MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
India is ranked 127th out of 163 countries in the 2026 Global Peace Index (GPI)
Ministry of Education, Govt Of India

#Telegram Restricted For 2 Days

● 21 & 22 जून NEET परीक्षा काळात

● 30 तारीख पर्यंत Messages Edit करता येणार नाहीत एकदा टाकलेले

● बाकी त्यानंतर टेलिग्राम सुरूच राहील बंद नाही होणार

⚠️ कायमचे बॅन नाही, फक्त NEET परीक्षा सुरक्षित व्हावी म्हणून तात्पुरती बंदी आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाचे सुधारित सेवाप्रवेश नियम (RR) अंतिम झाल्यानंतर भरतीबाबत निर्णय घेण्यात येईल

RR लवकर मंजूर होणे गरजेचे आहे.
PMC विभागाला वाटलं असेल की मुलांना काही कळणार नाही, आणि कळलं तरी हे Civil चे विद्यार्थी काही करणार नाहीत. प्रत्येक वेळी शांत बसतील. पण आता तसं होणार नाही.

विद्यार्थ्यांच्या मनात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या उमेदवाराला BMC च्या निकालात -1 दाखवण्यात आलं होतं, त्याच उमेदवाराला PMC च्या निकालात 177 गुण कसे दिसतात? यामागचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे?

याहून मोठा प्रश्न म्हणजे निकालाची PDF तपासल्यानंतर तिच्या Properties मध्ये iLovePDF आणि Microsoft Excel चा वापर झाल्याचे तपशील दिसत आहेत. जर निकाल पूर्णपणे अंतिम आणि अधिकृत स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला असेल, तर PDF वर अशा प्रकारच्या processing आणि editing च्या नोंदी का दिसतात? याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट खुलासा करावा.

तसेच, प्रसिद्ध करण्यात आलेल्या PDF मधील Digital Signature सुद्धा verify होत नाही. त्यामुळे उमेदवारांनी या दस्तऐवजाची authenticity नेमकी कशी तपासायची? अधिकृत निकाल असल्यास Digital Signature वैध आणि verify होणं अपेक्षित असतं. सध्या उपलब्ध PDF ही केवळ edit copy असल्यासारखी दिसत आहे, त्यामुळे याबाबतही संबंधित विभागाने स्पष्ट स्पष्टीकरण द्यावं.

हा मुद्दा आधीच अनेक न्यूज चॅनलपर्यंत पोहोचला आहे. आता तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. कारण हा फक्त काही विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही, तर हजारो उमेदवारांच्या भविष्याचा आणि भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा प्रश्न आहे.

जर सर्व काही नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने झालं असेल, तर सर्व शंकांचं अधिकृत स्पष्टीकरण देण्यात कोणतीही अडचण नसावी. विद्यार्थी फक्त सत्य आणि पारदर्शकता मागत आहेत.

सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावं, आपली उपस्थिती दाखवावी आणि हा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. प्रश्न विचारणं हा प्रत्येक उमेदवाराचा अधिकार आहे.

✊ न्याय, पारदर्शकता आणि सत्यासाठी आवाज उठवा!
महत्त्वाचे Study PDF पाहायचे असतील किंवा Telegram वर काही आवश्यक काम असेल, तर Turbo VPN App वापरून Telegram वापरू शकता.

सध्या NEET परीक्षेमुळे 30 जूनपर्यंत Telegram चा सर्व्हर काही वेळा डाउन असल्यासारखा वाटू शकतो, त्यामुळे अडचण आल्यास VPN चा पर्याय वापरा. 👍🏻
🔴 MES 2026 🔴

Total = 2️⃣0️⃣ Post
PMC exam center madhe Mobile
#csmc exam pattern

✅Apti/reasoning both mentioned
✅No negative
✅Section timer with mix question
✅Normalisation
✅40 tech 60 non tech

✅IBPS pattern

Join @mpsc_learner
2026 ची महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (combine) पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहेत."

म्हणजे सध्या जो अभ्यासक्रम आहे, त्यावरच group c combine 2026 ची परीक्षा होणार आहे.
🚨 PMC JE भरती प्रकरण – आजची निर्णायक उपस्थिती आवश्यक! 🚨

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

आज आपल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर सर यांची भेट घेऊन भरती प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे मुद्दे मांडले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अविनाश साळवे, सरचिटणीस भाऊसाहेब अजबे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत IBPS Format Result आणि Normalization संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, PMC–IBPS करारानुसार निकाल Normalization प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आला आहे.

यानंतर माजी महापौर प्रशांत दादा जगताप यांच्याशीही सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:

📌 काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडवर CP Office / शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

📌 टेलिग्राम आणि WhatsApp वर व्हायरल झालेल्या छायाचित्रांची Digital Forensic तपासणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

📌 DV List ला तात्पुरती स्थगिती, तसेच DV List मधील उमेदवार आणि Top 300 उमेदवारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

📌 हा संपूर्ण विषय सोमवारी होणाऱ्या General Body Meeting मध्ये अधिकृतपणे उपस्थित करण्यात येणार आहे.

⚠️ आता सर्वात महत्त्वाची गोष्ट...

या लढ्याचे यश विद्यार्थ्यांच्या एकजुटीवर आणि उपस्थितीवर अवलंबून आहे.

🕙 आज सकाळी १०:०० ते १०:३० पर्यंत सर्वांनी PMC येथे उपस्थित राहावे.

🕚 ११:०० ते १२:०० या वेळेत प्रशांत दादा जगताप यांनी विद्यार्थ्यांसाठी वेळ दिली आहे.

आज आपण उपस्थित राहिलो, तरच आपल्या मागण्यांना अधिक बळ मिळेल आणि हा विषय प्रशासन व General Body Meeting समोर प्रभावीपणे मांडला जाईल.

🙏 प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः उपस्थित राहावे आणि इतरांनाही सोबत घेऊन यावे. आपल्या भविष्याशी संबंधित या प्रश्नासाठी एकजूट दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

frwd
📌पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) या पदाच्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकार बाबत आज विद्यार्थ्यांच्या वतीने शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले...