MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
534 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
Online आहे CBT ✅
file (57).pdf
30.6 MB
♦️ गट क 2026 जाहिरात.

Join 👉 @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
सध्या तरी अधिकृतपणे “सर्व परीक्षा onlineच होतील” अशी final confirmation आलेली नाही. पण शासनाचा GR + MPSC चे हे मोठे technology-based tender पाहता, सरळसेवा परीक्षा online पद्धतीनेच घेण्याची दिशा स्पष्ट दिसत आहे.
MPSC हळूहळू ऑनलाइन (Computer Based Test) मोडकडे वळणार, हे आधी पासूनच माहिती होतं.

आता आयोगाकडून विविध परीक्षांसाठी Computer Based Examinations (CBT), ऑनलाइन सुविधा आणि संबंधित व्यवस्था टप्प्याटप्प्याने वाढवली जात आहे.
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
या PDF मधून अप्रत्यक्षपणे तरी हे स्पष्ट दिसतं की MPSC मोठ्या प्रमाणावर सरळसेवा परीक्षा स्वतःच्या नियंत्रणाखाली घेण्यासाठी तयारी करत आहे. कारण PDF मध्ये : एकाच परीक्षेसाठी १४७५ sub-centres, १९ हजारांपेक्षा जास्त rooms आणि लाखो उमेदवारांचा उल्लेख आहे. biometric…
MPSC कडून भविष्यात गट-ब, गट-क सरळसेवा भरतीही टप्प्याटप्प्याने ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. आयोगाकडून ऑनलाइन प्रणालीचा वापर सातत्याने वाढवला जात असून, आगामी काळात भरती प्रक्रिया CBT माध्यमातून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
❤2
📢 MPSC कडून महत्त्वाचा निर्णय (सन २०२७ पासून लागू)

✅ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा आणि गट-क पूर्व परीक्षा आता वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा घेतल्या जाऊ शकतात.

💻 महत्त्वाचे: यापुढे या तिन्ही पूर्व परीक्षा Group A, Group B आणि Group C आता CBT (Computer Based Test) म्हणजेच Online स्वरूपातच घेतल्या जातील.

📊 जर परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये झाली, तर Normalization पद्धतीने गुणांचे समानीकरण करण्यात येईल.

🎯 संबंधित वर्षातील कोणत्याही एका पूर्व परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार त्या वर्षाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील. मुख्य परीक्षा मात्र वर्षातून एकदाच होईल.

➡️ तसेच उमेदवारांना वर्षातून एकापेक्षा अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
भविष्यात राजपत्रित पदांच्या परीक्षाही online वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीने झाल्या, तर आश्चर्य वाटणार नाही. 🌚 लक्षात असू द्या.
थोड्याच वेळापूर्वी सांगितलं होतं... आणि लगेचच त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब! 😅✅

राज्यसेवा पूर्व परीक्षा सुद्धा आता ऑनलाइन (CBT) स्वरूपातच होणार.
आज मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे येणार आहेत. आ. अभिमन्यू पवार साहेब देखील सकाळी 11:00 वाजता विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने भेटीसाठी तिथे उपलब्ध असतील. यावेळी ते गट-क ऑफलाईन मागणीबाबत मा. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करतील. मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मागणीची तीव्रता दाखवून द्या.
👉आयोगाची 4:00 वाजता पत्रकार परिषद..
Media is too big
VIEW IN TELEGRAM
"कांगणे सर चांगलेच पेटले!" 🔥
📢 No TCS, No IBPS!

आगामी MPSC CBT परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत होणार नाही.

✅ परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे MPSC च्या नियंत्रणाखाली असेल. ✅ C-DAC हे केवळ CBT चे तांत्रिक सहाय्य व परीक्षा केंद्रांचे Security Audit करणार आहे.

परीक्षेनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची Response Sheet त्याच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

म्हणजेच, MPSC + C-DAC = CBT परीक्षा


Join @mpsc_learner
पुढील तीन महिन्यांत आणखी ८१ संवर्गाच्या परीक्षा CBT पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहेत. 🔥💯✅
मुख्य परीक्षा ही एकाच सत्रा मध्ये झाली तर Normalisation होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ✅
भारतीय घटना समितीचे (Constituent Assembly) सचिव कोण होते?
Anonymous Quiz
32%
एच. व्ही. आर. अय्यंगार
35%
बी. एन. राव
18%
एस. एन. मुखर्जी
15%
डॉ. राजेंद्र प्रसाद
आमचा प्रश्न अत्यंत साधा आहे – उमेदवार मोबाईल परीक्षा हॉलमध्ये घेऊन गेलाच कसा? सुरक्षा तपासणी झाली होती का? झाली असेल तर मोबाईल सापडला का नाही? आणि फोटो काढण्याइतका वेळ त्याला मिळालाच कसा?

जॅमर हा मोबाईल आत जाण्यापासून रोखत नाही. मोबाईल परीक्षा हॉलमध्ये पोहोचणे ही स्वतःमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी आहे.

आज एका उमेदवाराचा फोटो समोर आला. मग अशाच प्रकारे आणखी किती उमेदवार मोबाईल घेऊन आत गेले असतील? जर एका उमेदवाराला मोबाईल नेता आला, तर संबंधित केंद्रावर इतरांनाही अशीच संधी मिळाली नाही, याची खात्री PMC कोणत्या आधारावर देत आहे?

देशभरातील अनेक भरती परीक्षांमध्ये तांत्रिक साधनांचा वापर करून गैरप्रकार झाल्याची प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. मायक्रो Bluetooth इयरपीस (नॅनो इयरपीस), Bluetooth कॉलर/नेकबँड, SIM आधारित डिव्हाइस, स्पाय कॅमेरे, स्मार्टवॉच, तसेच मोबाईलद्वारे प्रश्नांचे फोटो बाहेर पाठवून उत्तरे मिळवण्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले आहेत. त्यामुळे "जॅमर होता, म्हणजे गैरप्रकार अशक्यच होता" हा दावा स्वतःमध्ये पुरेसा ठरत नाही.

याहूनही गंभीर प्रश्न म्हणजे – उमेदवार मोबाईल फक्त फोटो काढण्यासाठीच घेऊन आला होता का? त्याला अशा ठिकाणी बसवण्यात आले होते का, जिथे मोबाईल वापरूनही कोणाचे लक्ष जाणार नाही? मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून बाहेर संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला नव्हता, हे PMC कोणत्या तपासाच्या आधारे सांगत आहे?

म्हणूनच या प्रकरणात केवळ त्या उमेदवाराची चौकशी करून. संबंधित परीक्षा केंद्राची सुरक्षा व्यवस्था, प्रवेश तपासणी, CCTV फुटेज, ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची भूमिका आणि संपूर्ण घटनाक्रमाची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

प्रश्न फक्त एका फोटोचा नाही; प्रश्न आहे लाखो उमेदवारांच्या परीक्षा प्रक्रियेवरील विश्वासाचा.