MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
MES Pre 2026 cut off
मिळालेल्या माहितीनुसार MJP JE चा निकाल लवकरच लागणार आहे. ✅

निकालाचे Editing होऊन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे समजते. PMC आणि MJP CEA मध्ये झालेला गोंधळ पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात असून, वॉटरमार्क Edit करणे, Excel शीटमध्ये Data नीट लावणे, Properties, digital sign आणि निकाल व्यवस्थित दिसावा यासाठी विभागाकडून "युद्धपातळीवर" काम सुरू आहे. 😄

म्हणूनच निकालाला थोडा उशीर होत असला तरी काळजी करू नका, विभाग यावेळी गोंधळ होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेत आहे... अशी आशा करूया!


Join @mpsc_learner
👏1
मित्रांनो,

मी आत्ताच अँटी करप्शन ब्युरो (ACB) कार्यालयाशी संपर्क साधला. PMC संदर्भातील संपूर्ण प्रकरण त्यांच्यासमोर मांडले. त्यावर त्यांनी सांगितले की ACB प्रामुख्याने भ्रष्टाचार आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित प्रकरणांमध्ये कारवाई करते. जर लाचखोरी, पैशांची देवाणघेवाण किंवा भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असतील, तरच ते थेट हस्तक्षेप करू शकतात.

तसेच त्यांनी स्पष्ट केले की ACB ही स्वतंत्र यंत्रणा आहे आणि ती कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाखाली काम करत नाही. तक्रारीतील तथ्ये आणि पुरावे यांच्या आधारेच कारवाई केली जाते.

या प्रकरणात त्यांनी आम्हाला पुणे सायबर क्राइम विभागाकडे अधिकृत तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, सायबर क्राइम विभाग देखील स्वतंत्रपणे काम करतो आणि प्राप्त तक्रारीतील पुराव्यांच्या आधारे आवश्यक ती चौकशी व कारवाई करतो.
त्यांनी असेही सांगितले की, जर सायबर क्राइम विभागाकडून योग्य मदत मिळाली नाही किंवा पुढील टप्प्यावर भ्रष्टाचाराशी संबंधित बाबी समोर आल्या, तर पुन्हा ACB शी संपर्क साधावा.

म्हणून सर्व संबंधित विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना विनंती आहे की या विषयात सक्रिय सहभाग घ्यावा, उपलब्ध पुरावे गोळा करावेत, अधिकृत तक्रारी दाखल कराव्यात आणि संबंधित यंत्रणांपर्यंत हा मुद्दा पोहोचवावा. जितक्या जास्त प्रमाणात लोक अधिकृतरीत्या आवाज उठवतील, तितकी निष्पक्ष चौकशी होण्याची शक्यता वाढेल.

धन्यवाद.
👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
मित्रांनो, मी आत्ताच अँटी करप्शन ब्युरो (ACB) कार्यालयाशी संपर्क साधला. PMC संदर्भातील संपूर्ण प्रकरण त्यांच्यासमोर मांडले. त्यावर त्यांनी सांगितले की ACB प्रामुख्याने भ्रष्टाचार आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित प्रकरणांमध्ये कारवाई करते. जर लाचखोरी, पैशांची…
योग्य वेळ आणि योग्य साथ मिळाली तर सगळ्यांना उघडं करू. यासाठी आम्हाला विद्यार्थ्यांच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे.

आजपर्यंत जे कधी घडलं नाही, तेही घडेल. या घोटाळ्यामागे जे जे आहेत, त्यांना उघडं केल्याशिवाय शांत बसायचं नाही. मग तो कोणीही असो. कोणालाही सूट दिली जाणार नाही.

आता फक्त या विषयावर मोठा दबाव निर्माण करण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या पातळीवर प्रयत्न करा. अधिकाधिक लोकांनी आवाज उठवला, तक्रारी केल्या आणि हा विषय पुढे नेला, तर सत्य बाहेर येणं सोपं जाईल.

हा विषय अधिवेशनात मांडला गेला तर आपलं काम आणखी सोपं होईल. बाकी, जेवढं शक्य आहे तेवढे प्रयत्न सुरू आहेत. आपणही आपल्या पातळीवर प्रयत्न सुरू ठेवा. ✊
सायबर क्राइमच्या हेल्पलाईन नंबरवर Call, WhatsApp किंवा Message करून तक्रार नोंदवा. हा मुद्दा जास्तीत जास्त प्रमाणात संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

निवेदनाचा Draft, तसेच उपलब्ध Photo, PDF आणि इतर सर्व पुरावे WhatsApp नंबरवर पाठवा. प्रत्येक पुरावा महत्त्वाचा ठरू शकतो.

अँटी करप्शन ब्युरो (ACB) शी थेट चर्चा झाली असून त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. आवश्यक पुरावे आणि तथ्ये उपलब्ध झाल्यास पुढील कारवाईसाठी ते तयार आहेत.

प्रत्येकाने आपल्या पातळीवर प्रयत्न सुरू ठेवा. जितक्या जास्त तक्रारी आणि निवेदने जातील, तितक्या गंभीरपणे या प्रकरणाची दखल घेतली जाण्याची शक्यता वाढेल.

PMC आधीपासूनच अँटी करप्शन ब्युरो (ACB) च्या रडारवर आहे. त्यामुळे आपला मुद्दा सायबर क्राइम विभागापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवा. प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता, पुढील स्तरावर ACB चा सहभाग देखील मिळेल.
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
PMC निकालातील PDF एकदा नीट तपासा. PDF Producer मध्ये iLovePDF दिसत आहे, तर इतर IBPS/MIDC निकालांच्या PDF मध्ये "Issued By" मध्ये company che नाव आणि proper digital signature verification दिसते. MIDC निकालात प्रत्येक पानावर digital signature असून ते verify…
PMC PDF edited, properties mismatched, watermark edited आणि digital sign unverified असल्याचे पुरावे आधीच अपलोड केले आहेत. हा फोटो/इमेज देखील अतिरिक्त पुरावा म्हणून WhatsApp वरती टाका. ✅
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
WhatsApp नंबरवर उपलब्ध पुरावे, फोटो, PDF तसेच निवेदन पाठवा. 7058719375 7058719371
प्रति,
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
सायबर क्राइम पोलीस स्टेशन,
शिवाजीनगर, पुणे – 411005.

विषय : PMC भरती परीक्षेमध्ये झालेल्या कथित गैरप्रकार व अनियमिततेची चौकशी करून परीक्षा रद्द करून नव्याने घेण्याबाबत.

महोदय,

आम्ही PMC भरती परीक्षेचे उमेदवार असून सदर परीक्षेच्या संदर्भात काही गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, ही विनंती.

निदर्शनास आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे :

१. परीक्षा गोपनीयतेचा भंग :
परीक्षा सुरू असतानाच CBT परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे परीक्षेच्या गोपनीयतेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे.

२. निकालातील संशयास्पद फेरफार :
परीक्षा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालाच्या PDF दस्तऐवजात फेरफार (Editing), Properties Mismatched, Watermark Edited तसेच Digital Signature Unverified असल्याचा व्यक्त केला जात आहे. या संदर्भातील सर्व डिजिटल नोंदी, लॉग्स व संबंधित तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात यावी.

३. निकाल प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव :
सदर परीक्षा IBPS मार्फत घेण्यात आली असली तरी निकाल प्रसिद्ध करण्याची पद्धत IBPS च्या नियमित निकषांनुसार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निकाल प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

४. भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने परीक्षा घेणे :
वरील बाबींची सखोल चौकशी करून गैरप्रकार सिद्ध झाल्यास सदर भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी व उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी नव्याने परीक्षा घेण्यात यावी.

वरील सर्व बाबींची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आवश्यक असल्यास संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे तांत्रिक व प्रशासकीय ऑडिट करण्यात यावे, ही विनंती.

आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे.

धन्यवाद.

आपला विश्वासू,

PMC भरती परीक्षेचे उमेदवार
Forwarded from Civil Maharashtra
🔴 जवळपासच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या..
कन्हैया कुमारजी आलेले आहेत...
Press चालू होईल आता...