीक्षा घेण्यात यावी त्यांची मागणी आहे. TCS…
आज Town planning कार्यालय, पुणे येथे काही विद्यार्थी पाठपुराव्यासाठी गेले होते.

त्यांना असे सांगण्यात आले की, विभागाकडून भरती प्रक्रिया MPSC कडे देण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे समजते. मात्र, फोनवर एक माहिती आणि प्रत्यक्ष कार्यालयात दुसरी माहिती दिली जात असल्याने नेमकी परिस्थिती काय आहे, हे अद्याप स्पष्ट होत नाही.

MPSC कडूनही सप्टेंबरनंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली.

त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट माहिती देण्याऐवजी काही प्रमाणात संभ्रम निर्माण केला जात असल्याचे जाणवले. त्यामुळे अद्यापही चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.

जुलैच्या मध्यापर्यंत (Mid July) जाहिरात आली तर ठीक; अन्यथा भरती प्रक्रिया MPSC कडे गेली आहे, असेच समजावे.

सध्या अधिकृत आदेश येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयमाने प्रतीक्षा करणे हाच योग्य पर्याय आहे.

Join
@mpsc_learner
❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📚 ज्ञानाची किंमत वाढली की फक्त मार्केटिंगची? 🚨 MPSC चं नाव लावलं म्हणून विद्यार्थ्यांना लुटण्याचा परवाना मिळत नाही! आज MPSC कडे परीक्षा गेली आणि दुसऱ्याच दिवशी हजारो रुपयांची फी वाढ? 🤔 हा नेमका शिक्षणाचा उत्सव आहे की मार्केटिंगचा? 💰 Mentorship साठी ₹9,___?…
सर्व क्लासचालकांना एक नम्र विनंती आहे. कृपया फी थोडी कमी करण्याचा विचार करा.

तुम्ही खूप चांगले आणि प्रतिभावान शिक्षक आहात, हे आम्ही सगळे मान्य करतो. तुमच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी अधिकारी होऊ शकतात. पण अनेक विद्यार्थी शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. जास्त फीमुळे त्यांना प्रवेश घेणं कठीण होतं.

तुम्ही फी कमी केली तर अनेक गरीब विद्यार्थ्यांनाही तुमच्याकडून शिकण्याची संधी मिळेल आणि तुमच्या मार्गदर्शनातून खूप अधिकारी घडतील.

तसेच आणखी एक विनंती. नवीन बॅचेस launch करत असताना आधीच्या बॅचेसचं कमिटमेंट आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडेही तितकंच लक्ष द्या. फक्त बॅचवर बॅच लॉन्च करून मागील बॅचेसचे सिलेबस आणि दिलेली आश्वासनं विसरली जाऊ नयेत. याबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत आहेत. विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी जुन्या आणि नवीन दोन्ही बॅचेसना समान न्याय मिळणं आवश्यक आहे.

आमची ही विनंती सकारात्मक दृष्टीने घ्याल, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. 🙏
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
<unknown> – 8097528889(8097528889)_20260703111150 (2)
निकाल इतका उशिरा लावण्यामागे नेमकं काय कारण आहे? विभागाकडून प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. हे सगळं ऐकून काहीतरी गोंधळ सुरू आहे की काय, अशी शंका येते.

सगळीकडे IBPS संदर्भातील घडामोडी पाहता, या निकाला विषयीही विद्यार्थ्यांचा विश्वास आणि अपेक्षा हळूहळू कमी होत चालल्या आहेत.


Join @mpsc_learner
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनाला सर्वांनी आपली उपस्थिती नोंदवावी.

आपला PMC चा मुद्दा कांगणे सरांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या Civil चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तर PMC, MJP मध्ये झालेल्या गोंधळावर चर्चा होईल. परीक्षा निकालातील Excel Sheet एडिट केल्याचा मुद्दा, तसेच iLovePDF संदर्भातील चर्चा पुन्हा समोर येईल. IBPS च्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले जाईल.

याच पार्श्वभूमीवर आपली स्पष्ट मागणी आहे की, तांत्रिक पदांच्या परीक्षा देखील MPSC मार्फत ऑफलाइन पद्धतीनेच झाल्या पाहिजेत. ना TCS, ना IBPS, ना इतर कोणतीही ऑनलाइन परीक्षा प्रणाली. तांत्रिक भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून ऑफलाइन परीक्षाच घेण्यात याव्यात.
माझ्या वैयक्तिक निरीक्षणानुसार, TCS आणि इतर कॉम्प्युटर परीक्षा केंद्रांचे मुख्य लक्ष ऑनलाइन परीक्षा सुरू ठेवण्यावर आहे. कारण MPSC ने जर पूर्णपणे ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय थांबू शकतो.

पण जर ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला, तर मुख्यमंत्री दोन्ही बाजूंचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता वाटते. त्यामुळे तांत्रिक (Technical Cadre) पदांच्या परीक्षा ऑनलाइन ठेवून, इतर सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्याचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. म्हणजे दोन्ही बाजूंचा समतोल साधला जाईल.

म्हणूनच माझी तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे की, ही बाब तुमच्या मित्रपरिवारापर्यंतही पोहोचवा आणि या विषयात सक्रिय रहा.
🔴BMC JE CASE UPDATE🔴

🔸BMC JE भरती संदर्भातील WP/18052/2024 हे प्रकरण सलग दोन दिवस सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे.

🔸दिनांक 6 जुलै 2026 रोजी प्रकरण Directions साठी ठेवण्यात आले असून, त्यानंतर दिनांक 7 जुलै 2026 रोजी हे प्रकरण High on Board मध्ये अनुक्रमांक 4 वर सूचीबद्ध आहे.

🔴सलग दोन दिवस सुनावणीसाठी प्रकरण ठेवण्यात आल्यामुळे या सुनावण्यांमध्येच प्रकरण अंतिम टप्प्यात जाऊन कुठल्याही परिस्थितीत निकाली निघण्याची दाट शक्यता आहे.

🔸त्यामुळे BMC JE भरती प्रक्रियेवर आलेले ग्रहण अखेर दूर होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

🔸पुढील सर्व घडामोडींबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल.


Join @mpsc_learner
❤1
प्रति,
मा. अध्यक्ष महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

विषय : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ऑफलाईन (OMR आधारित) पद्धतीने घेण्याबाबत निवेदन.

महोदय,

आम्ही खाली सही करणारे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन (OMR आधारित) पद्धतीनेच घेण्यात याव्यात, अशी नम्र विनंती करीत आहोत. (अभियांत्रिकी सेवेतील पद आयोगामार्फत भरताना ती पदे सुद्धा ऑफलाईन OMR पद्धतीनेच भरली जावी)

स्पर्धा परीक्षा ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे परीक्षेची पारदर्शकता, निष्पक्षता, समान संधी आणि विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास अबाधित राहणे आवश्यक आहे.

ऑनलाईन परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक अडचणी, परीक्षा केंद्रांमधील असमानता तसेच प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत विविध शंका आणि चिंता व्यक्त होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ राहावा आणि परीक्षेची विश्वासार्हता कायम राहावी यासाठी ऑफलाईन (OMR आधारित) परीक्षा पद्धतीच कायम ठेवण्यात यावी, अशी आमची कळकळीची विनंती आहे.

महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भावना व सार्वजनिक हित लक्षात घेऊन आमच्या निवेदनाचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

दिनांक : ___

ठिकाण : ___

अ.क्र.|    नाव|   गाव/शहर|  मो क्र|   स्वा.
1
2
3
निवेदन सह्या करून स्पष्ट pdf @helpspardhaa ह्या id वर पाठवा 👍🏻👍🏻

कोणाला काही बदल करावा वाटल तर बिनधास्त बदल करून तुमचं स्वतः च निवेदन द्या 👍🏻👍🏻
5_6217268252507119672.pdf
34.7 KB
5_6215007922888386063.pdf
निवेदन वर सह्या करून @helpspardhaa ह्या id वर पाठवा 👍🏻👍🏻👍🏻
100+ reactions dya mi pn Good news deto 😏😌
❤141😁14🔥9👏1🤔1🎉1🤩1🙏1
document(24).pdf
279.4 KB
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) सेवा प्रवेश नियम (RR)....!
📢 WRD JE (Civil) सेवा प्रवेश नियम 2026 मधील महत्त्वाचा बदल

पूर्वी पदोन्नती : सरळसेवा = 25 : 75 असे प्रमाण होते. आता नवीन सेवा प्रवेश नियमांनुसार ते 35 : 65 करण्यात आले आहे.

✅ 35% पदे – CEA (Civil Engineering Assistant) मधून पदोन्नतीने भरली जातील.

- किमान 7 वर्षांची नियमित सेवा आवश्यक.
- विभागीय/व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक (सूट असल्यास अपवाद).

✅ 65% पदे – MPSC मार्फत सरळसेवा भरतीने भरली जातील.

- पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी.
- भरती MPSC स्पर्धा परीक्षेद्वारे होईल.

ही बदललेली भरतीची रचना नवीन सेवा प्रवेश नियम, 2026 मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे.


Join @mpsc_learner
❤5🔥2💯1
लवकरच WRD चा आकृतीबंध (cabinet) मंत्रिमंडळातून मंजूर होऊन पुढील भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल.

Join @mpsc_learner
🔥13👍2❤1
करा आता
नाही तर 2029 नका करू फक्त
सारखं RR च कारण देत होते राव
💯11❤2🔥2
सर्वप्रथम Engineers Association च्या सर्व Admins चे मनापासून आभार आणि अभिमान व्यक्त करतो. 🙏

आम्ही डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, तुमचा मनापासून आदर करतो आणि तुमचा अभिमान वाटतो.

Engineers Association ने विद्यार्थ्यांसाठी उभं केलेलं हे व्यासपीठ केवळ एक Telegram चॅनेल नाही, तर हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास आहे.

तुम्ही गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांसाठी जे काम केलं, ते खरंच कौतुकास्पद आहे. अनेक अशक्य वाटणारे प्रश्न मार्गी लागले, विविध भरतींचा सातत्याने पाठपुरावा झाला, विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तेव्हा हा प्लॅटफॉर्म त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. हजारो इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचं काम या चॅनेलने केलं.

म्हणूनच एक नम्र विनंती आहे...

हा चॅनेल डिलीट करू नका.

उद्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोण करणार?

इथेच तर राज्यभरातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी एकत्र जोडले गेले आहेत. याच चॅनेलमधून भरतीसाठी काय करायचं, कोणता पाठपुरावा करायचा, विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर त्याविरोधात कसं उभं राहायचं, याची माहिती मिळते.

हा फक्त Telegram चॅनेल नाही, तर प्रत्येक इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा एकत्रित आवाज आहे.

संघर्ष अजून संपलेला नाही... अजून खूप काम बाकी आहे. अनेक विभागांच्या जाहिराती यायच्या आहेत, अनेक भरतींचा पाठपुरावा करायचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अजूनही लढायचं आहे.

आज हा एक मोठा प्लॅटफॉर्म संपला, तर विद्यार्थी पुन्हा विखुरले जातील. एकजूट कमी होईल, सामूहिक आवाज कमकुवत होईल आणि भविष्यातील लढे लढणं अधिक कठीण होईल.

ही केवळ विनंती नाही, तर हजारो इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या भावना आहेत.

एकजूट जपा... हा आवाज जिवंत ठेवा.
❤26🙏2💯2🔥1
आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार MPSC च्या ऑनलाइन (CBT) परीक्षा फक्त सरकारी केंद्रांवरच नाही, तर खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रनिकेतने यांनाही परीक्षा केंद्र म्हणून वापरले जाऊ शकते. तसेच तांत्रिक सेवा पुरवठादार संस्थांची (TCS Ion, private centers ) CBT केंद्रे देखील वापरली जातील. 😐

Join @mpsc_learner
😢13❤3🤯3😱2🕊1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «11 May च्या मेसेजमध्येच आपण सांगितलं होतं की,भविष्यात MPSC परीक्षा TCS मार्फतच होण्याची शक्यता आहे. कारण टेंडरची प्रक्रिया खूप आधीपासूनच सुरू झाली होती आणि त्या प्रत्येक घडामोडीवर आपली बारकाईने नजर होती. आता सध्याची परिस्थिती पाहता MPSC हा निर्णय बदलण्याची…»